• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

शर्माजींची शर्मनाक गच्छंति!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
February 24, 2023
in फ्री हिट
0

कुरुकटकासि पहातां तो
उत्तर बाळ फार गडबडला,
स्वपरबळाबळ नेणुनि
बालिश बहु बायकांत बडबडला
मोरोपंतांनी आर्या या वृत्तात उत्तर या मत्स्यनरेश विराट राजाच्या पुत्राचे अतिशय मार्मिक शब्दांत वर्णन केले आहे. पांडव अज्ञातवासात असताना विराट राजाकडे आश्रयास होते. अर्जुन आणि द्रौपदी यांनी अनुक्रमे बृहन्नडा आणि सैरंध्रीचे रूप धारण केले होते. या ‘स्त्रिया,’ राजकन्या उत्तरा (अभिमन्यूची पत्नी) आणि इतर बायकांमध्ये बसून उत्तर पराक्रमाच्या उथळ शेखी मिरवायचा. मात्र रणांगणावर दुर्योधन, दु:शासन, भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य यांच्यासारखे योद्धे पाहून त्याची फजिती झाली. बृहन्नडेकडे पाहून त्याने रथ माघारी वळवावा, असे निर्देश दिले. अशा प्रकारे पराक्रमाच्या वल्गना हे शिशुभाषणच जणू, असे त्याबाबत भाष्य मोरोपंतांनी केले आहे. महाभारताच्या युद्धाच्या पहिल्याच दिवशी पांडवांचे प्रतिनिधित्व करणारा उत्तर धारातीर्थी पडला होता.
भारताचे माजी वेगवान गोलंदाज आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांची सद्यस्थिती राजपुत्र उत्तराप्रमाणेच झाली आहे. टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये बोलताना तारतम्य न बाळगणार्‍या शर्मा यांनी काही बिनबुडाच्या वाच्यता केल्या आणि त्यातून पद गमावण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबतची अशास्त्रीय विधाने आणि वर्गीकृत संघनिवडीचा तपशील हे शर्मा यांच्या वाच्यतेमधील महत्त्वाचे मुद्दे. त्यामुळेच ते बातम्यांचा विषय ठरले. एकीकडे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बोर्डर-गावस्कर कसोटी मालिका एकतर्फी का होईना रंगात आली असताना हे ‘शर्मानाट्य’ घडले. भारतीय संघ व्यवस्थापनाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) नाराजी प्रकट केली. या प्रकरणात खेळाडू आणि ‘बीसीसीआय’ची प्रतीमासुद्धा डागाळण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे शर्मा यांचा राजीनामा म्हणजे त्यांची हकालपट्टीच आहे.
चेतन शर्मा हे भारताचे एकेकाळचे नामांकित खेळाडू. १९८४मध्ये लाहोर येथे पाकिस्तानविरुद्ध त्यांनी कसोटी पदार्पणात पाचव्याच चेंडूवर सलामीवीर मोहसीन खानचा बळी मिळवत लक्ष वेधले होते. त्यानंतर १९८७च्या रिलायन्स विश्वचषकात नागपूरमधील एकदिवसीय सामन्यात चेतन यांनी भारताकडून पहिली वहिली हॅट्ट्रिक नोंदवली होती. याच सामन्यात सुनील गावस्करने त्याचे पहिले एकदिवसीय शतक झळकावल्यामुळे हा सामना ऐतिहासिक ठरला. पण या शर्मा यांच्या दोन सुखद घटना पुसून जिव्हारी लागणार्‍या षटकाराची जखम आजही भळभळती आहे. शारजात ऑस्ट्रल-आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात अखेरच्या चेंडूवर शर्मा यांच्या चेंडूवर जावेद मियाँदादने मारलेला षटकार भारतीय क्रिकेटरसिकांच्या जिव्हारी लागला होता. कपिल देव यांचे गुरू प्रशिक्षक देशप्रेम आझाद यांच्याचकडे शर्मा यांनी क्रिकेटचे धडे गिरवले. अशा या शर्माजींची क्रिकेट कारकीर्द अनुक्रमे २३ कसोटी आणि ६५ एकदिवसीय सामन्यांपुरती मर्यादित ठरली. गोलंदाजीप्रमाणेच फलंदाजीचीही क्षमता असल्यामुळे या कारकीर्दीतही काही छोटेमोठे पराक्रम शर्मा यांनी गाजवले. त्यानंतर आधी बहुजन समाज पक्ष आणि नंतर भारतीय जनता पक्ष अशा मार्गाने शर्मा राजकारणात आणि क्रिकेटच्या प्रशासनात आले. इथे काही भरीव करून दाखवण्याची संधी असताना ते स्टिंग प्रकरणात अडकले.
या स्टिंग प्रकरणात त्यांनी ‘बीसीसीआय’चे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यातील मतभेदाबाबतही गरळ ओकली आहे. कोहलीचा एकदिवसीय कर्णधारपदाचा राजीनामा यांसारख्या अनेक विषयांवर ते बोलले आहेत. पण ८०-८५ टक्के तंदुरुस्त असतानाही स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी खेळाडू इंजेक्शन घेतात आणि तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण होतात, हे त्यांचे उद्गार अत्यंत वादग्रस्त ठरले. हे इंजेक्शन्स उत्तेजक चाचणीत पकडले जात नाहीत. खेळाडूंना खेळायचे असते, म्हणून ते हा मार्ग पत्करतात, असे शर्मा म्हणाले. पुढे जाऊन जसप्रीत बुमरासह आणखीही काही उदाहरणे शर्मा यांनी दिली.
शास्त्रीयदृष्ट्या सांगायचे तर जे पदार्थ उत्तेजक चाचणीत दोषी असल्याचा निष्कर्ष देत नाहीत, ते प्रतिबंधित पदार्थ नाहीत. याचप्रमाणे उत्तेजकांबाबत शास्त्रीय मीमांसा करण्यासाठी शर्मा हे डॉक्टर किंवा तज्ज्ञसुद्धा नाहीत. त्यामुळे स्टिंग ऑपरेशनमधील शर्मा यांच्या गौप्यस्फोटानंतर उडालेल्या या इंजेक्शनकृत्याची चर्चा झाली. पण क्रिकेटमधील जाणकारांच्या मते शर्मा यांचे हे विधान बिनबुडाचे आहे.

शर्मा यांचे नेमके काय चुकले?

निवड समितीसह ‘बीसीसीआय’च्या असंख्य पदांची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यानुसार अधिकृत पत्रकार परिषदेशिवाय प्रसारमाध्यमांशी ‘ऑफ द रेकॉर्ड’ही बोलण्यास परवानगी नाही. त्यांनी पदाची विश्वासार्हता गमावली. त्यामुळेच आपली बाजू मांडण्याऐवजी राजीनामाच सादर करण्याशिवाय पर्याय त्यांच्यापुढे उरला नव्हता.

काही जाणता, काही अजाणता!

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट २०००मध्ये उत्तेजक चाचणीत दोषी आढळली होती. सर्दीसाठी घेतलेल्या औषधात उत्तेजक पदार्थ आढळल्याने तिची कारकीर्द डागाळली आणि बंदीच्या शिक्षेलाही सामोरे जावे लागले. मुंबईचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि नाशिकची धावपटू संजीवनी जाधव उत्तेजक चाचणीत दोषी स्ाापडल्याच्या घटना काही वर्षांपूर्वी घडल्या. खोकल्यासाठी घेतलेल्या औषधामुळे पृथ्वीवर उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचे बालंट आल्याचा त्याचा दावा होता, तर आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यामुळे संजीवनी उत्तेजकांच्या कचाट्यात सापडली. अशा अनेक घटनांचा समान धागा म्हणजे अजाणतेपणा. अर्थात यात खरा आणि खोटा हे मात्र दोन वर्गीकरण होऊ शकतात. उत्तेजक पदार्थांचा समावेश असलेली सर्वसामान्य वापरातली असंख्य औषधे उपलब्ध आहेत. दुसरे म्हणजे कामगिरी उंचावण्याचे प्रचंड दडपण. यात अन्य खेळाडूंपेक्षा सरस ठरण्याची अभिलाषा आणि अपेक्षा अंतर्भूत असते. त्यामुळे प्रशिक्षक, पालक खेळाडूला वाईट मार्गाकडे प्रेरित करतात. उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेला कुस्तीपटू नरसिंग यादव २०१६च्या रिओ ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरला होता. त्याला आहारातून उत्तेजक पदार्थ देण्याचा कट रचण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु या प्रकरणातील सत्याचा अद्याप उलगडा झालेला नाही. म्हणजेच कुरघोडी करण्यासाठीसुद्धा ‘उत्तेजक प्रयोग’ होऊ शकतो. या संदर्भातील साक्षरतेसाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रयत्न झाले आहेत. २०२१मध्ये राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक विधेयक संसदेत संमत करण्यात आले.

क्रिकेटमधील धोरणे

‘बीसीसीआय’ने २००८च्या इंडियन प्रीमियर लीगपासून (आयपीएल) स्वीडनस्थित जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्था म्हणजेच ‘वाडा’ची मान्यता असलेल्या आंतरराष्ट्रीय उत्तेजक चाचणी आणि व्यवस्थापन या संस्थेकडून चाचण्या करून घेतल्या होत्या. कारण राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था म्हणजेच ‘नाडा’चे वर्चस्व ‘बीसीसीआय’ला अमान्य होते. ‘नाडा’ची उत्तेजक प्रतिबंधक चळवळ आणि त्यांची नमुने घेण्याची पद्धती खराब दर्जाची आहे, असे ‘बीसीसीआय’चे म्हणणे होते. जुलै २००६पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ‘वाडा’च्या उत्तेजक प्रतिबंधक नियमांचा स्वीकार केला आहे. त्यामुळे ‘ठावठिकाणा’ (व्हेअरअबाऊट्स) म्हणजे खेळाडू स्पर्धेच्या काळात रिकाम्या वेळात कुठे आहेत, हे जाणून घेण्याच्या नियमाला विरोध करणार्‍या ‘बीसीसीआय’ला ‘वाडा’च्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक ठरले. गेल्या काही वर्षांत ‘नाडा’चेही धोरण ‘बीसीसीआय’ने मान्य केले आहे. त्यामुळे सध्या देशांतर्गत असो, किंवा आंतरराष्ट्रीय तसेच कोणत्याही लीग क्रिकेटपटूंच्या रँडम म्हणजेच अनियत अशा उत्तेजक चाचण्या होत असतात. या परिस्थितीत प्रतिबंधक पदार्थांचे सेवन केल्यामुळे उत्तेजक चाचणी खेळाडू सुटू शकणार नाही, अशी एक बाजू क्रिकेटमधील जाणकार मांडतात.

[email protected]

…पण सुटका नाही!

चेतन शर्मा यांनी नमूद केलेली इंजेक्शन्स ही वेदनाशामक म्हणजेच ‘पेनकिलर’ असतात. जसप्रीत बुमराला पाठीचे दुखणे आहे. वेगवान गोलंदाजी करताना त्याला क्वचित प्रसंगी अडचणीचे ठरू शकते. परंतु तंदुरुस्ती चाचणी त्याला उत्तीर्ण करायची आहे. यात असंख्य चाचण्या घेतल्या जातात. खाली वाकू शकता, उभे राहू शकता, गोलंदाजी करू शकता याचे निरीक्षणही केले जाते. पाठीचे दुखणे असलेल्या व्यक्तीला वाकताना ती दुखणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे एखादा खेळाडू ‘पेनकिलर’ इंजेक्शन घेऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे इंजेक्शन बंदी असलेल्या उत्तेजकांच्या यादीत येत नाहीत. तंदुरुस्ती चाचणी जरी उत्तीर्ण करण्यासाठी हे ‘पेनकिलर’ साहाय्यक ठरत असले तरी त्याचे दूरगामी परिणाम घातक असतात. कारण, वेदना जाणवत जरी नसल्या तरी आतील नुकसान हे होतच असते.
खेळाडू १०० टक्के तंदुरुस्त कधीच नसतो. खेळाडूंची बोटे जरी पाहिली, तरी त्याची प्रचीती येते. त्यामुळे वेदनाशामक गोळ्या किंवा इंजेक्शन्सचे सेवन त्यांच्याकडून केले जाणे स्वाभाविक आहे. हे वैद्याकीय पदार्थ जोवर प्रतिबंधित उत्तेजकांच्या यादीत नाहीत, तोवर कोणतीच समस्या नाही. खेळाडूंकडून उच्च कामगिरीची अपेक्षा करता, तर त्या दर्जाचा सरावही करावा लागतो. इतक्या मोठ्या प्रमाणात सराव चालतो, तेव्हा दुखापती होतच असतात. खांद्याच्या जोडहाडात स्टेरॉइड्सचे इंजेक्शन घेतात, ते प्रतिबंधित उत्तेजकांच्या यादीत नसते. कुस्तीपटूसुद्धा खांदा दुखत असेल तर स्टेरॉइड्सची मात्रा घेतात. गुडघ्याची सूज भरून काढण्यासाठीसुद्धा स्टेरॉइड्स दिले जाते.
स्टेरॉइड्स हे असे रसायन आहे, ज्यातल्या काही प्रकारांतून स्नायूंची वाढ होते, तर काही प्रकारांत असे कोणतेही परिणाम होत नाही. दम्याचा त्रास असलेली सर्वसामान्य माणसेसुद्धा स्टेरॉइड्सची पावडर घेत असतात. प्रतिबंधित उत्तेजकांच्या यादीत तीच औषधे, गोळ्या किंवा इंजेक्शन्स येतात, ज्यांच्यामुळे तुम्हाला गैरवाजवी लाभ मिळतात. क्रीडा क्षेत्रात उत्तेजकांच्या चाचणीतून सुटण्यासाठीसुद्धा काही प्रयोग सुरू असतात. खूप पाणी पिऊन लघवीवाटे ते पदार्थ निघून जावेत, असेही प्रयोग केले जातात. पण त्यातून त्यांची सुटका होत नाही. प्रतिबंधित उत्तेजकांची यादी दर काही काळाने अद्ययावत केली जाते. त्यामुळे यातून पळवाटा काढता येत नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या उत्तेजक चाचणीचे नमुने अनेक वर्षे जतन केले जातात. त्यामुळे काही वर्षांनी त्यातून उत्तेजकांची मात्रा सिद्ध झाल्यास कारवाई होते. त्यामुळे चाचण्यांमधील आधुनिकता आणि बदलानुसार आज सुटलेला क्रीडापटू उजळ माथ्याने फार काळ ते यश टिकवू शकणार नाही.
२००५मध्ये झालेल्या ‘आयएएफ’ जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या अंतिम टप्प्यात लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जला रौप्यपदक मिळाले होते. परंतु नऊ वर्षांनंतर रशियाची टॅट्याना कोतोव्हा उत्तेजक चाचणीत दोषी आढळली. त्यामुळे टॅट्यानाचे सुवर्णपदक काढून घेत ते जॉर्जला देण्यात आले. हेलसिंकीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही टॅट्यानाने रौप्यपदक पटकावले होते. तेथीलही तिचे पदक खालसा झाल्याने पाचवा क्रमांक मिळवलेल्या अंजूचा क्रमांक सुधारून चौथा करण्यात आला. महान टेनिसपटू आंद्रे आगासीला ‘स्लिप डिस्क’चा त्रास होता. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्याआधी स्टेरॉइड्सची मात्रा घ्यावी लागायची, असे आगासीने ‘ओपन’ या आत्मचरित्रात लिहिले आहे.

– डॉ. निखिल लाटे, आंतरराष्ट्रीय क्रीडावैद्यकतज्ज्ञ

Previous Post

गौत्याचा बाबा!

Next Post

मर्मग्राही फोटोंचे प्रदर्शन

Related Posts

फ्री हिट

संधीचा चेंडू त्यांच्या दिशेने वळलाच नाही…

March 16, 2025
फ्री हिट

मिश्कील, उमदा, खेळकर सुनील!

July 19, 2024
फ्री हिट

त्यांचं काय चुकलं?

May 10, 2024
फ्री हिट

‘ते’ सध्या काय करतायत?

February 16, 2024
Next Post

मर्मग्राही फोटोंचे प्रदर्शन

काव्यसंग्रहात प्रगटली नाट्यसंहिता!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.