• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य (१७ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२६)

भास्कर आचार्य

Marmik Team by Marmik Team
October 17, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य

ग्रहस्थिती : हर्षल वृषभ राशीत, रवि कन्येत, बुध, शुक्र तुळेत, प्लूटो-मकरेत, राहू कुंभेत, शनि, नेपच्युन मीनेत, मंगळ, गुरू कर्केत, केतू सिंहेत. दिनविशेष : १७ ऑक्टो. सरस्वती पूजन, १८ ऑक्टो. भानुसप्तमी, १९ ऑक्टो. महानवमी, २० ऑक्टो. दसरा, २२. ऑक्टो. पाशांकुशा एकादशी, २५ ऑक्टो. कोजागरी पौर्णिमा, २६ ऑक्टो. अश्विन पौर्णिमा, २९ ऑक्टो. संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रा. ८ वा. ५० मि., १ नोव्हें. भानुसप्तमी, काला-कराष्टमी, ५ नोव्हें. रमा एकादशी, वसुबारस, ६ नोव्हें. प्रदोष, धनत्रयोदशी, ७ नोव्हें. शिवरात्री, ८ नोव्हें. नरक चतुर्दशी, अमावस्या आरंभ स. ११ वा. २७ मि., लक्ष्मीपूजन सायं. ६ ते ८ वा. २२ मि., ९ नोव्हें. सोमवती अमावस्या समाप्ती, दु. १२ वा. ३१ मि., १० नोव्हे. बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा, ११ नोव्हें. भाऊबीज.

 

मेष : यशदायी काळ. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. आई-वडिलांचे मोलाचे सहकार्य मिळेल. व्यवसायात यश मिळेल. कोर्ट कचेरीच्या कामाला गती मिळेल. मनाची बेचैनी होईल, असे काही करणे टाळा. नोकरीत जमवून घ्या. हातातले काम सहजपणे पूर्ण होईल. मित्रमंडळी कौतुक करतील. वाहनदुरुस्तीचा खर्च होईल. घरातील वातावरण आनंद देईल. कामातला उत्साह वाढेल. मुलांकडे लक्ष द्या. आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. मालमत्तांचे व्यवहार करताना जपून. भागीदारीत योग्य काळजी घ्या. कामात ध्येय निश्चित ठेवा. सकारात्मकता वाढेल. सरकारी कामांत घाई नको. घरासाठी भरपूर वेळ द्यावा लागेल. दिवाळीची सुरुवात गोड बातमीने होईल. सुटीमुळे सहल व भ्रमंती होईल. प्रवासात काळजी घ्या. व्यवसायात नवीन प्रयोग कराल. अचानकपणे थकीत येणे वसूल होईल. कलाकार, गायकांसाठी उत्तम काळ. सामाजिक कार्यातून आनंद मिळेल. आर्थिक कामांत छोटी चूक त्रासदायक ठरेल. सार्वजनिक जीवनात वादग्रस्त बोलणे टाळा. नोकरीच्या संधी चालून येतील. वास्तूचे प्रश्न मार्गी लागतील. ज्येष्ठांबरोबर जमवून घ्या.

वृषभ : चैन आणि मनोरंजनाकडे कल राहील. आर्थिक गणित विस्कटेल. वास्तूच्या व्यवहारांत अडचण येईल. तरुणांचे शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायात कामगारांशी वाद होतील. रोखीचे व्यवहार करताना काळजी घ्या. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. कामात चुका टाळा. तरुणांनी मानसिक संतुलन जपावे. नातेवाईकांकडून अपेक्षाभंग होईल. आर्थिक बाजू भक्कम राहील. कुटुंबीयांच्या मदतीमुळे अनेक कामे हलकी होतील. विवाहेच्छुकांसाठी काळ चांगला राहील. आध्यात्मिक कार्यातून प्रगती कराल. त्यातून मन:शांती मिळेल. तरुणांना नव्या नोकरीची संधी मिळेल. व्यवसायवाढीचा निर्णय विचारपूर्वक घ्या. सकारात्मक विचारांची सवय व्यक्तिमत्व प्रभावी होण्यास उपयुक्त ठरेल. घरात कामाची जबाबदारी वाढेल. महिलांनी अतिविश्वास दाखवणे टाळावे. शेअर, लॉटरीतून आर्थिक लाभ होतील. व्यवसायानिमित्ताने विदेशात जाल. शिक्षक, प्राध्यापक, संशोधक तसेच ब्रोकर, मार्वेâटिंग व्यावसायिकांना चांगला काळ. दिवाळीमध्ये आनंद वाढेल. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. जुना आजार बळावेल. अचानक आर्थिक लाभ होतील. चित्रकार, कलाकारांचा लौकिक वाढेल.

मिथुन : अडकलेली कामे ओळखींमधून मार्गी लागतील. घरात शुभकार्य ठरेल. छंदाचे रूपांतर व्यवसायात होईल. घरात वाद टाळा. येणे वसूल होईल. भागीदारीतील व्यवसाय तेजीत राहील. नोकरीत वाद होतील. आरोग्याचे प्रश्न त्रास वाढवतील. प्रेमप्रकरण डोकेदुखी वाढवेल. संयम आणि आत्मविश्वास ठेवा. मित्रांमध्ये वावरताना बोलताना काळजी घ्या. मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळेल. नवीन गुंतवणूक लाभ देणारी राहणार असली तरी काळजीपूर्वक पावले टाका. कामाचा अतिविचार करू नका. व्यवसायात आत्मपरीक्षण करा. शिक्षण क्षेत्रात नव्या संधी येतील. वास्तूचे प्रश्न मार्गी लागतील. लेखक, संपादक, पत्रकारांसाठी चांगला काळ. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. तरुण वाक्चातुर्याच्या जोरावर यश मिळवतील. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. सामाजिक कार्यामधून आनंद मिळेल. महिलांच्या बाबतीत जुने आजार डोके वर काढतील. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. दिवाळीचा गोडवा वाढेल. अनोळखी व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहारांत खबरदारी घ्या. सरकारी कामे पूर्ण करताना कायदेशीर चौकटी पाळा. आवक मनासारखी राहील. अवास्तव खर्च टाळा. महिलांना यश देणारा काळ.

कर्क : बुद्धिकौशल्याच्या जोरावर यश मिळवाल. व्यवसायात योजना यशस्वी होतील. घरात किरकोळ कारण वादाचे निमित्त होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. व्यवसायात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होईल. नोकरीत वरिष्ठ नाराज होतील. नवीन गुंतवणूक करताना अंदाज चुकू शकतात. तरुणांच्या मनावरचे दडपण वाढेल. नोकरीत संयम कामी येईल. कर्तृत्वात भर पडेल. पर्यटनाचे बेत आखाल. मुलाकडून चांगली बातमी कळेल. कुटुंबासाठी वेळ आणि पैसे खर्च होतील. व्यवसायात निर्णय घेताना विचार करा. दाम्पत्यजीवनात आनंदाचे क्षण अनुभवाल. प्रेमप्रकरणात वाद टाळा. मित्र, नातेवाईकांच्या बाबतीत भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. छंदासाठी वेळ द्याल. प्रवासात योग्य खबरदारी घ्या. बँकेची कामे काळजीपूर्वक करा. युवावर्गाला अपेक्षित यश मिळेल. दिवाळीचा आनंद वाढेल. सुटीनिमित्ताने सहलीचे आयोजन कराल. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. व्यवसायात कामानिमित्ताने प्रवास कराल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल, त्यामुळे घरासाठी एखादी महागडी वस्तू खरेदी होईल. महिलांचे आर्थिक गणित चुकेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल.

सिंह : व्यवसायात आणि मार्केटिंगमध्ये मोठे यश मिळेल. तरुणांसाठी आणि विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. नोकरीच्या संधी चालून येतील. नोकरीत अधिकचे कष्ट करावे लागतील. मनस्वास्थ्य सांभाळा. कामानिमित्ताने खूप प्रवास करावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी वागताना काळजी घ्या. आरोग्याच्या तक्रारी डोकेदुखी वाढवतील. घरात आर्थिक नियोजन करा. अचानक मोठा खर्च समोर उभा राहील. कलाकार, चित्रकारांचा मान-सन्मान होईल. मुलाकडून आनंददायी बातमी कळेल. मन दुखावेल असे बोलणे टाळा. मित्रांना दिलेला सल्ला फायद्याचा राहील. भावंडांबरोबर जमवून घ्या. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. दिवाळीचा आनंद बिघडू देऊ नका. शिक्षक, संशोधक, वैद्यकीय व्यावसायिक, अभियंते, कलाकार यांच्यासाठी उत्तम काळ. खेळाडूंना यश मिळेल, गौरव होईल. घरात छोटेखानी कार्यक्रम होईल. नातेवाईक, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. उधार-उसनवारीचे व्यवहार टाळा. अचानक धनलाभ होईल. मनाविरुद्ध घडणार्‍या घटनांचा अतिविचार करत बसू नका. तरुणांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. पालकांचे आरोग्य सांभाळा.

कन्या : नवीन कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. मोहाच्या गोष्टींमध्ये अडकून पडू नका. कलाकारांची चांगली प्रसिद्धी होईल. येणे वसूल होईल. हातात खेळते पैसे राहतील. व्यवसायात लॉटरी लागेल. विदेशात विस्ताराचे प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक बाजू चांगली राहील. नव्या वास्तूचे व्यवहार मार्गी लागतील. जनसंपर्क क्षेत्रात यश देणारा काळ. मित्रांशी वाद टाळा. घरात खर्च वाढतील. बहीण-भावांचे चांगले सहकार्य मिळेल. मित्रांशी वाद होतील. तुटेपर्यंत ताणू नका. अचानक वाहन नादुरुस्त होणे, कामे अडकून पडणे असे प्रसंग घडतील. नोकरीत वरिष्ठांच्या कलाने घ्या. प्रवासात काळजी घ्या, वाद टाळा. घरातही मतभेद टाळा. मार्वेâटिंग, रियल इस्टेटमध्ये चांगला काळ. तरुणांनी अति आत्मविश्वास दाखवू नये. अडकलेले काम दिवाळीच्या तोंडावर पूर्ण होईल. त्यामुळे घरात आनंददायी वातावरण राहील. धार्मिक कार्यासाठी वेळ खर्च होईल. कामानिमित्ताने दूरचे प्रवास कराल. भागीदारीत भावनिक होऊ नका. अहंकार बाजूला ठेवा, कामे सुलभ होतील. शिक्षणाचे प्रश्न पुढे नेताना वेळकाढूपणा होईल. कामाशी काम ठेवा, सल्ले देणे, मते व्यक्त करणे टाळा. सामाजिक क्षेत्रात चांगला काळ अनुभवाल.

तूळ : दिवाळीच्या तोंडावर आनंददायी बातमी कळेल. तुमच्या कामाचा गौरव होईल. बाहेरगावी फिरण्यासाठी जाल. घरात वाद टाळा. महिलांना यशासाठी अधिकचे कष्ट पडतील. व्यवसायात मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. पण, नशीब तुमच्या बाजूने राहील. नोकरीत मनासारखी घटना घडेल. नवीन घर घेण्याचा विषय पुढे ढकला. लग्नाचे विषय पुढे सरकतील. नातेवाईकांशी वाद होतील. भागीदारीत आर्थिक वाद होतील. मित्र-नातेवाईकांची मदत घ्यावी लागू शकते. दिवाळीच्या तोंडावर तरुणवर्गाला चांगले यश मिळेल. व्यवसायात मोठा निर्णय घेताना योग्य सल्लामसलत करून पुढे जा, यश मिळेल. नव्या ऑर्डर मिळतील. अनपेक्षितपणे धनलाभाची शक्यता. भावंडांचे सहकार्य मिळेल. सरकारी कामे पूर्ण करताना नियम पाळा. आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मौजमजेवर खर्च करण्याआधी खिसापाकीट पाहा. घरात टोकाची भूमिका घेणे टाळा. जुना आजार डोके वर काढेल. त्याकडे दुर्लक्ष करू नका. अनोळखी व्यक्तींशी बोलताना काळजी घ्या, आपली माहिती सांगू नका. बँकेत आर्थिक व्यवहारात अधिक दक्ष राहा. खेळाडूंना यश देणारा काळ. शेजार्‍यांना मदतीसाठी धावून जावे लागेल.

वृश्चिक : संयम ठेवूनच बोला. अरेरावी करू नका. व्यवसायात कामगार डोकेदुखी वाढवतील. नोकरीत नशीब पालटेल. पगारवाढ, प्रमोशन होईल. वरिष्ठ खूष राहतील. धार्मिक कार्यामधून समाधान मिळेल. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. नोकरीत दूरचे प्रवास करावे लागतील. कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर पडतील. वाद वाढवू नका. व्यवसायात अडचणी निर्माण होतील. मुले डोकेदुखी वाढवतील. कामात काही गोष्टींमध्ये स्पष्टता उपयुक्त ठरेल. मनातल्या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या भानगडीत पडू नका. ज्येष्ठांच्या बाबतीत संयम दाखवा. कुटुंबाशी वागताना बोलताना काळजी घ्या. आर्थिक बाजू चांगली राहील, पण, नियोजन करून पुढे जा. व्यवसायात खूप धावपळ करावी लागेल. अचानक लाभ होईल. वाचन, ध्यान, योग, व्यायामामधून मनस्वास्थ उत्तम राहील. सकारात्मक दृष्टिकोनाचा फायदा होईल. तरुणांना यश टिकवण्यासाठी वाढीव कष्ट घ्यावे लागतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मनातली गोष्ट दिवाळीत पुढे सरकेल. नवीन ओळखीमुळे जुना प्रश्न मार्गी लागेल. गुंतवणुकीसंदर्भात फसव्या आश्वासनांना बळी पडू नका. कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. बँकेचे व्यवहार जपून करा.

धनु : स्वप्ने पूर्ण होतील. तरुणांचा उत्कर्ष करणारा काळ. गुरुची साथ राहील. मित्र-मंडळींमध्ये सन्मान होईल. व्यवसायात काळज्ाीचे वातावरण राहील. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. आर्थिक गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या. महिलांना मोठे यश मिळेल. उच्चशिक्षणाचे प्रश्न वेगात मार्गी लागतील. घरात वेळ खर्च होईल. त्यातून आनंद मिळेल. समाजकार्याचा यथोचित गौरव होईल. मान-सन्मानामुळे हुरूप वाढेल. नव्या ओळखीतून काही अडकलेली कामे पुढे सरकतील. जुने मित्र भेटल्यामुळे आनंद मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. नियम तोडू नका. भावंडांचे सहकार्य मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी येईल. धावपळ करावी लागेल. दिवाळीच्या तोंडावर व्यवसायात सुवार्ता कळेल. लेखकांना नव्या संधी मिळवून देणारा काळ. विदेशात व्यवसाय विस्ताराची चर्चा पुढे सरकेल. संततीच्या आरोग्याच्या समस्या डोके वर काढतील. एखादे काम झाले नाही, म्हणून त्यात अडकून बसण्यापेक्षा पुढे जाण्याचा विचार करा. तरुणांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी चालून येईल. ज्येष्ठांच्या शब्दाला मान द्या. आई-वडिलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका.

मकर : भाग्य उजळणारी घटना घडेल. मनासारख्या गोष्टी घडतील. प्रवासात वस्तू गहाळ होतील. व्यवसायात धाडस कामी येईल. आत्मविश्वास वाढेल. ओळखीतून सरकारी कामे पूर्ण होतील. मालमत्तेची कामे लांबणीवर पडतील. घरात आनंद वाढेल. व्यवसायात भागीदारी टाळा, अन्यथा मनस्ताप होईल. नोकरीत कामानिमित्ताने विदेशात जाण्याचे योग जुळून येतील. धार्मिक कार्यातून चांगले अनुभव येतील. योगी पुरुषांची गाठभेट होईल. मधुमेह, हृदयरोग असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी. मोठे निर्णय घेताना भावनेच्या आहारी जाऊन कोणतीही कृती करू नका, त्याचा त्रास होईल. मित्रांना सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. मनस्वास्थ उत्तम ठेवा. कलाकार, संगीतकार, क्रीडापटूंना मान-सन्मानाचे योग. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाऊ शकाल. मनासारख्या घटना घडतील. अति फायद्याच्या प्रलोभनांपासून दोन हात दूर राहा. नवीन गुंतवणूक करताना सावध पवित्रा घ्या. दिवाळीत घरातील शांतता कायम ठेवा. वाद टाळा. प्रेम प्रकरणात काळजी घ्या. उधार उसनवारी देणे टाळा. आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. त्याकडे दुर्लक्ष करू नका. महिलांचे कामाचे गणित विस्कटेल.

कुंभ : कलाकारांना यशदायी काळ. नोकरीत वरिष्ठ पाठीवर प्रेमाची थाप देतील. नव्या वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल. आर्थिक बाजू सांभाळताना कसरत होईल. वाद डोकेदुखी वाढवतील. लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. सामाजिक क्षेत्रात नावलौकिक वाढेल. नोकरीत स्पष्टपणा कामी येईल. तरुणांना व्यवसायाचे नवे मार्ग सापडतील. आरोग्य चांगले ठेवा. राग व्यक्त करू नका. डोक्यावर बर्फ ठेवा. घरात आणि बाहेर बोलताना काळजी घ्या. मोठ्या वादाला तोंड फुटू शकते. नोकरीत समंजस भूमिका ठेवा. व्यवसायात नव्या संधींचे सोने करा. अहंकार बाजूला ठेवा. कलाकार, संगीतकार, क्रीडापटूंना मान-सन्मानाचे योग आहेत. कोणाच्या मध्ये मध्यस्थी करणे, सल्ला देणे, आश्वासन देणे टाळा. अचानक मोठा खर्च उद्भवू शकतो, त्यामुळे पैशाचे नियोजन करा. घरासाठी महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह टाळा. बँकेची कामे करताना काळजी घ्या. तरुणांना दिवाळीचा गोडवा लाभेल. अनपेक्षित कामे होतील. मौजमजेतून आनंद मिळेल. व्यवसायात हुरूप वाढेल. आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका.

मीन : व्यवहारात काळजी घ्या. कोर्टकचेरीची कामे पुढे ढकला. व्यवसायात नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. भावंडांशी वाद टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवाच. मोठे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्याच. हातातले पैसे आणि खर्च यांचा मेळ घालण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. मनाचा मोठेपणा दाखवा. कामानिमित्ताने प्रवास करावा लागेल. नव्या ओळखीचा चांगला फायदा होईल. मित्रांशी चेष्टामस्करी टाळा. सकारात्मक विचार करा. अति आत्मविश्वास दाखवणे टाळा. जुने येणे वसूल होईल, त्यामुळे आर्थिक बाजू बळकट होईल. प्रतिक्रिया देणे टाळा. संततीकडून चांगली बातमी कळेल. कर्तबगारी सिद्ध करण्याची संधी चालून येईल. मामा-मावशीकडून मदत मिळेल. अचानक आनंदाची बातमी समजेल. सार्वजनिक जीवनात एखादा प्रसंग त्रासदायक ठरेल. दिवाळीत मित्र मंडळींची भेट होईल, त्यामुळे आर्थिक गणित बिघडू शकते. आर्थिक घडी बिघडू देऊ नका. घरात कुणाचाही राग कुणावर काढू नका, त्रास होऊ शकतो. काही ठिकाणी व्यक्त होणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या. महिलांना यश देणारा काळ.

Previous Post

दिवाळी दसरा हातपाय पसरा!

Next Post

चुकीचा व्यवहार आणि गोठलेले खाते

Next Post
चुकीचा व्यवहार आणि गोठलेले खाते

चुकीचा व्यवहार आणि गोठलेले खाते

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.