• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पीएचडीचे पंचरत्न!

योगेश वसंत त्रिवेदी (चौफेर)

Marmik Team by Marmik Team
October 9, 2026
in विशेष लेख
0
पीएचडीचे पंचरत्न!

यंदाचे वर्ष हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष आहे. २३ जानेवारी २०२७ रोजी जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना केली आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी थोर समाजसुधारक आदरणीय दादा म्हणजेच केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या अथक परिश्रमाने तसेच भाई श्रीपाद अमृत डांगे, श्रीधर महादेव उर्फ एस. एम. जोशी, सेनापती बापट, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, शाहीर अमरशेख अशा अनेकांनी केलेल्या प्रखर संघर्षामुळे संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. १०६ बहाद्दर बांधवांच्या बलिदानातून मुंबई महाराष्ट्राला मिळाली परंतु मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळ केशव ठाकरे यांनी १३ ऑगस्ट १९६० रोजी ‘मार्मिक’ हे पहिले वहिले मराठी व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. आदरणीय दादांच्या प्रेरणेने मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी आणि जाज्वल्य देशाभिमान, राष्ट्रभक्ती, मराठी भाषेचा स्वाभिमान जागविणारी संघटना ‘शिवसेना’ या नावाने १९ जून १९६६ रोजी स्थापन केली. या संघटनेची यथायोग्य भूमिका, जाज्वल्य विचार जनमानसात, मराठी आणि हिंदू बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना दैनिकाची गरज भासू लागली. भांडवलदारी वृत्तपत्रे बाळासाहेबांचे विचार योग्य पद्धतीने देत नव्हती, म्हणून मग २३ जानेवारी १९८९ रोजी त्यांनी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक ‘सामना’ सुरू केले.

आज हा सगळा प्रवास अभिमानाबरोबरच अभ्यासाचा विषय बनला आहे. प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना आणि सामना या विषयांवर महाराष्ट्रातील पाच अभ्यासकांनी विविध विद्यापीठांना प्रबंध सादर करून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना ७२ व्या वर्षी म्हणजेच २०१०मध्ये मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी मिळाली. ‘शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरूप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर मनोहर जोशी यांनी सक्रिय राजकारणात असतानाही हा अभ्यास पूर्ण केला होता. २० मार्च २०१९ रोजी डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे त्यांना ‘डी. लिट’ पदवी प्रदान करण्यात आली. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी स्वतः भेट घेऊन ही पदवी डॉ. मनोहर जोशी यांच्याकडे सुपूर्द केली. मनोहर जोशी हे दोन दोन डॉक्टरेट मिळविणारे शिवसेनेचे निष्ठावंत नेते ठरले.

प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ ते १९३० दरम्यान मुंबई, सातारा आणि पुणे येथून प्रकाशित आणि संपादित केलेल्या प्रबोधन या नियतकालिकावर दैनिक सामनाचे पुणे आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक अनंत गुरव यांनी संशोधन करून पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून २०१६मध्ये पीएचडी पदवी प्राप्त केली. आता प्रबोधन नियतकालिकाचे अंक तीन खंडामध्ये महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केले आहेत. अमरावती येथे वास्तव्यास असलेले अभ्यासक मनीष देशमुख यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनावरील सुमारे एक हजार संदर्भ आपल्या संग्रही जमविले आहे. डॉ. देशमुख यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून २०१७मध्ये ‘केशव सीताराम ठाकरे यांच्या कार्याचे ऐतिहासिक परीक्षण’ या विषयावर डॉक्टरेट (पीएचडी) मिळविली आहे. डॉ. मनीष देशमुख यांनी इतर संशोधक व सहकाऱ्यांसोबत ऐतिहासिक व सामाजिक विषयांवर लेखन आणि अभ्यासही केला आहे.

ज्येष्ठ संपादक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुकृत खांडेकर यांनी दैनिक ‘सामना’ या मुखपत्रावर पुण्यातल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक विद्यापीठातून पीएचडी मिळवली आहे. शिवसेनेच्या अकोला जिल्हा महिला संघटक प्रा. सरिता विजय वाकोडे यांनी शिवसेनेच्या मानवतावादी कार्याचे ऐतिहासिक अध्ययन (कालखंड : १९६० ते २०१०) या विषयावर अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाला प्रबंध सादर केला. विद्यापीठाच्या उपकुलसचिव मीनल मालधुरे यांनी डॉ. सरिता यांना ‘डॉक्टरेट इन फिलॉसॉफी’ ही पीएचडी पदवी प्रदान केली. प्रा. डॉ. सरिता या अकोला जिल्ह्यातील झुंझार रणरागिणी म्हणून परिचित असून बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झपाटून कार्य करीत आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिवसेना अपंग सहाय्य सेनेतर्फे पीएचडीचे पंचरत्न ठरलेल्या पाच डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मातोश्री आणि ठाकरे कुटुंबियांनी या देशाप्रती आणि राज्याप्रती दिलेल्या अभूतपूर्व योगदानाची ही एकप्रकारे महत्त्वपूर्ण पावती असून शिवसेना अपंग सहाय्य सेना या पाच डॉक्टरांचा यथोचित सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करीत आहे. रविवार दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात हा कार्यक्रम होईल. खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत ज्ञानदेव लाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. एका बाजूला शिवसेनेवर एकापाठोपाठ एक अशा प्रकारे संकटे येत असतांना प्रबोधनकार, शिवसेना आणि सामना यावर पंचरत्नांनी पीएचडी पदवी प्राप्त करणे हा एक आशेचा महत्त्वाचा किरण म्हणावा लागेल. ही नव्या पिढीला निश्चितच अनुकरणीय बाब ठरू शकते.

Previous Post

ज्ञानू, चल ना घर चलते हैं…

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.