• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

गाणं ऐकवत गावोगाव

- सचिन परब (प्रबोधन-100)

सचिन परब by सचिन परब
June 30, 2021
in प्रबोधन १००
0
गाणं ऐकवत गावोगाव

थोडासा आधार असता तर प्रबोधनकारांकडे जग बदलण्याची क्षमता होती. पण त्यांच्या आयुष्याचा खूप मोठा काळ गावोगाव फिरून पोटापाण्यासाठी व्यापार आणि विक्री करण्यात गेला. त्याची सुरुवात ग्रामोफोनची गाणी ऐकवणारा फेरीवाला म्हणून झाली.


 

`सीताशुद्धी’ या प्रबोधनकारांच्या नाटकाचे प्रयोग झाल्याचा उल्लेख सापडत नाही. प्रबोधनकारांनीही त्याविषयी काही म्हटलेलं नाही. पण असे प्रयोग झाले असतील, तर त्याविषयीचं एक बारीक निरीक्षण प्रभाकर पणशीकर लिहितात, ते असं, `मारुती आणि वानरसेना, रावण आणि राक्षससेना कोणत्या रंगभूषेत आणि वेषभूषेत वावरत असतील याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर लंकेत उतू जात असलेला उन्माद आणि सत्पक्षाच्या सत्वशीलपणामुळे रामाकडील बाजूचा वाढत जाणारा आत्मविश्वास आणि अंतिम विजय नाटककारानं अचूक पकडला आहे. तत्कालीन रंगभूमीच्या मर्यादा लक्षात घेता २०-२५ फुटांच्या मर्यादेत वरखाली होणार्‍या पडद्यांच्या सहाय्याने गॅसबत्तीच्या उजेडात या नाटकातील समरांगणापासून समुद्रापर्यंतची दृष्यं कशी दाखवली जात असतील? परंतु त्यावेळेचे कलाकार आणि तंत्रज्ञ खूपच वाकबगार होते आणि प्रेक्षक खूपच समजूतदार होते, हेच खरं!’
असं हे `सीताशुद्धी’ नाटक छापण्यासाठी `धी इंडिया पब्लिशिंग कंपनी’ला दिल्यामुळे प्रबोधनकारांना त्याचे साडेतीनशे रुपये रोख मिळाले. ही रक्कम त्यांच्या उत्पन्नाच्या मानाने मोठीच होती. त्यांनी विचार केली ही रक्कम घरी नेली, तर घरखर्चात उडून जाईल. तसंच पैसे आहेत म्हणून आराम आणि आळसात दिवस निघून जातील. म्हणून त्यांनी या भांडवलावर नवीन उद्योग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी केलेला विचार असा होता, `आधी माझ्यासारख्या अखंड धडपड्याच्या हातात उद्योगासाठी थोडेसे का होईना, पण भांडवल येणार कुठून? आता आले आहे, तर ते वार्‍यावर उधळून म्हणजे केवळ सुखेनैव जगण्यासाठी खर्च करणे बरे नव्हे.’
धंदा करणार्‍यासाठी हुनरबाज उद्योजक नवनव्या कल्पनांचा विचार सतत करत असतो. अशी एक कल्पना प्रबोधनकारांच्या डोक्यात बरीच वर्षं घोळत होती. ती म्हणजे गावोगाव फिरून ग्रामोफोनवर गाणी ऐकवण्याची. आवाज रेकॉर्ड करण्याचं आणि नंतर ते ऐकवण्याचं फोनोग्राफ हे पहिलं यंत्र थॉमस अल्वा एडिसनने १८७७ला बनवलं, असं विकिपिडिया सांगतो. या यंत्रात पितळ आणि लोखंडाची नळकांडी असत. ती गोल फिरत आणि त्यात आवाज रेकॉर्ड होई. आवाज ऐकण्यासाठी त्याला टोकाला सुई असलेला भोंगा जोडलेला होता. हा एडिसनचा सिलेंडर फोनोग्राफ भारतात शोधानंतर दुसर्‍याच वर्षी भारतात पोचला. १८७८मध्ये कोलकात्यात त्याचा भारतातला पहिला प्रयोग झाला. एचएमवी कंपनीचे भारतातले पहिले डीलर महाराज लाल अँड कंपनी यांची स्थापना १८९५ची आहे. त्याआधी ते सिलेंडर फोनोग्राफच विकत. ते बांगड्या अडकवण्याच्या लंबगोल नळ्यासारखे दिसत. म्हणून त्याला भारतात बँगल्स असं नाव होतं. प्रोफेसर एच. बोस नावाच्या प्रसिद्ध उद्योजकाने भारतात त्याचं उत्पादनही सुरू केलं होतं. त्याने रवींद्रनाथ टागोरांच्या आवाजातल्या अनेक सिलेंडर रेकॉर्ड बाजारात आणली. त्यातली फक्त वंदे मातरमची रेकॉर्ड आज उपलब्ध आहे.
एमिल बर्लिनर या मूळ जर्मन पण अमेरिकेत राहणार्‍या अवलिया संशोधकाने एडिसनच्या सिलेंडरवरच्या रेकॉर्डिंगच्या जागी डिस्क रेकॉर्ड म्हणजे तबकड्या आणून क्रांती घडवली. आपला हा शोध जगभर पोचवण्यासाठी तो उत्सुक होता. म्हणून त्याने त्याचा मित्र फ्रेडरिक गॅस्बर्ग याला लंडनला पाठवून तिथे एका रेकॉर्डिंग स्टुडियो सुरू केला. गॅस्बर्गने १९०२मध्ये कोलकात्याच्या द ग्रेट ईस्टर्न हॉटेलमध्ये तबकड्यांचा भारतातला पहिला प्रयोग केला. त्यात त्याने गौहर जान आणि त्याच्या तीन दिवस आधी शशीमुखी यांची गाणी रेकॉर्ड केली होती. पण त्याच्याही चार वर्षं आधी म्हणजे १८९८-९९च्या दरम्यान याच गॅस्बर्गने त्याच्या लंडनमधल्या स्टुडियोत काही भारतीयांना गोळा करून त्यांचे आवाज रेकॉर्ड केले होते. त्यात हरनामदास किशनचंद नावाचा एक वीस वर्षांचा शिकाऊ वकील होता, भोलानाथ नावाचा ब्रिटिश लष्करातला तरुण डॉक्टर होता आणि अहमद नावाचा आणखी एकजण होता. त्यांनी रामायण, कुराण आणि गुरुग्रंथसाहेबातल्या पदांचं पठण तसंच मिर्झा गालिबच्या गझलाही रेकॉर्ड केल्या होत्या. पुढे १९०८मध्ये सियालदाह नावाच्या कोलकात्याच्या उपनगरात या ग्रामोफोनच्या तबकड्या बनवण्याचा मोठा कारखानाही उभा राहिला. तो बाजाखाना नावाने प्रसिद्ध होता. तिथे बनलेल्या तबकड्या फक्त भारतातच नाही, तर जगभर जात.


सांगायचा मुद्दा हा की ग्रामोफोनचं तंत्रज्ञान कवटाळण्यात भारताने बिलकुल उशीर केला नाही. प्रबोधनकारांच्या लहानपणीच पनवेलसारख्या खेडेवजा शहरातही हे तंत्रज्ञान पोचलं होतं. धूतपापेश्वर या आयुर्वेदिक औषधं बनवणार्‍या प्रख्यात कंपनीची पनवेलमध्ये स्थापना करणारे विष्णुशास्त्री उर्फ तात्या पुराणिक यांनी पनवेलमध्ये पहिल्यांदा एडिसनचं सिलेंडर फोनोग्राफ यंत्र आणलं. त्यात त्यांनी नवाथे मास्तरांची मेळ्याची गाणी रेकॉर्ड केली. त्याचा प्रयोग पनवेलच्याच नेटिव जनरल लायब्ररीत केला. तिथे प्रबोधनकार हजर होते. आज मात्र या लायब्ररीचा कोणताच ठावठिकाणा लागत नाही.
असाच सिलेंडर फोनोग्राफ घेऊन येणारे फेरीवाले तेव्हा जत्रांमध्ये असत. डॉक्टरांच्या स्थेटेस्कोपसारख्या नळ्या त्याला लावलेल्या असत. त्यातली नळी कानाला लावली की सुरू असलेलं गाणं ऐकता यायचं. दिडकीला एक गाणं, असा दर असायचा. खालापूरचे नारायणराव बेंद्रे नावाचे ठाकरेंचे एक कौटुंबिक स्नेही असंच यंत्र घेऊन पनवेलला आले होते. पनवेलला आजही ख्वाजा पीर करमअली शहाबाबांचा तसंच तक्का परिसरातल्या हजरत जमाल शाह पीर यांचा उरूस उत्साहात भरतो. या उरूसांमध्ये प्रबोधनकारांच्या वडिलांनीच बेंद्रेंना ग्रामोफोनचे स्टॉल उभारून दिले होते. तसंच कल्याणजवळच्या हाजी मलंग बाबांच्या उरूसामध्येही असं दुकान काढून दिलं होतं.
त्यानंतरच्या काळात तबकड्यांचा म्हणजे डिस्कचा ग्रामोफान गाजू लागला. प्रबोधनकारांनी त्यांच्या मुंबई भेटींमध्ये काळबादेवी रोडवर चारपाच दुकानांमध्ये तो पाहिला. त्याच्या फिरणार्‍या तबकड्या, सुया आणि `विशाल जबड्याचा शिंगाडा’ म्हणजे कर्णा यांचं प्रबोधनकारांना आकर्षण होतं. ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी या दुकानांमध्ये गोहरजान, मलकाजान, प्यारासाहेब अशा तो काळ गाजवणार्‍या गायकांची गाणी सुरू असत. ती ऐकण्यासाठी दुकानांसमोर गर्दी व्हायची. प्रबोधनकार सांगतात तसा तो त्या काळातला लोकोत्तर चमत्कारच होता. ते सांगतात, `त्याकाळी त्याचे आबालवृद्धांना वाटणारे आश्चर्य, अचंबा नि कौतुक आजच्या रेडियोच्या युगात सांगणे कठीण आहे.’ अर्थात आज अलेक्साच्या जमान्यात तर ते अधिकच कठीण झालं आहे.
हे सगळं प्रबोधनकारांच्या डोक्यात फिरत होतं. आपणही नारायणराव बेंद्रेंसारखं ग्रामोफोन घेऊन गावोगाव फिरलो तर उत्तम मिळकत होईल, असं त्यांना वाटलं. त्यांनी एक चांगला ग्रामोफोन आणि चार डझन रेकॉर्ड विकत घेतल्या. सुरुवात स्वतःच्या गावातच केली. पनवेलला चारपाच वकिलांच्या घरी कार्यक्रम झाले. त्यातून दहापंधरा रुपये मिळाले. त्यातून त्यांनी हँडबिलं छापून घेतली. त्यावर मजकूर होता, `माणसांसारखे गाणारे, बोलणारे, खदाखदा हसणारे अद्भूत यंत्र. पहाल, ऐकाल तर आश्चर्याने चकित व्हाला.’ त्यांचे विनायककाका निवृत्त झाले होते. त्यांना त्यांनी सोबत घेतलं आणि गावोगाव फिरायला सुरूवात केली.
गावाला पोचलं की हँडबिलं वाटायची. कुणाचं ना कुणाचं तरी आमंत्रण यायचंच. एका मैफिलीची फी पाच रुपये. जमणारे लोक वर्गणी गोळा करून प्रबोधनकारांना देत. लग्नसमारंभ आणि पार्ट्यांमधल्या पंगतीत करमणूक करण्याचं हे नवं माध्यम लोकांना आवडू लागलं होतं. त्यामुळे चांगलं उत्पन्नही मिळू लागलं होतं. प्रबोधनकारांचा बहुतेक प्रवास नाटक कंपन्यांसारखा रेल्वेनेच व्हायचा. गाडीतून उतरताच स्टेशन मास्तरची ओळख व्हायची. तोच सोबत घरी घेऊन जायचा. सरबराई करायचा. कारण आपल्या घरात असलं चमत्कारिक यंत्र आल्याचा त्याला अभिमान वाटायचा. मग तोच गावातली गिर्‍हायकं मिळवून द्यायचा. स्टेशनवर वर्गणी जमवून प्रयोग आयोजित करायचा. मुख्य म्हणजे गार्डशी ओळख करून देत पुढच्या मुक्कामापर्यंत फुकट प्रवासाची व्यवस्थाही लावून द्यायचा.
असा मस्त मजेचा प्रवास करत प्रबोधनकार ग्रामोफोनवर गाणी ऐकवत दक्षिणेला थेट सोलापूर, बार्शी आणि पंढरपूरपर्यंत खूप भटकले. त्या अनुभवाविषयी प्रबोधनकार म्हणतात, `प्राप्तीही बरी झाली. ओळखी सपाटून झाल्या. वाटेत परिचित नाटक मंडळींची गाठ पडल्यावर मग हो काय? घरच आमचे ते. तेथे आडवारी थेटरातही एक ते चार आण्यापर्यंत तिकिटी लावून जाहीर प्रयोग केले. खर्चबिर्च कसला? कंपनी आमचीच.’
आपल्या प्रतिभा आणि कर्तृत्वाच्या जोरावर जग बदलण्याची क्षमता असणारे प्रबोधनकार कुटुंबाच्या जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी गाणी ऐकवत गावोगाव फिरत होते. पोटापाण्यासाठी त्यांनी फेरीवाल्याचं काम स्वीकारलं होतं. ही तर सुरुवात होती. अशाच नवनव्या कल्पना काढून व्यवसाय करत त्यांना आयुष्याचा एक मोठा काळ भटकत राहावं लागलं.

– सचिन परब

(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)

Previous Post

भविष्यकाळाकडे रोखलेली प्रखर दुर्बीण!

Next Post

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

Related Posts

प्रबोधन १००

`प्रबोधन’मधील श्रीधरपंत टिळक

May 8, 2025
प्रबोधन १००

खरा लोकमान्य

May 5, 2025
प्रबोधन १००

सहभोजनाची क्रांती

April 25, 2025
प्रबोधन १००

लोकमान्यांच्या वाड्यावर अस्पृश्यांची स्वारी

April 11, 2025
Next Post
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

भाजपविरोधी जुळवाजुळवीची नांदी!

भाजपविरोधी जुळवाजुळवीची नांदी!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.