• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

तत्त्वत:, अंशत: आणि अटी शर्तींसह थुक्का!

- ऋषिराज शेलार (नौरंगजेबाची बखर)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 5, 2024
in भाष्य
0

(`सामान्य मराठी माणसाचं असामान्य घर.’ घरावरील छप्पर चार बाजूने उचकलेलं, दरवाज्याची केवळ चौकट उभीय, भिंती अपुर्‍या सिमेंट-वाळूच्या भरण-पोषणाने कुपोषित पोट निघालेल्या. घरात वंगणाचे टेंभे पेटलेले, त्याच्या प्रकाशात घर उजळलेलं. भल्या पहाटची वेळ. कुठूनतरी तीन तेजःपुंज धष्टपुष्ट दिव्य पुरुष तिथे अवतरतात.)

ढेबेंद्र : (मागील दोघांना वाट दाखवत) या, या…
ठगनाथ : (मागे मागे चालत अतीव शंकेने) हे आपण कुठे चाललोय?
टंचित : आपण विकासाच्या आणि लोककल्याणाच्या आणि पंथवाढीच्या मार्गावर चाललोय.
ढेबेंद्र : (घरासमोर येताच) आपण इथवर जर आलोच आहोत, तर ह्या `सामान्य मराठी माणसाची स्वप्नं’ पूर्ण करूयात.
ठगनाथ : थोडक्यात तुम्हाला `घोषणा आपल्या दारी’ हा उपक्रम राबवायचा आहे?
टंचित : या ठिकाणी आपल्याला तसंही अवतारकार्याचं उद्दिष्ट सांगावं लागणार आहे. त्यामुळे आलेली ही अप्रतिम संधी आपण या ठिकाणी दवडता कामा नये!
ढेबेंद्र : या तर..! आपण ह्या परिवाराच्या सूक्ष्म आत्म्याला जागृत करूया आणि त्यांच्या इच्छा जाणून घेऊन त्या पूर्ण करूयात!
ठगनाथ : केवळ तुमच्या पुढाकारामुळे आपण एक ऐतिहासिक म्हणजे असं कार्य या आधी कुणी केलेलंच नाही, असं कार्य करायला जातो आहोत. याप्रसंगी…
टंचित : (ठगनाथांच्या पाल्हाळाला कंटाळून) ढेबेंद्र, घ्या पुढाकार आणि सूक्ष्म आत्म्यास साद घाला.
ढेबेंद्र : (सर्व शक्ती एकवटून) अध्यक्ष महोदय!!!!
पुरुष : (किलकिल्या डोळ्यांनी करवादून पायथ्याची चप्पल फेकत) अय, निघ पुढल्या दारी!! (चप्पल येऊन ढेबेंद्रच्या गालावर पडते. ढेबेंद्र कळवळतो.)
ठगनाथ : ( ढेबेंद्रची अवस्था बघत) आपण जो काय लोककल्याणाचा मार्ग निवडलाय, तो फेक नरेटिव्हमुळे नीट पोहोचलेला दिसत नाही. आणि म्हणोन पुढला प्रयत्न टंचित तुम्ही करावा!
टंचित : (फुफ्फुसात हवा भरत) हे बघा, आत जे कुणी सन्माननीय… (तोच आतून एक भगुनं (पातेलं) उडत येतं नि टंचितच्या कपाळी लागतं. तो कळवळून मागे सरकतो.)
ठगनाथ : (टंचितची अवस्था बघत) आपण जो काय प्रयत्न केलाय, तो, त्याला आम्ही या ठिकाणी विसरू शकत नाही. आणि म्हणोन… (आता प्रयत्न करण्यासाठी स्वत:च शिल्लक असल्याचं लक्षात येताच) आता मी प्रयत्न करून बघतो.
ढेबेंद्र : काहीही झालं तरी तुमच्याच नेतृत्वाखाली आपल्याला हे विकासाचं काम करायचं आहे, तेव्हा अंतिम प्रयत्न तुम्हीच करा!
ठगनाथ : (भीत भीत कुठल्याशा प्रसिद्ध वाक्यांची नक्कल करत) हे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, माता आणि भगिनींनो…
मुलगा : (झोप डचमळल्यामुळे चिडून खाटेवरूनच काठी फेकत) ये पश्या, दारू जास्त ढोसला का? निघ घरी! (ती काठी जाऊन ठगनाथाच्या टाळक्यात बसते.)
ठगनाथ : (काठी डोक्यात बसल्यामुळे विव्हळत) आऽऽऽऽऽयऽऽऽवं!
टंचित : (पटकन ठगनाथाला सावरायला जात) आणि या प्रकारे जर आपला अवमान होत असेल तर आपल्याला पुन्हा ह्या उपक्रमाबद्दल फेरविचार केला पाहिजे, या ठिकाणी…!
ढेबेंद्र : टंचितरौ, आपल्याला काही चमत्कार दाखवावाच लागेल, अन्यथा लोकमान्यता मिळणार नाही. आणि विस्टेश्वराने सोपावलेलं द्वेषधर्म पसरवण्याचं कार्य अधुरं राहील. पंथवाढ खुटेल. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आणखी प्रयत्न करायची गरज आहे.
टंचित : या ठिकाणी ह्या कुटुंबानी आपल्याला स्पष्टपणे झिडकारलं आहे…
ढेबेंद्र : तुम्ही चुकीचं बोलताय, आपल्याला त्यांनी नाकारलं नाही. त्यांनी तुमच्यावर फेकलेलं भगुनं तुमच्या डोक्यात बसलं, अर्थात डोक्याच्या एक पंचमांश भागावर त्याचा आघात झाला, म्हणजे केवळ दोनाला तीनाने आणि क्ष ला य ने भागल्यावर त्यात झ वजा केल्यास असं दिसतं की आपल्याला फक्त ०.०००५ प्रमाणात कमी प्रतिसाद मिळालाय नि उलट होकाराची शक्यता वाढून तो एक पूर्णांक शप्पन पर्यंत गेलाय.
ठगनाथ : (डोके चोळत उठतो.) मीही तेच सांगतोय, समोरासमोरल्या आघातात तेरा अवयवांपैकी केवळ सात अवयवांना झिणझिण्या आल्या आणि बाकीचे थेट बधिर पडले म्हणजे माझा स्ट्राईक रेट वाढून हेहेचोळीस पर्यंत गेलाय. आणि तो ह्यांच्या-त्यांच्या आणि तुमच्यापेक्षाही जास्त आहे. हा जो काय फरक पडलाय, तोही तुम्ही बघा. आणि म्हणोन आपण यासंबंधी पुन्हा प्रयत्न करावा, असं मलाही वाटतं!
टंचित : आपलं सगळं म्हणणं मान्य केलं तरी आता ह्या कुटुंबाला आपण बाहेर बोलावणार कसं? त्यासंबंधी बाबा, काय मार्ग काढता येईल? याचा थोडक्यात म्हणजे… ते… आपलं? काय पर्याय याठिकाणी अवलंबता येतील याचा एक रोडमॅप आपण बसून ठरवूया! काय?
ढेबेंद्र : (टंचितकडे बघत) दारौव, काहीही बोलता आपण? अहो, दिवस उजाडायला केवळ तीन-चार घंटे उरलेत. आपल्याला आणखीही कुटुंबापर्यंत जायचं आहे. केवळ म्हणून आपल्याला हे काम तातडीने हाती घेण्याची गरज आहे.
टंचित : एक मिनिट! हे बघा, मीही बरीच वर्षे ह्या क्षेत्रात कामं केलीत, थोडाबहुत आमचाही अनुभव आहे. पण तुम्हाला म्हणून काही वेगळ्या संकल्पना मांडायच्या असतील तर ह्या गुलामशाहीत माझ्या हरकतीला तशीही किंमत नाही. तेव्हा काय करायचं ते करा. फक्त संबंधित कुटुंबाला जागृत करा!
ढेबेंद्र : अर्थात त्यासंबंधी आमचं आणि विस्टेश्वरांचं ह्यावर विस्तृत बोलणं झालंच होतं, त्यांनी सांगितलं आहेच की ह्या वेळेला आपण ठगनाथांच्या नेतृत्वात हे कार्य पूर्ण करायचं आहे…
ठगनाथ : (डोक्यावर आलेलं टेंगुळ दाबत) हे विस्टेश्वरा…!!
ढेबेंद्र : आधीच ह्या नेक नरेटिव्हने आपली वासलात लावलीय. पुन्हा कुठे विस्टेश्वरांचं नाव घेताय? हे कुटुंब दुसर्‍या पंथाला सामील होऊ नये म्हणून आधी नाव न घेता त्यांना आपल्याकडे बोलवा, आपण चमत्कार दाखवू नि मागोमाग ते आपसूक आपल्या महागळती पंथात येतील.
ठगनाथ : (भिंतीच्या मागे लपत दारातून आत डोकावत मोठ्याने ओरडतो) गद्दार आले, गद्दार!!!
(ढेबेंद्र आणि टंचित डोक्याला हात लावतात. कुटुंब घाईने विळा-खुरपे, टिकाव-फावडे घेऊन बाहेर धावतं.)
पुरुष : (हातातील फावडे खांद्यावर घेत) कोणे तिकडं?
ठगनाथ : (घाबरत पुढे होतो.) मी… मी ठगनाथ!
पुरुष : इतक्या भल्या पहाटे आमची झोपमोड करायचं काय कारण?
ढेबेंद्र : (हिंमत करत एक पाऊल पुढे सरकत) आम्ही विस्टेश्वर दरबारीचे गर्दभ लोक!
टंचित : (चूक लक्षात आणून देत) ते गंधर्व लोक असं काही असतं ना? नाही ह्या दरबारातला माझा हा पहिलाच मुजरा आहे, म्हणून ते जरा…
ढेबेंद्र : (टंचितचा हात दाबत हळू आवाजात) ते तितकं महत्त्वाचं नाहीय. आपल्याला पंथ वाढवायचा आहे ना? (पुन्हा मोठ्याने कुटुंबास उद्देशून) आम्ही तुमच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध होऊन आलोत. तुमच्या काहीही मागण्या असतील दंशअवतारी विस्टेश्वराकडे तर मागा. आम्ही तिघे त्या पूर्ण करू.
पुरुष : बाबा, त्याच्या `अच्छे दिन’च्या आशीर्वचनामुळे मी लंगोटावर यायलोय. आणखी कुठली थेरं करायची बाकी आहे आता?
ठगनाथ : तुम्ही असं म्हणू नका! तुमच्यासारख्या सामान्य मराठी माणसाच्या मनातला मी ठगनाथ आहे. हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. पण असो! तर तुमच्या कल्याणासाठी तिकडे सेन्त्रल विस्टेश्वर अठरा-अठरा घंटे झटताय नि इकडे मी, हे आणि ते मिळून दिवसाची रात आणि पौर्णिमेची अवस करून मेहनत घेतोय. आणि म्हणोन तुम्ही तुमच्या मागण्या आमच्यापुढे ठेऊन बघा!
स्त्री : (पुढे होत) काय बोलतो बाबा? इथं दाताला चणे नाही, कुकरला शीतं नाहीत. महागाईनं तेल-मीठ-मिरची सगळं महागलं…
ठगनाथ : (हात उंचावत) तथास्तु! ताई, इथून पुढे तू माझी लाडकी बहीण हे घे पंधराशे आणि वर गॅस तीनदा फुकट!
स्त्री : तीन नोटा, तीन गॅस, आणि तुम्ही तिघं! सगळा तिघाडाच की बाबा!
ढेबेंद्र : आणखी काही असेल तर मागा.
मुलगी : भाऊ ग्रॅज्युएट झालाय. त्याला चांगली नोकरी भेटली पाहिजे. माझे पेपर लीक व्हायला नको.
टंचित : (हात उभारून) तथास्तु!! इथून पुढे तुझं शिक्षण फुकट!
ठगनाथ : मागा आणखी कुणाला काही हवंय का ते? दिवस उजडायला केवळ दोनतीन तास उरलेत. आमची जायची घटिका भरत आलीय.
पुरुष : माझ्या जमिनीवर सावकाराचं मोप कर्ज आहे. त्यात लाईट दिवस-दिवस नसते, खतं महागली, औषधं महागली, खर्च काहिक पटींनी वाढलाय…
ढेबेंद्र : (घाईघाईने) तथास्तु! तुलाही सौरऊर्जा फुकट!
मुलगा : (हात जोडून) हे गर्दभवरांनो, तुम्ही वर दिलेत खरे! पण माझ्या घरातल्या कुणाही व्यक्तीच्या हाती धतुरा सुद्धा आला नाही. काय कारण?
ढेबेंद्र : (एक कागद हातात टेकवत) बाळ, त्यासाठी शेवटलं पान बघ! त्यावर लिहिल्येलं असतं ना? तत्वतः, अंशतः नि अटी-शर्तीसह मंजुरी! त्या दिवस उजाडण्याच्या आत पूर्ण कर आणि लाभ मिळव!
ठगनाथ : आणि म्हणोन…
टंचित : (खुणेने) निघा आता!
(तिघेही अंतर्धान पावतात. कुटुंब भानावर येतं, तेव्हा दिवस उगवलेला असतो नि अख्खं गाव रस्त्यावर उभं दिसतं. पारावर एक मास्तर काठी टेकवत चढतो.)
मास्तर : बाबांनो, पहाटच्या वेळेला आपल्या गावात काही भोंदू सोंग घेऊन आले, हे देतो, ते देतो सांगून गेले. दिलं काही नाही मात्र आपल्या गावच्या सातबार्‍यावर कर्जाचा बोजा वाढवून गेलेत, इथून पुढं पहाटेला…
(मास्तर पुढे बोलत जातो. कुटुंब मात्र डोक्याला हात लावून बसते. सर्व सदस्य ह्या टर्मला पण फसवेगिरीच झाल्याच्या भावनेनं हताश होतात.)

Previous Post

देशांना नेते मिळाले, जगाला नेता नाही…

Next Post

दुर्गप्रेमींना डोळस करणारा ग्रंथ

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post

दुर्गप्रेमींना डोळस करणारा ग्रंथ

बाळासाहेबांचे फटकारे...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.