• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

क्रीडा संस्कृती जपणारी, सौदीची ‘सौदेबाजी’!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 13, 2023
in फ्री हिट
0
क्रीडा संस्कृती जपणारी, सौदीची ‘सौदेबाजी’!

ख्रिस्तियानो रोनाल्डो हा फुटबॉलमधील चर्चेतला तारा. कधी अद्भुत खेळासाठी, तर कधी वादांसाठी चर्चेचं तरंग उमटवणं हे रोनाल्डोच्या कारकीर्दीत नित्य नेमाचं. ‘फिफा’ विश्वचषकाचे वाद अद्याप शमलेही नसताना मँचेस्टर युनायटेशी फारकत घेणार्‍या रोनाल्डोनं ‘ब्रेकिंग न्यूज’ दिली. तशी याची कुणकुण होतीच, पण ती प्रत्यक्षात उतरेल का, याबाबत अनेकांना शंका होती. पण रोनाल्डोनं अल नासर क्लबशी वर्षाला २० कोटी युरोचा ऐतिहासिक करार करून फुटबॉल जगताचे डोळे दिपवले. लीग-क्लब क्षेत्रातील हा सर्वात महागडा करार. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा वर्षाला १७७० कोटी रुपयांपर्यंत जातो. म्हणजे, रोनाल्डो दिवसाला किती रुपये कमावेल, ते गणित करून पाहा. या रोनाल्डो गाथेत अचानक येऊन लक्षवेधी ‘सौदेबाजी’ करणारा हा अल नासर क्लब कुठला, तर तो आशियाई आखातातील सौदी अरेबिया देशातला क्लब आहे.
यंदाच्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणार्‍या अर्जेंटिनाला पहिल्याच लढतीत अस्मान दाखवणारा संघ म्हणजेच सौदी अरेबिया. सौदीचा ‘फिफा’च्या जागतिक क्रमवारीत क्रमांक होता ५१वा. म्हणजेच विश्वचषकात सहभागी देशांपैकी क्रमांकानुसार तळापासून दुसर्‍या क्रमांकाचा देश. लिओनेल मेसीचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित राहिलेल्या ८८ हजार प्रेक्षकांचा हिरमोड करीत हुसेन सुलेमानीच्या नेतृत्वाखालील सौदीनं आपल्या खेळाचा नजराणा पेश केला. या विजयाच्या आनंदाच्या भरात सौदीत सार्वजनिक सुटीचंही ऐलान करण्यात आलं…
तेलाद्वारे श्रीमंती प्राप्त झालेल्या राष्ट्रांमध्ये सौदी अरेबियाची गणना केली जाते. १९३८पासून सौदीमध्ये ही तेलक्रांती झाली. आजघडीला हा देश जगातील दुसर्‍या क्रमांकाचा तेल उत्पादक (अमेरिकेच्या मागोमाग) आणि जगातील पहिल्या क्रमांकाचा तेल निर्यातदार म्हणून ओळखला जातो. जगातील दुसर्‍या क्रमांकाचे तेल साठे आणि चौथ्या क्रमांकाचे गॅस साठे या देशाने नियंत्रित केले आहेत. त्यामुळे जागतिक बँकेनंही सौदीला उच्च-उत्पन्न अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये वर्गीकृत केलं आहे. सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी), ह्यूमन डेव्हलपमेंट इन्डेक्स (उच्च मानव विकास निर्देशांक) अशा अनेक जागतिक याद्यांमध्ये सौदीचं स्थान उत्तमच असतं. लोकसंख्येच्या निम्मे नागरिक हे २५ वर्षांखालील म्हणजेच तरूण वर्गातील आहेत, ही सौदीसाठी आणखी एक सकारात्मक बाब. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी शाहरूख खान आणि तापसी पन्नू यांचा समावेश असलेल्या ‘डंकी’ चित्रपटाची घोषणा केली. त्यावेळी सौदीमध्ये चित्रित होणारा बॉलिवुडचा पहिला चित्रपट हे सांगायला ते विसरले नाहीत. परंतु तशी या राष्ट्राची प्रतिमा सर्वांगसुंदर आदर्श नाही. येमेनच्या अंतर्गत नागरी युद्धात हस्तक्षेप, इस्लामिक दहशतवादाचे कथित प्रायोजकत्व आणि फाशीच्या शिक्षेच्या अत्याधिक आणि अनेकदा न्यायबाह्य वापरामुळे मानवी हक्कांचं उल्लंघन अशा अनेक कारणांमुळे सौदी अरेबिया डागाळलाही आहे.
मात्र, खेळ हा सौदीच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. अनेक खेळांमध्ये सौदीची घोडदौड प्रकर्षानं आढळते. फुटबॉल हा देशातील सर्वात लोकप्रिय खेळ. सौदीनं १९९४, १९९८, २००२, २००६, २०१८ आणि २०२२ अशा सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. याशिवाय ‘एएफसी’ आशिया चषक स्पर्धेवर त्यांनी आतापर्यंत तीनदा मोहोर उमटवली आहे. हा देश अरेबियन गल्फ कप, एएफसी चॅम्पियन्स लीग आणि अरब नेशन्स कप अशा अनेक स्पर्धांमध्ये नियमित भाग घेतो. गेल्या काही वर्षांत हा खेळ देशाच्या वाळवंटी मातीत खोलवर रुजला आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे देशातील काही खेळाडू युरोपियन लीगमध्ये खेळत आहेत. सौदी फुटबॉल महासंघाची ‘सौदी प्रो लीग’ तितकीच चर्चेत असते.
रोनाल्डोच्या निमित्तानं युरोपमधील ही सौदीची पहिली मुसंडी मुळीच नव्हती. ऑक्टोबर २०२१मध्ये सौदी अरेबियातील नागरी गुंतवणूक निधीतून इंग्लिश प्रीमियर लीगमधील न्यूकॅसल युनायटेड संघाची ४१.५ कोटी डॉलर रकमेला खरेदी केली गेली. या अर्थव्यवहारातील काही समस्या काही महिन्यांपूर्वी सुटल्यानं हस्तांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यूकॅसलच्या आधीच्या मालकाशी चाहत्यांचे अनेक वर्षे मतभेद होते. त्यामुळे अरब पद्धतीचा पोशाख घालून चाहत्यांनी हा आनंद साजरा केल्याचंही ऐकिवात आहे. सध्या इंग्लिश लीगच्या गुणतालिकेत हा संघ तिसर्‍या क्रमांकावर आहे. पुढील काही वर्षांतही फुटबॉलमध्ये पाय रोवण्याच्या दृष्टीनं सौदीची ही वर्चस्वभरारी सुरू असेल. यात २०२६ आणि २०२७मध्ये अनुक्रमे महिला आणि पुरुषांच्या आशिया चषकाचे यजमानपद ते सांभाळतील. याचप्रमाणे इजिप्त आणि ग्रीस यांच्यासह २०३०च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदासाठी सौदीनं दावेदारी केली आहे.
सौदीची ही क्रीडा क्षेत्रातील वाटचाल फुटबॉलपुरतीच मर्यादित राहात नाही. सौदीच्या अरबांना वेगाचंही विलक्षण आकर्षण. फॉर्म्युला-वनच्या वार्षिक कार्यक्रमपत्रिकेत एकंदर २२ देशांना यजमानपदाचा मान मिळतो. यापैकी चार शर्यती आखाती देशांमध्ये होतात. यातही जेद्दाह येथे होणारी सौदी अरेबियन ग्रां.प्री.ही वैशिष्ट्यपूर्ण ठरते. सौदीतील विक्रमी बक्षीस रकमेची गोल्फ स्पर्धासुद्धा मोठ्या चर्चेचा विषय ठरते. सौदीचे बॉक्सिंगपटूही रिंगणं गाजवतात. क्रिकेटसुद्धा अरबांना आवडतं. जगातील अव्वल तेल निर्यात कंपनी म्हणून गणली जाणारी ‘सौदी अरामको’ ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पुरुष आणि महिला एकदिवसीय तसंच ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धांची पुरस्कर्ती आहे.
सौदीमध्ये सूर्य आग ओकतो, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण येथील वाटवंटातील तापमान ५० अंश सेल्सियसपर्यंत जातं. पण तरीही २०२९च्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी ते सज्ज होत आहेत. ५०० अब्ज डॉलर खर्चून तयार करण्यात येत असलेल्या नीओम शहरात या स्पर्धा होणार आहेत. सौदी अरेबियानं फक्त खेळात गुंतवणूक केली नाही, क्रीडा संस्कृतीही रुजवली. त्याचीच रसाळ गोमटी फळं त्यांना खायला मिळत आहेत. हे भारताला जमलं नाही. २०१३मध्ये इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सुरू झाली. ती या वर्षात दशकपूर्ती करील. पण कारकीर्द संपलेले आणि नावारूपास न आलेले परदेशी खेळाडू या लीगमधील संघांनी करारबद्ध केल्यामुळे ‘आयएसएल’ भारतात अस्तित्व निर्माण करू शकली नाही. लीगला मोठेपण मिळवून देण्यासाठी रोनाल्डो, मेसी, करिम बेन्झेमा, किलियन एम्बापे, मोहम्मद सलाह, रॉबर्ट लेवांडोवस्की यांच्यासारखे आजच्या घडीचे दर्जेदार खेळाडू खेळायला हवेत, हे देशातील फुटबॉलधुरिणांना अद्याप सुचलेलं नाही.
काही दिवसांपूर्वी देशाचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी अहमदाबादची (गुजरात) दावेदारी केली जाणार असल्याचं जाहीर केलं. जसं या शहरात ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांसाठी आधुनिक क्रीडा संकुल बांधलं, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियमसुद्धा बांधण्यात आलं. अगदी २०१६मध्ये विश्वचषक कबड्डी स्पर्धासुद्धा याच शहरात झाली. पण या क्रीडा प्रकारांमध्ये गुजरातचे क्रीडापटू आपलं नाणं वाजवताना दिसत नाहीत. त्या राज्यात क्रीडा संस्कृती नाही. मग या सगळ्या संकुलांचा उपयोग काय?
मँचेस्टरशी सामोपचारानं करार स्थगित केल्यानंतर रोनाल्डोला युरोमधील अनेक प्रतिथयश क्लबचे मोठ्या रकमेचे पर्याय खुले होते. पण रोनाल्डोनं ते धुडाकावले. अल नासर क्लबच्या स्वागत कार्यक्रमात ‘‘युरोपातील माझं कार्य आता संपलं आहे,’’ असं विधान रोनाल्डोनं केलं. रोनाल्डोचं हे आखातातलं पाऊल नेमकी कोणती लाट आणेल, हे औत्सुक्याचं ठरणार आहे. पण या निमित्तानं प्रत्ययास आलेली सौदी अरेबियाची क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचाल ही अन्य देशांनी धडे घेण्यासारखीच आहे.

[email protected]

Previous Post

तरी बरं…

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Related Posts

फ्री हिट

संधीचा चेंडू त्यांच्या दिशेने वळलाच नाही…

March 16, 2025
फ्री हिट

मिश्कील, उमदा, खेळकर सुनील!

July 19, 2024
फ्री हिट

त्यांचं काय चुकलं?

May 10, 2024
फ्री हिट

‘ते’ सध्या काय करतायत?

February 16, 2024
Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

कामगार संघटनांची घोडदौड!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.