• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘श्यामची आई’च्या गीतांना अशोक पत्कींचे संगीत

- नितीन फणसे (अ‍ॅडव्हान्स बुकिंग)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 14, 2022
in अ‍ॅडव्हान्स बुकिंग
0

बर्‍याच दिवसांपासून ‘श्यामची आई’ या आगामी चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबत कुतूहल आहे. ‘श्यामची आई’चा उल्लेख होताच सर्वप्रथम आठवतात ते साने गुरूजी… त्यासोबतच मनात रुंजी घालू लागतात साने गुरुजींच्या लेखणीतून अवतरलेली अजरामर गाणी… ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यानंतर आजच्या रंगीबेरंगी युगात पुन्हा एकदा त्याच काळात नेणारा ‘श्यामची आई’ हा चित्रपट तयार होत असल्यानं यातील गीत-संगीताची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात येणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. आता यावरून पडदा उठला असून ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की या चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढवणार आहेत, हे जाहीर झालं आहे.
अमृता फिल्म्सच्या बॅनरखाली अमृता अरुण राव यांनी ‘श्यामची आई’ची निर्मिती केली आहे. आजवर बर्‍याच महत्त्वाकांक्षी चित्रपटांचं दिग्दर्शन करणारा सुजय डहाके ‘श्यामची आई’चं दिग्दर्शन करत आहेत. जिंगल्सचे बादशहा अशी ओळख असणार्‍या पत्की यांनी आजवर बर्‍याच सिनेमांसोबतच नाटक आणि मालिकांनाही संगीत दिलं आहे. आता ‘श्यामची आई’च्या रूपाने त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण कामगिरी सोपवण्यात आली आहे. पत्की म्हणाले की, ‘श्यामची आई’ हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील माईलस्टोन आहे. साने गुरुजींच्या विचारांचं द्योतक असणार्‍या या चित्रपटातील गाणीही अतिशय अर्थपूर्ण आहेत. त्यातील भाव ओळखून तो संगीताच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची संगीतकार या नात्यानं माझ्यावर आहे.
सुजय डहाके म्हणाले, या चित्रपटाला संगीताच्या माध्यमातून उचित न्याय देण्यासाठी अशोक पत्कींसारख्या दिग्गज संगीतकाराची गरज होती. आज भारतीय संगीतक्षेत्रात बरेच नामवंत संगीतकार आहेत, पण पत्कींची संगीतशैली सर्वांपेक्षा वेगळी असून ती ‘श्यामची आई’मधील गीतांमधील भाव सर्वार्थानं रसिकांच्या मनापर्यंत पोहोचवू शकेल याची खात्री असल्यानं संगीत दिग्दर्शनासाठी त्यांची निवड केली आहे. हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाइट स्वरूपात रसिकांसमोर येणार असल्यानं त्या काळातील संगीताचा बाज ‘श्यामची आई’ला लाभावा हेदेखील पत्कींकडे संगीताची जबाबदारी सोपवण्यामागील एक प्रमुख कारण असल्याचं ते म्हणाले.

– नितीन फणसे

Previous Post

विशाल निकम विठ्ठलभक्तीमध्ये तल्लीन

Next Post

`सवता’ची धम्माल फॅन्टसी!

Next Post
`सवता’ची धम्माल फॅन्टसी!

`सवता'ची धम्माल फॅन्टसी!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.