नमस्कार ,
सस्नेह जय महाराष्ट्र

या वर्षी मार्मिकने हीरक महोत्सव साजरा केला. मार्मिक म्हणजे शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्याच्या धारधार फटकाऱ्यातून साकारलेली मराठी जनांसाठीची चळवळ. ज्याने पुढे शिवसेना नावाच्या तेजस्वी इतिहासाला जन्म दिला. निद्रिस्त समाजाला जागे करीत बाळासाहेब अन्यायाविरोधात लढण्यासाठी कुंचल्याच्या शस्त्रासह लढते झाले.
मार्मिकने ६० वर्षांची ही लढाई लढत ‘ एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक’ अशी आपली ओळख कायम ठेवली आहे.
मार्मिक हे केवळ एक साप्ताहिक नाही, तर तो बाळासाहेबांचा विचार जागृत ठेवणारे एक व्यासपीठ आहे. बाळासाहेबांनी सुरू केलेली व्यंगचित्र कलेची परंपरा आहे.
त्याच प्रेरणेतून बाळासाहेबांचा वारसा पुढे नेत आम्ही मार्मिकला नवीन स्वरूप देण्यासाठी सज्ज झालो आहोत.
बाळासाहेबांचा आशीर्वाद सदैव सोबत असेलच ! आता आपल्याला या मार्मिकच्या पालखीचे भोई व्हायचे आहे, बाळासाहेबांची ही व्यंगचित्रकला, परंपरा अबाधित राखण्यासाठी.
मार्मिकचा आत्मा असलेली व्यंगचित्रे नव्या मार्मिकच्या देखील केंद्रस्थानी असतील, शिवाय सोबतीला असतील प्रख्यात लेखक, विचारवंतांचे लेख आणि परखड विचारमंथन. त्यासोबत असेल बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांच्या आठवणींना उजाळा.
मार्मिकला साता-समुद्रापलिकडील मराठी माणसापर्यंत पोहोचवणारे हे सीमोल्लंघन आहे.
बाळासाहेबांची परंपरा पुढे नेणाऱ्या
या फटकाऱ्यांच्या नव्या रुपाला तुम्ही उदंड प्रतिसाद द्याल आणि नव्या मार्मिकलाही आपलेसे करून या नव्या चळवळीचे नवे शिलेदार व्हाल, अशी अपेक्षा.
अखिल विश्वात मराठी आणि महाराष्ट्राचा झेंडा फडकावित असलेल्या अनिवासी महाराष्ट्रीय बंधू-भगिनी साठी मार्मिक विशेष उपक्रम सादर करणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र धर्म वाढवीत महाराष्ट्राची गौरव गाथा अखिल विश्वात पाचही खंडांमध्ये पोहोचविण्यासाठी मार्मिक सज्ज झाला आहे. महाराष्ट्र धर्माच्या या उत्सवात आपणही उत्साही सहभाग नक्कीच नोंदवाल!
मार्मिकची वार्षिक वर्गणी फक्त ६०० रुपये आहे. आपण आपल्या मित्र परिवार, आप्तेष्टांना मार्मिक वार्षिक वर्गणी सभासदत्व भेट देऊन बाळासाहेबांच्या या व्यंगचित्र परंपरेचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यास मोलाचा हातभार लावाल, हा विश्वास.
आई जगदंबेच्या आशीर्वादाने नव्या मार्मिकसोबत पुन्हा नव्या मार्मिक साठी सज्ज होऊ या!

आपले,

प्रबोधन प्रकाशन