• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

यादी

अशोक नायगावकर

Marmik Team by Marmik Team
October 17, 2026
in वात्रटायन, विशेष लेख
0
यादी

चित्र-आशुतोष वाळे

यादीत चंद्राचं नाव
इतक्या वेळा कसं?
तर म्हणाले
हे वेगवेगळ्या दिवशीचं!
व्हेरिफिकेशनला गेले तर
सगळीच नावं कॅन्सल!
त्या दिवशी
नेमकी
अमोश्या!
पृथ्वीचं नांव दोनदा म्हणताना
इतर ग्रहांनी आरडाओरडाच केला
तर
एकदा स्वत:भोवती फिरताना
आणि
दुसरं म्हणजे
सूर्याभोवती फिरताना

हे सगळं ठीक आहे
पण
सूर्याचं नावच नाही
म्हणजे भलताच घोटाळा की!

चित्र-आशुतोष वाळे

लालबुंद होत डोस्कं तापलेला
केबिन ढकलन
साहेबांसमोर धडकलो
म्हणाला
`अहो मी रोज उगवतोय
पहाटे उठून!
तर म्हणाले,
उपकार करतोस कां?
आमच्या ऑफिसनं
थोडंच सांगितलंय उगवायला !
बिचारा संध्याकाळपर्यंत
ताटकळत
अखेर समुद्रात बुडी मारली!

माझ्याकडे आले
म्हटलं `माझं नाव कुठंय?
तर `केवायसी’ ंनाही केली
सगळे पेपर्स सबमिट केले होते
गावावरून किती साली
इथे आलो
एस एस सीचं मार्क शीट
रेशनकार्ड
वगैरे
वगैरे!
पण म्हणाले
`गावी कुठून आलात’

Previous Post

इझमची नव्हे सत्याची बांधिलकी

Next Post

आपला माणूस

Next Post
आपला माणूस

आपला माणूस

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.