• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

प्रदूषणात दिल्ली जगात दुसऱ्या क्रमांकावर

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 2, 2020
in घडामोडी
0
प्रदूषणात दिल्ली जगात दुसऱ्या क्रमांकावर

जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहरांच्या यादीत पाकिस्तानचे लाहोर शहर पहिल्या क्रमांकावर आहे. यूएस क्वालिटी इंडेक्सच्या वतीने जगभरातील टॉप प्रदूषित शहरांची यादी जाहीर नुकतीच करण्यात आली. यामध्ये पाकिस्तानची सांस्कृतिक राजधानी समजले जाणारे लाहोर शहर टॉपवर आहे. त्याखालोखाल दिल्ली शहर आहे. नेपाळची राजधानी काठमांडू हे तिसऱया क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे.

यूएस क्वालिटी इंडेक्स ही अमेरिकेची पर्यावरण एजन्सी आहे. त्यांच्या मते एअर क्वालिटी इंडेक्स 50च्या आत असणे समाधानकारक आहे. लाहोर शहरात प्रदूषणाची पातळी ठरवण्याचे पर्टीक्युलेट मॅटर म्हणजे पीएम 423 इतके आढळले आहे. लाहोरचा एअर क्वलिटी इंडेक्स 301 पेक्षा जास्त आहे. म्हणजेच लाहोर शहराने प्रदूषणाच्या बाबतीत धोक्याची पातळी गाठली आहे. नवी दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स 229 आढळला आहे. काठमांडू येथे पीएम 178 नोंदवण्यात आले आहे. प्रदूषित शहरांच्या यादीत पाकिस्तानचे कराची शहर सातव्या नंबरवर आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात थंडीच्या दिवसांत सर्वात जास्त प्रदूषणाचा सामना करावा लागतो.

लाहोरची हवा सर्वाधिक प्रदूषित; क्वालिटी इंडेक्सचा अहवाल

दिल्लीत हवेची गुणवत्ता खराब

दरवर्षी दिल्लीत थंडीमध्ये प्रदूषणाची पातळी वाढते. तेथील हवेची गुणवत्ता खराब होते. जगातील प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली दुसऱया क्रमांकावर आहे. शेजारील राज्यांमध्ये गवत जाळण्याचा वाढत्या प्रकारामुळे दिल्लीचे प्रदूषण वाढत असल्याचे म्हटले जाते.

वीटभट्टय़ा जास्त प्रदूषणकारी

लाहोरच्या आसपास 162 वीटभट्टी कारखाने आहेत. पाकिस्तानातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पंजाब प्रांतातील प्रोविन्शियल डिझास्टर मॅनेजमेंट ऑफ ऑथोरेटी यांनी 613 वीटभट्टय़ा, 2148 कारखाने आणि 8580 वाहनांना बंद करण्यासाठी एक डेडलाईन दिली आहे. याप्रकरणी 478 जणांना अटक झाली आहे.

z काही महिन्यांपूर्वी अन्न आणि कृषी संघटनेने प्रदूषणासंदर्भात एक अहवाल दिला होता. त्या अहवालानुसार गवताचा पेंढा जाळून प्रदूषण वाढत आहे. वाहतूक आणि औद्योगिक प्रदूषणाचीही दरवर्षी भर पडत आहे. अनेक वीटभट्टी कारखाने आजही जुन्या पद्धतीने सुरू आहेत. त्यामुळे वायूप्रदूषण सातत्याने वाढत आहे.

 

सौजन्य- सामना

Previous Post

प्रबोधनकारांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचा विश्वास

Next Post

देशातील प्रत्येकाला लस देण्याची गरज नाही, साखळी तुटायला हवी! केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका

Next Post
देशातील प्रत्येकाला लस देण्याची गरज नाही, साखळी तुटायला हवी! केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका

देशातील प्रत्येकाला लस देण्याची गरज नाही, साखळी तुटायला हवी! केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.