• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

निष्ठेचा प्रभाव करील गद्दारांचा पराभव!

योगेंद्र ठाकूर बेधडक

marmik by marmik
July 11, 2026
in बेधडक
0
निष्ठेचा प्रभाव करील गद्दारांचा पराभव!

२०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या मूळ शिवसेना पक्षाचे ९ खासदार निवडून आले होते. गेल्या महिन्यात त्यापैकी ६ खासदारांनी बंड नव्हे, तर गद्दारी करून शिंदेसेनेत प्रवेश केला. सत्ताधारी पक्ष मतदारसंघाच्या विकासासाठी निधी देत नाही. जनतेचे-शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यात अडचणी येतात म्हणून आम्ही शिंदेसेनेत गेलो असे कारण त्यांनी दिले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे आपल्याला भेटत नाहीत असाही आरोप त्यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी सभा घेतल्या नाहीत म्हणून पक्षाला यश मिळाले नाही, असे म्हणत त्यांनी अपयशाचे खापरही पक्षनेतृत्वावर फोडले.

पण एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने विकासनिधीबद्दलच्या दाव्याची पोलखोल केली. या सहाही खासदारांना जो काही विकासनिधी मिळाला होता, त्यापैकी २५ टक्के देखील त्यांनी गेल्या दोन वर्षांत वापरला नाही. त्यातून गद्दारीचे खरे कारण म्हणजे, ‘सत्ता आणि पैसा’ हेच आहे, हे लपून राहिले नाही. खासदार फोडण्यासाठी प्रत्येकी दीडशे-दोनशे कोटींचा व्यवहार झाला असे बोलले जाते. कारण शिंदेसेनेकडे बक्कळ पैसा आहे. शिवाय भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांचा पाठिंबा आहे.

ह्या फुटीर खासदारांना २०२२च्या पक्षफुटीनंतर पक्षप्रमुखांनी २०२४ला तिकीट दिले होते. हे सर्व सहा खासदार मशाल चिन्हावर निवडून आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर नव्हे, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या फोटोवर निवडून आले होते. २०२२ साली गद्दारी केलेल्या गद्दारांना धूळ चारण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिक आणि स्वाभिमानी मतदारांनी त्यांना भरभरून मते देऊन विजयी केले होते. आता सहाही खासदारांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल आणि येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव केल्याशिवाय मतदार शांत बसणार नाहीत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच या सहाही गद्दारांच्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. तेथील शिवसैनिक-पदाधिकारी व जनता यांच्याशी संवाद साधला. तेव्हा गद्दारांविषयी असलेली चीड, घृणा त्यांना दिसली.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपाला अनुकूल मतदारसंघ आहे. १९९०च्या दशकानंतर भाजपाचे प्रमोद महाजन, किरीट सोमय्या, मनोज कोटक हे त्या मतदारसंघातून आधी निवडून आले आहेत. पण २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मूळ शिवसेनेने भाजपच्या मिहिर कोटेचा यांचा १ लाख ३० हजार मतांनी दणदणीत पराभव करून हा मतदारसंघ भाजपकडून खेचून आणला. २०२२च्या फुटीच्या पार्श्वभूमीवर मूळ शिवसेनेचा विजय हा देदीप्यमानच होता. संजय दिना पाटील हे २००९ साली राष्ट्रवादीच्या तिकीटावर या लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने त्यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीत त्यांना कुणी विचारत नव्हते. अशा वेळी मूळ शिवसेनेने २०२४ साली लोकसभेचं तिकीट दिले आणि निवडून आणले. त्यांचे राजकीय पुर्नवसन केले. त्याची जाण त्यांनी ठेवली नाही आणि गद्दारी केली. मूळ शिवसेनेत असताना त्यांनी कधी तोंड उघडले नाही. पण सत्तेत जाताच सत्तेचा वैâफ त्यांना चढला आणि ते पत्रकारांवर घसरले. पत्रकारांचा अर्वाच्य, अश्लाघ्य भाषेत उद्धार केला. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. असंगाशी संग केल्याचा हा परिणाम होय. संजय दिना पाटील यांच्या गद्दारीला ईशान्य मुंबईतील जनता व मतदार निश्चितच धडा शिकवेल.

२००९ सालापासून शिर्डी या राखीव लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचाच खासदार निवडून येत आहे. २००९ साली भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले. पण २०१४च्या निवडणुकीत गद्दारी करून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडून लढवली आणि पराभूत झाले. शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे २०१४ आणि २०१९ साली इथून निवडून आले. जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली, तेव्हा लोखंडे यांनी गद्दारी केली आणि शिंदेसेनेत प्रवेश केला. या गद्दार खासदाराला २०२४ ला मतदारांनी-शिवसैनिकांनी पराभवाची धूळ चारली. भाऊसाहेब वाकचौरे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. मशाल चिन्हावर निवडणूक जिंकली आणि आता शिंदेसेनेत प्रवेश केला. वाघाचे कातडे पांघरणार्‍या या लबाड लांडग्याचा २०२९ साली पराभव अटळ आहे.

२०२४ साली विदर्भातील यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून मूळ शिवसेनेचे संजय देशमुख यांनी शिंदेसेनेच्या राजश्री हेमंत पाटील यांच्या ९४ हजार मतांनी पराभव केला. हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणून २००९ ते २०१९ अशा सलग तीन वेळा भावना गवळी या खासदार म्हणून निवडणून आल्या होत्या. त्याआधीही त्यांचे वडील पुंडलिक गवळी हे निवडून आले होते. जून २०२२ मध्ये भावना गवळी गद्दारी करून शिंदेसेनेत दाखल झाल्या. पण त्यांना गद्दारीचे बक्षिस मिळाले नाही. त्यांचा पत्ता कापला जाऊन त्यांच्या जागी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री हेमंत पाटील यांना शिंदेसेनेने तिकीट दिले. परंतु यवतमाळ-वाशिमच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि मतदारांनी हिंगोलीचे पार्सल हिंगोलीला परत पाठवले. भावना गवळींनी नंतर विधानसभा निवडणूक लढवली. पण त्यातही त्यांना मतदारांनी पराभवाची धूळ चारली. यवतमाळ-वाशिममध्ये पक्षप्रमुख जो उमेदवार देतात त्याला निवडून आणण्यासाठी शिवसैनिक जिवाचे रान करतात. येत्या लोकसभा निवडणुकीत गद्दारांचा पराभव निश्चित होणार आहे.

मुंबई-पुणे आणि कोकण यानंतर मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. १९८७ साली शिवसेनेने संभाजीनगर महापालिका जिंकली आणि शिवसेनेची मराठवाड्यात घोडदौड सुरू झाली. मग १९८९ सालापासून संभाजीनगर, परभणी, हिंगोली मतदारसंघातून काहीसा अपवाद सोडला तर शिवसेनेचे खासदार निवडून येत आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून १९८९ साली प्रथम शिवसेनेचे शिवाजी कांबळे विजयी झाले. त्यानंतर पुन्हा शिवाजी कांबळे (१९९६), कल्पना नरहिरे (२००४), प्रा. रविंद्र गायकवाड (२०१४) तर २०१९ पासून ओमराजे निंबाळकर निवडून आले आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघातून मूळ शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले संजय (बंडू) जाधव यांनी गद्दारी करून शिंदेसेनेत प्रवेश घेतला. या गद्दार खासदाराला आगामी लोकसभा निवडणुकीत जनता-शिवसेनाप्रेमी मतदार घरी बसवणारच. १९८९पासून शिवसेनेचा खासदार परभणीतून निवडून येतो. त्याला अपवाद फक्त १९९८ सालचा. त्यावेळी काँग्रेसचे सुरेश वरपुडकर निवडून आले होते. शिवसेनेचे प्रा. अशोक देशमुख १९८९ साली प्रथम निवडून आले. नंतर १९९१ सालीही निवडून आले. नंतर त्यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९६ साली काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि पराभव झाला. गद्दाराला मतदारांनी जागा दाखवली. तेव्हापासून जे खासदार पक्ष सोडून गेले, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. जनता व मतदारांच्या रोषाचा ते सामना करू शकले नाहीत. २००४ साली शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले तुकाराम रेंगे पाटील यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये दाखल झाले. परंतु काँग्रेसने त्यांना बेदखल केले. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या रेंगे पाटील यांचे राजकीय अस्तित्वच संपले. २००९ साली शिवसेनेतर्फे  निवडून आलेले गणेश दुधगावकर यांनीही गद्दारी केली आणि काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसतर्पेâ विधानसभा निवडणूक लढवली तिथेही त्यांना मतदारांनी पराभव दाखवला. त्यानंतर २०१४, २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय (बंडू) जाधव निवडून आले. २०२२ च्या शिवसेना फुटीनंतर २०२४ साली मशाल चिन्हावर संजय जाधव हे सहा लाखांपेक्षा जास्त मते मिळवून विजयी झाले. त्यांनी आता मूळ शिवसेना पक्षाशी गद्दारी केली. परभणीचा इतिहास पाहता आगामी निवडणुकीत संजय (बंडू) जाधव यांचा पराभव अटळ आहे.

धाराशिव लोकसभा मतदार संघात १९९६ साली सर्वप्रथम शिवसेनेचा खासदार निवडून आला. १९९६ आणि १९९८ साली शिवाजी कांबळे हे शिवसेनेच्या तिकीटावर आले. २००४ साली कल्पना नरहिरे या निवडून आल्या. २०१४ साली शिवसेनेचे प्रा. रविंद्र गायकवाड हे निवडून आले. विमान प्रवासातील भांडण प्रकरणामुळे त्यांना २०१९ साली तिकीट मिळाले नाही. त्यांनी गद्दारी केली. परंतु ते नंतर सध्या जिल्हा परिषदेवर देखील निवडून येऊ शकले नाहीत. २०२२ मध्ये त्यांनी गद्दारांच्या शिंदेसेनेत प्रवेश केला. २०१९ आणि २०२४ साली ओमराजे निंबाळकर निवडून आले. २०२२ साली १३ खासदारांनी मूळ शिवसेनेशी गद्दारी केली. पण ओमराजे मूळ शिवसेनेत राहून गद्दारांवर टोकाची टीका करीत होते. हेच ओमराजे आज शिंदेसेनेत सामील झाले आहेत. त्यांच्या गद्दारीचा हिशोब आगामी निवडणुकीत जनता आणि निष्ठावंत शिवसैनिक चुकता करतील ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे.

हिंगोलीचा इतिहास देखील गद्दारीचाच आहे. १९९९ साली शिवाजी माने, २००९ साली सुभाष वानखेडे, २०१९ साली हेमंत पाटील तर २०२४ साली नागेश पाटील अष्टीकर हे शिवसेनेचे खासदार निवडून आले. २००९ साली शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या सुभाष वानखेडे यांनी गद्दारी केली. ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले नाही. त्यांनी भाजपात प्रवेश केला तिथेही त्यांना खासदार किंवा आमदारकीचे तिकीट मिळाले नाही. २०१९ साली शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या हेमंत पाटील यांनी जून २०२२मध्ये गद्दारी केली आणि शिंदेसेनेत सामिल झाले. भाजपच्या रेट्यांमुळे हेमंत पाटील यांना २०२४ साली तिकीट मिळाले नाही. नंतर विधानसभेचेही तिकीट मिळाले नाही. २०२४ साली मूळ शिवसेनेच्या नागेश अष्टीकर यांनी गद्दार शिंदेसेनेच्या बाबुराव कदम याचा पराभव केला. आता अष्टीकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. पण ते पुन्हा निवडून येणार नाही. हिंगोलीचे मतदार दर पाच वर्षांनी खासदार बदलतात असा इतिहास आहे. तेव्हा गद्दारांचा पराभव कुणीही रोखू शकणार नाही.

२००९ साली कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद परांजपे निवडून आले होते. एकनाथ शिंदे यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादी पक्षात दाखल झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गद्दारी केलेल्या आनंद परांजपे यांना शिवसेनेने पराभूत केले. राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेत न पाठवल्यामुळे ते नाराज झाले. राष्ट्रवादी सोडून ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्याच कंपूत सामील होण्याची पाळी त्यांच्यावर आली.

गद्दारांच्या मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी झंझावती दौरा केला. या दौर्‍याला मतदार, जनता, पदाधिकारी आणि शिवसैनिक यांचा अपूर्व प्रतिसाद लाभला. मतदारांची त्यांनी माफी मागितली. या दौर्‍याने शिवसैनिकांत पुन्हा चैतन्य निर्माण झाले आणि त्यांनी गद्दारांचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत १३ गद्दारांपैकी किती खासदारांना पुन्हा तिकीट मिळणार आणि त्यातील किती निवडून येणार हे सांगण्यासाठी कुठल्याही राजकीय पंडिताची गरज नाही. कारण गद्दार-खासदारांचा इतिहास हा पराभवाचाच आहे! त्याच इतिहासाची पुनरावृत्ती नक्की होणार!

Previous Post

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा, नावे बदलून दिशाभूल नको!

Next Post

राम नाम जपना पराया माल अपना!

Next Post
राम नाम जपना पराया माल अपना!

राम नाम जपना पराया माल अपना!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.