• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

टीम मार्मिक by टीम मार्मिक
April 14, 2022
in टपल्या आणि टिचक्या
0

□ लोकप्रिय घोषणा, अव्यवहार्य योजना रोखल्या नाही तर… हिंदुस्थानची अवस्था श्रीलंका आणि ग्रीससारखी होईल! पंतप्रधान मोदींसमोरच अधिकार्‍यांचा इशारा
■ यातलं काहीही न करता आपल्या देशाची अवस्था श्रीलंका आणि ग्रीससारखी करण्याच्या पंतप्रधानांच्या क्षमतेवर शंका घेतल्याबद्दल या तज्ज्ञांच्या घरी ईडी का पाठवू नये?

□ श्रीलंकेत अराजक! संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा. अन्न नाही, पैसा नाही, जीवनावश्यक वस्तूंचाही प्रचंड तुटवडा
■ श्रीलंकेच्या सिंहली नागरिकांनी तामीळ नागरिकांवर सूड काढण्यासाठी महिंदा राजपक्षे यांच्या हातात अमर्याद अधिकार दिले, त्याची फळे ते भोगतायत.

□ गुजरातेत भाजप `आप’टणार, सर्वेक्षणातील अंदाज
■ केजरीवालांच्या घरावर हल्ला झाला, तेव्हाच कळलं ते.

□ लंडनपेक्षाही जास्त सीसीटीव्ही नवी दिल्लीत, जगात अव्वल
■ आपल्या देशात नागरिकांवर अधिक प्रमाणात पाळत ठेवावी लागते आहे किंवा तशी ती ठेवणारे सरकार आहे, यात कौतुकास्पद काय आहे?

□ राज्यातील तुरुंग कैद्यांनी झाले `ओव्हरफ्लो,’ कारागृह व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण; न्यायप्रक्रिया जलद होण्याचा परिणाम
■ महागाईची वाढ अशीच सुरू राहिली तर लोक आपणहून तुरुंगात भर्ती होऊ लागतील दोन वेळच्या अन्नासाठी… तेव्हा काय होईल?

□ नर्सिंगचे वादग्रस्त पाठ्यपुस्तक; येथे शिकवले जातात हुंडा घेण्याचे फायदे!
■ असली पाठ्यपुस्तके काढणार्‍यांना आधी फटकवले पाहिजे आणि नंतर त्यांच्यावर नर्सिंगचे उपचार करण्यास नकार दिला पाहिजे.

□ शुभमंगल सावधान…! नववर्षात विवाहाचे तब्बल ८९ मुहुर्त
■ कोविडकाळाची भरपाई होणार वाटते, नोकरदारांना अहेरासाठी स्वतंत्र बजेट करावं लागणार या वर्षात.

□ मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगावातील ८४ वर्षांची आजी कसते शेती. कमावते लाखो रुपये
■ शेतकरी बंधू, मनात कधी निराशा दाटली तर या आजीबाईंच्या शेतावर जाऊन या. उभारी मिळेल.

□ गुन्हेगारांची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने करणारे वादग्रस्त विधेयक मंजूर. गैरवापराची शक्यता केंद्राने फेटाळली
■ ईडी आणि सीबीआयपासून सगळ्या यंत्रणांना बटीक बनवून ठेवणारे केंद्र सरकार गैरवापराची शक्यता फेटाळते, याहून मोठा विनोद दुसरा नाही.

□ अवघ्या देशात अस्वस्थता आहे : शरद पवारांना चिंता
■ काळजी करू नका, देश जागा होऊ लागला की त्याला धार्मिक विद्वेषाची भांग पाजून निजवण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे… देशालाही या भांगेची लत लागते आहे.

□ गोव्याला देशाची पर्यटन राजधानी बनवणार : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
■ ते पाहू नंतर. सध्या गोव्यातले सौहार्द टिकवून ठेवलेत तरी पुष्कळ.

□ विस्थापित काश्मिरी पंडित लवकरच घरी परततील- सरसंघचालक मोहन भागवत यांचे आश्वासन
■ जादूची लाठी फिरवणार आहेत का भागवतजी!

□ अदानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत
■ टीकाकारांनो, केंद्र सरकारने आणखी किती उज्वल कामगिरी करून दाखवायची?

□ मराठीच्या पोटदुखीवर इलाज करावा लागेल – उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना इशारा
■ यांना आता कडक जमालगोटा देण्याची वेळ आली आहे उद्धवजी!

□ चांगल्या कामात विघ्न आणू नये-राज्यपाल कोश्यारी
■ हे कोण बोलतंय बघा. सगळं कोळून प्यालेत काय?

□ नागरिकांचे हात बांधून गोळ्या घालून हत्या, युक्रेनचा रशियावर आरोप. रस्त्यावर सापडले मृतदेह
■ तरी अमेरिका, युरोप शांत आहेत, आपल्याला स्वस्तात इंधन मिळाल्याचा आनंद आहे- हे इंधन सर्वसामान्यांना तरीही महागच पडते आहे ते वेगळेच.

□ भाजपमध्येही सर्वोच्च नेतृत्वावर आहे प्रचंड नाराजी. मोदी सरकारमधील ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा आरोप
■ मग द्या राजीनामे आणि पडा बाहेर.

□ शिक्षकाच्या पेशाकडे वाढतोय कल! बीएड अभ्यासक्रमाच्या जागा फुल्ल!
■ ज्याला काही येत नाही, तो शिक्षक बनतो, अशी एक इंग्लिश म्हण आहे… तिची आठवण झाली.

□ तेरा दिवसात ११ वेळा इंधनवाढ
■ दोन दिवस वाया कसे गेले, यावरून एखाद्याची नोकरी गेली नाही म्हणजे मिळवली

□ लिंबू दहा रुपयांना; मिरचीचाही ठसका
■ आता महागाईची ईडापिडा टळण्यासाठी लिंबूमिरचीही बांधण्याची सोय नाही राहिली…

□ निम्मे भारतीय शांत झोपेपासून वंचित
■ निम्म्यांना अजून शांत झोप लागते आहे, ही खरी बातमी आहे.

□ `आम्हालाही हवे आरक्षण’ तृतीयपंथीयांची उच्च न्यायालयात धाव
■ त्यांना शिक्षण, नोकर्‍यांपासून वंचित ठेवलं जातंच. योग्य मागणी आहे.

□ मुंबईचा विकास म्हणजे देशाचा विकास. विकासाच्या बाबतीत सर्वांनी एकत्र आले पाहिजे- नितीन गडकरी
■ हे फडणवीस, चंपा, शेलार वगैरेंना सांगा की हो गडकरी साहेब.

Previous Post

ईडी तो कान पिळी

Next Post

महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीला जगवा!

Next Post
महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीला जगवा!

महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीला जगवा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.