• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

धारावी, दादर, माहीममध्ये कोरोनाविरोधात जोरदार मोहीम

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 18, 2021
in घडामोडी
0
राज्यातील 4 हजार शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्य़ांना कोरोना

मुंबईतील काही भागांत कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेली धारावी आणि त्याला लागून असलेल्या दादर-माहीम परिसरात मात्र आजही कोरोनाची रुग्णसंख्या 10 पेक्षा कमी आहे. तरीही धारावी, दादर आणि माहीम परिसरात कोरोनाविरोधात निर्जंतुकीकरण, चाचण्या आणि जनजागृती या तीनही पातळ्यांवर जोरदार मोहीम सुरू आहे.

मुंबईत कोरोनाविरोधात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले असले तरी काही भागांत गेल्या 8 ते 10 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या ही 8 टक्क्यांनी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या जी/उत्तर विभागातर्फे जोरदार मोहीम हाती घेण्यात सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार निर्जंतुकीकरण तसेच कोरोना चाचण्या आणि जनजागृतीत आणखी मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत विभागीय स्तरावर कोरोना चाचण्यांचे प्रमाण रुग्णवाढीचा दर लक्षात घेऊन वाढवले जात आहे. धारावीसारख्या झोपडपट्टीच्या भागात तसेच दादर, माहीममधील अधिक जोखीम असलेल्या क्षेत्रात फिरत्या वाहनामार्फत कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. दादर, धारावी, माहीम क्षेत्रातील व्यापारी आस्थापनांमधील मालक, चालक तसेच इतर कर्मचारी वर्गाची तपासणी करण्यात येत आहे. जी/उत्तर विभाग व स्नेहा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन झीरो’ कार्यक्रम राबवला जात आहे. कोरोना गेला नसल्याने सतत हात धुणे, मास्क लावणे आणि सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे. या गोष्टींची जनजागृती मायकिंगद्वारे करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचणी अनिवार्य केली गेली आहे तसेच पॉझिटीव्ह आल्यास रुग्णालयात व निगेटिव्ह आल्यास 7 दिवस गृहविलगीकरण अनिवार्य करण्यात येत आहे. दादर रेल्वे स्थानकावर गुजरात तसेच इतर राज्यांमधून येणाऱया रेल्वे प्रवाशांची रेल्वे स्थानकावर स्क्रिनिंग व कोरोनासदृश लक्षणे असणाऱया प्रवाशांची मोफत चाचणी करून पॉझिटीव्ह आल्यास विलगीकरणासाठी विलगीकरण कक्षात पाठवण्यात येत आहे, अशी माहिती जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

 

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

फक्त प्रेम पुरेसे नाही़…

Next Post

बॅग भरो, निकल पडो… पर्यटनाला चला आता कॅरॅव्हॅनमधून

Next Post
बॅग भरो, निकल पडो… पर्यटनाला चला आता कॅरॅव्हॅनमधून

बॅग भरो, निकल पडो… पर्यटनाला चला आता कॅरॅव्हॅनमधून

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.