अशी आहे ग्रहस्थिती
रवी -बुध (वक्री) वृषभेत, केतू-तुळेत, राहू-हर्षल मेषेत, शुक्र, नेपच्युन, गुरु मंगळ मीनेत, शनि कुंभेत, चंद्र सप्ताहाच्या सुरवातीला मेषेत, त्यानंतर वृषभ आणि मिथुनेत.
मेष – उद्योग व्यवसायात उलाढाली होणार आहेत. राशिस्वामी मंगळाचे व्ययातील भ्रमण खर्च वाढवणार आहे. या आठवड्याची सुरवात कटकटीने होईल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी चिडचिड वाढलेली दिसेल. त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होण्याची शक्यता आहे. त्यामधून एखादा आजार मागे लागू शकतो. त्यामुळे थोडी काळजी घ्या म्हणजे झाले. व्ययस्थानातील वक्री बुध त्यामुळे सडेतोड उत्तर देण्याचा आपला स्वभाव या काळात महागात पडू शकतो. बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवा, चुकून त्यामधून मोठ्या वादाचे प्रसंग घडू शकतात. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. त्यामध्येच भले आहे. जुने येणे वसूल होईल. कर्जाचे प्रकरण मार्गी लागेल. धार्मिक कार्य, देवदर्शनासाठी वेळ मिळेल, त्या निमित्ताने प्रवासाचे योग जुळून येतील.
वृषभ – आगामी आठवडा तुमच्यासाठी खर्चिक राहणार आहे, त्यामुळे पैशाची तजवीज करून ठेवा. राशिस्वामी शुक्राचे व्ययातील भ्रमण, त्यासोबत चंद्र त्यामुळे खास करून करमणूक, आनंद घेण्यासाठी प्रवास घडतील. व्यवसायात अनपेक्षितपणे लाभ होतील. योगकारक शनीचे दशमातील भ्रमण उदयोगपती, शेती व्यवसायाशी निगडीत असणारी मंडळी, कायदेपंडित, या बरोबरच जमीन जुमल्याचा व्यवहार करणार्या मंडळींना लाभदायक राहणार आहे. घरात शुभकार्ये घडतील. विवाह इच्छुक मंडळींना चांगली स्थळे चालून येतील. विद्यार्थी वर्गास घवघवीत यश मिळेल. नवदांपत्यासाठी चांगला काळ राहणार आहे.
मिथुन – अनेक दिवसांपासून मनात घोळत असणारी महत्वाकांक्षा येत्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. बुधाचे वक्री भ्रमण त्यामुळे लेखक, पत्रकार, या मंडळींसाठी यशदायक काळ राहणार आहे. घरात शुभकार्य घडेल. देवकार्यासाठी सढळ हाताने मदत कराल. पैशाची उधळपट्टी टाळा. पैसे उसने घेऊ नका. या ना त्या कारणामुले थोडीफार आर्थिक अडचण जाणवेल. मात्र, लाभतील राहू अनपेक्षित लाभ देतील. दशन स्थानातील गुरु-मंगळ युती व्यवसायाची घडी बसवेल. नवा व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्तम काळ राहणार आहे. खेळाडू मंडळींना चांगले यश मिळेल. अध्यात्म, योगा, चिंतन या क्षेत्रात असणार्या मंडळींना गुरु-मंगळ युती योगामुळे विलक्षण अनुभव येतील.
कर्क – कौटुंबिक वातावरण थोढे गढूळ होऊ शकते. केतू, दशमात राहू -शुक्र युती त्यामुळे वैवाहिक जोडीदाराशी हेवेदावे टाळा. बांधकाम व्यावसायिक मंडळींसाठी चांगला काळ राहणार आहे. आयात-निर्यात व्यवसायात असणार्या मंडळीना चांगले लाभ होतील. परदेश भ्रमणाचे योग जुळून येतील. गुरु भाग्यस्थानात त्यामुळे धार्मिक कार्यात मोलाची कामगिरी पार पडेल. धनाधिपती रवि लाभात त्यामुळे अनपेक्षित लाभाचे प्रमाण वाढू शकेल. मित्रांच्या आणि ओळखीच्या व्यक्तींपासून चांगला फायदा होईल.
सिंह – तुम्हाला या आठवड्यात पत प्रतिष्ठां मिळणार आहे. वरिष्ठ मंडळींच्या मर्जीतल्या लोकांना चांगला लाभ मिळालेला दिसेल. नोकरीच्या ठिकाणी अधिकार योग दिसत आहे. काही मंडळींना प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. व्यावसायिक मंडळींची चांगली आर्थिक कमाई होईल. सरकारी परवाने, मान्यता ही कामे झटपट मार्गी लागतील. घरात वडील बंधूंकडून चांगले सहकार्य मिळेल. पोटाचा त्रास असणार्या मंडळींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. चुकून एखादा जुना त्रास उफाळून येऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या, मर लागण्याची शक्यता आहे. सहलीसाठी जाण्याचे नियोजन कराल.
कन्या – समाजात आणि आपल्या कार्यक्षेत्रात नावारूपाला येणार आहात. लग्नेश बुध आणि रवी भाग्यात त्यामुळे बंधुवर्गाचे सहकार्य लाभणार आहे. धार्मिक कार्य करणार्या मंडळींसाठी अतिशय अनुकूल वातावरण राहणार आहे. सत्संगाचा अनुभव येऊ शकतो. संशोधक मंडळींच्या महत्वाच्या कार्यास चांगली प्रसिद्धी मिळेल. काही मंडळींना आपल्या वत्कृत्व शैलीचा भरघोस लाभ झालेला दिसेल. कामाच्या निमित्ताने देशांतर्गत प्रवास घडेल. विवाह इच्छुक मंडळींसाठी शुभंकल राहणार आहे. मातृसुखाच्या दृष्टीने आठवडा आनंदात जाईल. मातुल घराकडून लाभ होईल. सामाजिक काम करणार्या मंडळींना सन्मान देणारा आठवडा राहील. व्यवसायात चांगला लाभ होईल.
तूळ – महिलांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे विशेष काळजी घ्यावि लागणार आहे. गर्भधारणा असणार्या महिलांना धावपळ करण्याचे टाळावे. शुक्र सप्तमात राहू सोबत त्यामुळे कुणाच्या प्रेमात फसू नका. प्रेमात अपयश येण्याची दात शक्यता आहे. मित्र- मैत्रिणींमध्ये वादाचे प्रसंग घडले असतील तर तुर्तात भेटणे टाळा. काही मंडळींना मामा कडून चांगला लाभ होऊ शकतो. नोकरदार मंडळींना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे आर्थिक लाभ मिळती. सट्टा, लॉटरी या माध्यमातून काही मंडळींना चांगले लाभ होऊ शकतात.
वृश्चिक – विध्यार्थ्यांना कला, खेळ, क्रीडा या क्षेत्रात चांगले यश मिळेल. सरकारी आणि राजकीय क्षेत्रात काम करणार्या मंडळींना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लॉटरी लागू शकते. काही मंडळी नवा व्यवसाय सुरु करू शकतात. महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. डॉक्टर मंडळींसाठी उपयुक्त आठवडा राहणार आहे. भागीदारीतील व्यवसाय असेल तर त्यामध्ये चांगले लाभ मिळतील. क्रीडा क्षेत्रातील मंडळी विजयोत्सव साजरा करतील. सल्लागार मंडळीसाठी येणारा आठवडा अत्यंत लाभदायक ठरणार आहे. संततीसोबत वेळ घालवाल.
धनु – सर्व कार्येशु सर्वदा असे अनुभव तुम्हाला येत्या आठवड्यात येणार आहेत. सुखस्थानात गुरु-मंगळ युती त्यामुळे घर वाहनसौख्य प्राप्तीचा अनुभव येईल. घरात मंगल कार्य घडेल. सरकारी कामे झटपट पूर्ण होतील. मनासारख्या घटना घडतील, त्यामुळे आनंदी राहाल. परदेशात असणार्या मंडळींकडून नवे घर घेण्याचा प्रयत्न सुरु होईल, त्याला चांगले यश मिळेल. काही मंडळींना राश्यांतर करून आलेला पंचमातील राहूसोबत शुक्र, त्यामुळे संशोधन, कला, नाट्यसंगीत या क्षेत्रात काम करणार्या मंडळींना चांगले यश मिळेल. फोटोग्राफर मंडळींसाठी आठवडा उत्तम जाईल.
मकर – शनि धन स्थानात. साडेसातीच्या काळात आर्थिक गणिते चुकली असतील ती आता बरोबर होतील. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे धनसंचयाचे ध्येय ठेवलेत तर तुम्हाला फारशी अडचण जाणवणार नाही. पराक्रमात गुरु-मंगळ युती त्यामुळे नव्या क्षेत्रात भरीत घेण्यासाठी लाभदायक आठवडा राहणार आहे. हातात आलेल्या संधीचा योग्य निर्णय घेतला तर भविष्यात चांगला फायदा झालेला दिसेल. कौटुंबिक कुरबुरी होतील, पण त्याकडे दुर्लक्ष करा. पंचमातील रवि-बुधादित्य योग त्यामुळे संततीला यश मिळवून देणारा ठरणार आहे. विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळेल.
कुंभ – व्यावसायिक लाभ मिळतील. अनपेक्षितपणे नवीन कामाच्या संधी चालून येतील. कला क्रीडा क्षेत्रात काम करणार्या मंडळींना उत्तम काळ अनुभवयास मिळेल. घरात नातेवाईकांची वर्दळ वाढलेली दिसेल. योगकारक शुक्र उच्च अधिकार प्राप्तीचा राहणार आहे. काही मंडळींना त्याचा चांगला फायदा झालेला दिसेल. प्रवास घडण्याचे योग आहेत. चतुर्थात वक्री बुध लेखक, पत्रकार मंडळींनी लिखाण करताना काळजी घ्यावी, अन्यथा आपल्यासमोर एखादी कायदेशीर अडचण उभी राहू शकते.
मीन – आपल्या बुद्धीला परमार्थाची जोड मिळाल्यामुळे तुम्हाला अनपेक्षित यश मिळालेले दिसेल. कोणतेही काम हातात घेण्याआधी खर्च किती आहे, याचा अंदाज घ्या. अन्यथा अपेक्षेपेक्षा अधिक पैसे खर्च होतील. संततीच्या शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर होईल. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग जुळून येतील. परदेशात जर काही कामे सुरु असतील तर ती वेळेत पूर्ण होतील. प्रवासात काळजी घ्या. काही मंडळींना खांदेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. नऊ गुंतवणूक करताना काळजीपूर्वक पाऊल टाका.