• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य (३ ते ९ ऑक्टोबर)

भास्कर आचार्य

Marmik Team by Marmik Team
October 1, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

ग्रहस्थिती : हर्षल वृषभेत, मंगळ मिथुनेत, गुरु कर्केत, शुक्र तुळेत, प्लूटो मकरेत, राहू कुंभेत, शनि नेपच्युन मीनेत, रवि-केतु सिंहेत, बुध कन्या राशीत. दिनविशेष : ३ ऑक्टो. कालाष्टमी, ४ ऑक्टो. अविधवा नवमी, ६ ऑक्टो. इंदिरा एकादशी, ८ ऑक्टो. प्रदोष, शिवरात्री, ९ ऑक्टो. अमावस्या आरंभ, रा. ९ वा. ३५ मि.

 

मेष : नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामानिमित्त प्रवास कराल. सामाजिक कार्याचा सन्मान होईल. घरात मतभेद होतील. मित्रांमधील मतभेद दूर होतील. भागीदारीतील व्यवहार त्रास वाढवतील. बँकेची कामे करताना गोंधळ होईल. आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. ब्रोकरांनी अधिकची काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी वागताना जपून. व्यवसायाच्या ठिकाणी घाई नको. तरुणांनी ध्येय निश्चित ठेवावे. मोठे काम करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सरकारी कामात घाई टाळा. मुलांचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. घरात ज्येष्ठांशी जपून बोला.

वृषभ : कार्यकर्तृत्वात भर पडेल. नोकरी-व्यवसायानिमित्ताने प्रवास कराल. व्यवसायात मोठे यश मिळेल. नवीन घर घेण्याचा विचार पुढे सरकेल. जनसपंर्क क्षेत्रात चांगले अनुभव येतील. तरुणांना नवी नोकरी मिळेल. उच्च शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. भागीदारी व्यवसाय तेजीत राहील.विवाहेच्छुकांसाठी आगामी काळ चांगला राहील. जुने मित्र-मैत्रीण भेटतील. घरात आनंद वाढवणारी बातमी कळेल. आर्थिक गणित बिघडेल. नोकरीत सकारात्मक विचार करा. व्यक्तिमत्व प्रभावी होण्यास मदत होईल.

मिथुन : आठवड्याच्या सुरुवातीला कटकटींना तोंड द्यावे लागेल. नोकरीत सबुरीने घ्या. किरकोळ वादात डोके घालू नका. व्यवसायात काळजीपूर्वक निर्णय घ्या. मुलांकडून आनंद वाढवणारी बातमी कळेल. परदेशी जाण्याचे नियोजन सफल होईल. खेळाडूंना यश मिळवण्यासाठी वाढीव कष्ट करावे लागतील. तरुणांचा उत्साह वाढवणार्‍या घटना घडतील. आतापर्यंत अडकून राहिलेली कामे पुढे सरकतील. कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना मानसन्मान मिळण्याचे योग. महिलांच्या आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. वायफळ खर्च करणे टाळा.

कर्क : कामानिमित्ताने होणार्‍या प्रवासात वेळापत्रक बिघडेल. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या. पती-पत्नीत वाद होतील. नोकरीत जबाबदारी वाढणार आहे. व्यवसायात नव्या योजना यशस्वी होतील. तरुणांनी रागावर नियंत्रण ठेवावे. आर्थिक बाजू नीट सांभाळा. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्या. कोर्ट प्रकरणे मार्गी लागतील. सार्वजनिक जीवनात कटकटी टाळा. प्रेमप्रकरणात अरेला कारे करू नका. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. प्रवासात काळजी घ्या. संसर्गजन्य आजारांपासून सावध राहा.

सिंह : व्यवसायात कामाच्या तुलनेत नफा कमी मिळेल. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लावणे कठीण जाईल. आरोग्याच्या समस्या डोकेदुखी वाढवतील. तरुणांचा कामात अधिक वेळ खर्ची पडेल. दाम्पत्यजीवनात आनंदाचे क्षण अनुभवाल. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. जुन्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. बँकेत अडकून राहिलेली कामे पूर्ण होतील. बंधूंंशी जमवून घ्या. नवीन वास्तू खरेदीच्या योजना पुढे ढकला. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.

कन्या : व्यवसायात नवीन योजना यशस्वी होतील. मित्र-मंडळींबरोबर मौजमजेवर खर्च होतील. नोकरीत कामाची नवीन जबाबदारी मिळेल. पगारवाढ, प्रमोशनचे योग आहेत. जुने येणे वसूल होईल. खेळाडूंना यशदायी काळ. अचानक धनलाभाच्या घटना घडतील. चित्त अस्थिर होऊ देऊ नका. मोठे काम करताना संयम ठेवा. आठवड्याच्या मध्यास घरामधील वातावरण बिघडू देऊ नका. महिलांना यश मिळेल. अडकलेले सरकारी काम पूर्ण होईल. व्यवसायात नवे प्रयोग करताना वेळ पाहून निर्णय घ्या. बोलताना काळजी घ्या. सकारात्मक गोष्टींचा विचार करा.

तूळ : व्यवसायात निर्णय चुकतील. काळजीचे वातावरण निर्माण होईल. आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. जुन्या गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. सरकारी कामे पुढे नेण्यासाठी शॉर्टकट वापरू नका. मित्रांच्या मदतीला धावून जावे लागेल. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. तरुणांना नोकरीच्या संधी चालून येतील. घरात आनंद वाढवणारी बातमी कळेल. भागीदारीत उत्तम यश मिळेल. प्रवासात काळजी घ्या. मौजमजा टाळा. बँकेत आर्थिक व्यवहार करताना दक्ष राहा. खेळाडूंना यशदायी काळ. विवाहेच्छुकांना चांगली बातमी कळेल. घरात टोकाची भूमिका टाळा. जुना आजार डोके वर काढेल.

वृश्चिक : व्यवसायात चांगले लाभ होतील. नोकरीत प्रमोशनचे योग आहेत. मालमत्तेचा प्रश्न मार्गी लावताना काळजी घ्या. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार पुढे सरकेल. आर्थिक बाजू चांगली राहील. तरीही आर्थिक नियोजन कराच. आगामी काळात खर्च वाढेल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. कुटुंबात एका शब्दामुळे मोठे वाद होऊ शकतात, काळजी घ्या. तरुणांना यश मिळेल, तरी त्यासाठी वाढीव कष्ट घ्यावे लागतील. कामांत वेळेचे गणित बिघडेल.

धनु : नोकरीत प्रमोशनचे योग आहेत. तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. व्यवसायात नव्या योजनांची अंमलबजावणी टाळा. महिलांना सामाजिक चळवळीत काम करण्याची संधी मिळेल. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षकांसाठी चांगला काळ. चांगली बातमी कानी पडेल. मित्रांशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. मोठा आर्थिक व्यवहार करण्याआधी ज्येष्ठांचा सल्ला घ्या. लेखक, प्रकाशकांना नव्या संधी मिळतील. विदेशात व्यवसाय विस्ताराची चर्चा पुढे सरकेल. सरकारी कामांत नियम तोडू नका. कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी चालून येईल.

मकर : मित्रांशी वाद होतील. मौज-मजेकडे कल राहील. नोकरीत कामाची जबाबदारी वाढेल. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. समाजकार्याचा गौरव होईल. नवीन गुंतवणुकीच्या भुलभुलैयामध्ये आर्थिक नुकसान होईल. नोकरीत वाद होतील. वरिष्ठ नाराज होतील. व्यवसायात तेजीचा अनुभव येईल. नव्या ऑर्डर मिळतील. वेळेचे आणि कामाचे गणित बिघडेल. उधार उसनवारीचे व्यवहार मनस्ताप वाढवतील. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. कलाकार, संगीतकार, क्रीडापटूंना मान-सन्मानाचे योग आहेत. कोणाला सल्ले देणे, मदतीची अपेक्षा ठेवणे टाळा.

कुंभ : घरात वाद होतील. व्यवसायात गुंतवणूक करताना काळजी घ्या. नोकरीत मर्जी सांभाळून काम करा. नव्या व्यवसायाची सुरुवात करताना घाई टाळा. कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर पडतील. घरासाठी महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह होईल, आर्थिक बाजू पाहून निर्णय घ्या. नवीन गुंतवणूक करताना घाईत निर्णय घेऊ नका. सरकारी कामे नियमात राहूनच पूर्ण करा. कलाकारांना यशदायी काळ. सार्वजनिक जीवनात जपून वागा. समंजस भूमिका कामाला येईल. तरुणांना व्यवसायाचे नवे मार्ग सापडतील.

मीन : ज्येष्ठांचा मान ठेवा. व्यवसायात चांगले उत्पन्न मिळेल. लहान शंका मोठी समस्या निर्माण करेल. नोकरीत कामाचा गोंधळ उडेल. जुने आजार डोकेदुखी वाढवतील. प्रेम प्रकरणात आणि मित्रांशी वाद होतील. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. मामा-मावशीची मदत मिळेल. भागीदारीत आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. अति आत्मविश्वास दाखवणे, प्रतिक्रिया देणे टाळा. विवाहइच्छुकांसाठी चांगला काळ. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. व्यवसायात मोठा निर्णय घेताना सल्ला घ्या. संततीकडून चांगली बातमी कळेल. आठवड्याअखेरीस व्यावसायिकांना कर्तृत्व सिद्ध करता येईल.

Previous Post

कबुतर आ ऽ आ ऽऽ आ ऽऽऽ

Next Post

मोहजाळ्यातून ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.