• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

खेळ

- प्रसाद ताम्हनकर (नवलकथा)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 12, 2024
in पंचनामा
0

चार दिवसाच्या इलाजानंतर अनुराधा कुशलला घेऊन डॉ. सप्तर्षी यांच्याकडे गेली. कुशलला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेताना तिला विचित्र वाटत होते. कुशल मात्र कशाची काही फिकीर नसल्यासारखा वागत होता. कुशलच्या कलाकलाने, थोडीफार संमोहनाची मदत घेऊन त्यांना कुशलकडून जी काय माहिती मिळाली ती धक्कादायक होती.
– – –

कुशलने हातातला कप उंचावला आणि संपूर्ण ऑफिसचा हॉल टाळ्यांच्या कडकडाटात निनादला. कुशल होताच तसा ऑफिसमध्ये सर्वांचा लाडका. त्यामुळे त्याच्या कौतुकात संपूर्ण ऑफिस सहभागी झाले होते. फक्त दोन लोकं उसन्या चेहर्‍यानी टाळी वाजवायचे नाटक करीत होती; एक म्हणजे सागर आरकरे आणि दुसरा संदीप बॅनर्जी. कुशलवर राग धरण्याची दोघांची कारणे वैयक्तिक असली, तरी `शत्रूचा शत्रू हा आपला मित्र’ या नात्याने दोघेही एकत्र आले होते. दोघांनी आजवर कोणत्याही कृतीमधून कुशलवरचा राग जाणवू दिलेला नव्हता, पण दोघेही कुशलमुळे प्रचंड दुखावलेले होते.
वर्षभरापूर्वी कंपनीत जॉईन झालेला कुशल बघता बघता आपल्या हुशारीने आणि नम्रपणाने सर्वांचा लाडका बनला होता. पण आठ महिन्यातच बॅनर्जीसारख्या सीनिअरला डावलून कंपनीच्या मॅनेजमेंटने दुबईच्या कामासाठी नेमलेल्या टीमचा लीडर कुशलला बनवले आणि बॅनर्जी दुखावला. कुशलची कर्तबगारी, लोकांना आपलंसं करायची वृत्ती हे काही लक्षात न घेता बॅनर्जी कुशलला दोषी मानून बसला. दुसरीकडे एचआर डिपार्टमेंटच्या अनुराधाला कुशलसोबत फिरताना ऑफिसच्या काही लोकांनी बघितल्याची चर्चा सागरच्या कानावर आली आणि त्याच्या वर्मी हा घाव जरा जोरात लागला. आज ना उद्या अनुराधा सागरला हो म्हणणार याची ऑफिसवाल्यांना देखील खात्री असताना, अचानक आलेल्या वादळाने सागरची स्वप्ने चक्काचूर केली होती.
`फार आनंदात दिसते आहेस. तुझ्या लाडक्याला चक्क `एम्प्लॉयी ऑफ द इयर’चे बक्षीस मिळाले आहे. प्रमोशनही ड्यू असेलच. तसेही लोकांनी मेहनत करायची आणि कुशलने फळे खायची हे पहिल्यांदा थोडी घडते आहे?’ सागरने अनुराधाला एकटीला गाठले आणि मनातील मळमळ बाहेर काढली.
आपल्यावर कधी ना कधी हा प्रसंग येणार याची अनुराधाला खात्री होती. त्यामुळे सागरच्या अशा अचानक हल्ल्याने ती थोडी बावरली, पण लगेच तिने स्वत:ला सावरले. `कुशल सगळ्यांचाच लाडका आहे. दुसर्‍याच्या सुखात आपण आनंद मानला तर त्यात वाईट ते काय?’
`…आणि तो दुसरा सुखी कुशल असेल तर मग बघायलाच नको,’ कुत्सित हसत सागर म्हणाला.
`दुसर्‍याच्या आनंदात आनंद मानणे हे दुसर्‍यावर सतत जळत राहण्यापेक्षा कधीही चांगले असते सागर. शरीरासाठी आणि मनासाठी देखील,’ अनुराधाने देखील आता बचाव सोडून हल्ल्याची तयारी केली होती. वातावरणात आलेला ताण पाहून, बॅनर्जीने सागरला तिथून दुसरीकडे ओढले आणि तो विषय तिथेच थांबला. पण घडलेल्या प्रसंगाने सागरच्या हृदयाला चांगला ओरखडा दिला होता.
– – –
`मी खून करू का त्या कुश्याचा?’ अडखळत्या स्वरात सागरने विचारले आणि बॅनर्जी चमकला.
`सागर बस कर आता! सहावा पेग आहे तुझा; तुला जास्ती चढली आहे.’ बॅनर्जीने विनंती केली.
`मला चढली आहे? मला चढली नाहीये… तो नालायक कुश्या सगळ्यांच्या डोक्यावर चढून बसलाय. लाथ मारून खाली उतरवतो त्याला.’
`आणि मग तुला काय मिळणार तुरुंगवास? त्या अनुराधाच्या नजरेत अजून खाली पडशील.’
`तिच्या नजरेत आता फक्त कुशल आहे रे बॅनर्जी.. फक्त कुशल..’
`अरे पण आपल्यासारख्या लोकांनी अशा खुनाच्या गोष्टी करणे शोभते का?’
`मग त्याला इथून हाकलायचे कसे? मला तर त्याला जगातून घालवायची इच्छा आहे.’
`तुला खरंच कुशलला नाहीसे करायचे आहे?’
`हो हो हो! त्यासाठी मी काही करायला तयार आहे!’
`ठीक आहे सागर. फक्त आता दिलेल्या शब्दाला जाग म्हणजे झाले. नाहीतर दारू उतरली, की परत नसते उसासे सोडत बसून राहशील.’
– – –
झोपडपट्टीच्या बरोबर मधून वाहणार्‍या त्या नाल्यावर उडी मारत सागर पलीकडे आला आणि बॅनर्जी खिदळला.
`बॅनर्जी अरे इथे कुठे घेऊन आला आहेस? दुपारचे जेवण पार पोटात ढवळायला लागले आहे.’
`कुशल नावाच्या रोगावर इलाज हवाय ना? मग थोडे सहन कर.’
`तू काय मला सुपारी वगैरे घेणा‍र्‍या गुंडाकडे नेतो आहेस का काय?’ धास्तावलेल्या सागरने विचारले.
`असेच काहीसे समज..’ गूढ हसत बॅनर्जी म्हणाला.
`हे बघ बॅनर्जी, कुशलवर मला प्रचंड राग आहे, तो दिसला तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. पण म्हणून दारूच्या नशेतली बडबड खरे करण्याचे धारिष्ट्य माझ्यात नाही. हे खून वगैरे करणे, सुपारी देणे हे असले काही मला जमणार नाही. वेळेला मला भित्रा म्हटलं तरी चालले.’
`काळजी करू नकोस कुशल. रक्ताचा एक थेंब देखील न सांडता, कोणत्याही गुंडाची देखील मदत न घेता कुशलला निपटवायचे आहे आपल्याला.’
`आपल्याला?’
`हो आपल्याला! हे धाडस करावे की नाही हे मला कळत नव्हते. पण परवा रात्री तू काहीही करण्याची तयारी दाखवलीस आणि मग मी हा प्लॅन आखला आहे. आता तू बरोबर असल्याने माझा देखील धीर वाढला आहे.’
`पण नक्की काय करायचे आहे?’
`आपण फक्त मजा बघायची आहे. आजपासून एका महिन्यात कुशल तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणि अनुराधा अश्रूंसाठी खांदा शोधताना दिसेल.’ बोलता बोलता बॅनर्जीने समोरच्या एका झोपडीवजा घराचे दार आत ढकलले आणि धूप, उदबत्ती, लोबन, जळकी लाकडं अशा संमिश्र वासाने सागरचे डोके भणाणले. आतमध्ये एक छोटीशी धुनी पेटलेली होती आणि तिच्यामागे फक्त धोतर नेसलेला एक उघडाबंब केसाळ मानवी जीव बसलेला होता. त्याने बहुदा बंगालीमध्ये `तुम्ही की निश्चित’ असे काहीतरी विचारले. त्यातला फक्त `निश्चित’ हा शब्द सागरला उमगला.
`हो आम्ही दोघेही तयार आहोत!’ बॅनर्जीने खणखणीत मराठीत उत्तर दिले.
`यातले धोके या माणसाला समजावले आहेस?’ त्या माणसाने खर्जातल्या आवाजात बॅनर्जीला विचारले.
`हो! तो कोणताही धोका पत्करायला तयार आहे,’ बॅनर्जी सागरकडे बघत म्हणाला आणि त्या भारावलेल्या वातावरणात सागरने देखील होकारार्थी मान डोलवली. त्या क्षणी त्या माणसाने डोळे मिटले आणि समोरच्या आगीत काहीतरी पदार्थ टाकला अन् एक लवलवती ज्वाला सरसर वर चढली…
– – –
संपूर्ण वर्षात एका दिवसाची देखील आजारपणाची रजा न घेणारा कुशल चक्क सोमवारी आजारी पडल्याने सुट्टीवर असल्याचे कळले आणि अनुराधाला काळजी वाटली. नाही म्हणाले तरी गेल्या काही काळात त्यांच्यात एक सुंदर नाते फुलू लागलेले होते. दोघेही शांतपणे त्याचा आनंद घेत होते. अशावेळी तिला कुशलची काळजी वाटणे स्वाभाविक होते. सागर आणि बॅनर्जी मात्र प्रसन्न चेहर्‍याने कुशलच्या रजेचा आनंद घेत होते. संध्याकाळचे पाच वाजले आणि लगबगीने टेबल आवरून अनुराधाने कुशलच्या घराचा रस्ता पकडला. पंधरा मिनिटात ती कुशलच्या घरी पोहोचली. दरवाजा उघडणार्‍या कुशलचा चेहरा पाहून ती एकदम धास्तावली. अवघ्या दोन दिवसात त्याच्या चेहर्‍याची पार रया गेली होती. खोल गेलेले, भावहीन डोळे, पिवळा पडलेला चेहरा अक्षरश: एखाद्या दीर्घ आजारी व्यक्तीसारखी कुशलची अवस्था झालेली होती. तो फिकट हसला आणि तिच्या काळजात अजून गलबलले.
`कुशल काय रे ही अवस्था?’ तिने भरल्या आवाजात विचारले.
`अगं मलाच उमगत नाहीये तर मी तुला तरी काय सांगू?’
`नक्की काय होतंय तुला?’
`प्रचंड झोप येते. सतत झोप येते. अगदी इच्छा नसताना देखील डोळे मिटले जातात आणि एकदा झोप लागली की मग स्वप्नात `ते’ येतात..’ अंग शहारत कुशल म्हणाला. त्याच्या आवाजात काठोकाठ भीती भरलेली होती.
`ते’ कोण कुशल?’
`मला नाही माहिती… पण ते येतात आणि माझ्या मनावर विलक्षण घाव घालतात,’ कुशल आता थरथरायला लागला होता.
चार दिवसाच्या इलाजानंतर देखील फरक पडत नसल्याने, शेवटी डॉ. शेंडेच्या सल्ल्याने शेवटी अनुराधा कुशलला घेऊन डॉ. सप्तर्षी यांच्याकडे गेली. कुशलला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेताना तिला विचित्र वाटत होते. कुशल मात्र कशाची काही फिकीर नसल्यासारखा वागत होता. अक्षरश: जगापासून तुटल्यासारखा वागत होता. जुजबी बोलणे झाल्यावर डॉक्टरांनी अनुराधाला बाहेर बसायला सांगितले आणि त्यांनी कुशलचा ताबा घेतला. कुशलच्या कलाकलाने, थोडीफार संमोहनाची मदत घेऊन त्यांना कुशलकडून जी काय माहिती मिळाली ती धक्कादायक होती.
शनिवारी नेहमीप्रमाणे कामावरून आल्यावर कुशलने सर्व घरातली कामे केली. तो रोज अकराला झोपत असे, पण का कोण जाणे त्या दिवशी त्याला रात्री आठापासून प्रचंड झोप यायला लागली होती. हो नाही करत शेवटी त्याने आडेआठला पाठ टेकवली. त्याचा डोळा लागला असेल नसेल तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि त्याला जाग आली. दार उघडतो तर दारात गावाकडचा गडी हरबा उभा.
`दादा, लवकर चला मोठा घोळ झालाय.’
`अरे काय झाले काय?’
`दादा सगळा ऊस पूर्ण जळाला आणि ते बघून शेतातच थोरल्या धनींनी आपले प्राण…’ हरबा ओक्साबोक्शी रडायला लागला आणि पायातले त्राण गेलेला कुशल दारातच खाली बसला. भानावर येऊन हरबाला घेऊन त्याने टू-व्हीलर काढली आणि पुण्याच्या दिशेने दामटली. शिरवळपासून पंधरा किलोमीटरवर त्याचे गाव. गाडी त्याने थेट शेताकडे वळवली. शेताची आग अजून धुमसत होती. आबांना एका बाजेवर झोपवले होते आणि गावातली लोकं तिथे उभी होती. कुशल धावतच आबांकडे गेला आणि आबांच्या पायावर कोसळला. अचानक अंधार अजून गडद वाटायला लागला. वातावरणात एक प्रकारची विचित्र थंडी पसरली होती. अचानक प्रचंड कुजबूज कुजबूज चालू झाली आणि कुशल दचकला. चारी बाजूंनी काळ्या सावल्या त्याला घेरायला लागल्या होत्या. एखादे पोते चालावे तसे त्या चालत त्याच्या दिशेने येत होत्या. त्यांची कुजबूज आता कोलाहलात बदलली होती आणि ते सर्व एकच शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत होते.. अनुराधा… अनुराधा…’ त्यांची कुजबूज आता विकृत हास्यात रूपांतर झाली आणि त्याचवेळी समोर पडलेल्या निष्प्राण आबांनी झटकन कुशलचा हात घट्ट पकडला आणि ते म्हणाले, `अनुराधा हवी होय रे तुला?’ त्यांचा तो आवाज, विकृत पडलेला चेहरा आणि आजूबाजूला गोळा झालेले `ते.’ सर्व बाजूंनी आपण पिचले जातोय असे वाटत असतानाच कुशलच्या तोंडून एक किंचाळी बाहेर पडली आणि त्याला जाग आली.
कुशल भानावर आला तोवर रात्रीचे दहा वाजले होते. अवघ्या तीन तासात त्याने जे काही स्वप्नात अनुभवले होते ते मती गुंग करणारे होते. आपल्याला पडलेल्या विचित्र स्वप्नाचा तो विचार करत असतानाच त्याला पुन्हा एकदा अनावर झोप यायला लागली आणि त्याचा डोळा देखील लागला. त्यानंतर रात्रभर विचित्र स्वप्न आणि जाग आली की पुन्हा झोप हे चक्र चालूच राहिले. रविवारी सकाळी कुशलला डोळे उघडायची देखील भीती वाटत होती. शेवटी त्याला भीती होती तेच घडले आणि पुन्हा एकदा काही मिनिटात त्याला झोपेने घेरले.
डॉक्टर कुशलशी गप्पा मारत असताना त्यांना अचानक त्यांचे मित्र चैतन्य प्रभू भेटायला आले आणि त्यांच्या संभाषणात काहीसा खंड पडला. डॉक्टर मानसशास्त्रातील प्रकांड तर चैतन्य प्रभू आध्यात्मातले. भावनाशून्य अवस्थेत बसलेल्या कुशलला चैतन्य प्रभूंनी पाहिले आणि त्यांचा चेहरा काहीसा काळजीत पडला. कुशलच्या आसपासची प्रचंड नकारात्मक आणि हिंस्र ऊर्जा त्यांना क्षणात जाणवली. त्यांनी आपले काम सोडले आणि डॉक्टरांकडे आधी कुशलची चौकशी केली. एखाद्या केसवर गप्पा मारणे हा तर डॉक्टरांचा आवडता छंद. त्यांनी पटापट महत्त्वाचे मुद्दे सांगितले आणि कुशलशी बोलताना काढलेली टिपणे देखील चैतन्य प्रभूंना दिली. दहा मिनिटे जगाचे भान विसरून चैतन्य प्रभू ती टिपणे चाळत होते.
`तुमची हरकत नसेल, तर पाच मिनिटे मी पेशंटशी बोलू शकतो?’ त्यांनी नम्रपणे विचारले.
`हे काय विचारणे झाले का? या.. आत या.’
चैतन्य प्रभू खोलीत आले आणि गेल्या चार पाच दिवसाच्या अंधारात लख्खकन एक चंदेरी किनार आल्यासारखे कुशलला वाटले. एक प्रकारची सात्त्विक भावना मनात दाटायला लागली.
`नमस्कार कुशल. सध्या तुम्ही काय अवस्थेतून जात आहात ते मी अनुभवू शकत नसलो, तरी समजून नक्की घेऊ शकतो. काही गोष्टी मानवी आकलनाच्या पलीकडे असतात. जसे जादूच्या चित्रपटात एखाद्या आरशात किंवा कपाटात आपण शिरतो आणि एका वेगळ्याच जादुई दुनियेत बाहेर पडतो, तसा काहीसा हा प्रकार आहेत. फक्त तुम्ही जिथे स्वप्नातून बाहेर पडत आहात, ती एक प्रकारची काळी आणि विषारी दुनिया आहे. तुम्हाला तिथे ओढून नेले जात आहे. तुम्ही जी जी स्वप्नं रंगवली आहेत, ती तिथे तुमच्याकडून ओरबाडली जात आहेत. तुम्ही कष्टाने पिकवलेले शेत जाळून टाकत आहेत, देवासमान वडील मृत्यूशय्येवर ढकलले जात आहेत, अनुराधाला हिरावण्याचा प्रयत्न होत आहे आणि बरेच काही घडत आहे.’
`एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मनात ज्या गोष्टींबद्दल प्रेम आहे, भीती आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर उभ्या केल्या जात आहेत. खरे सांगायचे तर त्या तुमच्या मनाचा गैरफायदा घेऊन त्याच्याकडून उभ्या केल्या जात आहेत. या दुनियेत प्रवेश करणे तुमच्या हातात नसले, तरी बाहेर पडणे आणि ही दुनियाच नष्ट करणे तुमच्या हातात आहेत. ज्या कोणी हे केले आहे, त्याला ही दुधारी तलवार आहे याची कल्पना नसावी. मन खंबीर करा आणि सामोरे जा…’ चैतन्य प्रभूंनी प्रेमाने कुशलच्या डोक्यावर थोपटले आणि ते बाहेर पडले. आपला सल्ला काम करणार याची बहुदा त्यांना खात्री पटली असावी.
– – –
`आता अजून फक्त दोन चार दिवस आणि मग द ग्रेट कुशल थेट मानसिक रुग्णालयात भर्ती..’ खिदळत बॅनर्जी म्हणाला आणि त्याच्या त्या हास्यात सागरने आपला सूर मिसळला. दोघेही ग्लास संपवून उठले आणि घरी जाण्यासाठी बाहेर पडले. रात्रीची वेळ आणि हवेतला गारवा जाणवला, तसे दोघेही भानावर आले. त्याचवेळी एक प्रचंड वावटळ उठली आणि तिने त्या दोघांनाही घेरून टाकले. क्षणात एखाद्या बोगद्यात खेचले जावे तसे दोघेही त्या वावटळीत ओढले गेले आणि एखाद्या गळालेल्या पानासारखे भिरभिरत राहिले. सागरला कोणीतरी हाका मारते आहे असे जाणवत होते पण डोळे उघडत नव्हते. शेवटी त्याने कसेबसे डोळे उघडले. बॅनर्जी त्याच्या तोंडावर वाकून त्याला हाका मारत होता.
बॅनर्जी आणि सागरला त्या जगात पाहून कुशलला प्रचंड आश्चर्याचा धक्का बसला होता. ते दोघेही त्याच्यावर फारसे खूश नाहीत हे त्याच्या लक्षात आले होते, पण ते या थराला जातील असे त्याला कधीच वाटले नव्हते. कुशलला समोर बघून त्यांची देखील तीच अवस्था झाली होती.
`माझ्या प्रत्येक सुखद आठवणीला, इच्छेला या जगात ओढून तुम्ही तिचा विनाश माझ्या डोळ्यासमोर घडवत होतात. क्षणाक्षणाला माझ्या मनावर क्रूर घाव घालत होतात. समोर सतत दु:ख, अपघात, मृत्यू आणि `त्यां’ची सोबत तुम्ही मला दिलीत. आज मात्र मी फक्त या दुनियेची ओळख मला करून देणार्‍यांना भेटण्याची इच्छा मनात धरली आणि तुम्ही हजर झालात. हे जग निर्माण तुम्ही केलेत पण हे चालणार आहे माझ्या मर्जीने हे माझ्या लक्षात आले आहे. आणि आता हे जग तुम्हा दोघांच्याकडे सुपूर्द करून मी इथून बाहेर पडतो आहे. आता प्रत्येक क्षणाला तुमच्या दोघांच्या आठवणी, इच्छा, भीती सत्यात उतरत राहतील आणि त्यांना तुम्हाला सदेह सामोरे जावे लागेल. काळजी घ्या..’
कुशलचा देह क्षणात विरला आणि सागर अन् बॅनर्जीने फोडलेला हंबरडा ऐकायचा थोडक्यात चुकला.

Previous Post

सुपरहिट अमृतसरी बडीयां!

Next Post

राशीभविष्य

Related Posts

पंचनामा

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
पंचनामा

डिसीप्लिन

May 8, 2025
पंचनामा

टेक सपोर्ट नव्हे, लुटालूट!

May 5, 2025
पंचनामा

कर भला, तो हो भला!

April 25, 2025
Next Post

राशीभविष्य

मिशा सांभाळा!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.