ग्रहस्थिती : बुध, हर्षल, राहू, गुरू मेष राशीत, रवि वृषभेत, मंगळ कर्क राशीत, शुक्र मिथुनेत, प्लूटो मकर राशीत, नेपच्युन मीनेत, शनि कुंभेत, केतू तूळ राशीत, विशेष दिवस : ३ जून रोजी वटपौर्णिमा, ७ जून रोजी संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय : रात्री १० वाजून ३९ मिनिटांनी.
– – –
मेष : तरुणांच्या नवीन कल्पनेला वाव मिळून त्यातून अर्थार्जनाचा मार्ग सापडेल. विदेशात उच्च शिक्षण घेण्याच्या विचाराला गती मिळेल. प्रवेश मिळवताना अडचणी येतील. मात्र, त्यामुळे नाराज होऊ नका. गुरुकृपेने काम मार्गी लागेल. नव्या नोकरीचा कॉल येईल, तिथे हमखास यश मिळेल. व्यवसायात नव्या गाठी भेटी होतील, त्यामधून काही नवे प्रोजेक्ट मार्गी लागतील, चांगला आर्थिक फायदा होईल. घरातल्या किरकोळ कुरबुरींकडे लक्ष देऊ नका. वीकेंड मित्रमंडळींबरोबर सेलिब्रेट कराल.
वृषभ : नव्या क्षेत्रात कामाची संधी मिळेल. विचार करून निर्णय घ्या. व्यावसायिकांना चांगला काळ. छोट्या कारणांमुळे आरोग्यावर परिणाम होईल. ध्यानधारणा करा. रुखरुख लावणारी घटना घडेल. नोकरी-व्यवसायात योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा करू नका. आर्थिक बाजू बळकट राहील. पण अवास्तव पैसे खर्च करू नका. शिक्षक, प्राध्यापकांसाठी उत्तम काळ. काहींना अचानक धनलाभ होईल. आध्यात्मिक ठिकाणी भेटींमुळे मन प्रसन्न राहील.
मिथुन : मालमत्तेसंदर्भांतील प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल. खातरजमा करूनच नवी गुंतवणूक करा. अन्यथा पस्तावाल. शुभघटनांचा अनुभव येईल. मन आनंदी राहील. मिष्टान्नभोजनाचा योग असला तरी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरीत मोठी जबाबदारी येऊ शकते. कामाच्या धावपळीचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. प्रवासात सतर्क राहा. अचानक खर्च वाढेल. चिडचिड होईल.
कर्क : विद्यार्थीवर्गाला चांगले यश मिळेल, उत्साह वाढेल. स्पर्धेत चमकाल. निर्णयासाठी सल्ला घेताना सावधान. व्यवसायात अडचणी येतील. भागीदारांबरोबर वाद होतील. नव्या नोकरीचे प्रयत्न मनासारखी संधी समोर आणतील. महिलांशी आदराने बोला. घरातल्या ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्या. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. जुने दुखणे त्रास देईल. पती-पत्नीत वादाचे प्रसंग घडतील. तुटेपर्यंत ताणू नका. जुने मित्र भेटतील.
सिंह : वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. विदेशात जाण्याची संधी मिळेल. मार्केटिंग, लेखन, बांधकाम क्षेत्रात चांगला काळ. आर्थिक बाजू भक्कम होईल. विदेशात व्यवसायाचा विचार पुढे न्या. कुणाच्या सल्ल्याने निर्णय घेऊ नका. कायद्याच्या चौकटीत काम करा. अवैध मार्गाने पैसे कमावू नका. प्रलंबित सरकारी कामे मार्गी लागतील. पाठीचे, कानाचे दुखणे त्रास देईल. महागडी वस्तू खरेदी कराल.
कन्या : अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होईल. नोकरीत बदली होईल. कागदपत्रे तपासूनच सही करा. घरात कामाची जबाबदारी वाढू शकते. नातेवाईकांबरोबर वाद टाळा. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रेमप्रकरणात वाद होतील. सामाजिक कामासाठी वेळ द्याल. कामासाठी धावपळ होईल. जुने येणे वसूल होईल. उधार उसनवारी टाळा. कर्ज मंजूर होईल. महिलांना आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात.
तूळ : माहिती-तंत्रज्ञान, संशोधन, आदी क्षेत्रात उत्तम काळ आहे. नवे काम मिळाल्याने आर्थिक बाजू भक्कम होईल. तरुणांना शुभघटनांचा अनुभव मिळेल. सल्ले देणे टाळा. त्यातून वाद उद्भवतील. स्थावर मालमत्तेसंदर्भातील प्रश्न मार्गी लागण्यास विलंब होईल. नोकरीत काळजी घ्या. वरिष्ठांचे निर्णय मान्य करा. शुभ घटना कानावर पडतील. त्यामुळे आठवडा आनंदात जाईल. घरात छोटा समारंभ घडेल. संततीकडून शुभवार्ता समजेल. खेळाडूंना चांगला काळ.
वृश्चिक : प्रलंबित सरकारी काम मार्गी लागेल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. व्यवसायात नव्या संधी चालून येतील. कलाकार, संगीतकार, पत्रकार, संपादकांना मानसन्मान मिळेल. नोकरीत वाद घडतील. लॉटरी, शेअर, सट्ट्यातून धनलाभ होईल. शत्रूच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवा. मनस्ताप होईल. नव्या ओळखी होतील, त्यामधून भविष्यात काम मिळेल. ध्यान धारणेसाठी वेळ द्याल. राजकारणी मंडळींसाठी चांगला काळ.
धनू : तरुणांसाठी उत्तम काळ. कामाचा कंटाळा येईल. कुटुंबाला वेळ द्याल. आध्यात्म, धार्मिक गोष्टींकडे कल राहील. नोकरीत पगारवाढ, प्रमोशन होईल. बदलीrच्या प्रयत्नांत यश मिळेल. व्यवसायात नव्या ऑर्डर येतील. नवा व्यवसाय सुरु करण्याच्या बाबतीत लगेच निर्णय घेऊ नका. अभियंता, रिअल इस्टेट एजंट यांची आर्थिक बाजू भक्कम होईल. नवे घर घेण्याच्या कल्पनेला आकार येईल. जुनी मित्रमंडळी भेटल्याने मन आनंदी राहील.
मकर : आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. सोशल मीडियावर काळजी घ्या. त्रास होईल. नवीन गुंतवणूक, घर, वाहन याच्या बाबतीत निर्णय होतील. कामात अति विश्वास नको. बोलताना काळजी घ्या. वेळेचे व्यवस्थापन करा. कामासाठी विदेशात किंवा बाहेरगावी जावे लागू शकते. बँक बॅलन्स चांगला राहील. हिशोबी राहा. उधार देणे टाळा. वाहन काळजीपूर्वक चालवा.
कुंभ : सरकारी क्षेत्रात उत्कर्ष घडवून आणणारा काळ. चैनीवर पैसे खर्च करणे टाळा. कामातील दगदगीचा आरोग्यावर परिणाम होईल. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. निर्णय घेताना घाई करू नका. सामाजिक कार्यात वेळ द्याल. नवीन व्यवसायाच्या बाबतीत दमाने घ्या. मित्र मंडळींकडून चांगला लाभ होईल. धार्मिक क्षेत्राला भेट द्याल. गुरुकृपा राहील.
मीन : प्रलंबित काम मार्गी लागल्याने आत्मविश्वास वाढेल. तरुण मंडळींना चांगल्या घटनांचा अनुभव मिळेल. कलाकारांना चांगली संधी मिळेल. एखादा प्रोजेक्ट मिळू शकतो. त्यामुळे समाजात चांगला मान-सन्मान मिळेल. नोकरीत अधिकची मेहनत करावी लागेल, त्यातून मोठे यश मिळेल. कुटुंबातील काहींच्या वागण्याचा त्रास करून घेऊ नका. वकील, डॉक्टर, शास्त्रज्ञांसाठी काळ उत्तम राहाणार आहे.विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील.