अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपासाचे आदेश देऊनही त्याची पूर्तता अद्याप सीबीआयने केलेली नाही असा दावा करत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. आम्ही याप्रकरणी तुमचे मनोरंजन करणार नाही तुम्ही हायकोर्टात जा असे बजावत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 19 ऑगस्ट 2020 रोजी आदेश दिले होते मात्र या आदेशाची अद्याप पूर्तता करण्यात न आल्यामुळे पुनीत धांदा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर सुशांतच्या चाहत्यांमध्ये एक आशा निर्माण झाली होती. मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिलासा देण्यास नकार दिला व याचिका फेटाळून लावली.