• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशी भविष्य (१६ ते २२ मे २०२६)

भास्कर आचार्य

marmik by marmik
May 16, 2026
in इतर, भविष्यवाणी
0
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

ग्रहस्थिती : मंगळ -मेष राशीमध्ये,गुरु-शुक्र-मिथुन राशीमध्ये,प्लूटो-मकर राशीत, राहू-कुंभेत, शनि-नेपच्युन मीनेत,रवि-बुध-हर्षल वृषभ राशीत, केतू सिंहेत.दिनविशेष :१६ मे दर्श भावुका अमावस्या, शनैश्वर जयंती,१९ मे श्री विनायक चतुर्थी
(अंगारक योग), २१ मे गुरुपुष्यामृत योग

मेष : कर्तव्यात कसूर करू नका. व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. नोकरीत्ी आत्मविश्वास वाढेल. तरुणांना वाढीव कष्ट करावे लागतील. कौटुंबिक प्रश्न चर्चेतून सोडवा. राग व्यक्त करू नका, नम्रता ठेवा. गुरुवर्यांचे मार्गदर्शन कामी येईल. आर्थिक नियोजनात गडबड होऊ शकते. आठवड्याअखेरीस चैन, मौजमजेवर पैसे खर्च होतील. नवीन संधी आर्थिक बाजू बळकट करतील. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. संततीकडून उत्साहवर्धक बातमी कळेल. मोठा निर्णय घेण्याआधी ज्येष्ठांचा सल्ला घ्या. नोकरीत बदल स्वीकारावे लागतील. खेळाडू, कलाकारांना यशदायक काळ.

वृषभ : घरात आनंदवर्धक बातमी कळेल. मुलांच्या वागण्याबोलण्याकडे लक्ष द्या. बँकेच्या कामांत घाई करू नका. नोकरीत वरिष्ठ कामावर खूष राहतील. व्यवसायात यश मिळेल. मुलांना, तरुणांना यश मिळेल. काही गोष्टी सोडून द्या. जुन्या आजारांवर वेळीच उपचार करा. आठवड्याअखेर कामगारांशी वाद टाळा, कामाला विलंब होऊ शकतो. सकारात्मक विचार करा. नोकरीची संधी चालून येईल. शिक्षणक्षेत्रात, संगीतक्षेत्रात चांगला काळ. नोकरीत आनंददायक बातमी कळेल. जुने मित्र भेटतील.

मिथुन : दडपण घेऊन, शॉर्टकट घेऊन काम करू नका. नोकरीत वादात पडू नका. काही ठिकाणी मौन पाळणेच श्रेयस्कर. मित्रांना सल्ले देऊ नका. जुने येणे वसूल होईल. उधार-उसनवारी टाळा. बँकेची कागदपत्रे तपासूनच त्यावर सही करा. समाजकार्यात कौतुक होईल. व्यवसायात फायदे मिळतील. प्रेमप्रकरणात डोकेदुखी वाढेल. सरकारी कामे सहज पुढे सरकतील. अचानक मोठा खर्च निर्माण होईल. आर्थिक नियोजन करा. मुलांच्या डोक्यातल्या नव्या संकल्पनांना चांगले यश मिळेल.

कर्क : साहसी वृत्ती दाखवण्याच्या भानगडीत पडू नका. आश्वासने देऊ नका. जपून बोला. नातेवाईकांशी जमवून घ्या. नोकरीत आत्मविश्वासात वाढ होईल. मोठे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्या. कामानिमित्ताने लहान-मोठे प्रवास कराल. लेखी व्यवहारात काळजी घ्या. तरुणांनी नवी संधी काळजीपूर्वक स्वीकारावी. लेखक, चित्रकार, खेळाडूंसाठी चांगला काळ. व्यवसायात सकारात्मकता आणि उत्साह वाढीस लावणार्‍या घटना घडतील. नोकरीनिमित्ताने विदेशात जाण्याची संधी मिळेल.

सिंह : ठाम राहा. निर्णय विचारपूर्वकच घ्या. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. घरात आनंददायी बातमी कळेल. जपून बोला, गैरसमज टाळा. व्यवसायात निर्णय घेताना घाई करू नका. सामाजिक कार्यात गौरव होईल. नोकरीत काम आणि वेळेची सांगड घाला. नोकरीत प्रगती होईल. प्रेमप्रकरणात वाद होतील. मित्रांशी बेताल बडबड करू नका. व्यवसायात आर्थिक आवक मनासारखी राहील. उधार-उसनवारी टाळा. बँकेची कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. कुटुंबात छोटे वाद घडतील. मार्वेâटिंगमध्ये यशदायी काळ.

कन्या : कामाचा आळस करू नका. शब्द जपूनच वापरा. ज्येष्ठांशी वाद टाळा. घरात समंजसपणा दाखवा. कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करा. नोकरीत नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. व्यवसायात वेळेचे गणित चुकवू नका. जुन्या गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. आर्थिक नियोजनात खबरदारी घ्या. समाजकार्यातून आनंद मिळेल. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. आर्थिक ताळमेळ घालताना गोंधळ होऊ शकतो, काळजी घ्या.

तूळ : आर्थिक व्यवहारात गोंधळ टाळा. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. पत्नीच्या मदतीने काम पुढे जाईल. सार्वजनिक ठिकाणी कायदा-नियमांचे पालन करा. कौटुंबिक वातावरण उत्तम ठेवा. किरकोळ वादाकडे दुर्लक्ष करा. शब्दामुळे संघर्ष निर्माण होऊ देऊ नका. मनातल्या गोष्टी पटकन बोलू नका, त्यामुळे ध चा मा होईल. नोकरीत संयम कामाला येईल. आर्थिक बाजू उत्तम राहील. व्यवसायात दगदग होईल. तरुणांच्या मनासारखी कामे होतील. मित्रांबरोबर वेळ खर्च कराल. कलाकारांसाठी उत्तम कालावधी. कर्तृत्व उजळेल. नावलौकिकात भर पडेल. सरकारी कामात सरळ मार्ग पत्करा.

वृश्चिक : संयम ठेवा. नोकरी-व्यवसायात विचारपूर्वक जा. नव्या ओळखीच्या व्यक्तीला मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू नका. मित्रांशी बोलताना जुन्या वादांना पुन्हा फोडणी देऊ नका. विदेशात शिक्षणाचा विषय पुढे सरकेल. कोणाच्या चुका दाखवत बसू नका. घरात छोटेखानी समारंभ होईल. तरुण आत्मविश्वासाच्या जोरावर बाजी मारतील. किरकोळ कुरबुरींकडे लक्ष देऊ नका. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. नोकरीत कौतुक होईल. वरिष्ठ शाबासकी देतील.

धनु : वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. व्यवसायात बुद्धिचातुर्याच्या जोरावर यश मिळेल. मुलांकडून चांगली बातमी समजेल. तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. कोणत्याही घटनांमध्ये भावनिक अडकून पडलात तर त्रास होईल. विदेशात व्यवसाय वाढवण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. सार्वजनिक जीवनात डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर हे तत्व सोडू नका. पत्नीशी संवाद करताना गोडवा राखा. घरात आपले म्हणणे पुढे रेटू नका.

मकर : कामे पूर्ण अधिक कष्ट घ्या. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. अहंकार दूर ठेवा, अवघड कामे सोपी होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मताचा आदर करा. नवीन ठिकाणी मोठी गुंतवणूक करताना विचार करा. घरात मालमत्तेच्या चर्चा पुढे सरकतील. नातेवाईक, मित्र यांच्याशी जमवून घ्या. व्यवसायात काम आणि आमदनी वाढेल. नवे वाहन घेण्याचे नियोजन कराल. महिलांना यश मिळेल. नव्या व्यवसायाच्या कल्पना पुढे सरकतील. वाणीवर नियंत्रण ठेवा, कामापुरतेच बोला. थकीत येणे वसूल होईल.

कुंभ : नियोजनपूर्वक केलेली कामे सहज पुढे जातील. नोकरीच्या ठिकाणी चुका टाळा. ब्रोकर मंडळींनी आर्थिक व्यवहारात सजग राहावे. भावंडांशी जमवून घ्या. सार्वजनिक ठिकाणी जपून बोला. नव्या व्यवसायाची कल्पना पुढे नेताना घाई करू नका. मुलांना अपेक्षित यश मिळेल. तरुणांच्या कामाला विलंब होईल. नव्या नोकरीची संधी मिळेल. स्पर्धेत यश मिळेल. घरात कामावर लक्ष द्या, चुका टाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या. नियोजनातून वेळ आणि पैसे वाचतील.

मीन : कोणावरही विसंबून राहू नका, कामाचा खोळंबा होईल. कलाकारांना यश मिळेल. प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीतून सकारात्मक गोष्टी घडतील. मित्रांना मदत करावी लागेल. व्यवसायात अधिकचे कष्ट घ्या. मामा-मावशींची मदत मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. तरुणांना यश मिळेल. नव्या वास्तूच्या संदर्भातील चर्चा पुढे सरकतील. व्यावसायिक मंडळींना अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. भागीदारीत सबुरीने घ्या. घेणे हिताचे राहील. विदेशात शिक्षणासाठी जाण्याचा प्रयत्न यशस्वी होईल.

Previous Post

लोकां सांगे ब्रह्मज्ञान…

Next Post

नाय नो नेव्हर

Next Post
नाय नो नेव्हर

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.