• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    प्रजासत्ताकावर डबल इंजीन बुलडोझर!

    एकजुटीची वज्रमूठ हीच खरी आदरांजली!

    यंदा संक्रांतीचे वाहन : बुजगावणे

    कायदेशीर, पण क्रूर आणि अनुचितच!

    सावध ऐका पुढल्या हाका…

    फ्रॅक्चर्ड मेंदू, नॅनो बुद्धी!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं…

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    शिवसेनेचा भगवा प्रथम ठाण्यात फडकला!

  • भाष्य

    नाय नो नेव्हर…

    किती नासाडी कराल रे अन्नाची!

    आता नॉर्दर्न लाईट्स

    कसं काय कौतिकराव, बरं हाय का?

    तुरुंग ते जेल!

    सृजनशीलते… तुझे नाम रमाधाम!

    Trending Tags

  • मनोरंजन

    बॉलिवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ!

    चुकवू नये असा रहस्यमय थरारपट

    वो शाम कुछ अजीब थी…

    वो शाम कुछ अजीब थी…

    एका डॉक्टरची हृदयस्पर्शी युद्धडायरी!

    जे ‘वेड’ मजला लागले…

    आयुष्यातील स्पर्धेवर हसरे भाष्य

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    प्रजासत्ताकावर डबल इंजीन बुलडोझर!

    एकजुटीची वज्रमूठ हीच खरी आदरांजली!

    यंदा संक्रांतीचे वाहन : बुजगावणे

    कायदेशीर, पण क्रूर आणि अनुचितच!

    सावध ऐका पुढल्या हाका…

    फ्रॅक्चर्ड मेंदू, नॅनो बुद्धी!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं…

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    शिवसेनेचा भगवा प्रथम ठाण्यात फडकला!

  • भाष्य

    नाय नो नेव्हर…

    किती नासाडी कराल रे अन्नाची!

    आता नॉर्दर्न लाईट्स

    कसं काय कौतिकराव, बरं हाय का?

    तुरुंग ते जेल!

    सृजनशीलते… तुझे नाम रमाधाम!

    Trending Tags

  • मनोरंजन

    बॉलिवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ!

    चुकवू नये असा रहस्यमय थरारपट

    वो शाम कुछ अजीब थी…

    वो शाम कुछ अजीब थी…

    एका डॉक्टरची हृदयस्पर्शी युद्धडायरी!

    जे ‘वेड’ मजला लागले…

    आयुष्यातील स्पर्धेवर हसरे भाष्य

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home मनोरंजन

नेपथ्याला टाळी, विषयाला हात, ‘जयहिंद’ची साथ!

- संजय डहाळे (तिसरी घंटा)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 5, 2023
in मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

पडदा उघडताच चक्क कश्मीर अवतरते. एक कश्मीरी चाचा. जो मुक्कामाला निघालेला वाटसरू. आपल्या बोटीतून एका टोकावरून दुसर्‍या टोकाकडे निघालेला. गारठलेल्या पाण्यावर रेघोट्या उमटतात. थंडगार हवा. बर्फ आणि धुकं याने वेढलेला डोंगराळ परिसर. बोट निघालेली. हळूवार पण ठामपणे तो चालवतोय. धुकं वितळत चाललेलं. निळा प्रकाश पसरलेला. मौन सावल्या. गारठलेलं तळं. अंतरंग पालटून टाकणारे एक निसर्गरम्य ऋतुचक्रच…
रसिक भानावर येतात. रंगमंचावरला हा थक्क करणारा जिवंत सिनेमॅटिक नाट्यानुभवच. नेपथ्याला पहिल्याच पाच मिनिटांत जोरदार टाळ्यांनी दाद मिळते.
गुजरातीतल्या प्रसिद्ध लेखिका स्नेहा देसाई यांच्या मूळ ‘सफरजन’ नाटकाचे रूपांतर मराठीत मुग्धा गोडबोले यांनी ‘सफरचंद’ या नावाने केले असून राजेश जोशी यांचे दिग्दर्शन आहे. एक भव्य-दिव्य नाट्यनिर्मिती म्हणून या नाटकाने रंगभूमीवर कमाल केलीय. कथानकापासून ते नेपथ्यापर्यंत आणि दिग्दर्शनापासून ते कलाकारापर्यंत शंभर नंबरी सोनच रसिकांपुढे या टीमने साकार करून एका ज्वलंत विषयात हात घातलाय.
हिंदुस्थान-पाकिस्तान सरहद्दीवरले कश्मीरातले एकाकी खानपोरा हे गावं. पूर्वी या गावाचं नाव रामपूर होतं, पण आता खानपोरा बनलेलं. गाव तसं ओस पडलेलं. बॉम्बस्फोट दहशतवादामुळे उध्वस्त झालेलं. तिथे महम्मद अब्बास सिद्दिकी उर्फ चाचा, हा लष्करातून निवृत्त झालेला वयोवृद्ध. तो आता सफरचंद ठेवण्याच्या लाकडी पेट्या तयार करण्याचा धंदा करतोय. त्याचा एक जिवलग मित्र आहे. श्यामलाल. तो सफरचंदाची लागवड करतो. तोच त्याचा व्यवसाय. या फळावर, त्याच्या बागेवर जिवापाड प्रेम. तो चाचांच्या गल्लीच्या कोपर्‍यावरच राहतो. महम्मद आणि श्यामलाल दोघांचे धर्म वेगळे पण जानी दोस्त. कुटुंब म्हणून दोघांना कुणीही सोबत नाही. पाकिस्तानी घुसखोर या गावात शिरलेत. त्याचा शोध हिंदुस्थानी लष्कर घेत आहे. बॉम्बस्फोट आणि गोळीबारातून वाचलेल्या, बेशुद्ध पडलेल्या दोघाजणांना या दोघा मित्रांनी घरात आश्रय दिलेला. एक हिंदू तरुणी झेलम आणि दुसरा पाकिस्तानी अतिरेकी अन्वर. या पाकड्याला शुद्धीवर आल्यावर ठार करण्याचा झेलमचा पक्का इरादा आहे. चाचांच्या एकाच घरात दोन शत्रू देशांचे कट्टर पोहचलेत. उपचार आणि आराम करताहेत. बॉर्डरपलीकडला अन्वर हा वरच्या खोलीत तर खालच्या पलंगावर झेलम. इथूनच सुरू होते सरहद्दीवरच्या वादळी प्रदेशातील जीवन-मृत्यू, देशप्रेम-देशशत्रू यांच्यातला थरारक लपंडाव. पदोपदी संघर्ष आणि भावनिकतेचे हादरून सोडणारे नाट्य!
दुसर्‍या अंकातील काही प्रसंग कश्मीर प्रश्नावर थेट विचारमंथन करणारे आहेत. त्यातील अंतरंग मांडताना रंगलेले नाट्य जराही कुठेही बिघडणार नाही, याची पुरेपूर दक्षता लेखिकेने घेतली आहे. तसेच हे चर्चानाट्यही होऊ दिलेले नाही. हिंदुस्थान-पाकिस्तानची जन्मकथा, निर्वासित, एकूणच मनोवृत्ती-इतिहास आणि बिघडलेली सद्यस्थिती तसेच भविष्यावरही भाष्य आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान तशी जुळी भावंडंच. पण पाक हे अकाली जन्माला आलेलं. ते कधीच अंग धरुच शकलं नाही, कायम अशक्त. ज्यात प्रतिकारशक्ती नाही, अशा अशक्त मुलानं एव्हरेस्ट चढण्याचा हट्ट धरू नये, असाही सल्ला चाचा देतो. हिंदुस्थानाचे महत्त्व मांडताना एके ठिकाणी म्हटलंय की, जसा पाकिस्तान हिंदुस्थानातूनच जन्माला आलाय. नाळ कापली तरी आई ही शेवटी आईच असते. स्वतःच्या आईला कुणी-कधी नाकारू शकत नाही! या बोलक्या भाष्याला ‘जयहिंद’ची उत्स्फूर्त दाद मिळते.
कश्मीर जिंकून तरी काय करणार? गेल्या सत्तर वर्षात दुसरा कुठलाही प्रश्न कश्मीरशिवाय पाककडे नाही. आज अर्ध्याहून अधिक जनता दारिद्रयरेषेखाली जगतेय. शिक्षण, तंत्रज्ञान काही एक नाही. कर्जबाजारी, भ्रष्टाचार, आतंकवाद याची वाळवी पाकला आतून पुरेपूर पोखरून टाकतेय. यावर आकडेवारीसह भाष्य संवादाच्या ओघात आलंय. कश्मीरच्या स्वर्गाचा नरक होता कामा नये. आज आवश्यकता आहे ती प्रेमाची, तिरस्काराची नव्हे, सुरांची गरज आहे, बॉम्बस्फोटांची नव्हे. नंदनवनाचे होणारे स्मशानवन रोखून माणुसकी जिवंत ठेवण्याची अपेक्षा या नाटकात व्यक्त केलीय.
कलाकारांची अचूक निवड, ही आणखी एक जमेची बाजू. सारेजण आपल्या भूमिकेत शोभून दिसतात. झेलमच्या भूमिकेत शर्मिला शिंदे हिने आधी वेशांतरातला लष्करी सैनिक आणि नंतर जखमी अवस्थेमुळे स्त्रीरूपातलं उघड झालेल सत्य चांगलं उभं केलंय. एकीकडे ज्वलंत राष्ट्राभिमान दुसरीकडे दुःख, वेदना पचवून शत्रूलाही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. झेलम नजरेत भरते. गुणी अभिनेता संजय जमखंडी याचा अन्वर अतिरेकी असला तरी स्वतःला ‘मिलिटंट’ म्हणजे देशासाठीचा लढवय्या समजणारा; तो तपशिलांसह साकार केलाय. झेलम आणि अन्वर यांची जवळीक तसेच तटस्थपणा दाखविणारे प्रसंग उत्तम झालेत. श्यामलालच्या भूमिकेत प्रमोद शेलार याची सहजता नोंद घेण्याजोगी. एका चांगल्या भूमिकेला त्याने न्याय दिलाय. खास करून पहिल्या अंकाचा शेवट सुन्न करून सोडतो. अमीर तडवळकर याचा सुलेमान म्हणजे यातला गब्बरसिंगच! तो हादरून टाकतो. महम्मद चाचाच्या भूमिकेत शंतनू मोघे म्हणजे हुकमी एक्काच! नाट्य अक्षरशः अंगावर झेलले आहे. कश्मीर प्रश्नांवरले तर्कशास्त्र, युक्तिवाद पकड घेतात. संवादशैली आणि देहबोली अप्रतिमच. जन्मदाता आपल्या लेकराला तो दहशतवादी बनला म्हणून ठार करतो, हे उपकथनक अंगावर शहारे आणणारे. झेलमचा नवरा वीरेंद्र आणि इब्राहिम या भूमिकेत अक्षय वर्तक, राज आर्यन (अल्ताफ), रुपेश खरे (रशीद) यांचीही साथसोबत प्रसंगात रंगत आणते. कलाकारांचं टीमवर्क नाट्य एका उंचीवर नेते. अनेक तांत्रिक बाजू पार करून आणि त्या सांभाळून या भूमिका केल्यात.
रंगभूमीच्या मर्यादा लक्षात ठेवूनच नाटककार पूर्वी प्रसंग, स्थळ याचे लेखन करीत, पण आज परिस्थिती बदलली आहे. पाऊस, पाणी, वादळ, बर्फ, नदी इथपासून ते बगीचा, बसगाडी, ट्रेन, लिफ्ट, तळघर, दुमजली घरं अशी जिवंत व हुबेहूब उभी करण्यात येतात. ‘पडद्याला टाळी!’ हा वाक्प्रचार १९६१ साली आला. त्याचीही रंजक कथा आहे. ‘मानापमान’ नाटकाच्या चौथ्या अंकात धैर्यधराच्या तंबू देखाव्याला रसिकांनी पडद्याला टाळी दिली. हा तंबू अस्सल की नक्कल हा संभ्रम पडला. तो काळ रंगविलेल्या पडद्याचा होता. आज ती जागा ‘नेपथ्याला टाळी’ने घेतली. या नाटकात दोन फिरते वेगवेगळे रंगमंच आहेत. जे वैशिष्ट्यपूर्ण. ब्लॅकआऊट न होताच प्रसंग बदल होतो हे एक वेगळेपण. सफरचंद झाडावरून काढणे, ते चक्क खाणं, ‘बोट’ही प्रारंभ आणि शेवट याचे आकर्षणच. प्रवाहातून जाणारी बोट, बर्फाचा पाऊस, धुकं-लाटा, कानठळ्या बसणारे बॉम्बस्फोट, झाडावर चढणे, शेकोटी पेटविणे… हे सारं काही ‘सिनेमा’ ठरतं. या रंगमंचावरला ‘कश्मीर’ सिनेमा असंही वर्णन याचे करता येईल. थक्क करून टाकणारे नेपथ्य कल्पक नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी उभं केलंय, ज्यांना जागोजागी रसिकांच्या टाळ्यांची दाद मिळते. सचिन जिगर यांचे संगीत आणि भौतेश व्यास यांची प्रकाशयोजना याची चांगली साथ मिळाली आहे. महागड्या तंत्रज्ञानाचा वातावरणनिर्मितीला योग्य वापर केलाय. वेशभूषा-रंगभूषा यांनीही ‘कश्मीर’निर्मितीत सहभाग घेतलाय. ‘सफरचंद’ नाटकाच्या प्रत्येक तांत्रिक बाजूवर सविस्तर भाष्य करता येईल एवढी विविधता आणि नावीन्य आहे.
निसर्गसौंदर्यामागे दडलेल्या दाहक तुकड्यांचा हा एक हृदयस्पर्शी कोलाज जो एक जिवंत नाट्यानुभव देतो. देखण्या नेपथ्याला रसिकांची मिळणारी टाळी, कश्मीरसारख्या ज्वलंत प्रश्नांच्या विषयात थेट हात घालण्याचे कसब आणि पडदा पडतांना भारावलेल्या रसिकांची मिळणारी ‘जयहिंद’ची उत्स्फूर्त साथसोबत यामुळे हे नाटक एका वळणावरला अप्रतिम आविष्कार सिद्ध होईल यात शंकाच नाही.
सामाजिक, राजकीय, कौटुंबिक सद्यस्थितीचे ज्वलंत विषय हाती घेतलेल्या शेकडो एकांकिका या स्पर्धेच्या निमित्ताने रंगभूमीवर आल्यात. त्याला उसळणारी गर्दी बघता मराठी रसिक सुजाण, चाणाक्ष झालाय खरा, पण त्याचे पडसाद मात्र व्यावसायिक रंगभूमीवर तितक्या प्रमाणात पडलेले दिसत नाहीत. अर्थात निर्मात्यांची ती मर्यादाही असेल. सर्वांना आवडणार्‍या कौटुंबिक, विनोदी नाटकांना अर्थचक्राच्या गणितात जादा प्राधान्य मिळते. पण अशी नाटके जाणीवपूर्वक नव्या संवेदना हाती घेऊन रंगभूमीवर येतात. याचे स्वागत होणे काळाची गरज आहे. यातला अस्वस्थेच्या वाटेवरला भयानक कश्मीर प्रश्न आणि त्यातला माणुसकीचे जतन करण्याचा संदेश हा सकारात्मक दिशादर्शक ठरतोय. ‘सफरचंद’च्या ‘टीम’चे परिपूर्ण प्रयोगाबद्दल अभिनंदन!

सफरचंद

मूळ लेखन – स्नेहा देसाई
रूपांतर – मुग्धा गोडबोले
दिग्दर्शन – राजेश जोशी
नेपथ्य – संदेश बेंद्रे
संगीत – सचिन जिगर
प्रकाश – भौतेश व्यास
वेशभूषा – तारा देसाई
रंगभूषा – राजेश परब
निर्माते – भरत नारायणदास ठक्कर / प्रवीण भोसले / अजय कासुर्डे
निर्मिती – सरगम अमरदिप / कल्पकला

[email protected]

Previous Post

चला, सुंदर दिसू या…

Next Post

आयुष्यातील स्पर्धेवर हसरे भाष्य

Related Posts

मनोरंजन

बॉलिवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ!

January 27, 2023
मनोरंजन

चुकवू नये असा रहस्यमय थरारपट

January 19, 2023
वो शाम कुछ अजीब थी…
मनोरंजन

वो शाम कुछ अजीब थी…

January 19, 2023
मनोरंजन

एका डॉक्टरची हृदयस्पर्शी युद्धडायरी!

January 13, 2023
Next Post

आयुष्यातील स्पर्धेवर हसरे भाष्य

चौकशीजीवी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय नो नेव्हर…

January 27, 2023

चला, कामाला लागा!

January 27, 2023

भविष्यवाणी २८ जानेवारी

January 27, 2023

अन हरवलेला सापडला…

January 27, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय नो नेव्हर…

January 27, 2023

चला, कामाला लागा!

January 27, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.