अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, बुध-रवी मिथुनेत, शुक्र कर्केत, केतू वृश्चिकेत, शनि-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरू-नेपच्यून (वक्री) कुंभेत, हर्षल मेषेत, चंद्र आठवड्याच्या सुरवातीस वृषभेत त्यानंतर मिथुन, कर्क, सिंह आणि कन्येत.
मेष – आठवड्याची सुरुवात अमावस्येने होत आहे. गेल्या आठवड्याची शुक्लकाष्ठे झटकून नव्या जोमाने काम कराल. वीकेंडला मौजमस्ती कराल, त्यामुळे आनंदात राहाल. कौटुंबिक सौख्य मिळेल. कामानिमित जवळचा प्रवास संभवतो. नव्या संकल्पना सुचतील. आर्थिक आवक समाधानकारक राहील. अपेक्षांची पूर्तता झाल्याने आठवडा खुशीत जाईल.
वृषभ – कमी श्रमात अधिक लाभ मिळण्याचे योग या आठवड्यात जमून येत आहेत. संगीत, कला क्षेत्रात असाल तर एखादा लक्षात राहण्यासारखा अनुभव येईल. शुक्र-चंद्र-मंगळ यांच्या युतीमुळे चांगल्या घटना घडतील. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रेम प्रकरण सुरू असेल तर हमखास यश मिळेल. आर्थिक बाजू भक्कम राहील.
मिथुन – घरातील वातावरण आनंदी राहील, त्यामुळे मिष्टान्नाचा आणि मेजवानीचा योग जमून येत आहे. शेअर बाजारातून चांगला लाभ मिळू शकतो. लग्नेश बुधाचा गुरू आणि नेपच्यूनबरोबर होणारा नवपंचम योग हा अमृतसिद्धीचा अनुभव देईल. या आठवड्यात वेगवेगळ्या माध्यमांतून खास लाभ मिळू शकतात.
कर्क – आठवड्याच्या सुरुवातीला पैसे खर्च होतील. ११ आणि १२ तारीख मस्त अनुभव देणारी. अनोळखी व्यक्तीच्या प्रेमाला चुकूनही प्रतिसाद देऊ नका, चांगलेच फसाल. पैशाचे व्यवहार करताना जरा जपून. पासवर्ड शेअर करताना काळजी घ्या. जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे जरा जपूनच राहा. प्रेम प्रकरणात चुका होतील.
सिंह – येत्या आठवड्यात आर्थिक आवक चांगली राहील,त्यामुळे मनावरील दडपण दूर होईल. वीकेंड साजरा करण्याचा मूड राहील. गुरू-नेपच्यूनबरोबरच रवी-बुध नवपंचम योगामुळे घबाडप्राप्तीचा योग जमून येत आहे. एखादी लॉटरी काढा, भाग्य चमकू शकते. महिलावर्गाने तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा दवाखान्याची पायरी चढावी लागू शकते.
कन्या – उद्योग-व्यवसायाची घडी पूर्वपदावर येईल. अनेक दिवसांपासून एखादे सरकारी काम अडकून पडले असेल तर ते मोकळे होईल. १५ आणि १६ तारखांना महत्वाच्या फाइल्सवर सह्या होतील. एखादी जुनी गुंतवणूक असेल तर तिच्यातून चांगला लाभ मिळू शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. एखादी छोटी शस्त्रक्रिया होऊ शकते.
तूळ – तुमची रसिकता वाढीस लागेल. येत्या आठवड्यात चांगले अनुभव येतील. सुखस्थानात बसलेला वक्री शनी आणि प्लूटो यांच्यामुळे काही अडचणी येतील. परदेशप्रवासाचे योग जमून येत आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळेल.
वृश्चिक – कोणत्या ना कोणत्या कारणामुळे एखादी चिंता वाढू शकते. मात्र, ११ आणि १२ तारखेला होणार्या चंद्रभ्रमणामुळे मानसिक समाधान मिळू शकते. आठवड्याच्या अखेरीस विशेष लाभ मिळू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
धनू – कुटुंबातील भावंडांकडून सुखद अनुभव येईल. अनेक दिवसांपासून सुरू असणारे वादविवाद मिटतील. एखादे धार्मिक कार्य घडून येईल. मनात निश्चित केलेला संकल्प सिद्ध होतील. रवि-बुध-गुरू नवपंचम योगामुळे कौटुंबिक स्वास्थ मिळेल.
मकर – तुमच्या राशीचा साडेसातीचा काळ सुरू आहे, त्यामुळे घरात कुरबुरीचे प्रसंग घडू शकतात. नोकरी, व्यवसायात काम करत असताना तडजोड करावी लागेल. आर्थिक आवक चांगली राहील. त्याने जरा या वाईट काळात दिलासा मिळेल.
कुंभ – शुभघटनांचा काळ. मात्र, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, एखादी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सावध राहा. आर्थिक व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्या, नाहीतर गोत्यात याल. एखाद्या नवीन वस्तूची खरेदी होऊ शकते.
मीन – आर्थिक आवक सुधारेल. कौटुंबिक सौख्य मिळेल आणि संततीबाबत एखादी शुभवार्ता कानावर पडेल. परदेशात काही करण्याचे नियोजन करत असाल तर त्यादृष्टीने सकारात्मक पाऊल पडेल. संमिश्र घटनांचा अनुभव येईल.