ग्रहस्थिती : हर्षल वृषभेत, मंगळ मिथुनेत, गुरु कर्केत, शुक्र तुळेत, प्लूटो मकरेत, राहु कुंभेत, शनि नेपच्युन मीनेत, रवि केतु सिंहेत, बुध कन्येत. दिनविशेष : ३ ऑक्टो. कालाष्टमी, ४ ऑक्टो. अविधवा नवमी, ६ ऑक्टो. इंदिरा एकादशी, ८ ऑक्टो. प्रदोष, शिवरात्री, ९ ऑक्टो. अमावस्या आरंभ, रा. ९ वा. ३५ मि.

मेष : नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. कामानिमित्त प्रवास कराल. घरात मतभेद होतील. सामाजिक कार्याचा सन्मान होईल. मित्रांमधील मतभेद दूर होतील. भागीदारीतील व्यवहार त्रास वाढवतील. बँकेच्या कामांत गोंधळ होईल. आरोग्याचे प्रश्न त्रास देतील. सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. ब्रोकरांना अधिक काळजी घेण्याची गरज. सार्वजनिक ठिकाणी जपून वागा. व्यवसायात घाई नको. तरुणांना निश्चित ध्येयातून सकारात्मक फळे मिळतील. मोठे काम करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सरकारी कामात घाई करू नका.

वृषभ : आपल्या कार्यकर्तृत्वात भर पडेल. नोकरी-व्यवसायानिमित्ताने प्रवास करावे लागतील. व्यवसायात यश मिळेल. नवीन घर घेण्याचा विचार पुढे सरकेल. जनसंपर्क क्षेत्रात चांगले अनुभव येतील. तरुणांना नवी नोकरी मिळेल. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. भागीदारीतील व्यवसाय तेजीत राहील. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. जुने मित्र-मैत्रीण भेटतील. घरात आनंद वाढवणारी बातमी कळेल. आर्थिक गणित बिघडेल. नोकरीत सकारात्मक विचार करा. व्यक्तिमत्त्व प्रभावी होईल. घरात वाढीव कामे करावी लागतील. महिलांनी अति विश्वास दाखवणे टाळावे.

मिथुन : सप्ताहारंभी कटकटी होतील. नोकरीत सबुरीने घ्या. किरकोळ वादात डोके घालू नका. व्यवसायात जपून निर्णय घ्या. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. परदेशी जाण्याचे नियोजन सफल होईल. खेळाडूंना वाढीव कष्ट करावे लागतील. तरुणांचा उत्साह वाढेल. अडकलेली कामे पुढे सरकतील. कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना मानसन्मान मिळतील. महिलांच्या आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. वायफळ खर्च टाळा. मित्रांबरोबर जुन्या वादाला फोडणी देऊ नका. वास्तूचे प्रश्न मार्गी लागतील. जनसंपर्क अधिकारी, संपादक, पत्रकार यांच्यासाठी चांगला काळ.

कर्क : कामानिमित्त प्रवासात वेळापत्रक बिघडेल. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या. पती-पत्नीत वाद घडतील. नोकरीत कामाची जबाबदारी वाढेल. व्यवसायात नव्या योजना यशस्वी होतील. तरुणांनी रागावर नियंत्रण ठेवावे. आर्थिक बाजू नीट सांभाळा. मुलांच्या वागण्या-बोलण्याकडे लक्ष द्या. कोर्ट प्रकरणे मार्गी लागतील. सार्वजनिक जीवनात कटकटी टाळा. प्रेमप्रकरणात वाद टाळा. वाहन हळू चालवा. कुटुंबात भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.

सिंह : व्यवसायात कामाचे गणित बिघडेल, नफ्याचे प्रमाण घटेल. उच्च शिक्षणाचे प्रश्न मार्गी लावताना वाढीव कष्ट घ्यावे लागतील. आजार डोकेदुखी वाढवतील. तरुणांचा अधिक वेळ खर्ची पडेल. दाम्पत्यजीवनात आनंद अनुभवाल. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. जुन्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. बँकेत अडकलेली कामे पूर्ण होतील. घरात भावंडांशी जमवून घ्या. नवीन वास्तूखरेदीच्या योजना पुढे ढकला. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करताना जपून. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी चालून येईल.

कन्या : व्यवसायात नव्या योजना यशस्वी होतील. मित्रांसोबत मौजमजेवर पैसे खर्च होतील. नोकरीत नवी जबाबदारी मिळेल. पगारवाढ, प्रमोशन होईल. येणे वसूल होईल. खेळाडूंना यशदायी काळ. अचानक धनलाभ होईल. चित्त स्थिर ठेवा. मोठ्या कामात संयम राखा. घरातील वातावरण सांभाळा. महिलांना यश मिळेल. अडकलेले सरकारी काम पूर्ण होईल. व्यवसायात नवे प्रयोग करताना वेळ पाहून निर्णय घ्या. बोलताना काळजी घ्या. सकारात्मक गोष्टींचा विचार करा. मुले डोकेदुखी वाढवतील. मार्केटिंग, रियल इस्टेटमध्ये चांगला काळ.

तूळ : व्यवसायात निर्णय चुकतील. आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. जुन्या गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. सरकारी कामे पुढे नेण्यासाठी शॉर्टकट टाळा. मित्रांच्या मदतीला धावून जावे लागेल. तरुणांना नोकरी मिळेल. घरात आनंददायी बातमी कळेल. भागीदारीत चांगले यश मिळेल. प्रवासात काळजी घ्या. मौज-मजेवर खर्च करणे टाळा. बँकेत आर्थिक व्यवहारांत दक्ष राहा. खेळाडूंना यश देणारा काळ. विवाहेच्छुकांना सुवार्ता मिळेल. घरात आपले मत लादून टोकाची भूमिका घेणे टाळा. जुना आजार डोके वर काढेल. मनस्वास्थ्य जपा.

वृश्चिक : व्यवसायात चांगले लाभ होतील. नोकरीत प्रमोशनचे योग आहेत. मालमत्तेचा प्रश्न मार्गी लावताना काळजी घ्या. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार पुढे जाईल. आर्थिक बाजू चांगली राहील. आर्थिक नियोजन करा. खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. अपघाताला निमंत्रण मिळेल. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. कुटुंबात एका शब्दामुळे मोठे वाद होतील. काळजी घ्या. तरुणांना यशासाठी अधिकचे कष्ट घ्यावे लागतील. कामे पुढे नेताना वेळेचे गणित बिघडेल. धावपळ होईल. खेळाडूंना मोठे यश मिळेल.

धनु : नोकरीत प्रमोशनचे योग आहेत. व्यवसायात नव्या योजनांची अंमलबजावणी टाळा. तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. महिलांना सामाजिक चळवळीत कामाची संधी मिळेल. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षकांसाठी चांगला काळ. मित्रांशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. मोठा आर्थिक व्यवहार करण्याआधी ज्येष्ठांचा सल्ला घ्या. लेखक, प्रकाशकांसाठी नव्या संधींचा काळ. विदेशात व्यवसायविस्ताराची चर्चा पुढे सरकेल. सरकारी कामांत नियम तोडू नका.

मकर : मित्रांशी वाद होतील. मौज-मजा कराल. नोकरीत जबाबदारी वाढेल. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. समाजकार्याचा गौरव होईल. नवीन गुंतवणुकीच्या भुलभुलैयामध्ये नुकसान होईल. नोकरीत वाद होतील. वरिष्ठ नाराज होतील. व्यवसायात तेजी अनुभवाल. नव्या ऑर्डर मिळतील. वेळ व कामाचे गणित बिघडेल. उधार उसनवारी मनस्ताप वाढवेल. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. कलाकार, संगीतकार, खेळाडूंना मान-सन्मान लाभतील. कोणाला सल्ले देणे, मदतीची अपेक्षा ठेवणे या गोष्टी टाळा, भ्रमनिरास होईल.

कुंभ : घरात वाद घडतील. नोकरीत मर्जी सांभाळून काम करावे लागेल. नव्या व्यवसायाची सुरुवात करताना, नवी गुंतवणूक करताना घाई टाळा. कोर्ट-कचेरीची कामे लांबतील. घरासाठी महागडी वस्तू खरेदी करण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्या. सरकारी कामे नियमानेच पूर्ण करा. कलाकारांना यश देणारा काळ. सार्वजनिक जीवनात वागताना-बोलताना योग्य खबरदारी व समंजस भूमिका घ्या. तरुणांना व्यवसायाचे नवे मार्ग सापडतील. आरोग्य चांगले ठेवा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष नको. घरात जपून बोला. मुलांना शिक्षणात नव्या संधी चालून येतील. अहंकार बाजूला ठेवा.

मीन : ज्येष्ठांचा मान ठेवा. व्यवसायात चांगले उत्पन्न मिळेल. लहान शंका मोठी समस्या निर्माण करेल. नोकरीत कामाचा गोंधळ उडेल. जुने आजार डोकेदुखी वाढवतील. प्रेम प्रकरणात, मैत्रीत वाद होतील. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. मामा-मावशीची मदत मिळेल. भागीदारीत आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. अति आत्मविश्वास दाखवणे, प्रतिक्रिया देणे टाळा. विवाहेच्छूंसाठी चांगला काळ. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. व्यवसायात मोठा निर्णय घेताना सल्ला घ्या. संततीकडून चांगली बातमी कळेल. व्यवसायात कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी चालून येईल.