• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘मोदीझम’ला झटका कधी बसणार?

अ‍ॅड. नोएल डाबरे विशेष लेख

marmik by marmik
July 3, 2026
in विशेष लेख
0
‘मोदीझम’ला झटका कधी बसणार?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना जानेवारी महिन्यात अमेरिकेत पकडून आणले. आपण काहीही करू शकतो अशी ट्रम्प यांनी जगाला दिलेली ती धमकी होती. त्यानंतर काही काळ जग थक्क झाले होते. ट्रम्प यांची ही खास शैली हा त्यांच्या राजकारणाचा मुख्य भाग राहिलेला आहे. यालाच ट्रम्पिझम म्हणतात. या ट्रम्पिझमने गेली दोन दशके अमेरिकेत धुमाकूळ घातलेला आहे. त्याच्याच जोरावर ट्रम्प यांनी २०१८ मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपद जिंकले.

समोरच्या माणसाचा कोणताही मुलाहिजा ठेवायचा नाही. आपण म्हणतो तेच खरे असे सांगायचे. सातत्याने खोटीनाटी विधाने करत राहायची. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत राहायचा. खरे काय खोटे काय हे लोकांना समजून द्यायचे नाही. आपण म्हणतो हेच खरे असल्याचे लोकांनी मानायचेच, असा ट्रम्पिझमचा पाया आहे.

अमेरिकेत दोनच पक्ष आहेत. एक डेमॉक्रॅटिक पक्ष आणि दुसरा रिपब्लिकन पक्ष. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात डेमॉक्रॅटिक पक्षातून केली. डेमॉक्रॅटिक पक्ष हा सुधारणावादी पक्ष आहे. गर्भपाताचे समर्थन करतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरतो. राजकारणाचा दर्जा उच्च राहावा असे म्हणतो. त्यामुळे ट्रम्प यांचे डेमॉक्रॅटिकांशी काही जमले नाही. रिपब्लिकन पक्ष हा त्यांना आयते कुरण म्हणून लाभला. हा पक्ष रुढीवादी आहे. वंशवादी लोकांचा त्याच्यात भरणा आहे. ते विस्तारवादी आहेत. व्हाईट सुप्रीमसी म्हणजे अमेरिकेत गोर्‍यांचा वरचष्मा असला पाहिजे, हे त्यांचे स्वप्न आहे. त्याचा गैरफायदा घेऊन ट्रम्प यांनी सगळाच रिपब्लिकन पक्ष पळवला. ट्रम्पिझमच्या जोरावर सर्वांची दिशाभूल करून ते निवडून आले.

निवडून आल्यावर त्यांनी ट्रम्पिझमचा खाक्या दाखवायला सुरुवात केली. त्याचा अतिरेक झाला. पोलिसांच्या दडपशाहीमुळे
जॉर्ज फ्लॉईड या आप्रिâकन अमेरिकन युवकाचा बळी गेला. पोलिसांनी त्याचा गळा अत्यंत क्रूरतेने नऊ मिनिटे आणि नऊ सेकंद दाबून ठेवून त्याचा खून केला. तो नि:शस्त्र होता. त्याचा व्हिडिओ जगभर पसरला. सर्वत्र प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. परंतु ट्रम्प यांनी पोलिसांची तळी उचलून धरली. पोलिसांचे कौतुक केले. या सार्‍याचा फटका ट्रम्प यांना पुढच्या निवडणुकीत बसला. ते पराभूत झाले. ते संपले असाच जगाचा विश्वास होता. त्या वेळेला त्यांचे वय ७४ होते. या वयात कोणी पुन्हा पुढारी होत नाही. परंतु अमेरिकन लोकांमध्ये ट्रम्पिझम बरोबर उतरला होता. ते ट्रम्प यांचे कट्टर समर्थक राहिले.

नंतर आलेल्या जो बायडन या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या दुर्बल राष्ट्राध्यक्षांना विशेष काही जमले नाही. ट्रम्पिझमचा बिमोड करता आला नाही. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याला पळ काढावा लागला. अमेरिकन महागाई काबूत राहिली नाही. तरी देखील ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष होतील याची कोणाला थोडी सुद्धा खात्री नव्हती. पण ते सगळ्यांचे अंदाज चुकवून पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले.

ट्रम्पिझम म्हणजे ‘Create Problems, Ensure to solve problems and Declare that the problems are solved .’ प्रश्न निर्माण करायचे. प्रश्न सोडवतो म्हणून सांगायचे आणि प्रश्न सुटले आहेत असे घोषित करायचे, याला म्हणतात ट्रम्पिझम. ट्रम्पिझमचे ढळढळीत उदाहरण म्हणजे इराण अमेरिका युद्ध. २०१५मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणशी तजोड घडवून आणली. इराण भविष्यात अणुबॉम्ब तयार करणार नाही अशी ग्वाही त्या करारात होती. ह्या ग्वाहीच्या मोबदल्यात अमेरिकेने इराणवरील काही आर्थिक निर्बंध सैल केले. त्यामुळे मध्यपूर्व आशियातील तणाव निवळण्यास सुरुवात झाली. ओबामा यांच्या दुसर्‍या राजवटीत रिपब्लिकन पार्टीतर्पेâ ट्रम्प यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या निवडणूक प्रचाराचा पायाच खोटा होता. ‘श्aव Aस्ीग्म्a उर्rीू Aुaग्ह’ अशी भंपक वल्गना ट्रम्प यांनी केली. ती अमेरिकन जनतेच्या गळी उतरवली. अमेरिका-इराणमधील तडजोड करार अमेरिका, इस्रायल आणि मध्यपूर्वेच्या देशांना घातक असल्याचे सातत्याने खोटेनाटे सांगितले. सत्तेवर आल्याबरोबर हा करार रद्द करीन अशी वल्गना ट्रम्प यांनी केली. त्या भूलथापांना जनता बळी पडली. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली, राष्ट्राध्यक्ष झाल्या-झाल्या त्यांनी ओबामा करार मोडून टाकला.

आता चित्र स्पष्ट दिसते की या विषयाच्या बाबतीत ओबामाच बरोबर होते. ‘इराणचा निःपात करून टाकीन. मध्यपूर्वतेत शांती आणीन आणि इस्रायलला बलाढ्य करीन,’ अशी ग्वाही ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला दिली होती. त्यामुळे पदावर पाच महिने होत नाही तोच त्यांनी इराणच्या अणुकेंद्रावर महाविध्वंसक क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. जगात जाहीर केले की इराण आता संपला आहे. इराण संपलेला नव्हता.
लेबनॉनमधून हिजबुल्लाचे आणि येमेनमधून शिया बंडखोरांचे हल्ले इराणने चालू ठेवलेलेच होते. कारण नसताना २८ फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला चढवला. त्यांचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खमेनी आणि त्यांचे वरिष्ठ सहकारी यांना क्षेपणास्त्रांनी ठार मारून टाकले. विजयी थाटात घोषित केले की ‘अमेरिकेने इराणचा पराभव केला आहे. इराणची जुनी राजवट उद्ध्वस्त करून टाकली आहे. तिथे जनतेने राज्यकारभार हाती घ्यायला हरकत नाही.’ थोडक्यात प्रश्न तयार करायचे. प्रश्न सोडवण्याची ग्वाही द्यायची आणि प्रश्न सुटला आहे असे छातीठोकपणे ठोकून द्यायचे.

इराणने जिद्दीने आणि चिकाटीने ट्रम्प यांना वळणावर आणले. ट्रम्प यांनी थेट युद्ध चालू केले होते. इराणने लॅटरल स्ट्रॅटेजी (असममित युद्धनीती) वापरत युद्ध चालू ठेवले. होर्मुज बंदराची नाकेबंदी करून टाकली. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, ओमान, कुवेत, कतार आदी आजूबाजूच्या आखाती देशांना इराणने युद्धात ओढले. त्यामुळे जगाच्या आर्थिक परिस्थितीवरच गंडांतर ओढवले. आजूबाजूचे देश आक्रोश करीत राहिले. इराणने दिलेला ‘हॉर्मुज चोक’ तर इतका प्रभावी ठरला की तो इंग्रजी साहित्यातील एक प्रचलित शब्द बनला. गेल्या दोन महिन्यांपासून या हॉर्मुज चोकमुळे संपूर्ण अमेरिकेमध्ये ट्रम्पच्या धोरणांविरुद्ध आणि इस्रायलविरुद्ध प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते इतके भयानक आहे की ऑक्टोबरमध्ये ज्या मध्यवर्ती निवडणुका अमेरिकेत होणार आहेत त्यात ट्रम्प यांचा सुपडा साफ होईल अशी खात्री त्यांच्या रिपब्लिकन नेत्यांनाही वाटत आहे. हा ट्रम्पिझमचा दारूण पराभव आहे. त्यामुळेच ट्रम्प यांना नाक मुठीत धरून १८ जून रोजी इराणशी शस्त्रसंधीसह व्यापक करार करावा लागला. पिटुकल्या इराणने बलाढ्य अमेरिकेचा पराभव केला.
जसा ट्रम्पिझम आहे तसा मोदिझम आहे. ‘भ्रष्टाचारी नेत्यांना जेलची भीती दाखवायची. ते एकदा घाबरले की त्यांना आपल्या पक्षात किंवा आपल्या सहयोगी पक्षात घ्यायचे, त्यांनी निष्ठा बदललेली म्हणून त्यांना मंत्रीपद द्यायचे,’ हा मोदीझमचा फंडा आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षाला आणि शिवसेनेला त्यांची जबर किंमत मोजावी लागली आहे. निरनिराळ्या प्रादेशिक पक्षांनाही त्याच्या झळा पोहोचल्या आहेत. देशपातळीवर काँग्रेसला प्रचंड फटका बसलेला आहे. केवळ सत्ता हाती राखण्याच्या हव्यासापोटी पंतप्रधान मोदींनी मोदीझमला जन्म दिलेला आहे. भारतीय जनता पार्टी जनतेची राहिलेली नसून भ्रष्टाचारी नेत्यांची पार्टी बनलेली आहे, असे जनमत तयार होत आहे.
मात्र, अजून तरी मोदीझमला फटका बसलेला नाही. भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन वाढवलेला हा मोदिझम फार काळ टिकणार नाही. आपल्या आजूबाजूला असलेला श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळच्या राज्यसत्ता उलथून पडल्या. त्यामुळे मोदिझमचा एक दिवस पराभव होणार हे निश्चित.

Previous Post

नार्वेकरांचे काय चुकले?

Next Post

एम्बापे : नवा महानायक!

Next Post
एम्बापे : नवा महानायक!

एम्बापे : नवा महानायक!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.