• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य ( २ ते ८ मे २०२६)

भास्कर आचार्य

marmik by marmik
May 8, 2026
in इतर, भविष्यवाणी
0
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

मेष : कामातला उत्साह वाढेल. नोकरी-व्यवसायात हुशारीच्या जोरावर चांगले यश मिळेल. वाद टाळा. तरुणांच्या मनासारखी कामे होणार नाहीत. कमीपणा घ्यायला लाजू नका. भविष्यात त्याचा फायदा होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण मनासारखे राहील. खर्चाचे नियोजन करा. लेखक, कलाकारांसाठी यशदायी काळ. घरात ज्येष्ठांचा आदर करा. चुकीची संगत टाळा. खेळाडूंना अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळेल. मुलांच्या वर्तनाकडे लक्ष द्या. सार्वजनिक ठिकाणी नियम पाळा. शेअर, जुनी गुंतवणूक यामधून चांगला लाभ मिळेल. आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या.

वृषभ : जुने येणे अचानक वसूल होईल. आर्थिक ताण कमी होईल. काही कारणामुळे कामाला विलंब होईल. कामाचे गणित बिघडेल. व्यवसायात वाढीव कष्ट घ्या. सरकारी कामे पुढे सरकणार नाहीत. अचानक तब्येत बिघडेल. महिलांशी जपून बोला. तरुणांना, लेखक, कलाकार, गायकांना यश मिळेल. आनंदवर्धक बातमी कळेल. नोकरीत काम आणि वेळेचे गणित साधा. मुले कर्तृत्वाच्या जोरावर यश मिळवतील. जुन्या मित्रांच्या भेटी होतील. कौटुंबिक धार्मिक सहल घडेल. दानधर्म होईल.

मिथुन : व्यवसायात अडचणी येतील. नव्या ओळखींमधून काही कामे पुढे सरकतील. नोकरदारांना दूरचे प्रवास करावे लागतील. सरकारी कामे झटपट मार्गी लागतील. देवाधर्मासाठी वेळ खर्च होईल. तरुणांना समाधान देणार्‍या घटना घडतील. मोठे निर्णय घेताना सल्ले घ्या. कला, छंदातून नवीन व्यवसाय उभा राहील. मुलांना अनेपक्षित यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ खूष होतील. कामात उतावळेपणा टाळा. वडीलधार्‍यांच्या मार्गदर्शनमुळे अडकलेले काम मार्गी लागेल. भागीदारीत वाद होतील.

कर्क : लांबचे प्रवास टाळा. घरात वेळ खर्च होईल. व्यवसायात लाभ होतील. नोकरीत संयमाने काम करा. वरिष्ठांची नाराजी ओढवून घेऊ नका. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. घरात आनंदसोहळा होईल. जुने मित्र भेटतील. काही गोष्टी मनात ठेवा. व्यवसायात महत्वाकांक्षी योजना पुढे जातील, त्यांचे कौतुक होईल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. माध्यम क्षेत्रात चांगली बातमी कळेल. तरुणांना नोकरी मिळेल. भावंडांशी जमवून घ्या. उच्च शिक्षणात, शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. उधार उसनवारी टाळा.

सिंह : कामातले ताणतणाव कमी होतील. आरोग्याचे प्रश्न सुटतील. घरात आनंदाची बातमी येईल. विवाहेच्छुंना हुरूप मिळेल. समाजकार्यातून उत्साह वाढेल. कामाचा गौरव होईल. व्यवसायात कामाचा ओघ वाढेल. तरुणांना मोठ्या नोकरीची संधी येईल. आर्थिक नियोजनात चुका करू नका. नव्या ओळखी कामी येतील. ज्येष्ठांचा आदर करा. लेखक, कलाकारांसाठी यशदायी काळ. जुन्या व्याधी डोके वर काढतील. नोकरीत आपणच बरोबर, हे दाखवू नका. व्यवसायातील लाभांमधून गुंतवणूक करा.

कन्या : नोकरीत मनासारखी स्थिती राहणार नाही. वरिष्ठांशी जमवून घ्या. भागीदारीत व्यवहार गडबडतील. प्रेमप्रकरणात डोकेदुखी वाढेल. मनातल्या गोष्टी व्यक्त करू नका. व्यवसायात चांगला लाभ होईल. तरुणांना कष्ट करावे लागतील. खेळाडूंचा गौरव होईल. संयमाने व्यक्त व्हा. विवाहेच्छुंना मनासारखे स्थळ मिळेल. स्पष्टवक्तेपणा अंगाशी येईल. सट्टा, लॉटरीच्या प्रेमात पडू नका. मित्रांकडून मदत होईल. बँकेची कामे पुढे सरकतील. अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकून आर्थिक व्यवहार करू नका.

तूळ : नोकरी-व्यवसायात समजूतदारपणा कामी येईल. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम राहील. आरोग्याचे प्रश्न दूर होतील. मुलांना मदत करावी लागेल. कुटुंबासोबत दूरच्या प्रवासाला जाल. घरात किरकोळ वाद होतील. जुनी गुंतवणूक चांगला लाभ देईल. कामात वेंधळेपणा टाळा. उलटे-सुलटे आर्थिक व्यवहार करू नका. थकीत येणे वसूल करताना कष्ट पडतील. कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर पडतील. आयटी, डिझायनिंग, मेडिकल क्षेत्रात चांगले लाभ मिळतील. संगीत क्षेत्रात सन्मान होईल. जनसंपर्क क्षेत्रात कामाचा ओघ वाढेल. शेअर ब्रोकर, मार्केटिंग करणार्‍यांच्या मनासारखी कामे होतील. घरात आनंद वाढेल.

वृश्चिक : कामे वेगात पूर्ण होतील. व्यवसायात नव्या आव्हानांचा सामना कराल. आई-वडीलांच्या आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. आर्थिक व्यवहार झटपट पुढे सरकतील. धार्मिक कार्यात भरपूर वेळ खर्च होईल. मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी कष्ट घ्या. बोलणे पटले नाही म्हणून राग डोक्यात जाऊ देऊ नका. आर्थिक बाजू भक्कम राहील. प्रेम प्रकरणात वादाची ठिणगी पडेल. नोकरीत तुमच्या मताला किंमत नसल्याने नाराज व्हाल. व्यवसायात निर्णय घेताना घाई करू नये. खेळाडूंना यशदायी काळ.

धनु : मालमत्तेचे व्यवहार जपून करा. फसवणुकीची शक्यता आहे. नोकरीत जबाबदारी वाढेल. पगारवाढ, प्रमोशनचे योग आहेत. घरात ताणतणाव निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. ब्रोकर मंडळींना चांगला काळ. तरुणांनाही चांगले लाभ मिळतील. ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा. व्यवसायात नवीन करार करताना तसेच सहलीच्या नियोजनात काळजी घ्या. शेजार्‍यांशी वाद होतील. मित्रांशी आर्थिक व्यवहार करताना जपून. व्यवसायात वेळ आणि कामाचे गणित सांभाळा. कलाकारांना मनासारखे काम मिळेल.

मकर : व्यवसायात आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. मित्रांशी जुने वाद उकरून काढू नका. घरात जमवून घ्या. उधारी टाळा. नोकरीत कौतुक होईल. गायक, कलाकारांना यश देणारा काळ. तरुणांचा उत्साह वाढेल. मनातल्या गोष्टी सांगून मोकळे होऊ नका. तरुणांनी भक्कमपणे निर्णय घ्यावा. मुलांना शिक्षणाच्या नव्या वाटा खुल्या होतील. नातेवाईकांना भरपूर वेळ द्यावा लागेल. पती-पत्नीत किरकोळ वाद होतील. बोलताना अति आत्मविश्वास नको. प्रवासात अनोळखी व्यक्तीबरोबर जपून बोला.

कुंभ : विवाहेच्छुंचे विवाह जमतील. नोकरीत महत्वाची जबाबदारी अंगावर पडेल. वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. दूरचे प्रवास कराल. तरुणांना यश मिळेल. नव्या संधी फायदा देतील. शिक्षणक्षेत्रात नवे काम मिळेल. नव्या ओळखीमुळे कामे पुढे सरकतील. बँकेत कर्ज मंजूर होण्यास विलंब होईल. व्यवसायात कर्तृत्वाच्या जोरावर यश मिळवाल. लॉटरी, शेअरमधून लाभ होईल. कुटुंबासाठी वेळ खर्च कराल. उधार उसनवारी टाळा. वाहन जपून चालवा. आर्थिक बाजू चांगली राहील, घरात शुभ कार्ये होतील.

मीन : कामे अपूर्ण राहतील. कटकटी होतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. बोलताना काळजी घ्या. रागाला दूर ठेवा. मालमत्तेचा विषय काही कारणामुळे पुढे जाईल. ज्येष्ठांशी जमवून घ्या. नोकरीत कामाचे गणित बिघडेल. व्यवसायाची नवी कल्पना पुढे नेताना विचारपूर्वक पाऊल टाका. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. साहित्यिकांसाठी चांगला काळ. क्षमता तपासूनच पुढचे पाऊल उचला. अहंकार दूर ठेवा. मुलांसाठी उत्तम काळ. मामा-मावशींची मदत मिळेल. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाऊ शकाल.

Previous Post

सायबर जगातली खंडणीखोरी

Next Post

चोरांच्या उलट्या बोंबा!

Next Post
चोरांच्या उलट्या बोंबा!

चोरांच्या उलट्या बोंबा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.