• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

चौसष्ट चौकडींचा चायनीज राजा!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 11, 2023
in फ्री हिट
0

१९९१पासून जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या अनेक बुद्धिबळपटूंनी मोहोर उमटवली आहे. डिंग लिरेनच्या निमित्ताने प्रथमच चीनमधील पुरुष बुद्धिबळपटूने हा पराक्रम दाखवला आहे. वेनझोऊमधून घडलेल्या या डिंगचे यश बुद्धिबळ क्षेत्रातील चीनच्या आगामी वर्चस्वाची नांदी ठरू शकते.
– – –

डिंग लिरेन हा नवा चौसष्ट चौकडींचा चायनीज राजा झाला. ही घटना तशी जगज्जेतेपदाची लढत संपली आणि विजेत्याने चषक उंचावला, इतकी साधी सरळ निश्चित नव्हती, तर ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारी. डिंग हा चीनचा पहिला जगज्जेता. गेल्या काही दशकांत जागतिक सत्तास्पर्धेपासून ते उत्पादनांपर्यंत आणि कलाक्षेत्रापासून ते क्रीडाक्षेत्रात चिनी ड्रॅगनचे वर्चस्व दिसून आलेले आहे. पण ही लाट बुद्धिबळातील जगज्जेतेपर्यंत उंचावली असे वरकरणी वाटत असेल तर, त्यात तथ्य नाही. १९९१पासून जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या अनेक बुद्धिबळपटूंनी मोहोर उमटवली आहे. त्यामुळे हे यश चीनच्या पुरुषांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते; पण एकंदर चीनसाठी हे नवलाचे मुळीच नाही.
बुद्धिबळातील जगज्जेतेपदाचा इतिहास वैभवशाली. १८८६पासून विश्वविजेतेपदाच्या प्रथेला प्रारंभ झाला. जोहानस झुकरटॉर्टला नमवून विल्हेम स्टेनिट्झ पहिला विश्वविजेता झाला. १८८६ ते १९४६ या कालखंडात विश्वविजेतेपदाची स्पर्धा इमानेइतबारे सुरू होती. १९४६मध्ये तत्कालीन विश्वविजेत्या अ‍ॅइलेक्झांडर अ‍ॅतलेखाइनच्या निधनामुळे ‘फिडे’ने या स्पर्धेचे संयोजन आपल्या हाती घेतले. त्यामुळे १९४८पासून जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला प्रारंभ झाला. दर तीन वर्षांनी ‘फिडे’ ही स्पर्धा घ्यायची. १९९३मध्ये विश्वविजेत्या गॅरी कास्पारोव्हने ‘फिडे’पासून फारकत घेतली. परिणामी १९९३ ते २००६ या कालखंडात व्यावसायिक बुद्धिबळ संघटना (पीसीए) आणि ‘फिडे’ या दोन संघटनांचे दोन विश्वविजेते ठरायचे. पण २००६मध्ये हा वाद संपुष्टात आल्याने ‘फिडे’च्या अधिपत्याखाली एकच जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येऊ लागली. या आधुनिक बुद्धिबळ क्षितिजावर पहिला ठसा अर्थात रशियाच्या व्लादिमिर क्रामनिकचा. नंतर २००७ ते २०१३ हा जागतिक वर्चस्वाचा कालखंड व्यापला भारताच्या विश्वनाथन आनंदने. २०१३मध्ये नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने आनंदला ‘चेकमेट’ करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले, ते या विश्वविजेतेपदाच्या लढतीपर्यंत म्हणजे एक दशक अबाधित होते. तसा जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अग्रस्थानावरील कार्लसनचा एकछत्री अंमल आणखी काही वर्षे सहज टिकला असता. परंतु ते त्याला मान्य नव्हते. म्हणूनच यंदाच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या लढतीमधून कार्लसनने माघार घेतली. परिणामी सध्याच्या जगज्जेत्याशी लढणारा आव्हानवीर ठरतो, त्या कँडिडेट्स लढतीमधील दोन अव्वल स्पर्धकांमध्ये विश्वविजेतेपदाची लढत होईल, हे ‘फिडे’ने निश्चित केले. त्यानुसार नियोजित १४ पारंपरिक डावांची लढत बरोबरीत सुटल्यानंतर कोंडी फोडण्यासाठी चार जलद डावांची ‘टायब्रेकर’ लढत झाली. यात डिंगने रशियाच्या इयान नेपोम्नियाशीला नामोहरम केले आणि १७वा जागतिक बुद्धिबळ विश्वविजेता म्हणून उदयास आला.

‘द सिटी ऑफ चेस’मधून घडला डिंग

डिंग हा चिनी जगज्जेता घडला, याचे प्रमुख कारण म्हणजे वेनझोऊ. १९९५मध्ये बुद्धिबळातील महान ग्रँडमास्टर व्हिक्टर कोर्चोई चीनमधील पहिली महिला जागतिक विजेती शि जून हिच्याविरुद्ध सामना खेळण्यासाठी जिथे आले होते तेच हे वेनझोऊ. पर्वतराजींमध्ये वसलेले हे एक बंदर. देशापासून तसे स्वतंत्र परगण्याप्रमाणेच सुटे. संस्कृती आणि भाषा हेसुद्धा त्यातील फरक मांडणारे आणखी दोन मुद्दे. पण बुद्धिबळामुळे वेनझोऊ हे चीनच्या नकाशावर गेली अनेक वर्षे ठळकपणे दिसते. म्हणूनच चीनने ‘द सिटी ऑफ चेस’ हा बहुमान या शहराला दिला आहे.
‘‘तुम्हाला निरोगी व्हायचे असेल तर इतरांना निरोगी बनवा. तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर इतरांना मोठे करा,’’ ही चीनमधील प्रसिद्ध तत्त्ववेत्ते कन्फ्युशियन यांची विचारसरणी. चिनी भाषेत लिरेन म्हणजे निरोगी बनवणे (इतरांना). म्हणून व्यवसायाने डॉक्टर वडील आणि परिचारिका आईने मुलाचे नाव लिरेन ठेवले. पण वयाच्या चौथ्या वर्षीपासूनच डिंगला बुद्धिबळाचा लळा लागला. त्याच्या पालकांनी त्याला याच शहरामधील बुद्धिबळ अकादमीत दाखल केले, तेव्हा बुद्धिबळाचे शहर म्हणून वेनझोऊवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नव्हते. कठीण गणिते सोडवण्याचा हातखंडा असणारा डिंग चौसष्ट चौकडींमध्ये लिलया रमला. २००१मधील दुसरे जागतिक महिला बुद्धिबळ अजिंक्यपद पटकावणार्‍या झू चेनचे प्रशिक्षक चेन लिशिंगचे मार्गदर्शन डिंगला वेनझोऊ चेस अकादमीत मिळाले. डिंगमधील गुणवत्ता हेरून त्याच्याकडे विशेष लक्ष पुरवले. तीच त्याच्या आजच्या यशासाठी प्रेरक ठरली.
डिंगच्या यशाला सुरुवात कनिष्ठ वयोगटापासूनच झाली. जागतिक १० आणि १२ वर्षांखालील वयोगटांच्या स्पर्धांमध्ये त्याने उपविजेतेपद पटकावले. पण या दोन्ही लढतीसुद्धा ‘टायब्रेकर’पर्यंत रंगल्या. त्यानंतर मात्र डिंगने वरिष्ठ गटांमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय अचूक ठरला. २००८मध्ये त्याने प्रथमच चायनीज अजिंक्यपद स्पर्धा जिंकली, तेव्हा तो फक्त १६ वर्षांचा होता. पुढच्याच वर्षी त्याने ग्रँडमास्टर किताब पटकावला. नंतर २०११, २०१२मध्ये त्याने राष्ट्रीय विजेतेपदाची पुनरावृत्ती केली. वेनझोऊमध्ये शिक्षणाच्या अभ्यासापेक्षा बुद्धिबळ खेळण्यातच त्याने अधिक धन्यता मानली. झेजियांग वेनझोऊ हाय स्कूलमधून पदवी पूर्ण केल्यावर वर्षभरातच बीजिंगच्या पर्किंग युनिव्हर्सिटी लॉ स्कूलच्या विधी शाखेत त्याला प्रवेश मिळाला.
२०१२मध्ये २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत डिंगला तिसरा क्रमांक मिळाला. अ‍ॅलेक्झांडर इपाटोव्ह आणि रिचर्ड रॅपर्ट यांच्यापासूनचे त्याचे अंतर फक्त अर्ध्या गुणाचे. २०११च्या विश्वचषक लढतीच्या पहिल्याच डावात वेस्ली सो याने त्याला पराभूत केले. पण पाच वर्षांनी एका मैत्रीपूर्ण लढतीत डिंगने वेस्लीचा २.५-१.५ असा पराभव करीत परतफेड केली. २०१५च्या विश्वचषकामधील डिंगची कामगिरी अधिक लक्षवेधी. त्याने पहिल्या डावात विजय संपादन केला, पण वेई यिविरुद्धच्या चौथ्या डावात तो पराभूत झाला. २०१५मध्ये एका प्रदर्शनीय सामन्यात डिंगने चक्क बोरिस गेल्फंडला हरवून खळबळ माजवली होती.
डिंगचा ऑलिम्पियाड आणि जागतिक अजिंक्यपद विजेत्या राष्ट्रीय संघातही समावेश होता. २०१४च्या ऑलिम्पियाडमध्ये डिंगने १० डावांपैकी ७.५ गुण कमावले आणि वैयक्तिक कांस्यपदक पटकावले. हंगेरी आणि पोलंडविरुद्धच्या विजयांमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची होती. २०१५च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत डिंग अपराजित राहिला. एव्हाना जागतिक बुद्धिबळातील अव्वल १० जणांमध्ये चीनच्या वांग युईच्या साथीने आता डिंगचीही गणना होऊ लागली. पण डिंग या शिखरावर पाय रोवून उभा राहिला. २०१७मध्ये डिंगने शेनझेन आणि मॉस्कोमधील ‘फिडे’ ग्रां प्रीचे टप्पे जिंकले. २०१७ आणि २०१९मध्ये त्याने विश्वचषकाचे उपविजेतेपदही मिळवले. त्यामुळे २०१८च्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणारा तो पहिला चायनीज बुद्धिबळपटू ठरला. या स्पर्धेत एक विजय आणि १३ बरोबरीच्या लढतींसह त्याने चौथे स्थान मिळवले. तो या स्पर्धेत अपराजित राहणारा एकमेव खेळाडू होता, हे आणखी एक वैशिष्ट्य. त्याची ही जगज्जेतेपदासाठी महत्त्वाची वारी सुरूच होती. सप्टेंबर २०१८मध्ये ‘फिडे’ जागतिक क्रमवारीत त्याने २८०० एलो गुणांचा टप्पा पार करीत सर्वांचे लक्ष वेधले, तर नोव्हेंबरमध्ये बुद्धिबळ इतिहासातील संयुक्तपणे १०व्या क्रमांकाचे सर्वोच्च गुण त्याच्या खात्यावर होते.
ऑगस्ट २०१९मध्ये सिन्क्वेफिल्ड चषक स्पर्धेत त्याने दोन विजय आणि नऊ डाव बरोबरीत सोडवले. या स्पर्धेत तत्कालीन विश्वविजेत्या कार्लसनला प्ले-ऑफमध्ये नमवण्याची त्याने किमया साधली. २००७नंतर कोणत्याही स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये कार्लसनला हरवणारा तो पहिला खेळाडू. २०१९च्या ग्रँड चेस टूर स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात डिंगसह कार्लसन, मॅक्झिमे वॅशिअर-लॅग्रेव्ह आणि लेव्हन अरोनियन अशा दिग्गजांची आव्हाने होती. पण डिंगने अरोनियनला उपांत्य फेरीत आणि वॅशिअर-लॅग्रेव्हला अंतिम फेरीत पराभूत करीत विजेतेपद पटकावले. सलग दुसर्‍या वर्षी विश्वचषक स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाल्यामुळे डिंग २०२०-२१च्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरला. यावेळी त्याने निराशा केली. २०२२च्या कँडिडेट्स स्पर्धेत डिंगला नेपोमनियाशीनंतर दुसरा क्रमांक मिळाला. पण यावेळी विश्वविजेतेपदावरील वर्चस्व ‘नकोसे’ झालेल्या कार्लसनच्या माघारीमुळे उपविजेत्या डिंगचे नशीब फळफळले. पारंपरिक बुद्धिबळ प्रकाराच्या जागतिक क्रमवारीत सध्या डिंग हा कार्लसन आणि नेपोमनियाशी यांच्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर आहे. जुलै २०१६मध्ये ‘ब्लिट्झ’ म्हणजेच अतिजलद प्रकारातील सर्वाधिक २८७५ गुण डिंगच्या खात्यावर होते.

चिनी महिलांची यशोगाथा

डिंगचा उदय गेल्या काही वर्षांतील असला तरी चिनी महिला बुद्धिबळपटूंची जागतिक मक्तेदारी नवी नाही. १९९१मध्ये चीनच्या शी जून हिने पहिल्यांदा महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याची किमया साधली. मग झू चेन, शू युहुआ, होऊ यिफान, टॅन झोंगयी आणि जून वेनजून अशा अनेक महिलांनी चीनची ही बुद्धिबळामधील यशोगाथा समृद्ध केली. २०१६पासून हे जेतेपद चीनच्याच वर्चस्वाखाली आहे. यंदा जागतिक महिला अजिंक्यपदाची लढत दोन चिनी स्पर्धकांमध्ये होणार आहे. विश्वविजेत्या जून वेनजूनला आव्हानवीर लेई टिंगजीचा सामना करावा लागेल. म्हणजे ही वर्चस्वगाथा कायम राहणार आहे. चीनच्या महिलांनी ऑलिम्पियाड स्पर्धाही चार वेळा जिंकली आहे.

चिनी वर्चस्वाची नांदी

१९८८मध्ये विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर झाला. मग २०००मध्ये मिळवलेल्या विश्वविजेतेनंतर जवळपास १३ वर्षे आनंदची जागतिक बुद्धिबळ क्षेत्रावर सत्ता होती. त्याच्या यशाने प्रेरित झाल्यामुळे देशात बुद्धिबळाची लाट आली. आजमितीस ग्रँडमास्टर किताब प्राप्त करणार्‍या भारतीय बुद्धिबळपटूंची संख्या ८१ आहे. डिंगचे यश ही चिनी वर्चस्वाची नांदी ठरू शकते आणि पुढील काही वर्षांत असंख्य चायनीज पुरुष बुद्धिबळपटूही जागतिक क्षितिजावर तेजाने तळपतील, अशी आशा आहे.

[email protected]

Previous Post

मराठवाड्यात दरारा वाढला!

Next Post

अजूनही आहे स्मिताचं अस्तित्व!

Related Posts

फ्री हिट

एशियाडमध्ये छोटे शेर… ऑलिम्पिकमध्ये ढेर…

September 21, 2023
फ्री हिट

प्रो-गोविंदाचे स्वागत, पण…

September 9, 2023
फ्री हिट

संकेत सरगर शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित

August 31, 2023
फ्री हिट

आनंदचा प्रज्ञावान वारसदार

August 31, 2023
Next Post
अजूनही आहे स्मिताचं अस्तित्व!

अजूनही आहे स्मिताचं अस्तित्व!

आता ब्रेकअपचं कर‘नाटक'

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1
शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023

किरीटाचे झिंगाट!

September 22, 2023

राशीभविष्य

September 22, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.