• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home फ्री हिट

मेसी अक्षरे रसिके!

- प्रशांत केणी (आप कतार में हैं...)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 23, 2022
in फ्री हिट
0
मेसी अक्षरे रसिके!
Share on FacebookShare on Twitter

ज्याच्या पदलालित्यानं फुटबॉलविश्वावर गारूड केलं, त्याचं मोठेपण विश्वविजेतेपद न मिळवल्यानं अधुरं ठरणार का? फुटबॉलविश्वातील सार्वकालिक सर्वोत्तम म्हणजेच ‘गोट’ (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) महायादीत स्थानापन्न होण्यासाठी त्याला विश्वविजेतेपदाचा शिक्काच फक्त हवा होता. कतारमध्ये त्याने या चर्चांना पूर्णविराम दिला. ३७ क्लब जेतेपदं, सात बलून डोर पुरस्कार, सहा युरोपियन गोल्डन बूट्स, एक कोपा अमेरिका जेतेपद, एक ऑलिम्पिक सुवर्णपदक आणि कदाचित कधीही मोडता येणार नाहीत असे असंख्य विक्रम आणि गोल त्याची कारकीर्द किती देदीप्यमान होती, याचा प्रत्यय घडवतात. त्याच्या चषक दालनात फक्त विश्वचषकाची जागा रिक्त होती. रविवारी लुसेल स्टेडियमवर १२० मिनिटांच्या महाउत्कंठावर्धक संघर्षानंतर तीही भरली गेली. आता पुढील अनेक युगं फुटबॉलजगत एका परिपूर्ण कारकीर्दीची ग्वाही देईल. फुटबॉलवर निस्सीम प्रेम करणार्‍या अर्जेंटिनाला तीन तपांनंतर त्यांचा ‘सुपरस्टार’ लिओनेल मेसीनं हा अत्युच्च आनंद रविवारी मिळवून दिला. ‘हँड ऑफ गॉड’ म्हणून अख्यायिका बनलेल्या दिएगो मॅराडोनाचा वारसा त्यानं चालवला, नव्हे दोन वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतलेल्या त्या महानायकाला एक आगळी श्रद्धांजलीच अर्पित केली.

रोनाल्डोवर मात

‘फिफा’ विश्वचषक अंतिम लढतीला खंडीय महत्त्वही प्राप्त झालं होतं. हा संघर्ष होता फुटबॉल संस्कृतीचा, युरोप आणि दक्षिण अमेरिकेचा. जो अंतिम सामन्यात फुटबॉल रसिकांना खेळाचा उच्च प्रतीचा आनंद देणारा ठरला. शिवाय, युरोपची गेल्या दोन दशकांची मक्तेदारी अर्जेंटिनानं मोडीत काढली. विश्वचषकाआधी मेसी श्रेष्ठ की ख्रिस्तियानो रोनाल्डो, ही चर्चा ऐरणीवर होती. त्यामुळेच अर्जेंटिना विरुद्ध पोर्तुगाल हा अंतिम सामना होईल आणि तो या दोन तारांकित फुटबॉलपटूंमधील श्रेष्ठत्व सिद्ध करणारा ठरेल, असे ठोकताळे बांधले गेले होते. तसा दोघांचाही हा विश्वचषक कारकीर्दीतील अखेरचाच सहभाग ठरण्याची शक्यता असल्यानं जगज्जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसह कोण कारकीर्दीला पूर्णविराम देणार, याकडे जगाचे लक्ष लागून राहिले होते. पण खेळापेक्षा मोठा होऊ पाहणार्‍या रोनाल्डोच्या पोर्तुगालचा सांघिक खेळ मोक्याच्या क्षणी उंचावला नाही. रोनाल्डोचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न जसं अधुरं राहिलं, तसंच अहंकारामुळे त्याची मावळत चाललेली कारकीर्दही डागाळली. उलट जसजशी स्पर्धा पुढे जात होती, तसतसा मेसीचा खेळ बहरत होता. पस्तिशीचा मेसी एखाद्या जुन्या मद्याप्रमाणं अधिक परिपक्वपणे मैदानावर वावरत होता. त्याचं पदलालित्य, प्रतिस्पर्ध्यांचा बचाव भेदण्याचं कसब आणि अचाट क्षमता ही मातब्बर संघांना म्हणूनच डोईजड ठरू लागली. रोनाल्डोप्रमाणे फक्त स्वत:च्याच खात्यावरील गोलपुंजी जमा व्हावी, असा स्वार्थी हेतून मेसीनं कधीच बाळगला नाही. यंदाच्या विश्वचषकात सात गोल आणि तीन गोल सहाय्य अशी कामगिरी त्यामुळेच मेसीला ‘गोल्डन बॉल’चा पुरस्कार मिळवून देणारी ठरली. मेसीने गट साखळीत, उपउपांत्यपूर्व फेरीत, उपांत्यपूर्व फेरीत, उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत अशा प्रत्येक टप्प्यात गोल करीत अद्वितीयतेचा प्रत्यय घडवला.

श्रेष्ठ कोण?

सार्वकालिक सर्वोत्तम ‘गोट’ यादीत सर्वोत्तम कोण, हीसुद्धा तुलना आता होऊ लागली आहे. पण पेले आणि मॅराडोना यांच्याशी मेसीच्या तुलनेत काळ आणि परिस्थिती हे दोन मुद्देसुद्धा महत्त्वाचे ठरतात. ब्राझीलचा पेले हा फुटबॉल जगताला लाभलेला पहिला ‘सुपर स्टार’. १९५६ ते ७७ या कालखंडात उत्तम कमाई करणारा खेळाडू ही ओळख निर्माण करणार्‍या पेलेने एकंदर कारकीर्दीतील ८३१ सामन्यांत ७५७ गोल केले. पेलेशी कुणाची तुलनाच होऊ शकत नाही. कारण चार प्रयत्नांत तो देशाच्या तीन विश्वविजेतेपदांचा (१९५८, १९६२, १९७०) शिल्पकार होता.
जगातील सर्वात सुंदर खेळ (ब्युटीफुल गेम) म्हणून गौरवल्या जाणार्‍या फुटबॉलला लक्षवेधी खेळानं वैभव मिळवून देण्याचं श्रेय पेलेला जातं, तर मॅराडोनाचं प्रतिस्पर्ध्यांचा बचाव भेदण्याचं अचाट सामर्थ्य प्रेक्षणीय होतं. त्यामुळेच फुटबॉलसाठी पेले हे दैवत झालं, तर मॅराडोना देवदूत. १९८६च्या विश्वचषकाचा इतिहास मॅराडोनाच्या पराक्रमाची छाप पाडणारा. मेसीच्या खात्यावरही क्लब आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण ५९२ गोल आणि ३५० सामन्यांत गोल साहाय्य. पण मेसीचं दिव्यत्व क्लब-लीग सामन्यांत अधिक प्रकर्षानं जाणवतं. बार्सिलोनासाठी मिळवलेले चार चॅम्पियन्स लीग चषक त्याच्या कर्तृत्वाची दखल घ्यायला लावतात. त्यामुळे श्रेष्ठत्वाची ही चर्चा पुढील अनेक युगं होतच राहील.

मेसीच्या पावलांवर एम्बापेचं पाऊल

उत्तरोत्तर विश्वचषक स्पर्धेत मेसी आणि किलियन एम्बापे यांच्याच नावाचा दबदबा होता. त्यामुळे मेसी-एम्बापे लढतीत कोण बाजी मारेल, याचं औत्सुक्य होतं. एम्बापेनं अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक झळकावली, यंदाच्या स्पर्धेतील सर्वाधिक आठ गोलसह ‘गोल्डन बूट’ पुरस्कारावर नाव कोरलं. पण गतविश्वविजेतेपद टिकवता न आल्याचं शल्य तो लपवू शकला नाही. मेसीनं बाजी मारली. पण इनमिन २३ वर्षांच्या एम्बापेकडे पेले, रोनाल्डो, मेसीचा वारसा चालवण्याची क्षमता आहे, याकडे दुर्लक्ष करता कामा नये. २०१८मध्ये म्हणजे वयाच्या १९व्या वर्षी तो विश्वचषकात गोल करणारा सर्वात युवा पâुटबॉलपटू ठरला होता. त्या विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं अर्जेंटिनाची वाटचाल खंडित केली, तेव्हा एम्बापेनंच दोन गोल करत महत्त्वाचं योगदान दिलं होतं. अगदी क्रोएशियाविरुद्धच्या अंतिम सामन्यातही एम्बापेनं २५ यार्डांवरील गोलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. एकंदर चार गोलमुळे त्यावेळी ‘फिफा’चा उदयोन्मुख फुटबॉलपटूचा पुरस्कार त्यानं पटकावला होता.

पराभवानं सलामी, ते…

यंदाच्या विश्वचषकातील अर्जेंटिनाची कामगिरी एखाद्या परिकथेसारखीच होती. असंख्य अडचणींनंतर सुखद शेवट झाल्यामुळेच आनंदाचं मोल अर्जेंटिनाच्या खेळाडूंना ठाऊक होतं. या स्पर्धेची सुरुवातच अर्जेंटिनासाठी अपयशी आणि खच्चीकरण करणारी ठरली.
सलग ३६ सामन्यांत अपराजित राहण्याची त्यांची मालिका कतारमध्ये खंडित झाली. २२ नोव्हेंबरला अर्जेंटिनानं विश्वचषकाच्या सलामीच्याच लढतीत सौदी अरेबियासारख्या संघाकडून हार पत्करली, तेव्हा अर्जेंटिना यंदाच्या विश्वचषकाचं जेतेपद मिळवेल, यावर कुणाचाच विश्वास बसला नसता. स्वाभाविकपणे अर्जेंटिनाच्या विश्वचषक तयारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. पण मेक्सिको आणि पोलंडला नामोहरम करत अर्जेंटिनानं गटविजेत्याच्या थाटात साखळीचा अडथळा ओलांडला. उपउपांत्यपूर्व फेरी ऑस्ट्रेलियाला हरवणं त्यांना कठीण गेलं नाही. पण उपांत्यपूर्व फेरीत पेनल्टी शूटआऊटच्या कडव्या प्रतिकारानंतरच नेदरलँड्सचा अडथळा ओलांडता आला. उपांत्य फेरी त्या तुलनेत सोपा पेपर ठरली. लुका मॉड्रिचच्या क्रोएशियावर मात करीत त्यांनी अंतिम लढत गाठली.
धक्कादायक निकालांची नोंद करणार्‍या यंदाच्या विश्वचषकाचा अंतिम सामनासुद्धा तितकाच रोमहर्षक ठरला. मेसी आणि अँजल डी मारियानं मिळवून दिलेली २-० अशी आघाडी ८०व्या मिनिटापर्यंत कायम होती. पण एम्बापेला हे मान्य नव्हतं. लागोपाठच्या मिनिटाला गेलेल्या दोन गोलमुळे त्यानं एकतर्फी वाटत असलेल्या सामन्यात रंगत निर्माण केली. मग अतिरिक्त वेळेतही मेसी-एम्बापेच्या जुगलबंदीनं सामना बरोबरीत सुटला. अखेरीस पेनल्टी शूटआऊटचा थरार एमिलियानो मार्टिनेझच्या पोलादी गोलरक्षणाच्या बळावर अर्जेंटिनानं जिंकला.

सलोनीचं योगदान

अंतिम लढतीत अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल सलोनी आणि फ्रान्सचे दिदिएल देसाँ यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. देसाँ यांनी खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून फ्रेंच यशाची अनुभूत घेतली होती. पण त्याची हॅटट्रीक त्यांना साकारता आली नाही. ३६ वर्षांनंतर प्रथमच, चाळीशीच्या सलोनी यांनी विश्वविजेतेपद जिंकणारा युवा प्रशिक्षक हा बहुमान प्राप्त केला. योगायोगाची बाब म्हणजे १९७८मध्ये हे यश अर्जेंटिनाच्याच सीजर लुइस मेनोटी (३९) यांनी मिळवलं होतं. २०१८च्या विश्वचषकात अर्जेंटिनानं लवकर गाशा गुंडाळल्यानंतर सलोनी यांच्याकडे प्रशिक्षकपद सुपूर्द करण्यात आलं. २०१९च्या कोपा अमेरिका चषकाच्या उपांत्य फेरीत ब्राझीलकडून पत्करलेला पराभव जिव्हारी लागणारा ठरला. पण त्याच ब्राझीलला माराकाना स्टेडियमवर नमवून गतवर्षी अर्जेंटिनानं कोपा अमेरिका चषक जिंकला, ही सलोनी यांचीच किमया. त्यानंतर यंदाच्या जूनमध्ये वेम्बले स्टेडियमवर अर्जेंटिनानं इटलीला नमवून फिनालिस्सिमा चषक जिंकला. २००६च्या विश्वचषकात देशाचं प्रतिनिधित्व करणार्‍या सलोनी यांनी गेल्या दोन वर्षांत अर्जेंटिनाला जिंकायला शिकवलं.

पुढे काय?

स्पर्धेआधी विश्वविजेतेपदासह निवृत्तीचे संकेत देणार्‍या कर्णधार मेसीनं स्पर्धेनंतर मात्र त्या योजना गुंडाळून ठेवल्या आहेत. विश्वविजेत्या अर्जेंटिनाचा खेळाडू म्हणून यापुढे खेळणं अभिमानास्पद असेल, असं त्यानं आवर्जून सांगितलं. अर्जेंटिनाच्या यशात जसं मेसी, मार्टिनेझ आणि सलोनी यांचं योगदान आहे. तसंच ज्युलियन अल्वारेझा, अँजेल डी मारिया, एन्झो फर्नांडिस, अ‍ॅलेक्सिस मॅक ऑलिस्टर, नाहयुएल मोलिना यांच्या गोलचंही आहेच. फ्रान्सची सत्ता खालसा करीत विश्वविजेतेपद पटकावणारी ही मेसीसेना पुढील काही वर्षे आपलं वर्चस्व कायम राखेल, हे निश्चित!

Previous Post

यात लोकशाहीविरोधी काय आहे?

Next Post

कतारच्या मैदानावर भावनांचे हिंदोळे…

Related Posts

फ्री हिट

नेतृत्वक्षम स्मिथ!

March 23, 2023
फ्री हिट

क्रीडा पत्रकारितेचे भीष्म पितामह

March 16, 2023
लीग आटवा, क्रिकेट वाचवा!
फ्री हिट

लीग आटवा, क्रिकेट वाचवा!

March 16, 2023
फ्री हिट

शर्माजींची शर्मनाक गच्छंति!

February 24, 2023
Next Post
कतारच्या मैदानावर भावनांचे हिंदोळे…

कतारच्या मैदानावर भावनांचे हिंदोळे...

बाळासाहेबांचे फटकारे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023

फिशिंग फ्रॉड

March 23, 2023

जेवणातील ऊर्फी जावेद

March 23, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.