समाज एकसंध ठेवण्यासाठीचा संदेश असलेले ‘हिंदुइझम बियॉण्ड रिच्युअलिझम’ हे पुस्तक नवीन पिढीसाठी निश्चित प्रेरणादायी ठरेल. या पुस्तकाद्वारे वाचकांना नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथील सभागृहात पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार म्हणाले, पुस्तकाचे लेखक विनीत अग्रवाल हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांनी अतिशय विचारपूर्वक व मेहनतीने हे पुस्तक लिहिले आहे. सर्वांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात आपण काम करीत असलो तरी मनात लपलेला लेखक वेळात वेळ काढून लिहितोच. समाजात वावरत असताना पडलेले विविध प्रश्न, त्याचे उत्तर शोधण्यामागची धावपळ, ही यामागील प्रेरणा आहे. यावेळी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच लेखक तथा प्रधान सचिव विनीत अग्रवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.