• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

भेंडीची कढी/आमटी आणि न्यूयॉर्क मेट गाला!!

- शुभा प्रभू साटम (चला खाऊया!)

शुभा प्रभू साटम by शुभा प्रभू साटम
October 7, 2021
in चला खाऊया!
0

भाद्रपदात कोकण, गोवा किंवा तिथे किनारपट्टीत थोडी जाडसर सालीची, पिवळी भेंडी मुबलक येते. नेहमीच्या वाणापेक्षा या भाजीला शिरा मोठ्या जाड असतात आणि काहीही वाया जाऊ द्यायचे नाही, या स्थानिक आयुष्यशैली सूत्रानुसार याची आमटी किंवा कढी कोकणात होते. गणपती-गौरीच्या दिवसात सतत वरणभात खाऊन कंटाळा येतो, त्यावर छान पर्याय. परत आमटी असल्याने मोठ्या कुटुंबाला पुरणार, भाजी पण परसदारातील. सकाळी नैवेद्याचे आकंठ जेवण झाल्यावर रात्री असे काही उत्तम जमते. जोडीला भाजलेला पोहा पापड, लोणचे आणि भात. ऋतूनुसार होणार्‍या भाज्या आणि आहार यांची उत्तम सांगड पारंपरिक स्वयंपाकात अशी दिसून येते. दही वापरावं अथवा ओले खोबरे. कसेही छान लागते. पाव किलो भेंडीत दहा माणसे जेवू शकतात आणि साहित्य पण माफक! आपले असे अनेक पदार्थ प्रसिद्ध होत नाहीत. एक उदाहरण देते.
अमेरिकेत क्रियोल/कजून जेवणपद्धती प्रसिद्ध आहे. आपल्याकडे मुघलाई किंवा दक्षिण भारतीय, पंजाबी जेवण कसे, तसेच! न्यू ऑर्लिन्स/लुइसियाना राज्यातील हे स्थानिक क्रीयोल कुकिंग पॉश हॉटेलच्या मेनूवर असतेच, पण पर्यटकांच्या यादीतसुद्धा अग्रक्रमी असते. या पद्धतीत गम्बो म्हणून एक मांसाहारी सूप आहे. ज्यात भेंडी प्रामुख्याने आणि अन्य मांसाहारी पदार्थ/भाज्या येतात. गम्बो सूप जगात फार नावाजला गेलेला प्रकार आहे. आपली कोकणी कढी किंवा आमटी त्याच्या तुलनेने खूप स्वस्त आणि पौष्टिक, परत पूर्ण शाकाहारी. तिला जागतिक अन्न-नकाशावर स्थान मिळायला हवे. कल्पना करा, अमेरिकेत किंवा पॅरिसमध्ये हंड्रेड परसेंट व्हेगन व्हेजिटेरियन सूप म्हणून ही कढी आलीय.
न्यूयॉर्क मेट गाला आताच पार पडला. अतिउच्चभ्रू वर्तुळातील ही मेजवानी असते. यावेळी त्यात खायला काय दिले हे एका लललेने सोशल मीडियावर टाकले. त्यात काय असावे? मका दाणे, भाजलेला टोमॅटो, रिसोटो आणि मशरूम! प्लेट किंमत ऐकून झीट येईल. शेफचे स्पष्टीकरण होते की आजच्या जीवनशैली आणि एथिक्सनुसार हा प्रामुख्याने शाकाहारी मेनू होता. वड्डे लोग, वड्डी बाते. इथे मुद्दा असा की भारतात असे रग्गड पदार्थ आहेत स्वस्त आणि पौष्टिक.
मराठी कुळीथ पिठी, पिठले, भजी आमटी, फोडणीचा भात, शेंगोळ्या, मूग खिचडी, पावटा भात असे जेवण किती जमून जाईल? पण भारतीय जेवण वडा पाव/ पुरणपोळी/ मिसळ पाव/ बटर चिकन/ छोले/ डोसा यापुढे जातच नाही. परदेशाचे सोडा, खुद्द भारतात किंवा महाराष्ट्रात आपण हळूहळू असे पदार्थ विसरू लागलोय. पूर्ण भारतात असे अनेक पदार्थ आढळून येतात जे आजच्या लोकप्रिय वेगन जेवणशैलीमध्ये व्यवस्थित सामावून जातात.
तर आज बघूया कोकणातील या दोन आमट्या/कढी.

भेंडी आमटी

साहित्य : पावसाळ्यात जाड सालीची भेंडी येते ती किंवा आपली नेहमीची भेंडी- पाव किलो
मध्यम तुकडे करून
ओले खोबरे- १ वाटी
धने + काळी मिरी- २ मोठे चमचे
कांदा- छोटा
लाल मिरच्या अथवा लाल तिखट, कसे तिखट हवे त्यानुसार
हळद
कोकम
गूळ
मीठ
तेल

कृती :
ओले खोबरे + धने + मिरी + तिखट/मिरच्या + हळद + अर्धा कांदा हे सर्व अतिशय गुळगुळीत वाटून घ्यावे.
टोपात तेल गरम करून त्यात हिंग + राई + कढीलिंब फोडणी करून, अर्धा कांदा घालून तो पारदर्शक होऊ द्यावा.
मग त्यात भेंडी घालून, थोडी परतून घ्यावी. या टप्प्यावर कोकम/चिंचकोळ टाकून, अगदी बेताने पाणी आणि थोडे मीठ घालून, भेंडी नरम शिजवावी. आता यात खोबरे वाटण घालून, हवे तसे घट्ट पातळ करून, मीठ गूळ घालून एक छोटी उकळी घ्यावी.
ही खोबरे घालून आमटी.
आता दही घालून कढी कशी करायची ते पाहू.

साहित्य : भेंडी पाव किलो मध्यम तुकडे करून.
हिरवी मिरची, आले लसूण वाटून.
चिंच कोळ थोडासा.
आंबट दही घुसळून बेसन लावून.
मीठ, हळद
धने जिरे पूड
लाल तिखट/सुक्या मिरच्या
फोडणी साहित्य

कृती : तेल तापवून फोडणी करून त्यात आले मिरची लसूण वाटण + हळद घालून, परतून, भेंडी + चिंच कोळ घालून चिक जाईतो परतून घ्यावे.
आता अंगाबरोबर पाणी + थोडे मीठ घालून किंचित शिजवावे.
घुसळून बेसन लावलेले दही घालून थोडे पातळ करावे, कारण नंतर कढी घट्ट होते. मीठ + धने जिरे पूड + साखर घालून उकळी काढावी. फार उकळवू नये. दही फाटू शकते.
पळीत तूप तापवून त्यात लाल तिखट/ सुक्या मिरच्या परतून कढीत ओताव्यात.
वरील दोन्ही पदार्थात कांदा आणि लसूण वापरणे ऐच्छिक आहे. प्रसाद किंवा तत्सम कार्याला करणार असाल तर ते वगळू शकता.
भेंडीऐवजी पडवळ/ शिराळी/ घोसाळी/ तोंडली/ बटाटा/ लाल भोपळा घालू शकता.
बटाटा/ लाल भोपळा/ रताळे घालून केलेली कढी उपासाला पण चालते. मग त्यात हळद/ लसूण/ कांदा/ बेसन टाकू नये.
तिखट आपापल्या आवडीनुसार ठरवावे.

– शुभा प्रभू साटम

(लेखिकेचे पारंपरिक अन्न या विषयावर प्रभुत्व आहे)

Previous Post

चिपी चिपी चुडू चिपी

Next Post

ती… पाहुणी…

Related Posts

चला खाऊया!

फ्राईड राईस

May 15, 2025
चला खाऊया!

मजेदार मेडिटेरियन!

May 5, 2025
चला खाऊया!

सॅलेड्स : एक पूर्ण आहार

April 18, 2025
चला खाऊया!

मूर्तिमंत माधुर्य, चिरोटे!!

April 11, 2025
Next Post

ती... पाहुणी...

झोटींगचं भूत

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.