• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

भविष्यवाणी २२ मे २०२२

- प्रशांत रामलिंग (२२ ते २८ मे २०२२)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 19, 2022
in भविष्यवाणी
0

अशी आहे ग्रहस्थिती

राहू मेषेत, रवि-बुध (अस्त) वक्री वृषभेत, केतू तूळेत, शनि कुंभेत, गुरु-शुक्र-मंगळ-नेपच्यून मीनेत, चंद्र मकरेत, नंतर कुंभेत, सप्ताहाच्या अखेरीस मीन राशीत. २४ मेपासून शुक्र मेषेत. दिनविशेष – २६ मे रोजी अपरा एकादशी.

 

मेष – मंगळ व्ययात, सोबत गुरु-नेपच्युन-शुक्र त्यामुळे धार्मिक कार्याच्या निमित्ताने कुटुंब, जोडीदार यांच्यासाठी खर्च करावा लागेल. त्यामुळे चिडचिड होईल. वैवाहिक सौख्याच्या बाबतीत असमाधानी राहाल. व्यावसायिकांसाठी लाभदायक काळ. कर्जाची कामे सहज मार्गी लागतील. कोर्टकचेरीची कामे लांबणीवर पडतील. पैशाचे काम करताना काळजी घ्या, फसगतीची शक्यता आहे. व्ययातील गुरु-नेपच्युन युती देव-धर्म, आध्यत्मिक प्रगतीत यश देतील. करमणूकक्षेत्रात चांगले आर्थिक लाभ होतील.

वृषभ – कलाकार, काव्य, संगीत, सेवा क्षेत्रात काम करणार्‍यांना लॉटरी लागेल. तरीही काळजी घ्या. गुरु-नेपच्युनमुळे आर्थिक व्यवहारात घोटाळा होऊ शकतो. अपेक्षित गोष्टींची खरेदी होईल. मित्रमंडळींकडून लाभ होतील. संततीच्या कर्तृत्वामुळे मानसन्मानाचे अनुभव येतील. सप्तमेश मंगळाचे लाभातील राश्यांतर सट्टा, शेअर बाजारात लाभ देईल. नोकरदारांची पगारवाढ होईल.

मिथुन – घर मोडून मांडव घालण्याची वृत्ती सोडा. तरच हातात पैसे खेळते राहतील. लाभेश मंगळाच्या दशमातील भ्रमणामुळे व्यवसायात चांगली कमाई होईल.नवी वास्तू घेण्याचा योग येईल.काही मंडळींचा मोठ्या संस्था, कंपन्यांच्याकडून सन्मान होईल. कायद्याच्या क्षेत्रातील मंडळींचा नावलौकिक वाढेल. परदेशी कंपनीच्या कामात यश मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या.

कर्क – नावलौकिकात भर पडेल. चंद्र आणि मंगळाचे भाग्यातील भ्रमण त्यासोबत गुरु-नेपच्युन-शुक्र त्यामुळे येणारा काळ चांगला जाईल. खास करून २५ आणि २६ या तारखा विशेष लक्षवेधी ठरतील. खेळाडूंना स्पर्धेत चांगले यश मिळेल. कामाच्या निमित्ताने लांबचे प्रवास होतील. आयात-निर्यातदारांना चांगले आर्थिक लाभ होतील. मामाकडून चांगले सहकार्य मिळेल. नोकरीच्या निमित्ताने परदेशप्रवासाचे योग जमून येतील. बदली-बढतीच्या ऑफर येतील. दशमातील राहू-केतू विनाकारण कौटुंबिक किटकिट वाढवतील.

सिंह – रविचे वृषभेतील भ्रमण फायदेशीर ठरेल, अधिकारात वाढ होईल. यश-सन्मान-अधिकार मिळेल. सरकारी कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. सरकारी ओळखीच्या माध्यमातून चांगला फायदा होईल. व्यवहारात चोखपणा ठेवा, उगाच नसता त्रास मागे लागेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी २२ ते २४ या काळात काळजी घ्यावी. वाद-विवादाचे प्रसंग टाळा. प्रवासात प्रकृती सांभाळा.चतुर्थेश मंगळाचे अष्टमातील भ्रमण स्थावर मालमत्तेमधून लाभ देऊ शकतो. ब्रोकर्सना चांगली दलाली मिळेल.

कन्या – हंस योगातला गुरु, मालव्य योगातला शुक्र, भाग्यात लग्नेश बुधादित्ययोग त्यामुळे २४ आणि २५ तारखा लाभदायक ठरतील. अनपेक्षित धनलाभाचे योग जुळून येतील. व्यवसायात लाभ होतील. उच्चशिक्षण घेणार्‍यांना नवी संधी चालून येईल. खर्च करताना काळजी घ्या. बंधुवर्गाचे सहकार्य लाभेल.

तूळ – विपरीत राजयोगाचे शुभ लाभ पदरात पडतील. महिलावर्गाला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागेल. षष्ठातील मंगळामुळे छोटी शस्त्रक्रिया करावी लागू शकते. लग्नातला केतू- सप्तमातील राहू दाम्पत्यजीवनात विसंगती निर्माण करेल. प्रॉपर्टी, फंड या माध्यमातून चांगला आर्थिक लाभ मिळेल. जुनी गुंतवणूक अचानक चांगला लाभ देऊन जाईल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा पोटाचे विकार निर्माण होतील. घरात खटका उडू शकतो, पण त्याकडे फार लक्ष देऊ नका.

वृश्चिक – टेक्निकल फिल्ड, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींना चांगला लाभ मिळेल. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. मैदानी खेळाडू, संगीत क्षेत्रातील मंडळींना आठवडा फलदायी ठरेल. चांगले आर्थिक लाभ होतील. जुगार, सट्ट्यामधून चांगले पैसे मिळतील. सासुरवाडीकडून लाभ होईल. व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ होईल. भागीदारीचा व्यवसाय फायदेशीर ठरेल.

धनु – राशिस्वामी गुरु हंसयोगात, शुक्र मालव्य योगात चतुर्थात, त्यामुळे घरात शुभकार्ये पार पडतील. रेंगाळलेला घराचा प्रश्न झटकन मार्गी लागेल. खेळाडू, साहित्यिक, नाट्य कलाकार, याच्यासाठी चांगले दिवस आहेत. दानधर्माचे कार्य पार पडेल. नोकरदारांना अधिकार मिळेल. कोर्ट-कचेरीत यश मिळेल. मातुल घराकडून लाभ मिळतील. शेतकर्‍यांना उत्तम लाभ मिळेल. टूर ऑपरेटरसाठी भरभराटीचा काळ. विद्यार्थीवर्गाला अपयश संभवते.

मकर – कार्यक्षमता वाढेल. गुरु-मंगळाच्या पराक्रमातील राश्यांतरामुळे मेहनतीचे चीज होईल. महिनाअखेरीस लांबचा प्रवास होईल. सुखस्थानातील राहुमुळे कौटुंबिक अस्वस्थता वाढीला लागेल. त्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायाकडे लक्ष द्या. पोलीस दलातील मंडळींची प्रशंसा होईल. सुखेश मंगळ तृतीयात आहे, त्यामुळे आईकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

कुंभ – मागे घेतलेल्या निर्णयांचा आता फायदा होईल. आर्थिक गणिताचे कोडे सुटेल. कर्ज प्रकरण सहज मार्गी लागेल. २४ मेपासून राश्यांतर करणारा शुक्र आणि राहू यांची युती असल्याने वैवाहिक जोडीदारसोबत कभी खट्टा, कभी ाfमठा अशी स्थिती होईल. फोटोग्राफर, चित्रकार यांना चांगल्या ऑफर्स येतील. कर्मेश व लाभेश गुरु-मंगळ धनस्थानात असल्याने जमीनजुमल्याच्या व्यवहारातून चांगली कमाई होईल. ब्रोकर, कमिशनचा व्यवसाय करणार्‍या मंडळींसाठी चांगला काळ राहणार आहे.

मीन – साडेसाती सुरु असल्याने वायदे-व्यवहार जपा. फसगत होऊ शकते. २४ मेपासून राश्यांतर करणारा शुक्र राहूबरोबर व्दितियात असल्याने व्यापार्‍यांसाठी खर्चिक आठवडा ठरू शकतो. व्यसनाधीनता टाळा. फाजील आत्मविश्वास नको. आठवड्याच्या सुरवातीला संततीसाठी पैसे खर्च करावे लागतील. प्रवासात नव्या ओळखी होतील. भावाबरोबरचा आर्थिक व्यवहार स्वच्छ ठेवा.

Previous Post

चक्रव्यूह

Next Post

नेत्यांची मनतपासणी

Next Post

नेत्यांची मनतपासणी

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.