• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य (१५ ते २१ ऑगस्ट २०२६ )

भास्कर आचार्य

Marmik Team by Marmik Team
August 13, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

ग्रहस्थिती : हर्षल वृषभ राशीत, मंगळ मिथुनेत, रवि बुध गुरू कर्केत, प्लूटो मकरेत, राहू कुंभेत, शनि-नेपच्युन मीनेत, केतू सिंहेत, शुक्र कन्येत. दिनविशेष : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन आणि पारशी नूतन वर्ष, १६ ऑगस्ट श्री विनायक चतुर्थी, १७ ऑगस्ट नागपंचमी, १८ ऑगस्ट श्रियाळ षष्ठी, २० ऑगस्ट दुर्गाष्टमी.

 

मेष : नोकरी-व्यवसायात आव्हानांचा सामना करावा लागेल. तरुणांना यशासाठी कष्ट पडतील. अति आत्मविश्वास दाखवण्याआधी आपली ताकद आणि मर्यादांची तपासणी करून पुढे जा. वादात मध्यस्थी अंगाशी येईल. कामाची जबाबदारी पूर्ण करण्यात टाळाटाळ नको. खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलांच्या वागण्या-बोलण्याकडे लक्ष द्या. आठवड्याअखेर व्यावसायिकांची प्रतिष्ठा वाढेल. भागीदारीत काळजी घ्या. मित्रांना समजावून घ्या. मालमत्तेचे व्यवहार पुढे सरकतील. आरोग्याचे प्रश्न डोकेदुखी वाढवतील. विमा सल्लागार, मार्केटिंग क्षेत्रात यश मिळेल. लेखक, प्रकाशकांना सुखावणारी बातमी कळेल. नव्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. प्रलंबित आर्थिक कामे मार्गी लागतील. शिक्षण क्षेत्रात यश मिळेल.

वृषभ : कामाची जबाबदारी वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक नियोजन करा. तरुणांचे ध्येय पूर्ण होईल. शिक्षणक्षेत्रात यश मिळेल. आठवड्याअखेर कामाचा कंटाळा येईल. सकारात्मक वृत्ती वाढेल. सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. मित्रांशी जमवून घ्या. व्यवसायात यश मिळेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. नोकरीत वरिष्ठ खूष होतील. जपून व्यक्त व्हा. उत्साह, आनंद आणि सकारात्मकता वाढीस लागेल. नोकरी शोधणार्‍यांना मनासारखी संधी मिळेल. घरातील वातावरण चांगले राहील.

मिथुन : नाती जपताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. यशाने हुरळून जाऊ नका. उच्चशिक्षण घेणार्‍यांच्या मनासारख्या घटना घडतील. नव्या घराची योजना मार्गी लागेल. अचानक एखादी महागडी वस्तू खरेदी कराल. खेळाडूंना यश मिळेल. कठीण प्रश्न गोड बोलून मार्गी लावा. व्यवसायात चांगली प्रगती होईल. तरुणांनी उमेद ढासळू देऊ नये. व्यवसायात स्पर्धेकडे लक्ष देऊ नका. मुलांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. ज्येष्ठांचा सल्ला कामी येईल. मित्रांबरोबर मौजमजेत वेळ जाणार आहे. मनातल्या गोष्टी प्रत्यक्षात येतील. संयम बाळगा.

कर्क : भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. नोकरी, व्यवसायात कमी अपेक्षा ठेवा. तरुणांना घाई नुकसानदायक ठरेल. खेळाडूंचा गौरव होईल. घरात वेळ खर्च होईल. आर्थिक नियोजनात काळजी घ्या. भावंडांशी वागताना जपून. भागीदारीत वाद घडतील. मित्रमंडळींना आर्थिक मदत करताना परिस्थिती पाहून निर्णय घ्या. व्यवसायात आमदनी आणि खर्च यांचा मेळ बसवताना कसरत करावी लागेल. नोकरीत विनयशीलता कामी येईल. शॉर्टकट निवडून काम पुढे नेण्याचा प्रयत्न करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या.

सिंह : सरकारी कामे पुढे नेताना काळजी घ्या. कामात हेकटपणा दूर ठेवा. नोकरीत चुका होतील. सामाजिक क्षेत्रात गौरव होईल. तरुणांना यशासाठी झटावे लागेल. व्यवसायात कामाचे गणित बिघडेल. विदेशात काम सुरू असताना थोडे थांबून पुढे जा. शिक्षक, संशोधकांना नव्या संधी येतील. महिलांचा उत्साह आणि हुरूप वाढेल. घरातील कामाकडे दुर्लक्ष नको. धार्मिक कार्यातून आत्मचिंतन होईल. ब्रोकर, दलाल, मार्वेâटिंग व्यावसायिकांना लाभ मिळेल. नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मनातल्या गोष्टी ओठावर आणू नका, नुकसान होईल.

कन्या : प्रलोभने, आश्वासने यांच्यापासून दोन हात दूर राहा. कामात विवेकबुद्धी जागृत ठेवा. व्यवसायात नवे प्रयोग करताना गुणवत्ता सांभाळा. तरुणांचा निर्णय घेताना गोंधळ उडू शकतो. महिलांना यशासाठी अधिकचे कष्ट पडतील. ज्येष्ठांशी मतभेद होऊ देऊ नका. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. लॉटरी, सट्टा, शेअरच्या फंदात पडू नका. आठवड्याअखेर मानसिक स्वास्थ्य सांभाळा. सकारात्मक विचार करा, योगा, ध्यान आणि स्व-आनंदासाठी वेळ खर्च होईल.

तूळ : खूप ताणल्याने तुटते, त्यामुळे व्यवसायात जमवून घ्या. नवीन ओळखीमधून कामे पुढे सरकतील. नोकरीत मन शांत ठेवा. बँकेच्या कामात गोंधळ होईल. आरोग्याचे प्रश्न त्रासदायक ठरतील. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. नातेवाईकांशी वाद होतील. प्रेमप्रकरणात मिठाचा खडा पडेल. महिलांना कामाच्या नवीन संधी चालून येतील. सरकारी कामे झटपट पूर्ण होतील. संततीकडून डोकेदुखी वाढेल. शेजार्‍यांशी सबुरीने घ्या. कामात मोठेपणा दाखवू नका. पती-पत्नीत विनाकारण वाद होतील. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन वाहन घेण्याचे ठरवाल. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. मनाची सकारात्मकता वाढवणार्‍या घटना घडतील. लेखक, कलाकारांसाठी चांगला काळ.

वृश्चिक : उत्तम नियोजन करा. येणे वसूल होईल. पण, बेपर्वाईने पैसे खर्च करू नका. बँकेच्या व्यवहारात गोंधळ होईल. नोकरीत लाखाचे बारा हजार होतील. मुलाकडून आनंददायी बातमी कळेल. तरुणांचे कामाचे गणित चुकेल. घरात पूजा-अर्चा होतील. पत्रकार, लेखकांसाठी चांगला काळ आहे. एखादा सन्मान मिळेल. जनसंपर्क क्षेत्रात चांगल्या संधी येतील. सार्वजनिक ठिकाणी कायदेशीर त्रास होईल, असे वागू नका. मौजमजेपासून दूर राहा. शेअरमधून लाभ मिळेल. नोकरीच्या संधी चालून येतील. नोकरीत नवे बदल स्वीकारा. अति आत्मविश्वास टाळा. भागीदारीत वाद होतील.

धनु : रागाला आवर घाला. अन्यथा काम बिघडेल. उच्चशिक्षणाचे प्रश्न अडकून राहतील. तरुणांचा कल करमणुकीकडे राहील. व्यवसायात काही गोष्टींवर विसंबून राहू नका. हातातले काम पूर्ण करा. मामा-मावशींची मदत मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. सामाजिक कार्यात प्रतिष्ठेचा सन्मान मिळेल. आठवड्याअखेर नोकरीत नवी जबाबदारी पडेल. करियरला आकार मिळेल. संगीतकार, कलाकारांना नवे काम मिळेल. प्रलंबित सरकारी प्रश्न मार्गी लागतील.

मकर : घरातील वातावरण आनंद देईल. नोकरीत काही गोष्टीकडे दुर्लक्ष करा. ज्येष्ठांची मने सांभाळा. भावंडांच्या मदतीने काही कामे हलकी होतील. व्यवसायात निर्णय चुकतील. तरुणांनी संयम ठेवावा. मुलांशी मतभेद टाळावे. मित्रांबरोबर मौजमजा कराल. नवीन कामात यश मिळेल. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. ब्रोकरांच्या आर्थिक व्यवहारात गडबड होईल. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम राहील. वायफळ खर्च टाळा. मनासारखी न झाल्याने मरगळ जाणवेल. घरात वाद प्रसंग टाळा.

कुंभ : रोखठोक राहणे टाळा, नुकसान होईल. नोकरी, व्यवसायात खूपच कष्ट पडतील. नव्या कामाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. मुलांचा अतरंगीपणा मनस्तापदायक ठरेल. कामानिमित्ताने अचानक प्रवास करावा लागेल. घरात आनंदाची बातमी कळेल. खेळाडूंना यश मिळेल. मित्रांशी मतभेद मिटतील. अडकलेली कामे पुढे सरकतील. नवीन ओळखी तापदायक ठरतील. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. महिलांना यश मिळेल. ज्येष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. मामा-मावशींचे सहकार्य मिळेल.

मीन : कुटुंबासाठी भरपूर वेळ खर्च होईल. नोकरी, व्यवसायात फार चिंता न करता काम करून पुढे जा. व्यवहार आणि भावना यांची गल्लत करू नका. तरुणांचा आत्मविश्वास वाढेल, त्यातून कामे मार्गी लागतील. मुलांच्या शिक्षणाचा आलेख उंचावेल. व्यवसायात वाद टाळा. नोकरदारांच्या मनासारखी कामे होतील. खूप वेळ प्रवासात खर्च होईल. सरकारी कामे मार्गी लागतील. धार्मिक ठिकाणांना भेट द्याल. खेळाडू, कलाकार, संगीतकार, लेखकांना उत्साहवर्धक बातमी कळेल. विमा एजंट, मेडिकल व्यावसायिक, विमा सल्लागार यांना अपेक्षित यश मिळेल.

Previous Post

ढोंगबाजी बस्स करा!

Next Post

गंध वार्‍याचा… क्षणभंगुरत्वाच्या जाणिवेचा…

Next Post

गंध वार्‍याचा... क्षणभंगुरत्वाच्या जाणिवेचा...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.