• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    मोदी है तो मुमकिन है…

    आपल्यापेक्षा बेडूक हुशार!

    निर्मलाक्का! जमिनीवर या!

    मुद्रित माध्यमांचे मारेकरी

    हसू नका, आपण जात्यात आहोत!

    सरकारी संताची जळजळ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    हिंदुत्त्व : बाटग्यांचे नकली आणि शिवसेनेचे बावनकशी!

    ‘प्रोजेक्ट इम्रान’ ओव्हर!

    ‘प्रोजेक्ट इम्रान’ ओव्हर!

    कोल्हापुरात साकारले एकीचे बळ

    जरा याद रखो कामगिरी!

    जनाब फडणवीस, हे सगळे कुठून येते?

    दडपलेल्या खर्‍या काश्मीर फाइल्स

  • भाष्य

    असे साकारले महाराष्ट्र गीत!

    क्रिकेटपटू, उद्योगपती आणि समाजसेवक

    दिवाळी अंकांचा सुप्रीमो… ‘आवाज’

    भविष्य घडवणारे तंत्रज्ञान… ब्लॉक चेन

    भविष्य घडवणारे तंत्रज्ञान… ब्लॉक चेन

    व्यंगचित्रकलेचे विद्यापीठ

    शिवरायांच्या तडाख्यातून मेंगलोर कसेबसे बचावले होते..!

    Trending Tags

  • मनोरंजन

    झाँबी चावला…

    सुमनसुगंधाची अविरत दरवळ

    विजय तेंडुलकरांची पाच नाटके स्टोरीटेलवर

    फेब्रुवारीत रंगणार बोलीभाषा एकांकिका स्पर्धा

    झी टीव्हीवर ‘स्वर्ण स्वर भारत’

    फरहान, रोहित शेट्टीचे खडतर प्रशिक्षण

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    मोदी है तो मुमकिन है…

    आपल्यापेक्षा बेडूक हुशार!

    निर्मलाक्का! जमिनीवर या!

    मुद्रित माध्यमांचे मारेकरी

    हसू नका, आपण जात्यात आहोत!

    सरकारी संताची जळजळ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    हिंदुत्त्व : बाटग्यांचे नकली आणि शिवसेनेचे बावनकशी!

    ‘प्रोजेक्ट इम्रान’ ओव्हर!

    ‘प्रोजेक्ट इम्रान’ ओव्हर!

    कोल्हापुरात साकारले एकीचे बळ

    जरा याद रखो कामगिरी!

    जनाब फडणवीस, हे सगळे कुठून येते?

    दडपलेल्या खर्‍या काश्मीर फाइल्स

  • भाष्य

    असे साकारले महाराष्ट्र गीत!

    क्रिकेटपटू, उद्योगपती आणि समाजसेवक

    दिवाळी अंकांचा सुप्रीमो… ‘आवाज’

    भविष्य घडवणारे तंत्रज्ञान… ब्लॉक चेन

    भविष्य घडवणारे तंत्रज्ञान… ब्लॉक चेन

    व्यंगचित्रकलेचे विद्यापीठ

    शिवरायांच्या तडाख्यातून मेंगलोर कसेबसे बचावले होते..!

    Trending Tags

  • मनोरंजन

    झाँबी चावला…

    सुमनसुगंधाची अविरत दरवळ

    विजय तेंडुलकरांची पाच नाटके स्टोरीटेलवर

    फेब्रुवारीत रंगणार बोलीभाषा एकांकिका स्पर्धा

    झी टीव्हीवर ‘स्वर्ण स्वर भारत’

    फरहान, रोहित शेट्टीचे खडतर प्रशिक्षण

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home सिने प्रिक्षान

रॉकी

- शुद्ध निषाद

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 8, 2022
in सिने प्रिक्षान
0
Share on FacebookShare on Twitter

एखादी व्यक्ती अचानक गेली की संबधित कुटुंबीय लोकांबद्दल सहसा कुणी वाईट म्हणत नाही. पण चित्रपट काय किंवा एखादा ग्रंथ काय काय, शेवटी त्याविषयी केव्हा ना केव्हा खरं काय ते सांगायचं लागतं मग त्यावेळेस असो अगर काही दिवसांनी असो. सुनिल दत्त यांच्या ‘रॉकी’ या चित्राविषयी जवळ जवळ तसंच घडलंय. नर्गिसने केलेल्या कामगिरीबद्दल ती ‘फॉर्म’मध्ये असतानाच तारीफ केली गेलीय. ‘अनहोनी’, ‘रात और दिन’ ‘मदर इंडिया’ यातील तिच्या अप्रतिम कामाबद्दल तिच्या दुष्मनांचं (जर असेल तर) देखील विरुद्ध एकही मत पडणार नाही. सुनिल दत्तच्या अभिनयाबद्दल मात्र निरनिराळी मतं ऐकू येतील. त्यांनी ‘यादे’ हा चित्रपट १९६४ साली काढला त्यावेळी त्याची मी खूप तारीफ केली होती. तो एक भारतात अभिनव प्रयोग होता पण त्याच्या मुलाच्या कामाबद्दलही खोटं काही सांगावं हे काही खरं नाही. फिल्मी इंडस्ट्रीत सारख्या नव्या नव्या लाटा येत असतात. आता लाटा फेसाळताहेत. पूर्वी हिरोगिरी करणार्‍यांच्या पोरांना हीरो बनवून पडद्यावर आणण्याच्या कपूर घराण्याची परंपरा वेगळी आहे. या कुटुंबातील मुलांनी आपली कामगिरी इतर ठिकाणी गाजवली. टक्के टोणपे खाल्ले. सगळ्यांच्या बाबतीत ते घडणार नाही. असो. तुम्हाला सांगायचं ‘रॉकी’ या सुनिल दत्त यांच्या चित्राबाबत.
एका कंपनीत शंकर नावाच्या कामगारांच्या हिताचं रक्षण करणारा लिडर असतो. कंपनीचा मालक त्याला बाजूला सारण्यासाठी जे.डी. नावाच्या हस्तकाला सांगतो तर जे.डी. शंकरला जगातूनच कायमचा दूर करून टाकतो तर मालकाचाही खून करतो. मग तो शंकरची विधवा पत्नी पार्वती हिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो, पण दारूचा गुत्ता चालविणारा रॉबर्ट याच्यात एका क्षणात शंकरने बदल घडवून आणलेला असल्याने तो मदतीला धावून जातो. पार्वतीचा छोटा मुलगा राकेश त्याच्या मनावर या झटापटीचा परिणाम होतो. त्याच्या जन्मदात्या आईनं त्याच्यासमोर येऊ नये हा डॉक्टरांचा सल्ला खरा मानून रॉबर्ट आणि त्याची पत्नी राकेशला रॉकी डिसूझा बनवून त्याला मोठा करतात. मोठा झाल्यावर तो तुफान फटफटी चालवून हुंदडक्या करीत असतो तरी परीक्षेत पास होत असतो. मग त्याला रॉबर्ट कश्मीरला पाठवतो तिथे जे.डी.चा पोरगा आर.डी. जायचा असतो. पण हा रॉकी डिसूझा म्हणजे आर्डी तिथे पोहोचतो आणि रेणूशी ‘जंगली’ पद्धतीने मुहब्बत करू लागतो. यात एक लाजवंतीचं जोड कथानक आहे. जे.डी. जे खून करतो त्याला मदत करणारा कंपनीचा मॅनेजर त्याची मुलगी लाजवंती तिच्यावरही जे.डी. बलात्कार करतो. ती जीव द्यायला जाते तर तिला कोठेवाली वाचवते व लाजवंतीची हिराबाई होते. ही हिराबाई आपल्या बापाला त्याच्या दुष्कृत्याची पाढा वाचून दाखवते नि आत्महत्या करते. शेवटी सगळे चांगले विरुद्ध वाईट अशी धमाल फायटींग होऊन सगळं कसं व्यवस्थित होतं.
स्टोरी रायटर बी. बी. भल्ला यांनी भल्याबुर्‍या पिक्चर्सवर डल्ला मारून ही ‘चालू’गिरी केलीय. यात नवं असं काही नाहीच. फक्त कसंही करून संजय दत्तला खूप वाव मिळावा अशी सगळी व्यवस्था केलेली.
सुनिल दत्त यांनी शंकरचं काम केलंय. ते पडद्यावर मेल्यानंतर राखीच्या पोटी त्यांचाच पुत्र संजय दत्त जन्म घेतो. कंपनीचा मालक यात आपले मेहुणे अन्वर हुसेन यांनाही घेतलंय. अमजद खान प्रथम थोडा व्हिलनी असतो पण त्याला मरण्यापूर्वी सुनिल दत्त ‘गुड मॅन’ बनवतो. रिना रॉय, सत्येन कप्पू, शशिकला, रणजित, शक्ती कपूर या कलाकारांनी कामं चांगली केलीत. राखीनं संवाद न बोलता एक्स्प्रेशन छान दिलंय. यात तीन ‘आर्डी’ आहेत. रणजित आणि संजय दत्त हे आर्डी आणि संगीतकारही ‘आर्डी’ बर्मन. यांनी लव्ह स्टोरी इतकी संगीताची कामगिरी यात केलेली नाही. नुसताच बेंडबाजा नि गाजावाजा वाजवलाय.
संजय दत्त हा मुळातच कलाकारांचा मुलगा. त्याने मोटरबाईक चांगली चालवलीय. फाईट कंपोजरने सांगितल्याप्रमाणे फायटींग चांगली केलीय. पण त्याला संवादाची फेक अजून जमलेली नाही आणि त्याचे डोळे तर अगदी निस्तेज आहेत. अभिनयांत डोळ्याला फार महत्त्व असतं. ज्याचे डोळे बोलके तो डोळ्याने बरेच संवाद सांगून जातो. संजयचे निर्जीव डोळे त्याच्या प्रगतीला अडथळा आणू शकतात. आता त्याच्या वडिलांनीच प्रत्येक चित्रात हीरो बनवलं तर पाहणार्‍याचा नाईलाज आहे.
नर्गिस गेली तेव्हा तिच्या संदर्भात एक वाक्य वर्तमानपत्रात आलं होतं. ‘हल्लीच्या चित्रपटाचा खालावलेला दर्जा पाहून नर्गिसला फार हळहळ वाटली!’ आणि ती जेव्हा परदेशाहून परत आली तेव्हा ‘रॉकी’ या चित्राचा प्रायव्हेट शो पहात असतानाच तिची तब्येत जी ढासळली ती कायमचीच. हल्लीच्या चित्रपटाचा खालावलेला दर्जा आणि ‘रॉकी’ चित्रपट यात काहीतरी साम्य तिला खचितच दिसलं असलं पाहिजे. त्याशिवाय हा आघात तिच्यावर घडता ना!

Previous Post

निसटलेलं सुख शोधण्याचा प्रयत्न

Next Post

डायटप्रेमींची देवता : ज्वारी

Related Posts

सिने प्रिक्षान

‘यादों की बारात’ या अकल की बारात

May 12, 2022
पाकिजापेक्षा बेहतर ‘लाल पत्थर’
सिने प्रिक्षान

पाकिजापेक्षा बेहतर ‘लाल पत्थर’

April 14, 2022
सिने प्रिक्षान

प्रेमाच्या ताकावरचं लोणी ‘बॉबी’

April 7, 2022
सिने प्रिक्षान

एक सुंदर, नवा, वेगळा ‘अनुभव’

March 31, 2022
Next Post

डायटप्रेमींची देवता : ज्वारी

बिघडलेलं गणित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

January 16, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नया है वह

May 12, 2022

ती ऐतिहासिक भेट!

May 12, 2022

राशीभविष्य (१५ मे २०२२)

May 12, 2022

असा लागला छडा!

May 12, 2022

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.

About Us

Contact Us

Privacy Policy

Terms of Service

Refund Policy

  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नया है वह

May 12, 2022

ती ऐतिहासिक भेट!

May 12, 2022
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.