ग्रहस्थिती : मंगळ मेषेत, हर्षल वृषभेत, गुरु-शुक्र कर्क राशीत, राहू कुंभेत, शनि-नेपच्युन मीनेत, रवि-बुध मिथुनेत,केतू सिंहेत, प्लूटो मकरेत. दिनविशेष : २७ जून शनिप्रदोष, २९ जून वटपौर्णिमा, ३ जुलै संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रा. ९ वा. ४७ मि.

मेष : आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास कराल. सरकारी कामे रेंगाळतील. नातेवाईकांशी जमवून घ्या. कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर पडतील. चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. प्रेमप्रकरणात सावध राहा. तरुणांमध्ये चंगळवादी वृत्ती वाढेल. कामात विश्वास ढळू देऊ नका. संशोधकांच्या नव्या संकल्पना यश मिळवून देतील. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. युवा वर्गाला चांगले यश मिळेल. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ. कौटुंबिक पावसाळी सहलीचे आयोजन कराल. व्यवसायात आर्थिक गणित चुकू शकते. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या.

वृषभ : कुटुंबातील वातावरण आनंद देईल. घरात समारंभ होईल. मालमत्तेचा विषय मार्गी लागेल. विवाहेच्छुंसाठी चांगला काळ. नोकरीनिमित्त प्रवास कराल. नव्या कल्पना व नवे काम यातून आनंद मिळेल. व्यवसायात योग्य समन्वय ठेवा. व्यवहारात काळजी घ्या. काही ठिकाणी भावना, संवेदना बाजूला ठेवा. कामात आरोग्याची काळजी घ्या. कामे विलंबाने होतील. घरातील वातावरण शांत ठेवा. तरुणांनी समोर आलेल्या परिस्थितीशी दोन हात करावे. आठवड्याअखेर सकारात्मक विचारांना चालना मिळेल.

मिथुन : मित्रांशी आणि अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. धाडस दाखवणे अंगाशी येईल. तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात निर्णय घेताना ताणाताणी करू नका. नोकरीत प्रगती होईल. आयटी कर्मचार्यांना विदेशात नोकरीची संधी येण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात चांगला अनुभव येईल. भागीदारीत संयम ठेवा. नवीन गुंतवणूक करताना जादाचा परतावा फसगत करील. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना यश देणारा काळ. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.

कर्क : सरकारी कामे पुढे सरकतील. नव्या ओळखींमधून लाभ मिळतील. व्यवसायात उलाढाल वाढेल. नव्या संकल्पना पुढे जातील. आरोग्याची काळजी घ्या. भागीदारीत वाद होतील. नोकरीत व्यक्त होताना काळजी घ्या. येणे वसूल होईल. शेजार्यांना मदत कराल. कुटुंबासाठी भरपूर वेळ खर्च होईल. घरासाठी एखादी महागडी वस्तू खरेदी कराल. अचानक धनलाभाचे योग आहेत. शेअर, सट्टा, जुगार यापासून दोन हात दूर राहा. भाऊ-बहिणींची मदत होईल. नोकरीत कामाची अधिकची जबाबदारी दिली जाईल.

सिंह : विनाकारण वाद होतील. नोकरीत कामावर विशेष लक्ष ठेवा. व्यवसायात चांगली स्थिती राहील. नवे प्रकल्प यश देतील. सामाजिक कार्यात कौतुक होईल. नव्या व्यक्तीवर विश्वास टाकू नका. भागीदारी व्यवसायात अचानक बदल होतील. मनावरील दडपण वाढेल. आर्थिक व्यवहारांत शॉर्टकट टाळा. कोणाबद्दल मते बनवू नका. तरुणांचा आत्मविश्वास आणि कामाचा वेग वाढेल. प्रवासात खिसा पाकीट सांभाळा. कुटुंबाबरोबर भटकंती होईल. बँकेची कामे पुढे सरकतील. महिलांचा भाग्योदय करणार्या घटना घडतील.

कन्या : आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. आर्थिक बाजू भक्कम होईल. कुटुंबासाठी भरपूर वेळ खर्च होईल. सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल. तरुणांना अनपेक्षित बातमी कानी पडेल. कोणाला सल्ले देऊ नका. मनातल्या सगळ्या गोष्टी व्यक्त करू नका. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. मोठ्या व्यवहारांत खबरदारी घ्या. भावा-बहिणीच्या बाबत अचानक मोठा खर्च निर्माण होऊ शकतो. शेअर, लॉटरीतून काहीजणांना लाभ होईल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. जुने दुखणे पुन्हा डोके वर काढेल.

तूळ : कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार व कोर्ट-कचेरीची कामे पुढे सरकतील. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळेल. जुने प्रश्न मार्गी लागतील. खेळाडूंचा गौरव होईल. मोठ्या व्यक्तीच्या भेटी लाभदायक ठरतील. महिलांना यश मिळेल. नव्या योजनांना गती मिळेल. सकारात्मक विचार पुढे जाण्यासाठी फायदेशीर ठरतील. नोकरीनिमित्ताने विदेशात जाल. व्यवसायात भावनेच्या भरात घेतलेला निर्णय त्रासदायक ठरेल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. पावसाळी सहलीत काळजी घ्या. गिर्यारोहणाचा नियोजन करून प्लॅन ठरवा.

वृश्चिक : घरातील वातावरण आनंदी राहील. कामे चिकाटीने पूर्ण कराल. पत्नीसाठी पैसे खर्च कराल. मित्रांशी जपून वागा. कुणाला सल्ले देऊ नका. महिलांशी जपून बोला. नोकरीत सावध राहा. व्यवसायात कर्तृत्व सिद्ध कराल. हिशेब सांभाळा. तरुणांना सहकार्य मिळेल. घरात ज्येष्ठांचा अनादर करू नका. मुलांची शैक्षणिक प्रगती होईल. धार्मिक स्थळांना भेट द्याल, समाधान मिळेल. क्रीडापटूंना यशदायी काळ. मालमत्तेचा प्रलंबित विषय पुढे सरकेल. मार्केटिंग, रियल इस्टेटमध्ये यश देणारा काळ. नोकरीत वरिष्ठ खूष होतील.

धनु : घरात एखादा छोटेखानी समारंभ घडेल. वातावरण आनंददायी राहील. सरकारी कामे पुढे सरकतील. बँकेची कामे करताना काळजी घ्या. व्यवसायाचा विस्तार करण्याबाबत विचार करून निण&य घ्या. तरुणांनी जुन्या गोष्टी डोक्यात ठेवून काम करणे टाळावे. नोकरीत काम पुढे नेण्यासाठी अधिकचे कष्ट घ्या. व्यवसायात ध्येय सहज साध्य होईल. वाक्चातुया&च्या जोरावर समोरच्याचे मन जिंकाल. सामाजिक कार्यायात कौतुक होईल. घरातील कामे मार्गी लावण्यासाठी धावपळ करा. सरकारी कामात अडथळे निर्माण होतील.

मकर : प्रवासात काळजी घ्या. आमदनी चांगली राहील. घरात वातावरण उत्तम राहील. नोकरीत वाद टाळा. नातेवाईक, मित्रांशी बोलताना काळजी घ्या. कामानिमित्त प्रवास कराल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. तरुणांना करियरच्या, उच्चशिक्षणाच्या मनासारख्या संधी चालून येतील. कामाचा ताण वाढेल. जमीनजुमल्याच्या बाबतीत निण&य घेताना विचारपूर्वक पाऊल टाका. सार्ववजनिक ठिकाणी वाद टाळा. महिलांबद्दल आदर भाव ठेवा. काही ठिकाणी कमी बोला, त्याचा फायदाच होईल. सरकारी कामांत शॉर्टकटचा वापर नको.

कुंभ : नोकरीत जोखमीचे काम करण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. व्यवसायानिमित्ताने दूरचे प्रवास कराल. नव्या संकल्पनेमधून व्यवसाय उभा राहील. आर्थिक बाजू चांगली राहील. उधार-उसनवारी टाळा. कौशल्य कामाला येईल. बुद्धीचातुर्याच्या जोरावर मोठे यश मिळवाल. नव्या गोष्टीमुळे आनंद वाढेल. घरातील वातावरण बिघडू देऊ नका. राग व्यक्त करू नका. कला क्षेत्रातील मंडळी प्रसिद्धीच्या झोतात येतील. सामाजिक कार्यात मोठे काम पूर्ण होईल. भाग्योदय करणार्या घटना घडतील. ज्येष्ठांशी सुसंवाद ठेवा.

मीन : मोठे आथि&क लाभ होतील. मनस्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करा. व्यवसायात तडजोड करू नका, घवघवीत यश मिळेल. व्यवहारात काळजी घ्या. मनातल्या गोष्टी ओठावर आणू नका. सामाजिक कार्यात गौरव होईल. नोकरदारांना आर्थिक नियोजनाची गरज राहील. निर्णणयत अति आत्मविश्वास टाळा. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. नातेवाईकांशी चेष्टामस्करी टाळा. तरुणांना यश देणारा काळ. शिक्षण क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. खेळाडूंना यशासाठी झुंजावे लागेल. नवीन वास्तू घेण्याच्या योजनेला गती मिळेल.

