(`मेरीच लाल’ किल्ल्याचा दरबार ए खास. वजीर अमानतुल्ला शामेनी आपल्या रिकाम्या टकलावरून हात फिरवत मेजावर पडलेले सामंजस्याचे चार-दोन कागदं न्याहाळत अंतिम मसुदा तयार करण्यात गर्क.सोबत निंदानाथ उर्फ मौजनाथ सिंह, मेवाराज सिंह, जयपत नाडा आदी मंडळी कानठळ्या बसणार्या तोफांच्या आवाजाने भेदरून मुकाट आपापल्या आसनावर बसून अधीरतेने अंतिम मसुद्याची प्रतीक्षा करताय. पलटूराम बाबूची माणसं वाटाघाटीसाठी अडून बसलेली. त्याच वाटाघाटींवर तख्त वाचवण्यासाठी अधिकची कुमक बाबू पाठवणार की नाही, ते ठरणार असल्याने वातावरण तंग आहे. त्यात दर दहा-पंधरा मिनिटांत कुर्निसात करत शिपाई येतोय, नि कुठल्या प्रांतात गढ आणि योद्धा पडला त्याची इत्यंभूत खबर देतोय. तोच फुलचंद पंत डबीर कुर्निसात करत आत प्रवेशतात नि येऊन जयपतच्या कानाजवळ काही बोलू जातात. पण वजीर शामेंनीच्या जळजळीत कटाक्षामुळे एक दूरच्या आसनावर जाऊन निमूटपणे बसून घेतात.)
मेवाराज : (काहीशा बेफिकिरीने) तख्त वाचवायला अशी कितीशी कुमक हवीय आपल्याला?
जयपत : (उत्साहित मेवाराजला आवरत) आप जरा धीरज रखिए। (अमानतुल्लाकडे बोट करत) बडे बुजुर्ग और राजनीती के चाणक्य यहाँ बैठे है।
अमानतुल्ला : (स्वतःशी पुटपुटल्यागत) ये जो खाता है, अगर ये इन्हें दिया जाय तो क्या होगा? (स्वतःचंच डोकं खाजवतो. तोच एक शिपाई आत येतो, मुजरा करतो.)
शिपाई : हुजूर, वाईट बातमी आहे.
अमानतुल्ला : (नजर वर न करता) कहिए। हमारे बहोत सारे गढ़ तो ढह गए है। इससे बुरी और भी कोई बात है?
शिपाई : (खालमानेने) हां, हुजूर! हम फैजाबाद हार गये है।
अमानतुल्ला : (डोक्याला हात लावत) या अल्लाह। और क्या दिन दिखाने बाकी रह गए थे? क्या कसूर था आखिर हमारा?
शिपाई : हुजूर, शायद धर्माच्या अफूचा ओव्हरडोस झाला असेल.
अमानतुल्ला : ( जवळची बाटली हलवत) ऐसा तो संभव ही नहीं है, मान्यवर। इसमें तो अभी भी कुछ बचा खुचा है कुछ।
(तोच काहीतरी पडल्याचा आणि मागाहून `या अल्लाह!’ म्हणून पुकारल्याचा आवाज येतो. सगळ्यांच्या नजरा त्या दिशेने वळतात. थोड्या वेळाने त्या दिशेने कंबर पकडून चहापन्हा नौरंगजेब प्रवेशतात. त्यांना बघताच सर्वजण घाईने उठतात, सर्व माना झुकवल्या जातात.)
नौरंगजेब : ( वेदनेने विव्हळत तीव्र संतापाने) कम्बख्त। आखिर किसने की ये साजिश?
अमानतुल्ला : हुजूर। आखिर किस साजिश की बात कर रहे हो आप?
खानसामा : (गडबड ऐकून आत डोकावत) यहाँ सुबह से एक चाय नही उबाल जा सकी, वहाँ साजिश क्या खाक होगी?
अमानतुल्ला : (डोळ्याने खानसामाला खुणावत) खाक तो मोगलों के दुश्मन हो। हुआ क्या है? ये बताइये। मुगल सल्तनत की कसम हम किसीको…
शिपाई : (अमानतुल्लाला सावध करत) ओ, हुजूर! जरा हळू! आधीच तोफगोळे किल्ल्याचे बुरुज ढासळवताय, त्यात तुम्ही पुन्हा जंग लढण्याची भाषा केलीत तर किती महाग जाईल हे सांगावं लागेल का?
नौरंगजेब : (लहान मुलागत त्रागा करत) जाने दो यार। कोई यहाँ मुझे सीरियसली लेता ही नहीं। मैं हूँ कौन आखिर यहाँ पर?
अमानतुल्ला : माफी हुजूर, पर आपके खिलाफ याने गौरव ए मंद के खिलाफ कौन बगावत कर सकता हैं?
शिपाई : (मलूल चेहर्याने) खरंय, चहापन्हाची ही अवस्था बघावत नाही हो!
नौरंगजेब : (काकुळतीला येत) अय मूर्ख! चुप बैठ। आज किसने मेरे शाही पलंग को हात लगाने के ढांढस किया है? अँ? कौन है वो? उसकी ये जुर्रत? (तोच तोफेचा आवाज येतो, त्यासरशी नौरंगजेब टुणकन उडी मारत एक आसनामागे लपतो. आवाज शांत झाल्यावर चोरून आसनामागून बघत) इन लोगों ने मुझे चार घंटे चैन से सोने भी नहीं दिया। कोई तो ढूंढो उसे।
अमानतुल्ला : (जीभ चावत) जी झोलमगीर! जो हुआँ हैं उसकी वजह ये हमारा अलायन्स है। इसमें हर चीज का बंटवारा हुआ है।
नौरंगजेब : मित्र तो क्या मेरा शाही पलंग भी बांट दिया? हाय अल्लाह।
पंत : (अंगभूत लाचारपणे) हुजूर, एक गाणं आहे मराठीत, `खेळ कुणाला दैवाचा कळला? टुणुनुणूनू…’
अमानतुल्ला : (जळजळीत नजरेने पंतांकडे बघत) चहापन्हा, कभी मुगल दरबार में सय्यद भाई हुआ करते थे, दरबार उनके हुक्म से चलता था! अब वही नौबत आई है! अब हमें ऐसे ही दो भाइयों का सहारा लेना पड़ा है। पलटूराम बाबू कहते हैं लोग उन्हें। बट फिकर नॉट! हमने तख्त बचाने के लिए सिर्फ उन्हें गैरजिम्मेदाराना मनसब या पोस्ट देनेको `हां’ बोला है।
नौरंगजेब : (इतक्या वेळ डाचणारा प्रश्न करत) फिर पलंग में से क्या दिया?
शिपाई : (निर्लज्जपणे हसत) बरोबर मधला बांबू काढला. तसे तर पावके काढावे वाटले, पण त्याने पलंग कोसळला असता!
(तोच धट्टेकट्टे चारपाच जण आत प्रवेशतात. मुजरा करतात.)
अमानतुल्ला : (चारपाच जणांकडे बघत) काय काम काढलंत?
एकपंचमांश : ते ब्यादश्याची काळजी वाटली, म्हणून आलो होतो.
अमानतुल्ला : (शंकेने) त्यांना क्या हुआ हय? ठीक तो हैं मान्यवर!
एकपंचमांश : वो तो ठीक हैं। पण विरोधी फौजे दरवाजे तक आलीय ना?
अमानतुल्ला : तो फिर?
एकपंचमांश : या येशू!! चहापन्हा बोललेले ना? वो जितल्यावर म्हैस और मंगळसूत्र छिन सकते है। और वो जितते हुए यहाँ पहुँचे है तो आम्ही सोचा, वो लई जाने से पहिले हम ही लई जाते है, सब प्रॉपर्टी। क्या? सेफ रहेगी, हमारे पास बोले तो!
मौजनाथ : (इतक्या वेळच्या मौनाचा भंग करत) मित्र, आप जो साझेदारी का अवसर ढूंढने आये हो, उसी विषय का मंथन करने के लिए हम लोग यहाँ लोकतांत्रिक तरीके से समाधान खोजने की चेष्टा कर रहे हैं।
एकपंचमांश : (गोंधळून) काही समझा नहीं!
पंत : त्यांची पल्लेदार वाक्य बहुतेकदा त्यांनाच वरून बाऊन्सर जातात, उगाच का वरला बगीचा विरळ झालाय?
अमानतुल्ला : (चार-पाचजणांकडे बघत दोन्ही हात जोडून) जनाब! आइये आप! हम बाद में बात करेंगे। चहापन्हा, आप भी जल्दबाजी करें। और स्नानसंध्या कर लीजिए। क्या पता, हमें भी कहीं तलवार उठानी ना पड़ जाए? (चारपाच जणांमगे नौरंगजेब देखील जातो.)
मेवाराज : (मौजनाथच्या कानात पुटपुटत) मुझे नहीं लगता चहापन्हा ये तख्त संभाल पाएंगे।
मौजनाथ : मुझे भी! (प्रश्न आणि उत्तराने दोघंही एकमेकाकडे चमकून शंकेने बघतात आणि घाईने उठून वेगवेगळ्या दुसर्या आसनांवर जाऊन बसतात.)
(तोच एक हेर घाईने आत येतो नि अमानतुल्ला यांच्या कानी लागतो. त्यांच्या कानगोष्टी चालू असताना अमानतुल्लाच्या चेहर्यावर एकाचवेळी शंका आणि चिंतेचे भाव दाटतात.)
जयपत : (उत्सुकतेने) वजीर साब क्या हुआ?
अमानतुल्ला : हमने जो टेहळे नेमे थे। या तो उन्होंने भेजा हुआ अनुमान गलत निकला, या वो गलत निकले.
मौजनाथ : अवसर तो सृष्टि का नियम है। है कि नहीं? (चुकीचं बोलल्या गेल्याचं लक्षात येताच चपापून मागे सरतो. तोच दाणादाण पावलं वाजवीत नौरंगजेब प्रवेशतो.)
नौरंगजेब : वजीर, आमच्या चीजवस्तू का देताय तुम्ही?
अमानतुल्ला : (खजील होत) चहापन्हा, वो गलतीसे पलंग का बाम्बू निकाला गया। आगे से नहीं होगा ऐसा कुछ!
नौरंगजेब : बात एक बाम्बू की नही रही, वजीरजी।
अमानतुल्ला : शायद आप दोन की बात कर रहे हो।
नौरंगजेब : हम हमारे अधिकार की और पहचान की बात कर रहे है।
अमानतुल्ला : ब्यादश्या, मैं समझा नहीं! मैं तो सिर्फ कम जिम्मेदाराना मनसब तथा पोस्ट उन दो बाबुओं को दे रहा था।
नौरंगजेब : हम बात कर रहे है, हमारे तख्त की। हमारा तख्तरोहण है, और फोटो उनके खिंचवाए जा रहे है। हमारा आधा क्रू उनकी तस्वीरें उतार रहा है। हमारे वार्डरोब के महंगे कपडे बांट दिए गए है। और हमारे आसन पर वो दोनों चढ़कर बैठे है। उन्हें हम उतारे कैसे?
(कुणीच अवाक्षर काढत नाही. सगळे माना खाली घालून उभे आहेत. त्याने चहापन्हा नौरंगजेब आणखी संतापतो.)
नौरंगजेब : कोई कुछ नहीं बोलेगा?
पंत : (धाडस करून हात वर करत) में बोलेगा।
नौरंगजेब : (अधीरतेने) बोलिए जनाब।
पंत : वो इधर का उधर का मैं बोलेगा नहीं, सबकी हारकी जिम्मेदारी मइच लेता हूँ। फक्त तेव्हढं मला मोकळं करा, ही विनंती हा अर्ज! अध्यक्ष महोदय!
अमानतुल्ला : (कपाळावर हात मारत) क्या अश्लील लौंडा हैं ये?