• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

खरकट्यातली माशी!

- ऋषिराज शेलार (नौरंगजेबाची बखर)

Nitin Phanse by Nitin Phanse
March 14, 2024
in भाष्य
0

(अतिथीगृहात वजीर अमानतुल्ला शामेनी यांचं आगमन होतं, सुभेदार इकमाल सिद्दीक, फुलचंद डबीर, हेजीब पेव्हरराव लगबगीनं मुजरे, कुर्निसात वगैरे घालत त्यांचं स्वागत करतात. शामेनी आपल्याच थाटात केवळ हसून त्यांचं स्वागत स्वीकारतात. आणि आत जातात. मागोमाग फुलचंद डबीर आणि हेजीब पेव्हरराव आत जातात. तोच व्हरांड्याच्या कोपर्‍यावरून रामझान मकदुम, गजमल तिर्की, शिकस्त सिद्दीक आणि नरुल इकमालला खुणावतात. इकमाल घाईने कोपर्‍यावर जातो.)

इकमाल : (कपाळावर आठ्या आणत) क्या है अब? यहाँ किसलिए आये हो?
गजमल : (नाकावरला चष्मा सावरत) वो ऐसा है ना? के आप भूल जाते हो! आप हमारी सेना के सिपाह सालार हो। इसबार लड़ाई के लिए जाने से पहले पूरी सेना के लिए…
इकमाल : (त्रासिक चेहर्‍याने) मराठी बोला रे! मी मजहब बदललाय, भाषा नाही! या ठिकाणी आधीच रोज उर्दू, आंग्ल भाषा बोलून जिभेचे तुकडे पडायची वेळ झालीय. बरं अजून चहापन्हासारखा माझा टेलिप्रॉम्प्टर भर सभेत बंद पडला नाही ते! (भाषणाच्या आवेशात) आणि म्हणोन आपण मराठी जपली पाहिजे…!
शिकस्त : (वडिलांना मध्येच थांबवत) अब्बू, ये कोई रैली नहीं है। हम यहाँ कोने में खड़े हैं।
इकमाल : (भानावर येत) बोला काय विषय आहे?
नरुल : (अंगभूत लाचारीने पुढे होत) त्याचं काय आहे सुभेदार, आपण नव्या लढाईच्या तयारीला लागताय खरं! पण…
इकमाल : या ठिकाणी `पण’ आलाच पाहिजे का? आणि म्हणोन मला तुमचा राग येतो.
नरुल : राग तर रामझान मकदुम आणि गजमल तिर्की यांना आलाय.
इकमाल : (हसत) ती तर त्यांची खासियत आहे. त्यात काय नवीन?
नरुल : नाही आज नवीन आहे.
रामझान : नवीन जुडं काय चाललंय? हाऽऽऽ? आम्हाला आताच सांगा, नव्या मुडुखगिरीवर जाण्याआधी वजीर शामेनींना जिंकलेल्या मुडुखातील जास्तीची वतनं, जहागिर्‍या, देशमुख्या, चौथया वगैरे आपल्याला मिळतील याविषयी मागण्या तुम्ही आज आता करणार आहात का?
गजमल : आता करणार का म्हणजे? आताच करायला पाहिजे. लढायचं आपण तर हिस्सा आपल्याला मिळायलाच पाहिजे. त्यात तुम्ही आमचे धब्बेदाऽऽऽर…!
शिकस्त : (काहीसा निरागस रागाने) धब्बेदार काय म्हणता? अब्बू सुभेदार है।
रामझान : (शिकस्तच्या डोक्यावरून हात फिरवत) भाबडं बिचारं लेकरू! बाळा, तुला चड्डी सावरण्याआधी जी वतनं मिळालीत ती किमान टिकवण्यासाठी अमानतुल्ला यांच्यापुढं लढाईच्या आधी प्रस्ताव ठेवायला हवा की नको?
नरुल : (मान डोलवत) हुजूर, सरदार रामझान, सरदार गजमल सही फरमा रहे हैं। लढाईत माणसं आपली कामी येतील, पहिल्या फळीत आपण लढायचं. चहापन्हाचं तख्त शाबूत ठेवण्यासाठी आपण पीठ पिछे वार करायचे, गद्दारी करायची, मक्कारी करायची, नमक हरामी करायची. आणि लूट गट्टम करणार फुलचंदची माणसं! नाव होणार फुलचंदचं!
गजमल : अशाने पुढल्या वेळी सुभेदार फुलचंदलाच बनवतील, मग आपल्या ऐतिहासिक मक्कारीचं काय? ती विसरून जायची?
शिकस्त : (अतीव बालसुलभ निरागसतेने) अब्बू, अब्बू! वजीर ह्या लढाईनंतर खरंच तुमची सुभेदारी काढून घेतील? आणि माझ्या जहागिरीचं काय?
इकमाल : (शिकस्तला उचलून कडेवर घेत) नही बेटे! ऐसा कूच नही होगा। (नरुल, रामझान आणि गजमलकडे काहीशा रागाने बघत) केवढं घाबरवता हो तुम्ही लेकराला? असं कुणी आमच्या जहागिर्‍या छिनणार आहे का? चहापन्हा नौरंगजेब मला म्हणालेले, `आपका काम बहुत अच्छा है’ म्हणून. त्यांनी सांगितलंय, जे होईल ते सर्वांच्या विचाराने आणि आपला सन्मान ठेऊन केलं जाईल…
रामझान : (तावातावाने) सन्मान सन्मान काय लावलंय तुम्ही? त्यांनी उद्या सन्मानाने पुढं करा म्हणले गाऽऽ…
इकमाल : (घाईने शिकस्तचे कान झाकत) किती शिवराळ, घाण भाषा वापरता हो? लहान मुलं असतात आजूबाजूला. किमान बघून तर बोला!
गजमल : (रामझानचं बोलणं सावरून घेत) ते गालाविषयी बोलत होते! ते असू द्या. पण तुम्ही लढाईनंतर आहे ती वतनं, जहागिर्‍या कायम राहतील, याविषयी बोलणार आहात का नाही?
इकमाल : (विषयाची गंभीरता ध्यानी येऊन) मैं पुछुंगा उनसे इस बारे में। वजीर साब से तो में ज्यादा से ज्यादा जहागिरी की सीटे हासिल करने के लिए मैं पुरजोर कोशिश करूंगा! (स्वत:वर खुश होत) या ठिकाणी मला चांगलं उर्दू जमलं, नाही? बघा, आता डबीरांपेक्षा मीच कसा इम्प्रेशन पाडतो ते? (शिकस्तला कडेवरून उतरवत) शिकस्त बेटा, इथेच थांब हं? मी आत जाऊन आधीच्या वतनापेक्षा मोठ्ठं काही घेऊन येतो हं? (बाकी तिघांकडे बघत) आणि तुम्हीही इथंच थांबा! मी आलोच.
(इकमाल घाईने कक्षात जातो, बाकीचे बाहेरून भिंतीला कान लावून उभे राहतात. आत एक मोठ्या मेजावर छान ढोकळा वुइथ मटण परोसलेला. वासावरून बरखा महालातील `अमन’ नावाच्या बोकड्याचं हे मटण असावं, हे इकमाल लगेच ओळखतो. मुठ्या आवळत केवळ `महिम’ म्हणत दात खात गप्प प्रवेशतो. मेजापुढल्या सोफ्यावर ढेरीचा रांजण सांभाळत वजीर अमानतुल्ला शामेनी `अमन’चं लेगपीस तोडतोय. मेजाच्या उजव्या पावक्याजवळ वासाने किळसावलेलं तोंड झाकून हेजीब पेव्हरराव बसलेला तर डाव्या पावक्याजवळ तोंडातली लाळ टिपत फुलचंद डबीर बसलेला. इकमाल वजीरांना कुर्निसात घालतो, आणि मेजापुढे मांडी घालून जमिनीवर बसतो. भिंतीवर चहापन्हा नौरंगजेबांची एक हसतमुख तसबीर लटकवलेली.)
अमानतुल्ला : (इकमालकडे बघत अमनचा लेगपिस तोडत) और क्या चल रहा है, तुम्हारे सुभे में?
इकमाल : (उगाच हसत) हमारे यहाँ तो सोंग चल रेला है।
अमानतुल्लाह : (किंचित शंकेने) मतलब?
इकमाल : मतलब सोंग! जैसे कि मैं कर रहा हूँ, सुभेदार होने का सोंग! वैसे ही कुछ!
अमानतुल्लाह : (गडगडाटी हसत) बहोत मजाकिया हो तुम। हमें पसंद आया! बोलो क्या मांगना है, तुम्हे?
इकमाल : (दाढीचा खुंट खाजवत) कूच नही। खाली कुछ जहागिर्‍या और…!
अमानतुल्ला : (फूलचंदकडे बघत) हमने जो लिस्ट बनाने के लिए बोला था, वो बनवाई या नहीं?
इकमाल : (शंकेने) कसली?
अमानतुल्लाह : (मिशीत गेलेली भाताची शीतं झटकत) जो कीमती चीजे हम हमारे साथ ले जाना भूल गये। उसकी हमें लिस्ट बनवानी हैं। ताकी ले जाने में सहजता आ सके।
इकमाल : (भाबड्या काळजीने) तुम जो चाहे लेके जाव। लेकिन डबीरने जैसे बोला था के तुम अगर कुछ ले के जाओगे तो उससे बड़ा कुछ दोगे…
फुलचंद : (बिर्याणीकडे गुंतलेली नजर न हलवता) देणार, देणार! आता इथं खूप सारी शितं उरतील ती तुमच्या वाड्यावस्त्यांत बेशक वाटा! काय?
इकमाल : शितं? त्यांचं काय करू?
हेजीब : (किंचित पुटपुटल्यागत) याठिकाणी कुणीतरी म्हटलेलंच आहे, असतील शितं तर जमतील भुतं, काय? त्यात तुमची भुतं फार उपाशी आहेत, बरोबर ना?
इकमाल : (हेजीबच्या कानात पुटपुटत) हेजीब, तुम्ही यांत न बोललेलंच बरं! आम्ही विषय मांडतोय, लढायांच्या मोर्चेबांधणी आधी मुलूखगिरी नंतरच्या `जागावाटपा’चा! म्हणजे माझ्या माणसांना जहागिर्‍या, वतनं किती मिळणार त्याबद्दल.
अमानतुल्लाह : (दोघांकडे शंकेने बघत) जो बोलना है, खुल के बोलो! क्या? यहाँ हरेक की बात का उचित समाधान दिया जायेगा।
इकमाल : (चाचरत) वोइच… वतनं कितनी मिलेगी?
अमानतुल्ला : (ढेकर देत) ये देख। तेरा अमन तो भोत स्वादिष्ट था। अगर कोई अमन हेजीब के पास भी हो, तो और अच्छा! मटण कित्ती भी मिले तो मुझे कोई ऐतराज नहीं।
इकमाल : (अजीजीने) शायद आपने गलत सुना हुजूर! मैं….!
(इकमाल पुढे काही बोलणार तोच बसल्या जागी झोपी गेलेल्या अमानतुल्लाच्या घोरण्याचा आवाज कक्षात घुमतो. पावक्याजवळ बसलेला हेजीब शांतपणे उठून खालमानेने बाहेर पडतो. अमानतुल्लाच्या समोरील बिर्याणीचं उष्टं ताट डबीर आत दुसर्‍या कक्षात घेऊन जातो आणि घाईने परत येतो.)
इकमाल : (डबीरकडे बघत) वजीर झोपी गेलेत वाटतं?
डबीर : (छद्मीपणे) मग तुम्हालाही अंथरुण टाकून हवंय?
इकमाल : नाही पण मुलूखगिरीवर जाण्याआधी काही गोष्टी क्लिअर झाल्या असत्या तर…
डबीर : चला, मी आहे की!
इकमाल : पण एकवेळ वजीरांनी स्वत: यात लक्ष दिलं असतं तर…?
डबीर : सुभेदार, खरकट्यावर जगणार्‍या माशीने विचारू नये, हे खरकटं तोंडावरचं आहे की ढुंगणावरचं? काय? त्यांना पोट भरण्याशी मतलब! आणि त्यातही त्यांनी चवीचे चोचले करूच नयेत! मिळेल ते, मिळेल तितकं खावं. उगाच तक्रार गुणगुणताना सत्तेसाठी दिल्या, घेतल्या जाणार्‍या टाळ्यांत सापडून जीव जायचा!
(इकमाल काही न बोलता खालमानेने निघून जातो, आणि रात्री मीडियात बातमी येते, चहापन्हा नौरंगजेबांच्या नेतृत्वाखाली सुभेदार सन्मानाने लढणार. तर चर्चेचा तपशील व्हिडिओतील सुभेदारांचा उतरलेला चेहरा तर हेजीब पेव्हरराव यांचा डोळ्यावरचा चष्मा सांगत जातो.)

Previous Post

पब : पवित्र तीर्थस्थळ

Next Post

जावे ‘निर्मात्या’च्या वंशा…

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025
भाष्य

टिंग टिंग भास्कर

May 22, 2025
भाष्य

चायवाला का डरला?

May 22, 2025
भाष्य

महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

May 22, 2025
Next Post
जावे ‘निर्मात्या’च्या वंशा…

जावे ‘निर्मात्या’च्या वंशा...

बाळासाहेबांचे फटकारे...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.