• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य

- भास्कर आचार्य (कालावधी : १५ ते २१ जुलै २०२३)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 14, 2023
in भविष्यवाणी
0

ग्रहस्थिती : बुध वृषभ राशीत, मंगळ-शुक्र कर्केत, केतू तुळेत, हर्षल-राहू-गुरु मेष राशीत, नेपच्युन मीन राशीत, प्लूटो मकर राशीत, शनि कुंभेत. विशेष दिवस : १५ जुलै शनि प्रदोष, शिवरात्री. १७ जुलै दीपपूजा, दर्श सोमवती अमावस्या. १८ जुलै अधिक श्रावण सुरुवात.

 

मेष : काहीजणांचे मोठे भाग्योदय होतील. तरुणांना संधी चालून येतील. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. नवी वास्तूच्या नियोजनाला गती मिळेल. कर्ज प्रकरणे, विद्यार्थ्यांची कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात धनलाभ होतील. कोणावर अतिविश्वास टाकू नका. आर्थिक शिस्त ठेवा. मुलाच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. व्यावसायिकांची बरकत होईल.

वृषभ : शुभघटनांमुळे उत्साह वाढेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. महागड्या वस्तूची खरेदी होईल. जुने येणे वसूल होईल. व्यावसायिकांचे काम वाढेल. नव्या ऑर्डर येतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. कागदपत्रे न पाहता सही करू नका. वाद टाळा. सार्वजनिक जीवनात अरेला का रे करू नका. संगीतकार, कलाकारांना नव्या संधी मिळतील. नव्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याआधी योग्य विचार करा.

मिथुन : नोकरीतल्या पेचप्रसंगांतून सहीसलामत बाहेर पडाल. काहीजणांना नव्या नोकरीच्या संधी मिळतील. काहींना अचानक आलेल्या संधींमधून व्यवसाय सुरु करण्याची कल्पना सुचेल. त्यावर विचारपूर्वक काम करा. कुटुंबातील मालमत्तेसंदर्भातील वाद मार्गी लागतील. शुभघटनांचा अनुभव येईल. व्यावसायिकांना चांगला अनुभव मिळेल. बुद्धीच्या जोरावर नव्या संकल्पना यशस्वी कराल. कामात घाई टाळा. व्यसनाधीनांपासून दूरच राहा.

कर्क : आर्थिक बाजू भक्कम होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. मौजमजेवर खर्च टाळा. वर्षासहलीत भलते साहस नको. विदेशात नोकरी मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. प्रेमप्रकरणात जपून वागा. बोलण्यातून वाद टाळा. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत संयम ठेवा. वरिष्ठांना प्रतिक्रिया देणे टाळा. वादात मध्यस्थी टाळा. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. तरुणांची स्वप्नपूर्ती होईल.

सिंह : विचारपूर्वक निर्णय घ्या. भावनिकता बाजूला ठेवा. नोकरी-व्यवसायात अतिउत्साह टाळा. मनाविरुद्ध घटना घडल्या तरी मन शांत ठेवा. आध्यात्मात मन रमवा. कलाकारांचा उत्कर्ष होईल. व्यावसायिकांनी आर्थिक बाजू सांभाळून काम करावे. खाण्या-पिण्याच्या पथ्यावर नियंत्रण ठेवा. तळलेले पदार्थ खाणे टाळा, पोटाच्या विकारांना निमंत्रण मिळेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. अवास्तव खर्च टाळा. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल.

कन्या : कष्टाला चांगले फळ मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी येईल. वरिष्ठ कामावर खूष राहतील. कामात चूक होऊ देऊ नका. व्यावसायिकांना यश मिळेल. उत्साह वाढेल. नातेवाईक, मित्रमंडळींना आर्थिक मदत कराल. शुभकार्य होईल. फसवणुकीचे प्रकार घडतील. राजकारणात मन:स्ताप होईल. खर्च वाढेल, चिडचिड होईल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. मनाविरुद्ध घटना घडल्याने मानसिक त्रास वाढेल.

तूळ : शुभ घटनांचा अनुभव येईल. बुद्धिवादी, विचारवंत, लेखकांचा सहवास लाभेल. फायदा होईल. घरात काळजीपूर्वक वागा. शब्दाने शब्द वाढू देऊ नका. वडीलधार्‍यांचा आदर ठेवा. व्यावसायिकांना यश मिळेल. सरकारी कर्मचार्‍यांनी नियम पाळावेत. वर्षासहल घडेल. संसर्गजन्य आजार होऊ शकतो, काळजी घ्या. नोकरीत काम परफेक्ट करा, मनस्ताप टाळा.

वृश्चिक : मनासारखी गोष्ट घडेल. आध्यात्मिक कार्यात मन रमवाल. नोकरीत मनाविरुद्ध घटना घडतील, नाराज होऊ नका. विचलित होऊ नका. शेअर, लॉटरी, सट्टा यातून आर्थिक लाभ होतील. त्याच्या आहारी जाऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्या. वेगावर नियंत्रण ठेवा, अपघात टाळा. जुने येणे वसूल होईल. काही व्यावसायिकांना कामगार वर्गाकडून त्रास होईल. वादाचे प्रसंग टाळा.

धनु : घरासाठी वेळ द्याल. आर्थिक नियोजनात चूक करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा, नोकरीत बाहेरगावी जाण्याची संधी मिळेल. काहीजणांना नोकरीनिमित्ताने विदेशात जावे लागेल. कामाचा झपाटा वाढेल. सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, नव्या योजना आकार घेतील. व्यावसायिकांचा आर्थिक ओघ वाढेल. आर्थिक नियोजनात चूक करू नका. काही मंडळींना मनासारखी नोकरीची संधी चालून येईल. दाम्पत्यजीवनात आनंदाचा काळ.

मकर : नव्या नोकरीची संधी चालून येईल. जुगार, सट्टा, शेअर यांच्यापासून लांब राहा. घरातील ज्येष्ठांची, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होतील. काहींना विदेशात उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील. नोकरीत सबुरीने घ्या. व्यावसायिकांनी व्यवहारात पारदर्शीपणा ठेवावा. घरात छोटा समारंभ होईल, नातेवाईक, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. कमी बोला आणि काम करा.

कुंभ : कामाचा ओघ वाढल्याने धावपळ होईल. आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मनासारख्या घटना घडतील, कामाचा उत्साह वाढेल. संशोधन क्षेत्रात उत्तम काळ. पर्यटनाचे प्लॅन ठरतील. कलाकार, पत्रकारांसाठी उत्तम काळ. नव्या ओळखीमुळे अडकलेले काम मार्गी लागेल. संततीकडून शुभवार्ता कळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. नियोजनपूर्वक पैशाचा विनियोग करा. उधार उसनवारी टाळा. काहीजणांना अनपेक्षित धनलाभ होतील.

मीन : चैन, मौजमजेवर वेळ खर्च होईल. व्यावसायिकांना नव्या ऑर्डर मिळतील, लष्कर, पोलीस कर्मचार्‍यांना चांगला अनुभव येईल. नोकरीच्या ठिकाणी चांगली स्थिती राहील. बढती, पगारवाढीचे योग आहेत. शेतीविषयक व्यवसायात चांगला काळ आहे. प्रेमप्रकरणात यश मिळेल. कलाकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना मानसन्मान लाभेल. व्यावसायिकांनी कामानिमित्त प्रवास करताना काळजी घ्यावी.

Previous Post

हे वयच असं असतं…

Next Post

गोची

Next Post

गोची

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.