कुणाचं मन कुणाशी जुळेल हे काही सांगता येत नाही. पण आपल्या मताचा, आपल्या विचारांचा व्यक्ती आपल्याला कधातरी भेटतोच. तो आपल्याला समजून घेणारा असतो. तो एक मित्र म्हणून भेटू शकतो किंवा आयुष्याचा जोडीदार मिस्टर परफेक्ट म्हणूनही भेटतो. मराठी सिनेसृष्टीतील स्टारकिड स्वानंदी बेर्डे हिलाही असाच तिचा मिस्टर परफेक्ट मिळाला की काय असे वाटू शकणारी पोस्ट स्वानंदीने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आणि चाहत्यांसह तिच्या हितचिंतकांच्या भुवया उंचावल्या.
स्वानंदी तिच्या सोशल मिडियावर पोस्टमुळे सतत चर्चेत असतेच. ती आपले स्टायलिश लुक सोशल मिडियावर वेळोवेळी शेअर करत असते. म्हणूनच आजच्या तिच्या या हटके पोस्टमुळे सगळे चकीत झाले. स्वानंदीने एका मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनने मात्र चाहत्यांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये स्वानंदी म्हणते, ‘तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यासाठी मी काहीही करु शकते. आयुष्यातील कठीण काळात आपण अधिक जवळ आलो आहोत. आता तुझी इतकी सवय झाली आहे की एकटीला भीती वाटते. खूप प्रेम’. प्रेम मोदीच्या रूपात स्वानंदीला तिला हवा तसा पार्टनर मिळाला तर आनंदाचीच बाब आहे ना…!