• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

१२ मार्च भविष्यवाणी…

- प्रशांत रामलिंग (१२ ते १९ मार्च)

प्रशांत रामलिंग by प्रशांत रामलिंग
March 10, 2022
in भविष्यवाणी
0

अशी आहे ग्रहस्थिती
राहू- वृषभेत, केतू-वृश्चिकेत, शनि-मंगळ-शुक्र-प्लूटो मकरेत, रवि-गुरु-बुध-नेपच्युन कुंभेत, चंद्र-मिथुनेत त्यानंतर कर्क आणि सिंहेत. १५ मार्च नंतर रवि मीनेत, १७ मार्च रोजी राहू- मेषेत, केतू वृषभेत.
दिनविशेष – १४ मार्च रोजी आमालिका एकदशी, १७ मार्च रोजी होळी, १८ मार्च रोजी धूलिवंदन

 

मेष – आगामी काळ तुमच्यासाठी उत्तम आहे, तुमच्या मनासारख्या घटना घडतील. मंगळ उच्च स्थानी, शनि-शुक्र सोबत, लाभात रवि-गुरु-बुध त्यामुळे येणारा काळ चांगला जाणार आहे. अपेक्षित कामे झटपट पूर्ण होतील. विवाहेच्छुक मंडळींसाठी चांगला काळ राहणार आहे. वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या मंडळींना उत्तम काळ राहणार आहे. यश प्राप्तीच्या दृष्टीने उत्तम आठवडा. होळी पौर्णिमा उत्साहात साजरी करताल. या दिवशी गृहसौख्य लाभेल. काही शुभ वार्ता कानावर पडेल. नोकरदार मंडळींना चांगले लाभ होतील. बढती, बदलीसाठी उत्तम काळ राहणार आहे. सरकारी नोकरीत असणार्‍या मंडळींसाठी चांगला आठवडा राहणार आहे.

वृषभ – येणार्‍या आठवड्यात तुम्हाला चांगले अनुभव येतील. राहूचे १७ मार्च रोजी मेषेत राश्यांतर, १५ मार्च रोजी रवीचे मीन राशीत लाभतील राश्यांतर, राजयोगकारक शनी भाग्यात त्यामुळे स्थावर मालमत्ताबाबतचा विषय मार्गी लागेल. गृहसौख्याचा अनुभव येईल. मंगळ उच्चीचा त्यामुळे जो जे वांछील तो ते लाभो, असा काळ तुमच्यासाठी राहणार आहे. अपेक्षापूर्तीचा काळ राहणार आहे. व्यावसायिक उलाढाल वाढेल. आर्थिक उन्नती होईल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळेल. नोकरीसाठी राहत्या घरापासून दूर जावे लागू शकते. पत्नीकडून लाभ होतील. कुटुंबासोबत देवदर्शनाला जाण्याचे योग जुळून येत आहेत.

मिथुन – आपल्यासाठी आता अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. षष्टग्रही ग्रहांच्या तावडीतून सुटल्यानंतर आता तीन ग्रहणाचे राश्यांतर होत आहे, त्याचा चांगला फायदा होणार आहे. तुमच्यातला आत्मविश्वास जागृत होईल. नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी चालून येईल, पण चालू परिस्थितीचा विचार करूनच योग्य निर्णय घ्या, तरच फायद्यात राहाल. कुंडलीत विपरीत राजयोग होत असल्याकारणामुळे महत्वाच्या कामाची जबाबदारी खांद्यावर पडेल, ती तुम्ही सहजपणे पूर्ण करताल. पौर्णिमा विशेष आनंद देणारी राहाणार आहे.

कर्क – तुम्ही जर व्यवसाय करत असताल तर तुमच्याकडे चांगली बरकत राहणार आहे. मंगळाची उच्चस्थिती त्यामुळे तुमची उलाढाल चांगली वाढेल. आपले हितशत्रू कामात बाधा आणायचे काम करतील, त्यामुळे सावधानता बाळगा. पौर्णिमा खर्चाची रहाणार आहे. प्रेम प्रकरणात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही मंडळींच्या बाबतीत घरात आसमंजसपणा मुळे विनाकारण वादाचे प्रसंग होतील. बंधूंचे सहकार्य मिळणार नाही. एखाद्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी अंगावर पडेल. त्यामुळे चिडचिड होईल. निष्काळजीपणा टाळा अन्यथा नुकसानीला तोंड द्यावे लागेल.

सिंह – या आठवड्यात तुम्हाला संमिश्र स्वरूपाचे अनुभव येतील. ग्रहस्थिती साधारण राहणार आहे. होळी पौर्णिमेच्या आसपास आपली प्रकृती सांभाळा. अपचन, पोटाचे विकार असणार्‍या मंडळींनी विशेष काळजी घ्यायला हवी. महिला वर्गाला ओटीपोटाचे त्रास होऊ शकतात. संघर्षमय काळ राहण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गासोबत तू तू मैं मैं होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वेगळे अनुभव येतील. काहींना मानापमानाच्या घटनांना सामोरे जावे लागू शकते. राहू-केतुचे राश्यांतर कौटुंबिक सौख्य, जुने हेवेदावे, चूकभूल, मनमानीपणे यामुळे झालेल्या वादविवादावर पडदा पडेल. परिस्थिती सुखकारक राहील.

कन्या – तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी विशेष अधिकार मिळतील. मात्र, त्याठिकाणी शत्रू निर्माण होतील अशा प्रकारच्या गोष्टींपासून दोन हात दूरच राहा. वैद्यकीय व्यवसायात असणार्‍या मंडळींसाठी अनुकूल काळ राहणार आहे. उच्च शिक्षण घेणार्‍या मंडळींना चांगले यश मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असाल तर आघाडीवर राहताल. संगीत, अभिनय क्षेत्रात असणार्‍या मंडळींसाठी लाभदायक काळ आहे. आर्थिक लाभ होतील. शेअर बाजार, सट्टा या माध्यमातून पैसे मिळवण्यासाठी उत्तम काळ आहे, पण परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घ्या. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक काळ, आपले कर्तृत्वासिद्ध करण्याचा काळ, वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेताना सतर्क राहा…

तूळ – सुख समृद्धीची घोडदौड सुरूच राहणार आहे. मनासारख्या गोष्टी घडणार असल्यामुळे कामात उत्साह राहणार आहे. १५ आणि १६ या तारखांना धनलाभ होईल. व्यावसायिकांना चांगला फायदा मिळेल. विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळेल. शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असताल तर नक्की यश मिळेल. सुखस्थानात शनि-मंगळ असले तरी शुक्राच्या सानिध्यात कौटुंबिक मौज मजा आणि आनंदाचे क्षण अनुभवताल. व्ययेश बुध गुरूबरोबर पंचमात त्यामुळे धार्मिक कार्यात सहभागी होताल. देवदर्शनासाठी एखादा लांबचा प्रवास घडेल.

वृश्चिक – रवि-राहू-केतूचे या आठवड्यातील राश्यांतर पराक्रमातले शनि-मंगळ-शुक्र धावपळ वाढवणारे राहणार आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी चालून येतील. सुखस्थानातील बुध-गुरु कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवेल. षष्ठम भावावर मंगळाची दृष्टी त्यामुळे प्रकृतीच्या समस्या उद्भवतील. भाऊबंदकीमध्ये व्यावहारिक नाते बिघडेल. काही ठिकाणी तडजोडीचा विचार करा. बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. प्रवासात प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. आपल्या घराच्या शेजारी राहणार्‍या मंडळींबरोबर वादाचे प्रसंग टाळा.

धनू – नोकरी करणार्‍या मंडळींसाठी हा आठवडा विशेष फलदायी राहणार आहे. नोकरी, व्यवसायाच्या व्यतिरिक्त अन्य माध्यमातून आर्थिक लाभ होतील. राहू-केतूचे राश्यांतर फायदेशीर राहील. साडेसातीचा कालावधी आता लवकरच संपणार आहे. त्यामुळे चांगल्या दिवसांची चाहूल लागेल. सकारात्मक गोष्टी घडतील, त्यामुळे मन आनंदी राहील. घरात धार्मिक कार्ये पार पडतील. प्रवासात संवादाच्या माध्यमातून नवीन ओळखी होतील. लेखकांकडून समाजप्रबोधनाचे कार्य साध्य होईल.

मकर – साडेसाती सुरु आहे, त्यामुळे कष्ट दायक काळ राहणार आहे. राहू-केतूचे सुख आणि दशमातील राश्यांतर सुखाच्या बाबतीत कष्टदायक काळ. व्यावसायिक उचापती वाढतील. त्यामुळे काही छोटे मोठे त्रास होऊ शकतात. मित्र अपेष्टांकडून मन:स्तापाच्या घटना घडतील. अति महत्वाकांक्षी गोष्टीच्या मागे लागू नका. पौर्णिमेच्या आसपास प्रवास टाळा. वादविवादाचे प्रसंग उद्भवले तर बोलण्याच्या चातुर्यावर वेळ मारून न्या. ते शहाणपणाचे ठरेल.

कुंभ – या ना त्या कारणामुळे खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे पैसे खर्च करताना काळजी घ्या. विनाकारण खर्च करण्याचे टाळा. पौर्णिमा शुभदायक राहील. अनपेक्षित आनंदाचे क्षण अनुभवायास मिळतील. विद्यार्थी वर्गासाठी शिक्षणासाठी चांगला काळ राहणार आहे. पत्रकारांसाठी उत्तम काळ राहणार आहे. उल्लेखनीय कामाबद्दल पाठीवर शाबासकीची थाप पडेल. समाजात प्रतिष्ठा मिळेल.

मीन – पौर्णिमा अध्यात्मिक आनंद देणारी राहणार आहे. राहू-केतूचे १७ मार्च रोजी होणारे राश्यांतर धन आणि अष्टम भावातून सुरु होणार आहे. सांपत्तिक स्थिती चांगली असली तरी विनाकारण देणेकरी वाढवू नका. शेअर, वायदे बाजारातून चांगले आर्थिक लाभ होतील. आयात-निर्यातीच्या व्यवसायात असताल तर चांगले लाभ मिळतील. प्रवासाचे योग जुळून येतील. मित्रवर्गाकडून लाभ होतील. नवीन वाहनांची खरेदी होईल. तीर्थयात्रांचे योग जमून येतील.

Previous Post

राजाची ताकद कशात!

Next Post

किरीटाऽऽऽ येशील कधी परतूनऽऽऽ

Next Post

किरीटाऽऽऽ येशील कधी परतूनऽऽऽ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.