आयफोन हा स्टेटस सिम्बॉल मानला जातो. अँड्रॉईड फोनपेक्षा किमतीला खूप महाग असल्याने त्याच्या किमतीबाबतीही अनेक विनोद केले जातात. त्यातला एक गाजलेला विनोद म्हणजे किडनी विकून फोन घेणे. पण कुणी खरंच तसं केलं तर?
आयफोन हा स्टेटस सिम्बॉल मानला जातो. अँड्रॉईड फोनपेक्षा किमतीला खूप महाग असल्याने त्याच्या किमतीबाबतीही अनेक विनोद केले जातात. त्यातला एक गाजलेला विनोद म्हणजे किडनी विकून फोन घेणे. पण कुणी खरंच तसं केलं तर?
विनोदात म्हटली जाणारी गोष्ट खरोखर एका महिलेने केली आहे. वांग शांगकु नावाच्या एका चिनी महिलेला नऊ वर्षांपूर्वी आयफोन आणि आयपॅड घेण्यासाठी पैसे हवे होते. दोघांची किंमत जबरदस्त असल्याने तिने पैशांची जमवाजमव करायला सुरुवात केली.
मात्र, पैसे कमी पडत असल्याचं दिसल्यावर तिने आपली किडनी विकायला काढली. त्यावेळी वांग अवघी सतरा वर्षांची होती. तिने हुनान प्रांतात अवैध पद्धतीने आपली उजवी किडनी काढायची शस्त्रक्रिया केली.
या किडनीला तिने 3273 अमेरिकन डॉलर्स (दोन लाख 42 हजार रुपये)ना विकलं. मिळालेल्या रकमेतून तिने एक आयफोन आणि एक आयपॅड खरेदी केलं. ही घटना तब्बल नऊ वर्षांपूर्वी म्हणजे 2011 मध्ये घडली.
ही शस्त्रक्रिया केल्यानंतर वांगच्या दुसऱ्या किडनीत संसर्ग झाला. जसजशी वर्षं पुढे जाऊ लागली, तसतशी तिची तब्येत बिघडू लागली. तिला डायलिसिसचा आधार घ्यावा लागला.
आज वांग 25 वर्षांची आहे. पण तिची प्रकृती फारशी बरी नसते. एकच किडनी असल्याने तिला सतत डायलिसिसचा आधार घ्यावा लागतो. ती सध्या अंथरुणाला खिळलेली आहे. आणि तिच्या तब्येतीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
सौजन्य : दैनिक सामना