‘वांग्याची भाजी खावी तर आमच्या आईच्या हातची!’ मित्राने जेवणाला सुरुवात करता करताच म्हटले. बर्याच वर्षानंतर मी त्याच्या घरी जेवायला आलो होतो. डायनिंग टेबलवर आम्ही जेवता-जेवता गप्पा मारत होतो. समोर वहिनी वाढत होत्या. वरील वाक्य कानी पडताच त्यांनी आपल्या नवरोबाकडे रागाचा एक कटाक्ष टाकला. नवर्याचे काही तिच्या नजरेकडे लक्ष नव्हते. समोर असलेल्या झणझणीत मसाल्याच्या मटण रश्श्याला पहात ‘मटणाचा रस्सा सुद्धा फिका पडेल अशी वांग्याची भाजी करायची’ असे त्याचे आपल्या आईचे गुणगान अजून चालूच होते. वहिनी पण चांगल्या सुगरण आहेत. त्या चार-चौघींपेक्षा चांगला चविष्ट स्वयंपाक करतात. पण ह्याला आपल्या आईच्याच हाताच्या जेवणाची आवड. चेहर्यावरचे भाव पाहता वहिनीला काही हे आवडले नसावे. ते पाहून घाईघाईने मी ‘वहिनी, छान झाली हां भाजी!’ अशी कॉम्प्लिमेंट देऊन टाकली (हो, मटणाची असली तरी तिला आम्ही भाजीचं म्हणतो!)
एक तर आमच्या ह्या भोळ्या मित्राला ‘एका स्त्री समोर दुसर्या स्त्रीचे गुणगान गात नसतात’ हा साधा नियम माहीत नाही! बाकी जनरली आपण भारतीय लोक कुणाही जिवंत मनुष्याची मनापासून तारीफ करण्यात नेहमीच कंजुषी करत असतो. वहिनींनी ‘कशी झाली हो भाजी?’ हा प्रश्न विचारल्यावर हा ‘भाजीत मीठ थोडं कमी पडलं वाटतं’ असं खरं-खरं बोलून गेला! हे काही बोलायची आवश्यकता होती का? अगदी तोंडाने काहीच म्हटले नसते आणि हाताने नुसते अंगठ्यावर तर्जनी टेकवून ‘छान’ अशी खूण केली असती तरी स्वयंपाक केल्याचे सार्थक वाटले असते वाहिनीला. पण नाही, तोही आनंद चिमूटभर मिठाने हिरावून घेतला. ‘नाही हां, मीठ बरोबर आहे, तुलाच जास्त मीठ लागतं,’ मीठदानी मित्राच्या समोर आपटत मी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना ‘बूँद से गई वो सॉल्ट शेकर से नहीं आती!’
अझरबैजान देशातील एक बोधकथा सांगतो. तुम्ही ही कथा रशियाची म्हणून सुद्धा ऐकली असेल! रशियाची असो वा चीनची, कथेचा बोध महत्त्वाचा. तर, एक बाई एके दिवशी आपल्या म्हातार्या नवर्याच्या आणि तरुण मुलांच्या ताटात गवत वाढते. ते चकित होऊन एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात. नवरा म्हणतो, ‘हे काय आम्ही गवत खायचं?’ बायको म्हणते, ‘गेली पंचवीस वर्षे मी तुम्हाला जेवण वाढत आहे, पण कुणी त्याबद्दल कधी एक चकार शब्दही बोलला नाहीत.’ कौतुकाचे दोन शब्दही अथक मेहनतीचे श्रम विसरायला लावतात. आपल्या श्रमाची किंचितशी पोचपावती मन सुखावून जाते. कष्ट करणार्या व्यक्तीला नवीन हुरूप येतो. पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणे हे त्यांचे कर्तव्य असते असे मानले, तरी त्याबद्दल थोडीशी कृतज्ञता मुलांनी नुसती मनात बाळगण्यापेक्षा ती काही वेळा दाखवली सुद्धा पाहिजे.
एखाद्याच्या हातालाच चव आहे असे म्हटले जाते. रेसिपी आणि त्यातली सामुग्री एकच असली तरी ते बनवणार्याच्या हातात काय अशी जादू असावी की एकाचे पदार्थ चविष्ट व्हावे आणि दुसर्याचे सुमार चवीचे व्हावेत? मसाल्याच्या जाहिरातीत ‘हमारा मसाला और आपका थोडा प्यार मिलाईये’ असे लाडिक आवाजात सांगितले असले तरी शेवटी बनणारा पदार्थ हा तो बनवणार्या व्यक्तीनुसार वेगवेगळ्या चवीचाच होतो. कुणी प्रेम किंवा द्वेष मिसळून भाजी करत नसतो! ती कविकल्पना आहे. फार फार तर कधी बायको नवर्यावरच्या रागाने कढईवर चमचा जोरात आपटून राग व्यक्त करू शकते किंवा त्वेषाने कणिक अजून जोरात तिंबू शकते. त्यामुळे चवीत फारसा फरक पडत नसावा. मूळ मुद्दा म्हणजे ती रेसिपी किती काटेकोरपणे पाळली जाते हा आहे. एखादी सुगरण दुसर्याला रेसिपी सांगतानाही व्यवस्थित सांगेल ह्याचा काय भरवसा? बर्याच रेसिपी फोनवर सांगितल्या जातात. एखादी नुकतेच लग्न झालेली तरुणी आपल्या काही वर्षे अधिक अनुभव असलेल्या मैत्रिणीस फोनवर रेसिपी विचारते. परवा फुटपाथवरून समोर चालणार्या महिलेचा संवाद असा ऐकू आला.
‘काय म्हटलं? काय टाकायचं?’ ती फोनवर विचारत होती.
‘कॉर्न फ्लॉवर… समजलं’ रेसिपी सांगणारी पलीकडून म्हणते…
‘समजलं… फ्लॉवर म्हणजे कोबी ना?’ पहिली.
‘नाही नाही, कॉर्न फ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ!’ दुसरी शक्य तेवढ्या जोरात ओरडून सांगते.
‘कशाचं पीठ?’ पहिली
‘मका मका, भुट्टा. आपण कणीस भाजून खातो ना!’
‘ओके, मक्याचं कणीस टाकायचं?!’
‘कणीस नाही ग, त्याची पावडर टाकायची…’
‘आणि पावडर कशी तयार करायची?’
‘विकत मिळते ना रेडिमेड बाजारात!’
‘बरं, मी मार्केटमध्ये जाईन तेव्हाच घेऊन येईन. तुझ्या घराजवळच्या मॉलमध्ये मिळेल ना? आणि काय पाहिजे?’
‘आले पाहिजे…’
‘नंतर येईन मी तुझ्या घरी… हे मला कुठेच सोडत नाहीत अजून..!’
‘अगं आलं पाहिजे आलं, चहात नाही का आपण कुटुन टाकतो… ते आलं!’
‘अच्छा ते आलं होय? मला वाटलं…’ मैत्रिणीने आपल्याला लग्न झाल्यापासून अजूनही बोलावले नाही, याची पहिलीला अचानक जाणीव झाली आणि स्त्रीसुलभ मत्सर जागृत होऊन राग पण आला.
‘बरं हे आलेत, मी नंतर बोलते,’ असे म्हणत तिने फोन कट केला.
सीन दुसरा :-
मंगलाबाई शाळेत शिक्षिका होत्या. त्यांच्या दूरच्या नात्यातल्या वत्सलाबाई छान पुरणपोळी बनवत असे ऐकिवात होते. मंगलाबाईंना पुरणपोळी काय, साधी चपाती सुद्धा कधी बनवण्याचा अनुभव नव्हता. मंगलाबाईंनी एक दिवस वत्सलाबाईंना काहीतरी दुसर्याच निमित्ताने फोन केला. आपल्याला पुरणपोळी ‘वांग्याची भाजी खावी तर आमच्या आईच्या हातची!’ मित्राने जेवणाला सुरुवात करता करताच म्हटले. बर्याच वर्षानंतर मी त्याच्या घरी जेवायला आलो होतो. डायनिंग टेबलवर आम्ही जेवता-जेवता गप्पा मारत होतो. समोर वहिनी वाढत होत्या. वरील वाक्य कानी पडताच त्यांनी आपल्या नवरोबाकडे रागाचा एक कटाक्ष टाकला. नवर्याचे काही तिच्या नजरेकडे लक्ष नव्हते. समोर असलेल्या झणझणीत मसाल्याच्या मटण रश्श्याला पहात ‘मटणाचा रस्सा सुद्धा फिका पडेल अशी वांग्याची भाजी करायची’ असे त्याचे आपल्या आईचे गुणगान अजून चालूच होते. वहिनी पण चांगल्या सुगरण आहेत. त्या चार-चौघींपेक्षा चांगला चविष्ट स्वयंपाक करतात. पण ह्याला आपल्या आईच्याच हाताच्या जेवणाची आवड. चेहर्यावरचे भाव पाहता वहिनीला काही हे आवडले नसावे. ते पाहून घाईघाईने मी ‘वहिनी, छान झाली हां भाजी!’ अशी कॉम्प्लिमेंट देऊन टाकली (हो, मटणाची असली तरी तिला आम्ही भाजीचं म्हणतो!)
एक तर आमच्या ह्या भोळ्या मित्राला ‘एका स्त्री समोर दुसर्या स्त्रीचे गुणगान गात नसतात’ हा साधा नियम माहीत नाही! बाकी जनरली आपण भारतीय लोक कुणाही जिवंत मनुष्याची मनापासून तारीफ करण्यात नेहमीच कंजुषी करत असतो. वहिनींनी ‘कशी झाली हो भाजी?’ हा प्रश्न विचारल्यावर हा ‘भाजीत मीठ थोडं कमी पडलं वाटतं’ असं खरं-खरं बोलून गेला! हे काही बोलायची आवश्यकता होती का? अगदी तोंडाने काहीच म्हटले नसते आणि हाताने नुसते अंगठ्यावर तर्जनी टेकवून ‘छान’ अशी खूण केली असती तरी स्वयंपाक केल्याचे सार्थक वाटले असते वाहिनीला. पण नाही, तोही आनंद चिमूटभर मिठाने हिरावून घेतला. ‘नाही हां, मीठ बरोबर आहे, तुलाच जास्त मीठ लागतं,’ मीठदानी मित्राच्या समोर आपटत मी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना ‘बूँद से गई वो सॉल्ट शेकर से नहीं आती!’
अझरबैजान देशातील एक बोधकथा सांगतो. तुम्ही ही कथा रशियाची म्हणून सुद्धा ऐकली असेल! रशियाची असो वा चीनची, कथेचा बोध महत्त्वाचा. तर, एक बाई एके दिवशी आपल्या म्हातार्या नवर्याच्या आणि तरुण मुलांच्या ताटात गवत वाढते. ते चकित होऊन एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात. नवरा म्हणतो, ‘हे काय आम्ही गवत खायचं?’ बायको म्हणते, ‘गेली पंचवीस वर्षे मी तुम्हाला जेवण वाढत आहे, पण कुणी त्याबद्दल कधी एक चकार शब्दही बोलला नाहीत.’ कौतुकाचे दोन शब्दही अथक मेहनतीचे श्रम विसरायला लावतात. आपल्या श्रमाची किंचितशी पोचपावती मन सुखावून जाते. कष्ट करणार्या व्यक्तीला नवीन हुरूप येतो. पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणे हे त्यांचे कर्तव्य असते असे मानले, तरी त्याबद्दल थोडीशी कृतज्ञता मुलांनी नुसती मनात बाळगण्यापेक्षा ती काही वेळा दाखवली सुद्धा पाहिजे.
एखाद्याच्या हातालाच चव आहे असे म्हटले जाते. रेसिपी आणि त्यातली सामुग्री एकच असली तरी ते बनवणार्याच्या हातात काय अशी जादू असावी की एकाचे पदार्थ चविष्ट व्हावे आणि दुसर्याचे सुमार चवीचे व्हावेत? मसाल्याच्या जाहिरातीत ‘हमारा मसाला और आपका थोडा प्यार मिलाईये’ असे लाडिक आवाजात सांगितले असले तरी शेवटी बनणारा पदार्थ हा तो बनवणार्या व्यक्तीनुसार वेगवेगळ्या चवीचाच होतो. कुणी प्रेम किंवा द्वेष मिसळून भाजी करत नसतो! ती कविकल्पना आहे. फार फार तर कधी बायको नवर्यावरच्या रागाने कढईवर चमचा जोरात आपटून राग व्यक्त करू शकते किंवा त्वेषाने कणिक अजून जोरात तिंबू शकते. त्यामुळे चवीत फारसा फरक पडत नसावा. मूळ मुद्दा म्हणजे ती रेसिपी किती काटेकोरपणे पाळली जाते हा आहे. एखादी सुगरण दुसर्याला रेसिपी सांगतानाही व्यवस्थित सांगेल ह्याचा काय भरवसा? बर्याच रेसिपी फोनवर सांगितल्या जातात. एखादी नुकतेच लग्न झालेली तरुणी आपल्या काही वर्षे अधिक अनुभव असलेल्या मैत्रिणीस फोनवर रेसिपी विचारते. परवा फुटपाथवरून समोर चालणार्या महिलेचा संवाद असा ऐकू आला.
‘काय म्हटलं? काय टाकायचं?’ ती फोनवर विचारत होती.
‘कॉर्न फ्लॉवर… समजलं’ रेसिपी सांगणारी पलीकडून म्हणते…
‘समजलं… फ्लॉवर म्हणजे कोबी ना?’ पहिली.
‘नाही नाही, कॉर्न फ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ!’ दुसरी शक्य तेवढ्या जोरात ओरडून सांगते.
‘कशाचं पीठ?’ पहिली
‘मका मका, भुट्टा. आपण कणीस भाजून खातो ना!’
‘ओके, मक्याचं कणीस टाकायचं?!’
‘कणीस नाही ग, त्याची पावडर टाकायची…’
‘आणि पावडर कशी तयार करायची?’
‘विकत मिळते ना रेडिमेड बाजारात!’
‘बरं, मी मार्केटमध्ये जाईन तेव्हाच घेऊन येईन. तुझ्या घराजवळच्या मॉलमध्ये मिळेल ना? आणि काय पाहिजे?’
‘आले पाहिजे…’
‘नंतर येईन मी तुझ्या घरी… हे मला कुठेच सोडत नाहीत अजून..!’
‘अगं आलं पाहिजे आलं, चहात नाही का आपण कुटुन टाकतो… ते आलं!’
‘अच्छा ते आलं होय? मला वाटलं…’ मैत्रिणीने आपल्याला लग्न झाल्यापासून अजूनही बोलावले नाही, याची पहिलीला अचानक जाणीव झाली आणि स्त्रीसुलभ मत्सर जागृत होऊन राग पण आला.
‘बरं हे आलेत, मी न्ांतर बोलते,’ असे म्हणत तिने फोन कट केला.
सीन दुसरा :-
मंगलाबाई शाळेत शिक्षिका होत्या. त्यांच्या दूरच्या नात्यातल्या वत्सलाबाई छान पुरणपोळी बनवत असे ऐकिवात होते. मंगलाबाईंना पुरणपोळी काय, साधी चपाती सुद्धा कधी बनवण्याचा अनुभव नव्हता. मंगलाबाईंनी एक दिवस वत्सलाबाईंना काहीतरी दुसर्याच निमित्ताने फोन केला. आपल्याला पुरणपोळी बनवायला जमत नाही हे काही त्यांना वत्सलाबाईना कळू द्यायचे नव्हते. आणि पुरणपोळी कशी बनवतात, ते शिकायचे सुद्धा होते.
मंगलाबाई : ‘हॅलो, वत्सलाबाई परवा लग्नात तुम्ही नेसलेली पैठणी खूप छान होती हां!’
वत्सलाबाई : ‘थँक्स मंगलाबाई. आमच्या ह्यांनी खास येवल्यावरून आणली होती ती.’
मंगलाबाई : ‘माझ्याकडे पण अशीच होती. पण त्यावर पुरणाचे डाग पडले बघा.’
वत्सलाबाई : ‘पुरणाचे डाग?’
मंगलाबाई : ‘हो ना. तुम्ही करता ना पुरणपोळी?’
वत्सलाबाई : ‘हो करते ना.’
मंगलाबाई : ‘पण तुमची पद्धत आमच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे बाई.’
वत्सलाबाई : ‘वेगळी? अजून काय वेगळी पद्धत असते? आम्ही चणा डाळ भिजवून त्याचे पुरण बनवतो.
मंगलाबाई : ‘हो, आम्ही पण चणाडाळच वापरतो!’
वत्सलाबाई : ‘चणाडाळ आम्ही कुकरमध्ये शिजवून मऊ करून घेतो.’
मंगलाबाई : ‘असं का? आम्ही पण कुकरमध्येच शिजवतो.’
वत्सलाबाई : ‘मग आम्ही त्यात गूळ आणि वेलची घालतो.’
मंगलाबाई : ‘ते माहीत आहे हो, आम्ही पण तसंच करतो!’
वत्सलाबाई : ‘…नंतर आम्ही वरवंट्यावर पुरण वाटून बनवतो’
मंगलाबाई : ‘ते सुद्धा माहीत आहे हो, आम्ही सुद्धा पाटा वरवंटा वापरतो.’
(आता वत्सलाबाईंना संशय येतो. त्या मुद्दाम पुरणपोळीच्या रेसिपीत बदल करतात.)
वत्सलाबाई : ‘मग आम्ही त्यात दोन प्याले गार पाणी ओततो.’
मंगलाबाई : ‘आम्ही पण पाणीच ओततो…’
वत्सलाबाई : ‘मग त्यात आम्ही बेसन कालवतो.’
मंगलाबाई : ‘अगदी सेम टू सेम, आम्ही पण तसंच करतो…’
वत्सलाबाई : ‘मग आम्ही त्या पीठाला तेलात लालसर होईपर्यंत तळून घेतो.’
मंगलाबाई : ‘आम्ही सुद्धा तसेच करतो!’
वत्सलाबाई : ‘…तळलेल्या पिठाचे गोळे करून ते लाटतो.’
मंगलाबाई : ‘आम्ही सुद्धा सेम करतो!’
वत्सलाबाई : ‘मग चुलीवरच्या निखार्यात त्या पोळ्या भाजून घेतो की झाल्या पुरणपोळ्या तयार!’
मंगलाबाई : ‘हो ना, आमच्या पण पुरणपोळ्या अशाच तयार होतात बघा.’
सर्व रेसिपी कसलाही संशय न येता बिनबोभाट मिळाली म्हणून मंगलाबाई खुश आणि वत्सलाबाई सुद्धा मंगलाबाईला कसं बनवले ह्यामुळे खुश!
एखाद्या पदार्थाला अशी अगदी ‘हाताची चव’ येण्यासाठी तो पदार्थ ज्याच्या हाताला चव आहे म्हणतात ती व्यक्ती जसा बनवतो अगदी तसाच तंतोतंत बनवता आला पाहिजे. साधा चहा घ्या ना. म्हणजे उदाहरणं म्हणून घ्या. प्यायला नाही सांगत आहे! चहा पावडर, साखर, दूध आणि पाणी एवढे जिन्नस एकत्र करून गरम करायचे की झाला चहा तयार. तरीसुद्धा चहाच्या एवढ्या व्हरायटी चाखायला मिळतात. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीचे प्रमाण. ते वेगवेगळे असल्यामुळे चहाची चव बदलते. चहा कितीवेळ उकळवला जातो ह्यावरूनही चव वेगळी लागते. कुणी त्यात वेलची कुटून घालतो तर कुणी आले ठेचून वापरतो. डाळीला फोडणी देताना सर्वप्रथम कडिपत्ता टाकला जातो. त्यात तेल एका विशिष्ट तापमानावर पोहोचले की त्यात मोहरी तडतडली जाते. तेल गरम नसेल तर मोहरी कच्ची राहते आणि चव बदलवून जाते. कांदा किती वेळ परतवला की त्याची चव गोडसर होते हे प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळणे शक्य नाही. बिर्याणी दहा मिनिटे गॅस शेगडीवर मध्यम आचेवर, नंतरची पाच मिनिटे मंद आचेवर आणि बंद
गॅसवर अजून दहा मिनिटे ठेवली की खाली न लागता परफेक्ट तयार होते हे सर्व अनुभवानेच समजते. सुगरण प्रत्येक पदार्थाची मनात नोंद ठेवत असते आणि पुढच्या वेळी हवा तसा बदल करून पाहत असते.
आमचे मॅनेजर साहेब नेहमी एकच विनोद सांगायचे. ते रिटायर्ड होईपर्यंत हा एकच विनोद मीटिंग म्हणा, पार्टी म्हणा, गेट टुगेदर म्हणा अशा सर्व प्रसंगी आमच्या कानावर अत्याचार करत असायचा. चुईंग गमसारखा चावून चावून चोथा झालेला असा हा विनोद ऐकून केवळ ते आमचे साहेब असल्यामुळे आम्ही दरवेळी बळेबळेच हसत असू. साहेब सांगत- एका घरात मुलगी पाहण्याचा कार्यक्रम सुरू असतो. आईने बनवलेले पोहे मुलगी घेऊन स्वतः बनवले असे सांगून नवर्याकडच्या पाहुण्यांना देते. तिची आई आता त्यांच्याशी लग्नाची बोलणी करत असल्यामुळे मुलगी चहा बनवण्यासाठी आत स्वयंपाकघरात जाते. तिला बराच वेळ झाल्यामुळे आई मोठ्याने आवाज देत विचारते, ‘झाला का गं चहा?’
मुलीने चहा पूर्वी कधीच बनवलेला नसतो. वेळ मारून नेण्यासाठी ती म्हणते, ‘झाला मम्मी, आता फक्त चहाला फोडणीच देते आहे!’