• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

पोस्टाच्या बचत योजना सुरक्षित व व्याजाची हमी

- उदय कुलकर्णी

Nitin Phanse by Nitin Phanse
August 4, 2022
in कशी कराल गुंतवणूक!
0
पोस्टाच्या बचत योजना सुरक्षित व व्याजाची हमी

या योजनांवर मिळणारा व्याजदर डिसेंबर २००१पासून मार्केटनिगडीत झाल्याने योजनेत गुंतवणूक करताना त्या दिवशी काय दर आहे ते बघावेत. या योजनांबाबत तीन निकष लावले तर त्या सर्वात सुरक्षित आहेत. काही अटींसह किंवा दंडासह रोकडसुलभता आहे, इतर जोखीमरहीत साधनांच्या तुलनेत या गुंतवणुकीवरील उत्पन्न थोडेसे जास्त आहे. इक्विटी म्युचुअल फंड या जोखीमयुक्त साधनांच्या तुलनेत मात्र ते फार कमी आहे.
– – –

पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणारा अशी मराठी माणसाची एकेकाळी ख्याती होती, त्यात आता खूपच फरक पडलेला आहे. पोस्ट ऑफिसच्या बचत योजना ज्यांना स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम्स म्हटलं जातं त्याची माहिती घेऊ. एक ठळक बाब लगेच लक्षात येईल, या सर्वात सुरक्षित योजना आहेत, कारण त्या भारत सरकारच्या पोस्ट ऑफिसच्या आहेत. आपण बँकेत बचत खाते उघडतो, तसेच पोस्टातही ते उघडता येते. ग्रामीण भागात जिथे बँकांच्या शाखा नाहीत किंवा दूर दूर आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सेवा आहे. या बचत खात्यातील शिल्लक रकमेवर सध्या ४ टक्के व्याज मिळते. बँक मुदत ठेवीप्रमाणेच पोस्टातही मुदत ठेव सुरू करता येते. एप्रिल २०२२मध्ये ३ वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर ५.५ टक्के व्याज मिळते व ५ वर्षांच्या मुदतठेवीवर ६.७ टक्के व्याज मिळते. आवर्ती खाते म्हणजे रिकरिंग डिपॉझिट (आरडी) हीसुद्धा पोस्टात सुरू करता येते. पोस्टाच्या इतर योजना बघू…
पोस्टाची मासिक मिळकत योजना (मंथली इन्कम स्कीम- एमआयएस) : सेवानिवृत्त लोक याचा उपयोग करत असले तरी कोणतीही प्रौढ व्यक्ती हे खाते सुरू करू शकते. सध्या यावर ६.६ टक्के व्याज मिळते. यात एकाच्या नावावर खाते असेल, तर फक्त ४.५ लाख रुपयांपर्यंत जास्तीत जास्त गुंतवणूक करता येते. दोघांच्या नावावर खाते असेल तर ९ लाख रुपयांपर्यंत जास्तीत जास्त गुंतवणूक करता येते. अल्पवयीन मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने पालकाने हे खाते सुरू केले तर त्याची गुंतवणूक मर्यादा वेगळी धरली जाते. हे खाते पाच वर्षे मुदतीचे असते, त्यानंतर संपूर्ण रक्कम परत मिळते किंवा पाच वर्षांसाठी पुन्हा गुंतवणूक केली जाऊ शकते. मुदतीआधी खाते बंद करायचे असेल तर एक वर्षाच्या आत ते करता येत नाही. १ ते ३ वर्षाच्या आत केलं तर मुद्दलाच्या २ टक्के रक्कम कापून घेतली जाते. ३ वर्षे ते ५ वर्षाच्या दरम्यान बंद केलं तर १ टक्का रक्कम कापली जाते. या खात्याचा उद्देशच दर महिन्याला पैसे हातात यावे असा असल्याने त्यावर मासिक व्याज दिले जाते. ते त्याच पोस्टातील बचत खात्यात ऑटो क्रेडिटने किंवा इतर बँक खात्यात ईसीएसने दिले जाऊ शकते. स्वत:सुद्धा काढून आणू शकतो. या व्याजावर आयकर द्यावा लागतो.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे-८ (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट-८) : ही पाच वर्षे मुदतीची योजना आहे. यावर सध्या ६.८ टक्के दराने व्याज मिळते, परंतु ते मुदतीअंती देण्यात येते. यात किती रक्कम गुंतवू शकतो यावर मर्यादा नाही. यात गुंतवलेली रक्कम आयकराच्या सेक्शन ८०-सी खाली वजावटीस पात्र आहे. त्यामुळे पाच वर्षांचा लॉक-इन असतो आणि मृत्यू किंवा कोर्ट ऑर्डर अशा अपवादात्मक कारणाशिवाय हे खाते मुदतीआधी बंद करता येत नाही. यात रोकडसुलभता नाही, परंतु त्याची गरज नसेल तर आयकर वजावट आहे आणि व्याजाचा दर समाधानकारक आहे. मुद्दलाची वाढ व्हावी वाटत असेल तर याचा विचार केला जाऊ शकतो.
किसान विकास पत्र : या योजनेतसुद्धा कितीही रक्कम गुंतवू शकतो. यावर सध्या ६.९ टक्के दराने व्याज मिळते आणि ते मुदतीअंती मिळते. आपण गुंतवलेले मुद्दल दुप्पट करणे हा मुख्यतः या योजनेचा उद्देश आहे, ते सध्याच्या व्याजदराने १२४ महिन्यांमध्ये दुप्पट होते, त्यामुळे याची मुदत सध्या १२४ महिने आहे. याला अडीच वर्षाचा लॉक-इन कालावधी असतो, त्यानंतर पैसे काढू शकतो, मात्र व्याजदर कमी मिळेल. मृत्यू किंवा कोर्ट ऑर्डर अशा अपवादात्मक स्थितीत अडीच वर्षाच्या आतही खाते बंद केले जाऊ शकते. एक व्यक्ती कितीही खाती सुरू करू शकते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना- (सीनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम) : ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक चांगली योजना आहे. ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे ते कोणीही यात गुंतवणूक करू शकतात. ५५ वर्षापेक्षा जास्त वय असलेले ते ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेले निवृत्त कर्मचारी, तसेच ५० वर्षापेक्षा जास्त वय असलेले ते ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेले संरक्षण खात्यातील निवृत्त कर्मचारीसुद्धा यात गुंतवणूक करू शकतात. मात्र रिटायरमेंट बेनिफिट मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत त्यांनी गुंतवणूक करायला हवी. त्यांचे वय ६०पेक्षा जास्त झाले की एक महिन्याच्या आत गुंतवणूक करण्याचा नियम लागू होत नाही. ते इतर नागरिकांसारखे कधीही गुंतवणूक करू शकतात. संयुक्त नावाने हे खाते सुरू करता येते, पण फक्त वैवाहिक जोडीदारासहच. पोस्टासारखेच हे खाते काही बँकांमध्येही सुरू करता येते.
यात जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. यावर सध्या (मे २०२२मध्ये) ७.४ टक्के प्रति वर्ष इतके व्याज मिळते, ते दर ३ महिन्यांनी देय होते. योजनेची मुदत ५ वर्षे आहे, ती आणखी ३ वर्षांनी वाढवता येते. मुदतीआधी, एका वर्षाच्या आत पैसे काढले तर काहीच व्याज मिळत नाही, त्यानंतर १ टक्का, १.५ टक्के इत्यादी दंड लागू होतो. गुंतवणूक करताना जो व्याजदर ठरलेला असतो तो मुदतपूर्तीपर्यंत कायम असतो, मात्र दर तीन महिन्यांनी यावरील व्याजदराचा आढावा घेऊन तो बदलला जातो किंवा स्थिर राहतो. तो नवीन गुंतवणुकीला लागू होतो.
यात गुंतवलेली रक्कम आयकराच्या सेक्शन ८०-सी खाली वजावटीस पात्र आहे. योजनेची मुदत ५ वर्षे आहे म्हणजे खूप जास्त कालावधीसाठी रक्कम अडकून राहात नाही, उलट मुदत वाढवायची असेल तर तीसुद्धा सोय आहे. तसेच व्याजाचा दर चांगला आहे. नियमित उत्पन्न हवे असेल तर याचा जरूर विचार करावा.
सुकन्या समृद्धी योजना खाते : ही मुलींच्या पालकांकरता एक खास योजना आहे. ज्या पालकांना दहा वर्षे वयाखालील मुलगी आहे त्यांनाच त्या मुलीच्या नावाने हे खाते सुरू करता येते. एका मुलीच्या नावाने पोस्ट ऑफिस किंवा बँकेत एकच खाते सुरू करता येते. एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोनच मुलींसाठी हे खाते सुरू करता येते. जुळ्या किंवा तिळ्या मुली झाल्या, तर मात्र दोनपेक्षा जास्त खाती सुरू करता येतात. यावर सध्या ७.६ टक्के व्याज मिळते. या खात्यामध्ये एका वर्षात कमीत कमी २५० रुपये व जास्तीत जास्त १,५०,००० रुपयांची गुंतवणूक करता येते. ही रक्कम एकरकमी गुंतवता येऊ शकते किंवा एका महिन्यात, वर्षात कितीही वेळा रक्कम जमा करता येते. खाते सुरू केल्यापासून १५ वर्षे पूर्ण होईपर्यंतच त्यात रक्कम जमा करता येते. मात्र हे खाते सुरू केल्यापासून २१ वर्षे पूर्ण झाल्यावर मॅच्युअर होते व ज्या मुलीच्या नावाने खाते आहे तिला रक्कम मिळते. तसेच मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिच्या लग्नाच्या वेळेस खाते बंद होते.
यात गुंतवलेली रक्कम आयकराच्या सेक्शन ८०-सी खाली वजावटीस पात्र आहे. यावर मिळालेले व्याज करमुक्त असते. हे व्याज खात्यात जमा होत राहते. मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत तिचे पालक (गार्डियन) हे खाते ऑपरेट करतो. मुलीने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यावर किंवा ती दहावी पास झाल्यावर या खात्यातून अंशत: पैसे काढले जाऊ शकतात. मागील आर्थिक वर्षात खात्यात जितकी रक्कम शिल्लक आहे, त्याच्या फक्त ५० टक्के काढली जाऊ शकते ती एकरकमी किंवा एका वर्षात एकाच वेळा असे पाच वर्षेपर्यंत काढली जाऊ शकते. मुलीच्या उच्चशिक्षणासाठी ही काढता येते व ते पैसे फी किंवा तशा शैक्षणिक खर्चासाठी वापरावेत असा नियम आहे व ५० टक्केच्या मर्यादेत त्यासाठी आवश्यक तितकीच रक्कम काढता येते. खातेदाराचा किंवा पालकाचा मृत्यू झाला तर अशा अपवादात्मक स्थितीतच खाते सुरू केल्यापासून पाच वर्षानंतर मुदतीआधीच बंद करता येऊ शकते.
अशा या पोस्टाच्या बचत योजना. ह्या योजनांवर मिळणारा व्याजदर डिसेंबर २००१पासून मार्केटनिगडीत झाल्याने योजनेत गुंतवणूक करताना त्या दिवशी काय दर आहे ते बघावेत. सरकार मध्यमवर्गासाठी जरा जास्त व्याजदर द्यायचा प्रयत्न करते, म्हणून या योजनांमध्ये कमाल गुंतवणुकीवर ९ लाख, १५ लाख रुपये अशी मर्यादा आहे, अन्यथा धनाढ्य लोक त्यात कोट्यवधी रुपये गुंतवतील व त्याचा भार सरकारवर पडेल. या योजनांबाबत तीन निकष लावले तर सर्वात सुरक्षित आहेत, काही अटींसह किंवा दंडासह रोकडसुलभता आहे, इतर जोखीमरहीत साधनांच्या तुलनेत या गुंतवणूकीवरील उत्पन्न थोडेसे जास्त आहे. इक्विटी म्युचुअल फंड ह्या जोखीमयुक्त साधनांच्या तुलनेत मात्र ते फार कमी आहे.

Previous Post

हर बोर्ड कुछ कहता है…

Next Post

पोलिसी खाक्याचा फटका!

Related Posts

म्युच्युअल फंडांतून प्रत्यक्षात मिळालेला लाभ
कशी कराल गुंतवणूक!

म्युच्युअल फंडांतून प्रत्यक्षात मिळालेला लाभ

October 6, 2022
कशी कराल गुंतवणूक!

म्युच्युअल फंड व त्याचे प्रमुख प्रकार

September 29, 2022
कशी कराल गुंतवणूक!

गरीबांकरिता काही योजना

September 22, 2022
कशी कराल गुंतवणूक!

इपीएफ : अदृश्य गुंतवणुकीचे लाभ

September 15, 2022
Next Post

पोलिसी खाक्याचा फटका!

बाळासाहेबांचे फटकारे...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.