• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home फ्री हिट

कतारच्या मैदानावर भावनांचे हिंदोळे…

- पराग फाटक (व्हायरल लेख)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 23, 2022
in फ्री हिट
0
कतारच्या मैदानावर भावनांचे हिंदोळे…
Share on FacebookShare on Twitter

भरुन पावलो असं म्हणावं इतका सुखद अनुभव आपल्यासारख्या किडूकमिडूक माणसांच्या आयुष्यात दुर्मीळतेने येतो. जगभरातल्या अशा असंख्य जनतेला ती अनुभूती देण्याचं काम फुटबॉल वर्ल्डकपच्या फायनलने केलं. हिरव्याकंच कॅनव्हासवर फुटबॉलची नव्हे, पदलालित्याची विलक्षण मैफल रंगली. त्यात नाट्य होतं, वेग होता, थरार होता, उत्कटता होती, निराशा होती, जिद्द होती, विजिगीषु वृत्ती होती. रात्र सरत गेली, मैफलीचे रंग गहिरे होत गेले. एरव्ही साधारणपणे लाथा, लाथाळ्या आणि पाय या सगळ्यांना गुणवत्ता यादीत शेवटाकडलं स्थान असतं. पण आजची रात्र त्या पळणार्‍या पायांसाठी चिरंतन स्मरणात राहील.
एकीकडे होता असा माणूस, जो गेली १५-२० वर्ष धावतोय आणि वेड्यागत गोल करतोय. त्याच्या हसण्यात लहान बाळाची निरागसता आहे. गोट म्हणजे ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ अशी बिरुदावली त्याच्या नावामागे कधीच लागू झाली आहे. पैसे, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेच्या सगळ्या शिखरांवर त्याचं नांदून झालंय. पण एक सल त्याच्या मनात सदैव ठुसठुसत होता. तो म्हणजे देशासाठी फुटबॉल वर्ल्डकप जिंकून द्यायचा. त्याचं नाव हे यशाचं, सातत्याचं आणि विश्वासार्हतेचं प्रतीक बनून राहिलं आहे. काम एकच- गोल करणं. आज तुम्ही त्याला पाहिलं असेल तर गोल करण्यातही इतकं वैविध्य असू शकतं याचं जितंजागतं प्रात्यक्षिक त्याने सादर केलं. धावत धावत जाऊन दाणकन गोल करता येतो, हलकेच जाऊन बॉलला गोलपोस्टमध्ये ढकलता येतं, कधी वाटलं तर अगदी सरपटी वाटावं असाही गोल करता येतो, हे त्याने इतक्या मोठ्या व्यासपीठावर सिद्ध केलं. त्याला पाहून वाटावं की गोल करणं किती मामुली गोष्ट आहे. बिल्डिंगचे दोन मजले चढल्यावर धाप लागणारे आपले पाय मातीचे आहेत आणि मेस्सीच्या पायांना सुवर्णभिंगरी आहे. तो वर्षानुवर्ष खेळतोय. दडपण त्याला नवीन नाही. मोठ्या स्पर्धेचं व्यासपीठही त्याला नवं नाही. देशाची कमान खांद्यावर असणंही त्याच्यासाठी अनोखं नाही. आपल्या सचिनसारखंच. धावांच्या टांकसाळी उघडल्यात. विक्रमांचे पर्वत रचलेत. जगभरातल्या भल्याभल्या बॉलर्सना पुरुन उरलोय, पण वर्ल्डकपचा झळाळता करंडक देशासाठी जिंकू शकलो नाही ही सल सचिनला होती. २ एप्रिल २०११ रोजी तो सल पुसला गेला. सचिनने इतकी वर्षं देशवासीयांच्या अपेक्षांच्या ओझं वागवलं, आज आम्ही त्याला उंचावून अभिवादन करत आहोत, हे विराट कोहलीचे शब्द इतिहासात नोंदले गेले. मेस्सीने सचिनक्षण अनुभवणं नियतीने आजच्या दिवशी लिहून ठेवलं होतं. सचिनप्रमाणेच मेस्सीने आपली ताकद फक्त फायनलमध्ये नव्हे, तर संपूर्ण स्पर्धेत पुरेपूर दाखवून दिली. हा माझा शेवटचा वर्ल्डकप असेल असं त्याने आधीच स्पष्ट केलेलं. विश्वविजेतेपदाच्या कोंदणासह हा गोलिया कॅनव्हासवर बाजूला सरेल. पण त्याची जादू कधीच विस्मृतीत जाणार नाही.
एकीकडे कारकीर्दीचा सूर्यास्त तर दुसरीकडे एम्बापे नावाच्या वल्लीचा झळाळता सूर्योदय. मेस्सीने जो करंडक कमावला तो कमावण्यासाठी एम्बापेने जिवाचं रान केलं. शेरास सव्वाशेर काय असतं हे दाखवून दिलं. मेस्सीच्या गोलवेळी नजाकत पेश करणारे पाय एम्बापेच्या गोलवेळी रांगडेपणाची महती दर्शवतात. अशक्य स्टॅमिना, बॉलवरची भन्नाट पकड आणि गोल करण्याची हातोटी यामुळे एम्बापेला पाहणं म्हणजे एखादा पहाडी आवाजातला पोवाडा ऐकण्यासारखं आहे. ९० मिनिटांपैकी ८० मिनिटं अर्जेंटिनाच्या नावावर होती. पण एम्बापेने हार मानली नाही. एम्बापेच्या व्यक्तिमत्वात आणि खेळात लष्करी खाक्या जाणवतो. त्याचे पाय शिस्तबद्ध रिदममध्ये धावतात. त्याचे गोल एकदम ‘अल्फा टू डेल्टा, ओव्हर अँड आऊट’ असतात. ढिसाळ, गचाळ काहीच नाही. थेट आणि भेदक. गपगार पडलेल्या संघात जान फुंकली एम्बापेने. त्याने विश्वास दिला की आपण टक्कर देऊ शकतो. एम्बापेला पाहून वाटतं, फिटनेस असा असावा राव.
त्या कॅनव्हासवर हे दोघेच पळत नव्हते. असंख्य मंडळी पळत होती. ठरलेली ९० मिनिटं, जादा वेळ, अतिरिक्त वेळ, पेनल्टी शूटआऊट म्हणजे साधारण तीन तास अविश्रांत पळण्याचा कार्यक्रम सुरूच होता. अनेकांना टीव्हीवर पाहूनही दमायला झालं. हे किती सूचक- पळणं म्हणजे हालचाल. मेंदूची, मनाची योग्य हालचाल असेल तर नीट विचार होतो, तद्वत कृतीही होते. पळणं थांबलं तर साचलेपण येते. विचारांना आणि कृतीत शिथिलता येते. वेग कमी झाला की मंदावायला होतं. पळणं आपल्या प्रोसेसमध्ये आहे पण आपल्याला बसणं आवडू लागलंय. ते छातीचा भाता फुटेस्तोवर धावत आहेत, आपण निवांत बसलोय हे असंच तुमचंही होतं का आज? फुटबॉलचं वर्णन ‘पोएट्री इन मोशन’ असं करतात. आजच्या कवितेरुपी मैफलीने काय दिलं तर पळण्याचा धडा दिला. बैठं ठोंबेपण टाकण्यासाठी बळ दिलं. कामाशी इतकं तादाम्त्य व्हावं की कुठल्याही पद्धतीने रचली तरी मोहीम फत्ते व्हावी. लोकांनी विश्लेषणाचा कीस पाडावा, विक्रमांची चर्चा करावी- जेव्हा घडलं ते कसं याचा अचंबा वाटायला हवा. काम तर सगळेच करतात पण ते कसं करावं याचा वस्तुपाठ पुढच्या येणार्‍यांना मिळायला हवा.
मेस्सी, एम्बापे आणि पळत्या मंडळींनी समरसून जगण्याचं आव्हान दिलं आहे. शेवटच्या क्षणालाही बाजी पलवटता येतं हे सातत्याने दाखवून दिलंय. उत्तुंग काही गाठाय्ाचं असेल तर प्रयत्नही त्याच तोडीचे हवेत. सगळ्यात कमी संसाधनं आणि आर्थिक गुंतवणूक लागणारा हा खेळ जगातले सर्वाधिक देश खेळतात. दीडशेपेक्षा जास्त देशातून ३२, त्यातून १६, मग ८, नंतर ४, शेवटचे दोन आणि अंतिम एकमेव हा खंडप्राय प्रवास करुन अर्जेंटिना विश्वविजयी झालंय. ३६ वर्षांपूर्वी जेव्हा अर्जेंटिनाने वर्ल्डकप जिंकला, तेव्हा मेस्सी एक वर्षांचा होता. एका पिढीचं स्वप्न मेस्सीने प्रत्यक्षात साकार केलंय. गोल्डन बॉलचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर जात असताना मेस्सीने पोडियमवर ठेवलेल्या वर्ल्डकपचं चुंबन घेतलं. विश्वविजेतेपदाच्या त्या झळाळत्या करंडकाचं गारुड मेस्सीच्या मनात किती खोलवर आहे हे त्या प्रसंगाने दाखवलं.
सर्वस्व देऊनही हार पदरी पडलेल्या एम्बापेचं सांत्वन करायला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मैदानात उतरले होते. केस विस्कटलेले, कोट व्हीआयपी बॉक्समध्येच राहिलेला, शर्टाच्या बाह्या दुमडलेल्या असे राष्ट्राध्यक्ष आणि विमन्सक स्थितीत बसलेला एम्बापे हे दृश्यही स्मरणात राहील. पराकोटीचा आनंद आणि इतक्या समीप येऊनही हुलकावणी दिल्याने तरळलेले अश्रू- कतारच्या मैदानाने भावनांचे हिंदोळे पाहिले.
या वर्ल्डकपला काळी किनार आहे. २०१०मध्ये कतारला यजमानपद मिळाल्यापासून काळी वर्तुळं अधिकाअधिक मोठी होत गेली आहेत. जवळपास ३०० बिलिअन डॉलर्स इतकी अबब रक्कम खर्च करून कतारने वर्ल्डकप का भरवला? आणि त्यासाठी काय काय केलं याचे तपशील गुगल तुम्हाला देईल. भ्रष्टाचार, हितसंबंधांचं राजकारण, तेलाचं अर्थकारण, स्थलांतरितांचं शोषण, सख्ख्या शेजार्‍यांना चीतपट करण्यासाठी स्पोर्ट्सवॉशिंगचं प्रपोगंडा टूल यांचीच चर्चा सातत्याने होत राहिली. त्याचवेळी वाळवंटात उभी राहिलेली एकापेक्षा एक भव्य स्टेडियम्स, खास मेट्रो ट्रेन्स, विमानतळं, हॉटेलं हे चित्रही जगभर पोहोचलं. फुटबॉल मागे राहिला, बाकी सगळं ढवळून निघालं. चूक कोण, बरोबर कोण, खरं कोण, खोटं कोणं याचा निवाडा होतो आहे, नंतरही होत राहील. कतारची नियती उलगडेलच. पण सरत्या वर्षाचे शेवटचे क्षण आजच्या मैफलीने भारून टाकले. काही तासांसाठी का होईना पडद्यामागल्या वास्तवाचा विसर पडला. भान हरपलं. खेळाची ताकद ही आहे. उद्याचा सूर्य अनुभवताना मंत्रमुग्ध करणारी चांदण्यातली ही मैफल आठवणींची पखरण करेल यात शंकाच नाही.

Previous Post

मेसी अक्षरे रसिके!

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Related Posts

फ्री हिट

नेतृत्वक्षम स्मिथ!

March 23, 2023
फ्री हिट

क्रीडा पत्रकारितेचे भीष्म पितामह

March 16, 2023
लीग आटवा, क्रिकेट वाचवा!
फ्री हिट

लीग आटवा, क्रिकेट वाचवा!

March 16, 2023
फ्री हिट

शर्माजींची शर्मनाक गच्छंति!

February 24, 2023
Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

सॅन्टाचं गाव रोवानियमी

सॅन्टाचं गाव रोवानियमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023

फिशिंग फ्रॉड

March 23, 2023

जेवणातील ऊर्फी जावेद

March 23, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.