• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य १ ते ७ ऑगस्ट २०२६

भास्कर आचार्य

marmik by marmik
July 30, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

ग्रहस्थिती : मंगळ-हर्षल-वृषभ राशीत,प्लूटो-मकरेत, राहू कुंभेत, शनि-नेपच्युन मीनेत, रवि-बुध मिथुनेत, गुरु-कर्क राशीत, शुक्र-केतु सिंहेत दिनविशेष : १ ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी, २ ऑगस्ट संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रा.९ वा. ३३ मि. ५ ऑगस्ट कालाष्टमी.


मेष : तरुणांना नव्या नोकरीची संधी येईल. नियोजित कामात विस्कळीतपणा येईल. व्यवसायात नव्या योजना राबवू नका, नुकसान होईल. अधिक नफा मिळवण्याच्या मागे धावू नका. मुलांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्याकडे अधिक लक्ष द्याल. नोकरीत मनासारख्या घटना घडणार नाहीत. महिलांना नवी ऊर्जा मिळेल. नवीन घराचा विषय मार्गी लागेल. वडीलधार्‍यांच्या मनावरचे दडपण वाढवू नका. विचार करण्यासाठी वेळ घ्या. मित्रमंडळींबरोबर जेवढ्यास तेवढे ठेवा. नव्या व्यवसायाच्या कल्पना सुचतील, पण घाई करू नका. खेळाडूंना चांगली बातमी कानावर पडेल. शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवासात काळजी घ्या, खिसापाकीट सांभाळा.

वृषभ : आनंदात भर पडेल. आरोग्याच्या प्रश्न त्रासदायक ठरेल. जुने आजार डोकेदुखी वाढवतील. नोकरीत कामाचे कौतुक होईल. सहकारी मदत करतील. भावाकडून मदत मिळेल. व्यवसायात नव्या योजना सफल होतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. ज्येष्ठांचा मान राखा. अनोळखी व्यक्तीला माहिती सांगताना काळजी घ्या. तरुणांचे प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायात सकारात्मकता कामी येईल. मालमत्तेसंदर्भातील चर्चा पुढे ढकला. सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्या. महिलांशी संवाद साधताना काळजी घ्या.

मिथुन : नोकरीत मनासारखी स्थिती राहील. तरुणांना यशासाठी धडपड करावी लागेल. व्यवसायात नवा पर्याय शोधा. घरात वेळ खर्च होईल. कलाकार, खेळाडूंना यश मिळेल. मित्रमंडळींशी बोलताना संयम ठेवा. कोणाचा अपमान करू नका. आई-वडिलांचा सल्ला ऐका. आर्थिक नियोजन करा. कोणाला सल्ले देऊ नका. व्यवसायात मनासारखी कामे होतील. नव्या योजना सुचतील. तरुणांचा विवाहाचा प्रश्न मार्गी लागेल. प्रवासात खिसा, पाकीट सांभाळा. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नातेवाईकांशी वाद होतील.

कर्क : मनासारखी कामे होणार नाहीत. नोकरीत कटकटी होतील. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. व्यवसायात वाढीव कष्ट पडतील. सरकारी कामे पुढे सरकतील. नवीन मित्र मदतीला धावून येतील. तरुणांना अधिक काम पडेल. प्रेमप्रकरण डोकेदुखी वाढवेल. शिक्षणक्षेत्रात चांगला काळ. उत्साह, अतिविश्वास, अहंकार यांत अडकू नका. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. पत्रकार, लेखक, यांचा नावलौकिक वाढेल. अहंकारी वृत्ती सोडून द्या. ध्यानधारणेमधून सकारात्मकता वाढेल. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.

सिंह : घाईत घेतलेला निर्णय डोकेदुखी वाढवेल. व्यवसायात गैरसमज टाळा. नोकरीमध्ये अधिक काम करावे लागेल. तरुणांचे निर्णय चुकतील. प्रवास दगदगीचा ठरेल. घरात अधिक लक्ष द्या. मनस्वास्थ बिघडेल. संयम ठेवा. बँकेचे व्यवहार करताना डोळेझाक नको. सामाजिक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उच्चशिक्षणाच्या निमित्ताने विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. ब्रोकरांना यश मिळेल. उधार-उसनवारी टाळा. वडीलधार्‍यांच्या आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक क्षेत्रात चांगला अनुभव येईल. संततीकडे लक्ष द्या.

कन्या : नोकरीत कामाची नवीन जबाबदारी पडेल. व्यवसायात यश मिळेल. शिक्षणक्षेत्रात मोठे यश मिळेल. तरुणांचा कल मौजमजा, चैनीकडे राहील. नवीन घराचा प्रश्न मार्गी लागेल. आठवड्याअखेर धावपळ होईल. कोणाला आश्वासने देऊ नका. व्यवसायात ताण जाणवेल. अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी थोरामोठ्यांचे सहकार्य मिळेल. सरकारी कामे झटपट पूर्ण होतील. प्रवासात काळजी घ्या. जुन्या ओळखींमधून फायदा होईल. नोकरी-व्यवसायातील फायद्याच्या गोष्टी जगजाहीर करू नका. काही बाबतीत सल्ला घ्या. रखडलेले काम मार्गी लावाल.

तूळ : महिलांना मोठे यश देणारा काळ. नोकरीत अडकलेली कामे पुढे सरकतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. त्रास वाढेल. नवीन वाहन घेण्याचे नियोजन कराल. पत्नीशी वाद घडतील. उधार-उसनवारी टाळा. घरात वाद टाळा. मुलांची शैक्षणिक प्रगती होईल. व्यवसायात विदेशात विस्ताराच्या योजनेला गती मिळेल. आठवड्याच्या मध्यास चांगली बातमी कळेल. सामाजिक कार्य करणार्‍या व्यक्तींचा गौरव होईल. तरुणांना मनासारखी संधी मिळेल. नवीन गुंतवणूक करण्याकडे कल राहील. भागीदारीत ताणतणाव वाढेल. नवीन घराचा प्रश्न मार्गी लागेल. विमा, वित्त क्षेत्रात चांगला काळ अनुभवाल. अडकलेली सरकारी कामे पूर्ण होतील. मित्रमंडळींना आर्थिक मदत करताना विचार करा.

वृश्चिक : अडचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. देवदर्शनातून समाधान मिळेल. मित्रांबरोबर वेळ खर्च होईल. सामाजिक क्षेत्रात गौरव होईल. तरुणांना यश मिळेल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. सरकारी कामे मार्गी लावताना संयम ठेवा. येणे वसूल होईल. व्यवसायात ताण वाढेल. तोंडात साखर ठेवून कामे पूर्ण करा. घरात अचानक आर्थिक नियोजन विस्कळीत होईल. मामा-मावशींची मदत मिळेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. लेखकांचा सन्मान होईल. कलाकारांना कामाच्या संधी येतील. आयटीमध्ये विदेशात जाण्याची संधी मिळेल.

धनु : घरातील वातावरण धार्मिक राहील. वादाचे विषय मार्गी लागतील. नव्या ओळखीमुळे अडकलेली कामे पुढे जातील. बहीण-भावाशी वाद टाळा. आमदनी आणि खर्च यांचा मेळ घाला. तरुणांना यश मिळेल. महिलांना नव्या कामाच्या संधी चालून येतील. नोकरी व्यवसायात संयम ठेवा. घाईत निर्णय घेऊ नका. सामाजिक कार्यात वेळ खर्च होईल. सकारात्मकता वाढीस लागेल. नव्या नोकरीच्या संधी चालून येतील. मित्रांशी मस्करी नको. संगीतकार, पत्रकार, संपादक, जनसंपर्क क्षेत्रात चांगला काळ.

मकर : अचानक धनलाभ होईल. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. घरासाठी वेळ खर्च होईल. शिक्षण क्षेत्रात मोठे यश मिळेल. मित्रांशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. पत्नीशी जमवून घ्या. आरोग्याची काळजी घ्या. थंडीतापापासून सावधान. व्यवसायात आडमुठेपणा टाळा. आठवड्याअखेर आळस येईल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. संततीकडून चांगली बातमी कळेल. नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल. उधार-उसनवारीचे व्यवहार टाळा. कलाकार, अभियंत्यांना चांगले अनुभव येतील. कोर्टकचेरीची कामे लांबणीवर पडतील. खेळाडूंकडून चांगली चमकदार कामगिरी होईल.

कुंभ : जुने मित्र भेटतील. व्यवसायात यश मिळेल. नव्या योजना पुढे जातील. नोकरीत कामाचा गौरव होईल. प्रमोशन, पगारवाढीचे योग आहेत. मित्रांशी बोलताना काळजी घ्या. चिडचिड होऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. सकारात्मकता व आत्मविश्वास वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. व्यवसायात दूरचे प्रवास करावे लागतील. नियम सोडून काम करू नका. मित्रांशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. सार्वजनिक ठिकाणी जपून वावरा. कलाकार, संगीतकारांना सन्मान मिळेल.

मीन : नोकरीत कष्ट करावे लागतील. मनावर दडपण वाढेल. आर्थिक नियोजनात चुका टाळा. घरात वाद घडतील. ज्येष्ठांचा मान राखा. व्यवसायात अधिकचे कष्ट करावे लागतील. चित्रकारांचा सन्मान होईल. शिक्षक, संशोधकांना कामाच्या नवीन संधी मिळतील. नवीन गुंतवणूक काळजीपूर्वक करा. घरात छोटेखानी कार्यक्रमात नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. मित्रांशी मतभेद होतील. वाद वाढवू नका. धार्मिक कार्यासाठी वेळ खर्च होईल. कुटुंबासोबत देव दर्शनासाठी बाहेरगावी जाल.

 

Previous Post

या माजोर्ड्यांना क्षमा नाही!

Next Post

लिंबू फिरवले, रहस्य उलगडले…

Next Post
लिंबू फिरवले, रहस्य उलगडले…

लिंबू फिरवले, रहस्य उलगडले...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.