• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

प्रबोधन-मार्मिक विनोदी कथा स्पर्धा २०२६चा निकाल जाहीर

मार्मिक प्रतिनिधी

Marmik Team by Marmik Team
October 17, 2026
in विशेष लेख
0

‘मानकरी तातल्या’ला पहिला क्रमांक, ‘मानसी’ ठरली सर्वोत्तम लघुतम कथा!

मुंबई : ‘प्रबोधन गोरेगाव’ आणि ‘साप्ताहिक मार्मिक’ यांच्यातर्फे आयोजित साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती विनोदी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून सदाशिव पाटगावकर लिखित ‘मानकरी तातल्या’ ही कथा प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. त्याचवेळी, यंदा प्रथमच घेण्यात आलेल्या लघुतम कथा स्पर्धेत प्राजक्ता पांगारकर यांच्या ‘मानसी’ या कथेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

विनोदी कथा स्पर्धेमध्ये वैशाली देवडीकर यांनी लिहिलेली ‘दाराआडचा चोर’ ही कथा दुसर्‍या क्रमांकाची मानकरी ठरली असून असून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार अमित पंडित लिखित ‘गोष्ट एका पेनाची’ या कथेने पटकावला आहे.
संध्या सामंत (कथेचे शीर्षक : गाव गर्दी गजाली) आणि डॉ. अविनाश भोंडवे (आनंदाची बातमी) यांच्या कथांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

लघुतम कथा स्पर्धेत राधिका जोशी यांच्या हिशोब या कथेने दुसरा तर अशोक गोवंडे यांच्या नेव्हर लव्ह अ स्ट्रेंजर या कथेने तिसरा पुरस्कार पटकावला आहे. प्रा. अरुण सुका पाटील यांची बळी आणि वंदना ताम्हणे यांची मॉडर्न भूत या कथांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले आहे.

‘मानकरी तातल्या’ ही विनोदी कथा स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची कथा आणि ‘मानसी’ ही प्रथम क्रमांकाची लघुतम कथा या दोन कथा साप्ताहिक मार्मिकच्या २०२६च्या दिवाळी अंकात प्रकाशित होणार असून अन्य सर्व पारितोषिक विजेत्या कथा-लघुतम कथा मार्मिकच्या नियमित अंकांत क्रमश: प्रकाशित होणार आहेत. प्रबोधन संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते, कट्टर शिवसैनिक व साहित्यसेवक असलेल्या स्व. वसंत तावडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित झालेल्या या स्पर्धेला या तिसर्‍या वर्षीही लेखकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांमधूनही स्पर्धेसाठी सकस कथा प्राप्त झाल्या.

नामवंत विनोदी लेखक सॅबी परेरा आणि पत्रकार-लेखक-कवी विनोद पितळे यांनी विनोदी कथालेखन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. लघुतम कथांचे परीक्षण ‘धक्कथा’कार आणि साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी केले. प्रबोधनचे विजय नाडकर्णी यांनी कथांची प्राथमिक छाननी केली. प्रबोधन गोरेगाव संस्थेचे प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे यांनी समन्वयाची जबाबदारी पार पाडली.
या पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याचा देखणा, दिमाखदार सोहळा लवकरच आयोजित होणार असून त्या कार्यक्रमाची पूर्वसूचना सर्व स्पर्धकांना दिली जाईल.

Previous Post

जलसंवर्धनाअभावीच दुष्काळाचे सावट!

Next Post

मोदीजी इट्स डन ब्रो!

Next Post
मोदीजी इट्स डन ब्रो!

मोदीजी इट्स डन ब्रो!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.