• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कोलकाताच्या विजयगाथेचे शिलेदार!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 3, 2024
in खेळियाड
0

कोलकाता नाइट रायडर्सनं सनरायजर्स हैदराबादवर आरामात विजय मिळवून ‘आयपीएल’ चषक तिसर्‍यांदा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. कोलकाताच्या विजयगाथेचे अनेक शिलेदार आहेत. हे यश कुण्या एकाचं मुळीच नव्हे, असं कर्णधार श्रेयस अय्यरही म्हणतो. मार्गदर्शक, कर्णधार आणि खेळाडू या त्रिसूत्रीनं मिळवलेल्या यशातील शिलेदारांच्या कामगिरीचं केलेलं विश्लेषण.
– – –

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १७व्या हंगामाच्या प्रारंभी डेव्हिड विज आणि एन. जगदीशन यांच्या सनसनाटी विधानांमुळे अख्खं क्रिकेटजगत ढवळून निघालं होतं. कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या लष्करी शिस्तीच्या विरोधात त्या संघातील या खेळाडूंनी आवाज उठवला होता. पण जसजसं केकेआरला यश मिळत गेलं, तसतसे हे तरंग कुठल्या कुठे गायब झाले. रविवारी कोलकातानं तिसर्‍यांदा ‘आयपीएल’ जेतेपदाला गवसणी घातली. यशाचे अनेक शिल्पकार असतात, पण अपयशाचं खापर कुण्या एकावरच फोडलं जातं. कल्पना करूया की यंदा कोलकाताचा संघ अपयशी ठरला असता, तर जबाबदार अर्थात पंडित यांना धरलं गेलं असतं आणि पुढील वर्षी ते संघासमवेत नसते. त्यामुळेच या यशाचं श्रेय देताना पंडित यांचं नाव अग्रणी हवं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या मार्गदर्शनाचा ठसा उमटवणार्‍या पंडित यांचं सूत्र आता ‘आयपीएल’च्या व्यासपीठावरही यशस्वी झालंय.
कोलकाताला तब्बल एका दशकाच्या प्रतीक्षेनंतर तिसर्‍यांदा जेतेपद मिळालं. गतवर्षी हा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर फेकला गेला होता, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नेतृत्वाचा अभाव. कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकला. परिणामी नितीश राणाकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. पण ती फलदायी ठरली नाही. यंदा श्रेयस परतला आणि कोलकाता एक्स्प्रेस रुळांवर वेगानं दौडू लागली. कुशल नेतृत्व आणि चौथ्या क्रमांकाची आश्वासक फलंदाजी या बळावर श्रेयसनं संघाला यशाचा मार्ग दाखवला. त्यानं ३९ धावांच्या सरासरीनं ३५१ धावा केल्या. दुखापतीचा ससेमिरा, ‘बीसीसीआय’च्या नियमाचं अनवधानानं उल्लंघन झाल्यामुळे वार्षिक करारबद्ध खेळाडूंमध्ये स्थान नसणं, कसोटी संघातलं स्थान गमावणं असे अनेक कटू प्रसंग ‘आयपीएल’आधी श्रेयसच्या कारकीर्दीत आले. पण तो खचला नाही, तर राखेतून भरारी घेणार्‍या फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यानं स्वत:ला सिद्ध केलं. भारताचा कर्णधार रोहित शर्माची कारकीर्द अस्ताकडे वाटचाल करीत आहे, तर अष्टपैलू हार्दिक पंड्याची कारकीर्द तळ्यात-मळ्यात आहे. या परिस्थितीत श्रेयस हा कर्णधारपदासाठीचा उत्तम पर्याय म्हणून नावारूपास येतोय, हे शुभसंकेत आहेत.
प्रशिक्षक पंडित आणि कर्णधार श्रेयस या दोन्ही मुंबईकरांना कोलकाताच्या यशात महत्त्वाचं श्रेय जातं. यात तिसर्‍या मुंबईकराचं नाव घेतलं जातं, ते म्हणजे फलंदाजीचे प्रशिक्षक अभिषेक नायर. प्रेरणादायी वृत्तीच्या नायरचं योगदान अनेक खेळाडू मान्य करतात. पण या सर्वांपेक्षा भाव खाऊन गेला तो गौतम गंभीर. गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकातानं २०१२ आणि २०१४ असं दोनदा विजेतेपद पटकावलं होतं. तोच गंभीर यंदा कोलकाताच्या संघाचा प्रेरक (मेंटॉर) म्हणून परतला. त्याचं संघासमवेत असणं, हे नक्कीच अनुकूल ठरलं. पण या भाजपनेत्याला माध्यमांकडून कोलकाताच्या यशाचा एकमेव शिल्पकार अशा रीतीनंच दाखवलं जातंय. यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून गंभीरला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं. परंतु राहुल द्रविडनंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याची वर्णी लावता येऊ शकते, म्हणून वातावरणनिर्मिती मात्र जोरदार सुरू आहे.
मागील दोन हंगामांचं अपयश आणि यंदाचं यश यातील फरकांचं विश्लेषण केल्यास अनेक मुद्दे समोर येतात. यापैकी सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे सलामीवीर. २०२२ आणि २०२३ या दोन हंगामांमध्ये कोलकातानं सात स्वतंत्र सलामीच्या जोड्या हाताळल्या. पण यंदा पहिल्या १२ सामन्यांत सुनील नारायण आणि फिल सॉल्ट यांनी कोलकाताच्या डावाला प्रारंभ केला, जो अत्यंत यशस्वी ठरला. सॉल्ट इंग्लंडकडून खेळण्यासाठी माघारी परतल्यानंतर सलामीला रहमनुल्ला गुरबाजला पाठवण्यात आलं. नारायणनं तीन अर्धशतकं आणि एका शतकाच्या साहाय्यानं कोलकाताकडून सर्वाधिक ४८८ धावा काढल्या. त्याची ३४.८६ची धाव सरासरी आणि १८०.७४चा स्ट्राइक रेट बरंच काही बोलून जातो. कोलकाताच्या फलंदाजांच्या यादीत दुसरं स्थान पटकावतो, तो चार अर्धशतकांसह ४३५ धावा (स्ट्राइक रेट – १८२.००) काढणारा सॉल्ट. कोलकातानं सॉल्टला लिलावात मुळीच खरेदी केलं नव्हतं, किंबहुना त्याला कुणीच खरेदीदार संघ मिळाला नव्हता. पण वैयक्तिक कारणास्तव जेसन रॉयनं ‘आयपीएल’मधून माघार घेतली आणि त्याच्या जागी मिळालेल्या संधीचं सॉल्टनं सोनं केलं.
नारायण आणि आंद्रे रसेल या दोन वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूंची भूमिका कोलकाताच्या जेतेपदात अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळे प्रभावी खेळाडूच्या (इम्पॅक्ट प्लेअर) नियमानिशी कोलकाताकडे आठ फलंदाज आणि सहा गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध असायचे. नारायणनं आपल्या जादुई फिरकीच्या बळावर १७ बळीसुद्धा मिळवले आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. रसेलनं मधल्या फळीत फिनिशरची भूमिका बजावताना २२२ धावा केल्या आणि मध्यमगती गोलंदाजीसह १९ बळी मिळवले. नारायण आणि रसेल या दोघांचंही वय ३६ वर्षं, म्हणजेच कारकीर्द अस्ताकडे चाललेली. वेस्ट इंडिजकडून ते अखेरचे खेळले, त्या घटनेलाही आता पाच वर्षं उलटलीत. पण नारायण आणि रसेल यांच्या आक्रमक वृत्तीतून निवृत्ती दूरदूरपर्यंत कुठेच दिसली नाही. इतकंच नव्हे, तर सध्या धडपडणार्‍या कॅरेबियन संघात ते का नाहीत, याची चर्चाही समाजमाध्यमांवर रंगलीय.
सलामीवीर माघारी परतले, तरी कोलकाताच्या फलंदाजीचा भार सांभाळत अय्यर जोडगोळीनं समर्थपण किल्ला लढवल्याचं पाहायला मिळालं. वेंकटेश अय्यरनं चार अर्धशतकांनिशी तिसर्‍या क्रमांकाच्या ३७० धावा (स्ट्राइक रेट १५८.७९) काढल्या. वेंकटेश गेली दोन वर्षं भारतीय संघापासून दूर आहे. मात्र आपल्या सातत्यपूर्ण खेळाच्या बळावर तो पुनरागमनासाठी भक्कम दावेदारी करतोय.
कोलकाताकडून सर्वाधिक २१ बळी (इकॉनॉमी – ८.०४) मिळवले, ते फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीनं. सुरुवातीच्या हंगामात फारसा प्रभाव न दाखवू शकलेल्या वरुणनं नंतर मात्र आपली किमया दाखवून दिली. संघ व्यवस्थापनानं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणानं १९ बळी मिळवत दुसर्‍या क्रमांकासह उपयुक्तता सिद्ध केली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हे कोलकाताच्या गोलंदाजीच्या मार्‍याचं हुकमी अस्त्र. अंतिम सामन्यात धोकादायक अभिषेक शर्माचा त्यानं उडवलेला त्रिफळा स्टार्कच्या दर्जाची प्रचिती घडवणारा. स्टार्कनं १७ बळी मिळवत प्रतिस्पर्धी संघांची दाणादाण उडवली. हिमाचल प्रदेशच्या वैभव अरोरानंही ११ बळी मिळवून लक्षवेधी कामगिरी केली आहे.
कोलकाताकडून आंगरिश रघुवंशी आणि रमणदीप सिंग यांनीही चांगली कामगिरी केली. पण मागील हंगाम गाजवणारा आणि यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात स्थान मिळवू न शकलेल्या रिंकू सिंहला आपला प्रभाव दाखवता आला नाही. रिंकूने ११ डावांमध्ये १८.६७च्या सरासरीनं फक्त १६८ धावा काढल्या. २६ ही त्याची यंदाच्या हंगामातली सर्वोच्च धावसंख्या ठरली. १४८.६७ हा स्ट्राइक रेटही रिंकूच्या लौकिकाला साजेसा नव्हता. त्यामुळे कोलकाताच्या जेतेपदाच्या शिलेदारांमध्ये रिंकूचं योगदान अधोरेखित होत नाही.
कोलकाता जेतेपदावर नाव कोरत असताना ‘आयपीएल’च्या १७व्या हंगामात अनेक विक्रम मोडीत निघाले. ‘आयपीएल’मधील सर्वाधिक १० धावसंख्यांपैकी आठ धावसंख्या यंदाच्या हंगामात नोंदल्या गेल्या, त्यापैकी पाच कोलकाता आणि हैदराबाद या संघांनी नोंदवल्यात. सर्वाधिक १४ शतकं, सर्वाधिक २५०± धावसंख्या, एका हंगामात-सामन्यात-डावात सर्वाधिक षटकार, पॉवरप्लेमध्ये विक्रमी धावसंख्या, १० षटकांमध्ये सर्वाधिक धावसंख्या, इत्यादी अनेक विक्रमांची वासलात लागली. त्यामुळे हा विक्रमांचा विश्वचषक होता, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकनं कारकीर्दीला अलविदा केला, पण महेंद्रसिंह धोनी चाहत्यांच्या प्रेमाखातर अजूनही तळपतोय.

[email protected]

Previous Post

प्रसिद्धी-पैसा-प्रसिद्धी-पैसा…

Next Post

बहारदार ठेक्याचे सम्राट

Related Posts

खेळियाड

युद्धाचा खेळ, खेळांतले युद्ध!

May 15, 2025
खेळियाड

बिहारी बालकाचं वैभव टिकेल का?

May 8, 2025
खेळियाड

चंपक आहे साक्षीला…

May 5, 2025
खेळियाड

चला दोस्तहो, बॅटसंदर्भात बोलू काही…

April 25, 2025
Next Post

बहारदार ठेक्याचे सम्राट

बाप-लेकीची हृदयस्पर्शी गोष्ट!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.