• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

हयग्रीव – प्राचीन पक्वान्न

होळी सणानिमित्त खास रेसिपी

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 27, 2021
in चला खाऊया!
0
हयग्रीव – प्राचीन पक्वान्न

– जुई कुलकर्णी

हयग्रीव या नावाचा पदार्थ मला फेसबुकवर समजला. या पदार्थाचं नाव इतकं वेगळं आणि आकर्षक होतं की तो करून बघणं भागच होतं. आपण एखादा पुराणकाळातील, वैदिक वगैरे पदार्थ करून खाणार आहोत असं या हयग्रीव नावावरून वाटत होतं आणि खरंच हा पदार्थ फार जुना आहे.
पु. ल. देशपांडेंनी म्हणलंय की ज्या घरात वर्षभरात पुरण शिजलं नाही ते मराठी घर नाही. होळी आणि पुरणाची पोळी हे अद्वैत आहे. पण माझ्यासारख्या आळशी बाईला पुरणपोळी करायचा कधीकधी कंटाळाच येतो.अशा कंटाळ्यावरचा अक्सीर उपाय म्हणजे हे हयग्रीव आहे. हयग्रीव म्हणजे खरंतर पुरणच. पण त्याचं कोडकौतुक फार, सजावट बरीच आणि त्याला लगडून असलेल्या कथाही भलत्या रोचक आहेत.
पदार्थ प्राचीन असला की त्याच्या भोवती दंतकथा वेढलेल्या असतात. मला या दंतकथा शोधून काढून वाचण्यात/ऐकण्यात खाण्याइतकाच रस असतो.
हयग्रीव हे अगदी साधे सोपे पक्वान्न तर आहेच पण राघवेंद्र स्वामींच्या मठात त्याला प्रसाद म्हणून फार महत्त्व आहे.
हयग्रीव नावाचा राक्षस होता ज्याचे वरील शरीर घोड्यासारखे व कमरेखाली मनुष्याचे शरीर होते. हय म्हणजे घोडा, ग्रीवा म्हणजे आयाळ. त्याने अमर होण्याचा वर मागितला होता, पण तो न मिळाल्याने त्याने दुसर्‍या हयग्रीव असलेल्याकडूनच मला मृत्यू यावा हा वर मागितला. त्याला वाटले असा दुसरा कोणी नाहीच तेव्हा मी अमरच राहीन. मग श्री विष्णूंंनी हयग्रीवाचेच रूप घेऊन त्याचा वध केला. त्यामुळे श्री विष्णूूंच्या हयग्रीव रूपाचे पूजन करण्यात येऊ लागले. पण हे नाव पुरणाला कसे दिले याची माहिती दुसर्‍याच एका कथेत समजते. मध्ववैष्णव संप्रदायातील स्वामी श्री वादिराजआचार्य यांनी स्वादी क्षेत्री (कर्नाटकात) तप पूर्ण झाल्यावर श्री विष्णूंना नैवेद्य म्हणून हा पदार्थ सर्वप्रथम अर्पण केला. हरभरा डाळ, गुळ, द्राक्षं, सुक्या खोबर्‍याचे तुकडे व मध हे पदार्थ वापरून हा हयग्रीव तयार झाला. हे सगळेच पदार्थ त्यांना तपोभूमीमध्ये सहज उपलब्ध झाले, कारण त्यांच्या दर्शनाला येणारे गरीब लोक यापैकीच पदार्थ वादिराजांना देण्यासाठी घेऊन येत असत. तीन दगडांच्या चुलीवर वनामध्ये वादिराजांनी हे सगळे पदार्थ एकत्र शिजवले तेच हे हयग्रीव. हा पदार्थ तयार झाल्यावर एका पात्रात घेऊन वादिराज स्वामींनी ते पात्र आपल्या डोक्यावर ठेवून श्री विष्णूंना नैवेद्यासाठी आवाहन केले तेव्हा श्री विष्णू हयग्रीव स्वरूपात तेथे प्रकट झाले.
वादिराजस्वामींच्या मागे जाऊन हयग्रीव देवांनी आपले पुढचे दोन पाय वादिराज स्वामींच्या खांद्यावर ठेवून हा नैवेद्य ग्रहण केला अशी लोककथा आहे. या पदार्थाचे नावही हयग्रीव पडले. मध्ववैष्णव संप्रदायामध्ये या पदार्थास फार महत्त्व आहे. अश्वशीरस्वरूपात असलेल्या देवाला घोड्यांचे आवडते खाद्य- हरबरे/चणेच अर्पण करणे योग्यही आहे आणि विष्णूचं आवडतं गूळखोबरंही यात आहे.
हयग्रीव अवताराच्या अनेक कथा आहेत त्यापैकी एक कथा अशी आहे की मधु-कैटभ या दोन दैत्यांनी चारही वेद पळवून नेले. ब्रम्हाने हे वेद मिळवण्यासाठी विष्णूकडे धाव घेतली तेव्हा विष्णूने घोड्याचे डोके असणार्‍या मानवाचा अवतार घेतला व वेद परत मिळवले. वेदांवर हयग्रीवाचे प्रभुत्व असल्याने असं म्हटलं जातं की वेदांचा गाढा अभ्यासक होण्यासाठी हयग्रीवाचा आशीर्वाद हवाच. शृंगेरीला हयग्रीवाचं शिल्प आहे. मेंठ नावाच्या काश्मिरी कवीने ‘हयग्रीववध’ हे नाटक लिहिलं होतं. त्यात या दैत्याच्या पराक्रमाची देवांवरही किती जरब बसली होती याचा मजेशीर श्लोक आहे.तो म्हणे सहज फेरी मारायला प्रासादातून बाहेर पडला तरी स्वर्गात भीतीने कल्लोळ उडायचा. इंद्र तर द्वारपालांची वाट न पाहता स्वत: वेशीचे दार लोटून त्याची कडीही (अर्गला) धाडकन लावीत असे.
तर अशा या जबरदस्त ताकदवान विष्णू अवताराच्या नावाचाच हा पदार्थ आहे. पुरणाचा नैवेद्य तर आपण अनेकदा सणाला करतोच. पण त्या पुरणाचं हयग्रीव कसं करायचं ते आता बघूया.

साहित्य :
एक वाटी हरबरा डाळ.
पाऊण वाटी गूळ.
सुकं खोबरं कीस एक वाटी.
एक टीस्पून खसखस.
चार चिमूटभर वेलची पूड, जायफळपूड.
काजू-बदाम चिरलेले पाव वाटी.
साजूक तूप चार टेबलस्पून.

कृती :
– एक वाटी हरभरा डाळ तीन वाट्या पाणी घालून कुकरमधे चार पाच शिट्ट्या देऊन नीट शिजवून घेतली.
– डाळीतलं पाणी तसंच ठेवायचं कारण आच देताना ते आटतं.
– जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्यात दोन टेबलस्पून तूप गरम करायचं. त्यावर डाळ परतून घ्यायची.
– डाळ जरा परतली की त्यात पाऊण वाटी गूळ, अर्धी वाटी सुकं खोबरं, खसखस घालायची.
– हे सगळं गूळ वितळेपर्यंत परतत राहायचं. आच बारीक हवी.लक्ष तंतोतंत कढईकडेच ठेवायचं. दुसरीकडे कुठेही बघायचं नाही. कुठेही जायचं नाही.
– थोड्या वेळात हे मिश्रण जरा दाटसर होऊ लागतं. कडेनं सुटू लागतं. आता आच बंद करायची.
– वरून वेलची, जायफळ पूड, उरलेला अर्धी वाटी खोबरा कीस, सढळ हस्ते काजूबदाम घालायचे.
– वरून दोन टेबलस्पून तूप ओतून खायचं. इथं कंजूसी करायची नाही.
हयग्रीव तयार आहे. हयग्रीव गरमागरम खायला घेऊ नये. जीभ आणि टाळूला वाईच चटका बसतो. जरा निवल्यावर खावं. हा पटकन होणारा व भरपूर ऊर्जा देणारा पदार्थ आहे. हयग्रीव शिस्तीत वरून पातळ तूप ओतून खायचं असतं. तिथंही कंजूषी करू नये. चवीसाठी आणि डाळ पचवायला तूप गरजेचं आहे. हा हाय प्रोटीन पदार्थ आहे. भरपूर व्यायाम केला तर हयग्रीव खाताना नक्कीच बरं वाटेल.
शेवटी होळीला घरात पुरण शिजल्याशी कारण… मग बदल म्हणून हा हयग्रीव करायला काहीच हरकत नाही.

(लेखिका अन्नपदार्थांच्या अभ्यासक आहेत)

Previous Post

वेड लागायच्या पूर्वी सुचलेलं

Next Post

भेंड्या होळीच्या!

Related Posts

चला खाऊया!

फ्राईड राईस

May 15, 2025
चला खाऊया!

मजेदार मेडिटेरियन!

May 5, 2025
चला खाऊया!

सॅलेड्स : एक पूर्ण आहार

April 18, 2025
चला खाऊया!

मूर्तिमंत माधुर्य, चिरोटे!!

April 11, 2025
Next Post
भेंड्या होळीच्या!

भेंड्या होळीच्या!

मुलाखतींचा विक्रमवीर!

मुलाखतींचा विक्रमवीर!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.