• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पंचामृताची धपाटी

शुभांगी जोशी (चवदार साठवण)

Marmik Team by Marmik Team
October 1, 2026
in चवदार साठवण
0
पंचामृताची धपाटी

धपाटे शब्द द्वयर्थी आहे. भार पोटावर द्यायचा की पाठीवर हे आधी ठरवावे लागते. आपली लेखमाला पोटपूजेशी संबंधित असल्याने आपण धपाटा म्हणजे ‘महाराष्ट्रात घरोघरी लोकप्रिय असणारा अत्यंत रुचकर व पौष्टिक खाद्यप्रकार ‘हा अर्थ गृहीत धरून पुढे जाऊयात.
पंढरपुरात देवाच्या पंचामृती अभिषेकाचे पंचामृत पूर्वी तांब्या किंवा कळशी भरून प्रसादरूपात घरी येत असे. सगळ्यांना प्रसाद वाटूनसुद्धा ते उरायचे. त्या पंचामृताचा विनियोग योग्य प्रकारे करता यावा यासाठी पूर्वीच्या महिलांनी या पंचामृती धपाटीचा शोध लावला असावा, असा माझा कयास आहे. आमच्या घरात धपाटी हा पदार्थ आक्का नावाच्या आजींनी प्रथम आणला.
हा सर्व प्रकार पुन्हा डोळ्यांसमोर आणला माझी मैत्रीण आरती हिने. तिने पाठवलेल्या पंचामृताच्या धपाट्यांची चव अजून जिभेवर रेंगाळत आहे. आमच्याकडे येणार्‍या पाहुण्यांना मी ही धपाटी खाऊ घातली, त्यांनाही ती फार आवडली. खूप दिवसांपासून याची कृती मैत्रिणी आणि बहिणी विचारत होत्या. याची कृती खालीलप्रमाणे.
साहित्य
१) ३ वाट्या ज्वारीचे पीठ, २ वाटी कणीक, १/२ वाटी बेसन
२) १/२ वाटी (छोटी वाटी ) दूध, १/२ वाटी दही, ३ चमचे साखर, ३ चमचे मध, ३ चमचे तूप हे सर्व एकत्र करून पंचामृत करायचे.
३) १ चमचा हिंग, १ चमचा हळद, २ चमचे लाल तिखट, १/२ चमचा ओवा, १ चमचा जिरेपूड, १ चमचा धनेपूड, २ लहान कांदे किसून (कांदा घातला नाही तरी चालेल), लसूण १० ते १२ पाकळ्या, भरपूर कोथिंबीर, ३ चमचे तीळ, कोथिंबिरीच्या काड्या पण मिक्सरमधून बारीक करून घ्या, आल्याचा तुकडा.

कृती
१) परातीत सर्व पीठ घ्या, लसूण, कोथिंबीर काड्या, आलं, कांदा हे सर्व मिक्सरमध्ये वाटून त्याचे वाटण करून घ्या. हे वाटण या पिठात घालायचे. जिरेपूड, धनेपूड, तीळ, ओवा, तिखट, मीठ, हिंग, हळद हे पण पिठात घाला.
२) आता आपण तयार केलेले पंचामृत या पीठात घालून हे पीठ छान मळून घ्यायचे. चव बघून मीठ, तिखट घालायचे.
३) ही धपाटी छान लाटता येतात, तव्यावर तेल सोडून खमंग भाजून घ्या.
तुम्हाला थापून करायची असली तर थापून सुद्धा ती करता येतील.
४) मस्त दाण्याची चटणी, तिळाची चटणी, खरडा, दही ,यांतील कशाहीबरोबर धपाटी खायला चांगलीच लागतात.
पंचामृतसेवनाचे फायदे तुम्हा सर्वांना माहित आहेतच. त्यामुळे ते वेगळे लिहीत नाही. पण पंचामृताचे धपाटे मात्र जरूर करा.
Khamang.blog khamangbyShubhangi YouTube Channel

Previous Post

मोहजाळ्यातून ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये!

Next Post

अफाट आयुष्य जगलेला माणूस : अर्नेस्ट हेमिंग्वे!

Next Post
अफाट आयुष्य जगलेला माणूस : अर्नेस्ट हेमिंग्वे!

अफाट आयुष्य जगलेला माणूस : अर्नेस्ट हेमिंग्वे!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.