• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ऑनलाईन की ऑफलाईन…

आशिष पेंडसे by आशिष पेंडसे
November 30, 2020
in भाष्य
0
ऑनलाईन की ऑफलाईन…

राज्यभरातील शाळा आता पुन्हा भरू लागल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांची घंटा पुन्हा वाजू लागली आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे या शाळा-महाविद्यालये बंदच होती. नवीन शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशाच होऊ शकला नव्हता. किंबहुना, गेल्या शैक्षणिक वर्षाची अखेरदेखील केवळ एक सोपस्कार म्हणूनच करण्यात आली होती.

अर्थात, आठवीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही, असे धोरण राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यामधील शिफारशींनुसार आपण स्वीकारले आहे. पण, त्याचा अर्थ असा नव्हे, की कोणतेही मूल्यमापन न करताच या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलायचे. पास-नापास नाही, म्हणजे परीक्षाच नाही, मूल्यमापनच नाही, असा अर्थ कुणी काढू नये. अर्थात, आपापल्या सोयीनुसार असे अर्थ हे काढले जातातच.

 

कोरोनानंतरच्या पुनःश्च हरि ओमच्या परिस्थितीमध्ये उद्योगविश्वापासून अर्थकारणातील इतर अनेक व्यवहार आपण सुरळीतपणे पूर्ववत सुरू करण्यात यशस्वी ठरत आहोत. दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठा, पर्यटनस्थळे गजबजली होती. त्यामुळेच, अर्थचक्र आता आश्वासकपणे पूर्वपदावर येत आहे. अशा परिस्थितीमध्ये शैक्षणिक संस्थांमधील कामकाजदेखील पूर्वपदावर आणण्याच्या दिशेने कृती करणे अत्यावश्यक होते.

अगदी लहान मुलांना संसर्गाच्या धोक्यात ढकलण्याचा मूर्खपणा कुणी करणारच नाही. तेवढे भान सर्वंच स्तरांवरील धोरणकर्त्यांना असते. त्यामुळेच, वर्ग सुरू करण्यात आले ते नववीपासून बारावीपर्यंतचे. त्या वयामधील विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतर, संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना अशा सर्व आवश्यक वैद्यकीय विषयांचे भान-जाण असते, हे गृहित धरण्यात आले आहे. म्हणूनच, त्यांच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयांचे वर्ग पुन्हा उघडण्यात आले.

दरम्यानच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय आपण निवडला होता. किंबहुना, ज्या विद्यार्थी, मुख्यत्वे पालकांना आपल्या पाल्याला शाळेत पाठविणे धोकादायक वाटत असेल, त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अजूनही खुला आहे. यापुढेही राहणार आहे. मात्र, या ऑनलाईन शिक्षणाच्या पर्यायावर अनेक विद्यार्थी-पालकांनी अनेक मतमतांतरे व्यक्त केल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. मुंबईतील गांधी बालमंदिर हायस्कूलमधील शिक्षक-समुपदेशक जयवंत कुलकर्णी आणि सहकारीवर्गाने ही पाहणी केली आहे.

 

अपेक्षेप्रमाणे गणित आणि विज्ञान हे विषय ऑनलाईन स्वरूपात शिकणे अवघड जात असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याच्याच जोडीला भाषा हा विषयसुद्धा ऑनलाईन स्वरूपात शिकणे अवघड जात असल्याचे विद्यार्थी स्पष्ट करतात. अर्थात, हा कल काहीसा गोंधळात टाकणारा आहे. कारण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषाशिक्षणासाठीची अनेक ऑनलाईन सॉफ्टवेअर अतिशय प्रभावी कामगिरी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ऑनलाईन शाळांमध्ये भाषाशिक्षण नापास का ठरते आहे, हा शिक्षणतज्ज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे.

ऑनलाईन शिक्षणाचा अनुभव फक्त सुमारे १५ टक्के विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. ३४ टक्के विद्यार्थ्यांसाठी ठीक किंवा समाधानकारक आणि ३९ टक्के विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण, असा राहिला आहे. सहा टक्के विद्यार्थ्यांसाठी तो वाईट ठरला आणि ६.३ टक्के विद्यार्थ्यांना तो अतिशय वाईट ठरला.

या अहवालामधील त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, फक्त १२.३ टक्के विद्यार्थ्यांसाठीच ऑनलाईन शिक्षणावर पूर्णपणे लाल फुली मारली आहे. पर्याय दिल्यास ६० टक्के विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष वर्गात जाऊन घेतल्या जात असलेल्या शिक्षणासच प्राधान्य दिले आहे.

अर्थात, हा निष्कर्ष काही धक्कादायक नाही. मूळातच, ऑनलाईन शिक्षणासाठी उपलब्ध असणारे तंत्रज्ञान, साधन-सुविधा या महत्वाच्या आहेत. आणि तंत्रज्ञानापेक्षाही त्यासाठीची मानसिकता अतिशय महत्वाची आहे. आणि याच आघाडीवर आपल्या शिक्षणतज्ज्ञांना खूप काही काम करणे बाकी आहे. मोबाईल, कनेक्टिव्हिटी आदी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, ऑनलाईन शिक्षणासाठीची मानसिकता, त्या दिशेने विद्यार्थी-पालकांची मशागत, मुख्य म्हणजे शिक्षकांची तयारी करून घेणे अत्यावश्यक व निर्णायक आहे.

कोरोना परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांनाच अनेक न्यू नॉर्मलचा स्वीकार करावा लागला आहे. त्यामध्येच ऑनलाईन शिक्षण हे अतिशय महत्वाचे ठरते आहे. अर्थात, ऑनलाईन पद्धतीने शिकला म्हणजेच तो विद्यार्थी-शिक्षणसमूह प्रगतीपथावर गेला, असे नाही. पारंपरिक, वर्गांमधील शिक्षणाचा गाभा आजदेखील महत्वाचा आहे आणि उद्याही राहील. परंतु, एक पूरक साधन म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय नक्कीच स्वीकारला जाणे गरजेचे आहे. तसेच, शिक्षणाची व्याप्ती वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांपर्यंत कधीही-कुठेही-केव्हाही शिक्षणगंगा पोचविण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आधार मोलाचा आहे.

कोरोना संसर्गानंतर आता सर्वंच आघाड्यांवर पुनःश्च हरि ओम करण्यात आला आहे. ऑनलाईन शिक्षणाचा किमान श्री गणेशा तरी झाला, हेही नसे थोडके!

Previous Post

टँकरच्या धडकेत कंपनीची व्यवस्थापिका ठार

Next Post

बाळासाहेबांची व्यंगचित्र हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या कला संपत्तीतील एक महत्त्वाचा ऐवज आहे-प्रशांत कुलकर्णी

Next Post
बाळासाहेबांची व्यंगचित्र हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या कला संपत्तीतील एक महत्त्वाचा ऐवज आहे-प्रशांत कुलकर्णी

बाळासाहेबांची व्यंगचित्र हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या कला संपत्तीतील एक महत्त्वाचा ऐवज आहे-प्रशांत कुलकर्णी

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.