• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

मराठवाड्यात दरारा वाढला!

- योगेंद्र ठाकूर (गाथा शिवसेनेची)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 11, 2023
in गर्जा महाराष्ट्र
0

इंग्रजांच्या ताब्यातून हिंदुस्थान १५ ऑगस्टला मुक्त झाला. परंतु हैद्राबाद संस्थानातील जनता पारतंत्र्यातच होती. इंग्रज हिंदुस्थानातून जाताच निझाम संस्थानाने आपले स्वातंत्र्य जाहीर केले. निझाम संस्थानाची स्वतःची सेना, रेल्वे, बससेवा होती. निझामने स्वतःला स्वतंत्र म्हणून जाहीर केल्याचा परिणाम म्हणजे हिंदुस्थानच्या अशोकचक्रातील तिरंगा झेंडा संस्थानाच्या हद्दीत परकीय झेंडा ठरत होता. तो फडकविण्यास बंदी घालण्यात आली. संस्थानातील प्रजेने हे मान्य केले नाही. सत्याग्रहही केला आणि तिरंगा फडकवणे हा निझामविरुद्ध लढ्याचा एक भाग ठरला.
देश स्वतंत्र झाला होता. परंतु निझामशाहीच्या पारतंत्र्यात मराठवाडाही होता. निजामशाहीविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध लढा आदी सुरूच होता. आता तो अधिक तीव्र झाला. या लढ्यात अनेकांनी बलिदान दिले. १३ सप्टेंबर १९४८ रोजी चारी दिशांनी भारतीय सैन्य हैद्राबाद संस्थानावर चालून गेले आणि अवघ्या चार दिवसांत ते हैद्राबादला पोहोचले. १७ सप्टेंबर रोजी निजामचे सरसेनापती जनरल अँड्युस यांनी शरणागती पत्करली आणि सात पिढ्यांची निजामशाही समाप्त झाली.
१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली. १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून आनंदाने साजरा केला जातो. मराठवाड्यातील जनता मुक्त झाली. पण मराठवाड्यातील मुस्लिमांची अरेरावी संपली नव्हती. काँग्रेसच्या अल्पसंख्यांकधार्जिण्या भूमिकेमुळे व लांगूलचालनामुळे त्यांना बळच मिळत होते. याचा त्रास मराठवाड्यातील हिंदूंना सोसावा लागत होता. स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यात हिंदू-मुस्लिम दंगलीही झाल्या. चारीबाजूने हिंदूंवर अत्याचार सुरू होता. तेव्हा हिंदूंची भक्कमपणे बाजू घेणारा पक्ष नव्हता. स्वतःच्या हिंदूंचे रक्षक समजणारे मुकाबला करू शकत नव्हते.
निजामशाहीच्या जुलमी अत्याचाराविरुद्ध लढून, निजामाचे जोखड झुगारून मराठवाडा मुक्त केला होता. परंतु निजामशाहीच्या देशात अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करणार्‍या काँग्रेसने मराठवाड्यातील हिंदूंच्या भावना कधी जाणून घेतल्या नाहीत. तेव्हा हिंदूंच्या रक्षणासाठी शिवसेना लढते आहे, असे आश्वासक चित्र हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ८०च्या उत्तरार्धात मराठवाड्यात निर्माण केले. हिंदूंना हिंदुरक्षक मिळाला आणि मग सकल हिंदू समाज आपल्या मागण्यांसाठी शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्रित होऊ लागला, संघटित झाला. मग ९०च्या दशकात सुरुवातीपासूनच मराठवाड्यात शिवसेनेचा दरारा वाढला, वर्चस्व वाढले.
८०च्या सुरुवातीस नुकतीच मराठवाड्यात दंगल झाली होती. मराठवाडा महाराष्ट्रात आला तरी निजामशाहीत रमलेले काही धर्मांध लोकांचे अधूनमधून जातीय दंगल घडवून संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात दहशत माजवण्याचे, अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरूच होते. हिंदूंना कुणी वाली नव्हता. जे काही हिंदुत्ववादी पक्ष होते, त्यांचा प्रतिकार तोकडा पडत होता. त्याच काळात मुंबई-ठाण्यात सेनेचे वर्चस्व वाढतच होते. अन्यायाविरुद्ध लढणारी लढावू संघटना म्हणून शिवसेनेचा नावलौकिक झाला होता. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेलाही आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी, हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी शिवसेनेची गरज भासू लागली.
त्यावेळी संभाजीनगरमध्ये काही शिवसैनिक कार्यरत होते. परंतु संघटनात्मक बांधणी म्हणावी तशी झाली नव्हती आणि संघटनात्मक पदही कुणाकडे नव्हते. मुंबईप्रमाणे शिवसेनेची शाखा-कार्यालये असावीत असे वाटत होते. त्यासाठी मुंबईत शिवसेनाप्रमुख आणि सेनानेत्यांच्या गाठी-भेटी होत होत्या. संभाजीनगरमध्ये शिवसेनेची अधिकृत शाखा सुरू करावी असे आम्ही शिवसैनिक मागणी करीत होतो. त्यामुळे शिवसेनेच्या अधिकृत शाखेची स्थापना १९८५ साली झाली. शिवसेना नेते मधुकर सरपोतदार, मनोहर जोशी, साबीर शेख आदी नेत्यांच्या उपस्थितीत एकनाथ मंदिरमध्ये अधिकृपणे शिवसेना स्थापन झाली. जिल्हाप्रमुखपदी सुभाष पाटील, तर चंद्रकांत खैरे यांची उपशहरप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. मराठवाड्यातील शिवसेनेच्या सामाजिक व राजकीय चळवळीस अधिकृतपणे प्रारंभ झाला.
१९८६ साली शहाबानो प्रकरण घडले. समान नागरी कायदा या हक्कासाठी संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा पहिला मोर्चा निघाला. शहरातील धर्मांध लोकांना हे रुचले नाही. त्यांनी मोर्चाला प्रतिकार केला. त्याचे पर्यवसान दंगलीत झाले. समान नागरी कायदा लागू करावा, हे शिवसेनेचे निवेदन कलेक्टरांना देण्यासाठी १५० रिक्षांसह हा शिवसेनेचा मोर्चा निघाला होता. त्याचवेळी दंगल उसळल्याची बातमी आकाशवाणीवरून प्रसारित झाली. शहाबानो प्रकरण, समान नागरी कायद्यासाठी काढलेल्या मोर्चामुळे दंगल उसळल्याचा आरोप शिवसेनेवर करण्यात आला होता. त्यामुळे संभाजीनगरमधील शिवसेना प्रकाशझोतात आली. या मोर्चाचे नेतृत्व चंद्रकांत खैरे, सुभाष पाटील, राधाकृष्ण गायकवाड, बावस्कर आदी करीत होते. तेव्हा खैरे यांना अटक झाली. प्रथम २४ तास लॉकपमध्ये, नंतर अरसूल कारागृहात ५ दिवसांची कोठडी मिळाली. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लढताना जेलमध्ये जाणारे मराठवाड्यातील पहिले शिवसैनिक म्हणजे चंद्रकांत खैरे होत.
दरम्यान, संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. एप्रिल १९८८ मध्ये झालेली ही निवडणूक शिवसेना प्रथमच लढली. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यावर निवडणूक प्रचार सांभाळण्याची जबाबदारी सोपवली. त्यांच्याबरोबर लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांची फौज घेऊन शिवसेना नेते सुधीर जोशी आणि गजानन कीर्तिकर हे सज्ज होते. संभाजीनगरमध्ये शिवसेनाप्रमुखांच्या प्रचंड प्रचारसभा झाल्या. हिंदुत्वाच्या विचाराने संभाजीनगरमध्ये वातावरण ढवळून निघाले. निवडणुकीच्या दिवशी दंगल झाली. निकाल जाहीर झाला. शिवसेनेने ६० पैकी २७ जागा जिंकून घवघवीत यश संपादन केले.
संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात शिवसेनेच्या सभा झाल्या. शिवसेना या निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरली होती. शिवसेनेची शिस्तबद्ध प्रचारसभा व्हायची. स्थानिक शिवसैनिकांना बरोबर घेऊन लोकाधिकार महासंघाचे कार्यकर्ते आणि मुंबईचे नगरसेवक पदाधिकारी शिवसेनेचा दारोदारी प्रचार करीत होते. शिवसेनेची गरज का आहे हे समजावत होते. शिवसेनेचे हिंदुत्वाचे विचार घरोघरी पोहचवत होते. मधुकर सरपोतदार हे संभाजीनगरचे संपर्कनेते होते. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे तोफ, कमांडर दत्ताजी साळवी, छगन भुजबळ, मनोहर जोशी, वामनराव महाडिक, दत्ताजी नलावडे आदी नेते प्रचाराची धुरा सांभाळत होते. २०-२५ दिवसात शिवसेनेने संभाजीनगरमध्ये भगवे वादळ निर्माण केले.
शिवसेनेची निवडणूक प्रचार यंत्रणा, शिवसेना नेत्यांची आक्रमक भाषणे कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मतदारांच्या गाठीभेटीमुळे संभाजीनगर ढवळून निघाले होते. बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात प्रचंड सभा झाली. तिने वातावरण बदलले आणि शिवसेनेच्या बाजूने संभाजीनगरवासीयांचा कौल दिसू लागला. शिवसेनेचा महापौर बसणार होता, पण कुठेतरी माशी शिंकली. रिपाईंचे प्रकाश आंबेडकर आणि मुस्लीम लीगच्या नगरसेवकांनी काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवाराच्या पारड्यात मते टाकली. काँग्रेसचा महापौर निवडून आला. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती. त्याचा फायदा काँग्रेसला झाला.
संभाजीनगरच्या शिवसेनेच्या विजयी सभेत औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची घोषणा शिवसेनाप्रमुखांनी केली. तेव्हा संभाजीनगरातील जनतेने उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या गजरात या घोषणेचे स्वागत केले. औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ हे नामांतर सर्वप्रथम शिवसेनाप्रमुखांनी केले.
शिवसेनेची सत्ता हुकली, पण शिवसेनेचे कार्य संभाजीनगरमध्ये जोमाने सुरू झाले. गेली २० वर्षे संभाजीनगर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकतो आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संभाजीनगरवर विशेष प्रेम होते. संभाजीनगरमधील घवघवीत यशामुळे शिवसेनेचा मराठवाड्यात दरारा वाढला. ठाणे, मुंबईनंतर संभाजीनगरासह मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला.

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

चौसष्ट चौकडींचा चायनीज राजा!

Related Posts

उद्धव ठाकरे यांचीच कामगिरी सरस
गर्जा महाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांचीच कामगिरी सरस

September 21, 2023
गर्जा महाराष्ट्र

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!

September 21, 2023
गर्जा महाराष्ट्र

तुम्ही माझे, मी तुमचा! – शिवसेनाप्रमुख

September 15, 2023
सामान्याचा असामान्य लढा
गर्जा महाराष्ट्र

सामान्याचा असामान्य लढा

September 14, 2023
Next Post

चौसष्ट चौकडींचा चायनीज राजा!

अजूनही आहे स्मिताचं अस्तित्व!

अजूनही आहे स्मिताचं अस्तित्व!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1
शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023

किरीटाचे झिंगाट!

September 22, 2023

राशीभविष्य

September 22, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.