• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य (२९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६)

भास्कर आचार्य

Marmik Team by Marmik Team
August 28, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

ग्रहस्थिती : हर्षल वृषभ राशीत, मंगळ मिथुनेत, रवि-बुध-गुरु कर्क राशीत, प्लूटो मकरेत, राहू कुंभेत, शनि-नेपच्युन मीनेत, केतू सिंहेत, शुक्र कन्या राशीत. दिनविशेष : ३१ ऑगस्ट संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रा. ८ वा. ४७ मि., ४ सप्टेंबर कालाष्टमी, श्रीकृष्ण जयंती.

 

मेष : आपल्या कीर्तीत भर पडेल. नोकरीत सामोपचाराने घ्या. कुटुंबात वाद टाळा. व्यवसायात कामाचे गणित चुकेल. आर्थिक नुकसान टाळा. मुलांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे. थकीत येणे वसूल होईल. तरुणांच्या मनासारखी कामे होणार नाहीत. प्रवासात विशेष काळजी घ्या. अहंकार टाळा. संयम कामी येईल. लॉटरी, सट्टा यात आर्थिक फटका बसेल. आध्यात्मिक गाठीभेटींतून सकारात्मक ऊर्जा वाढेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. हेकट वृत्ती बाजूला ठेवा. महिलांना आनंददायी अनुभव येतील. अडकलेले वास्तूचे प्रश्न मार्गी लागतील. मित्रांशी वाद होतील. संततीकडून चांगली बातमी कळेल. साहित्य, कला, संगीत क्षेत्रात सन्मान होईल.

वृषभ : नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. घरात कटकटी होतील. व्यवसायात कामाकडे दुर्लक्ष होईल. मुलांकडून आनंददायी बातमी कळेल. नवीन योजना लांबणीवर पडतील, कामाचे गणित बिघडेल. आर्थिक गणित सांभाळण्यासाठी कसरत करावी लागेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. सार्वजनिक जीवनात वाद टाळा. नवी गुंतवणूक करताना घाई नको. तरुणांनी विचारपूर्वक पुढे जावे. नव्या ओळखीतून अडकलेले काम मार्गी लागेल. खिशात वाढीव पैसे राहतील. बँकेची कामे मार्गी लागतील. सरकारी कामे पुढे सरकतील. भावंडांचे सहकार्य मिळेल. महिलांच्या आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील.

मिथुन : नोकरीत मनासारखी स्थिती राहील, पण अधिकचे कष्ट पडतील. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. प्रेमप्रकरणात वाद घडतील. व्यवसायात नव्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल. नव्या मालमत्तेच्या खरेदीचा विषय मार्गी लागेल. तरुणांना नव्या नोकरीची संधी चालून येईल. महिलांना नशिबाची चांगली साथ मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. ज्येष्ठांची मने दुखावू नका. जुने आजार डोके वर काढतील. सामाजिक क्षेत्रात कौतुक होईल. राग व्यक्त करणे टाळा. वाहन चालवताना काळजी घ्या, अपघात टाळा.

कर्क : व्यवसायात नव्याने मोठी गुंतवणूक करू नका. नोकरीत वाद होतील. मित्रांमध्ये मोजकेच बोला, सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. आर्थिक नियोजनात चुका टाळा. मालमत्तेच्या चर्चा पुढे ढकला. जुन्या गुंतवणुकीमधून लाभ मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. प्रेमप्रकरणात वाद वाढतील. घरात महत्वाच्या विषयांवर चर्चा पुढे ढकलावी लागेल. आठवड्याअखेर सकारात्मक ऊर्जा वाढेल. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. खेळाडूंना चांगली बातमी मिळेल. ज्येष्ठांशी वाद वाढवू नका. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल.

सिंह : नोकरीत कामामध्ये बदल होईल. व्यवसायात कष्टाचे काम करावे लागेल. नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. तरुणांची द्विधा मनस्थिती राहील. भागीदारीत वाद घडतील. आमदनी आणि खर्चाचा मेळ घाला. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. महिलांना यश मिळेल. छोटेखानी सहलीचे आयोजन होईल. विदेशातील व्यापारात अपेक्षित यश मिळेल. नातेवाईकांशी बोलताना गैरसमज होतील. संततीकडून चांगली बातमी कळेल. वाहन चालवताना वेगावर स्वार होऊ नका. सामाजिक कार्यातून आनंद मिळेल.

कन्या : घरात पूजा होईल. वातावरण आनंददायी राहील. नोकरीत चांगली स्थिती राहील. कामासाठी दगदग कराल. आर्थिक गणित विस्कटू शकते. अवास्तव खर्च टाळा. बँकेची कामे मार्गी लागतील. मुलांना यश मिळेल. तरुणांना नव्या संधी चालून येतील. सरकारी कामे मार्गी लावताना मध्यस्थी टाळा. नोकरीनिमित्ताने प्रवास कराल. खिसा-पाकीट सांभाळा. अनोळखी व्यक्तीकडून फसवणूक होईल. नवीन वास्तू घेण्याचा विचार मार्गी लागेल. कामाचा ताण वाढेल. धावपळ करावी लागेल. मनासारख्या घटना घडतील.

तूळ : घरासाठी अचानक पैसे खर्च करावे लागतील. व्यवसायात मोठे यश मिळेल. नोकरीत कौतुक होईल. जुनी गुंतवणूक मोठा लाभ मिळवून देईल. व्यवसायात नव्या योजना यशस्वी होतील. मालमत्ता खरेदी करताना जाणकारांचा सल्ला घ्या. विदेशात उच्च शिक्षण घ्याल. प्रवासात काळजी घ्या. तरुणांना अस्वस्थ करणारे प्रसंग घडतील. प्रेमप्रकरण डोकेदुखी वाढवेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. आर्थिक बाजू सांभाळताना काळजी घ्या. आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. मित्रांमध्ये वावरताना आपणच योग्य असल्याचे दाखवणे टाळा. बँकेच्या कागदपत्रावर सही करताना काळजी घ्या. नवीन गुंतवणूक करताना मोठ्या अमिषाला बळी पडू नका.

वृश्चिक : घरासाठी खर्च होईल. नोकरीत जबाबदारी वाढेल. सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग वाढेल. व्यवसायात यश मिळेल. नव्या ऑर्डर मिळतील, जुने येणे वसूल होईल. हॉटेलिंग, मौजमजा, छोटेखानी सहल यावर तरुणांचा वेळ खर्च होईल. अचानक मनासारखी नोकरी चालून येईल. परिस्थिती पाहून निर्णय घ्या. मनातल्या गोष्टी उघड करू नका. अनोळखी व्यक्तीचा सल्ला ऐकून काही करू नका. पोटाच्या विकाराला निमंत्रण मिळू शकते. कुटुंबातील वातावरण आनंद देणारे राहील. ाfशल्पकार, चित्रकारांचा गौरव होईल. संयम बाळगा. युवा वर्गाचे अडलेले प्रश्न मार्गी लागतील.

धनु : घरातील वातावरण शांत ठेवा. जोडीदाराशी वाद टाळा. भागीदारीत वाद होतील. महिलांना यश मिळेल. राग व्यक्त करणे टाळा. सरकारी कामे चौकटीत राहूनच पूर्ण करा. नोकरीत मन:स्वास्थ्य खराब होईल. कामाचा कंटाळा येईल. व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना कराल. सकारात्मक ऊर्जा जागी ठेवा. शिक्षक, प्राध्यापकांना नव्या संधी येतील. किरकोळ वादाकडे दुर्लक्ष करा. संयम ठेवा आणि अहंकार दूर ठेवा. कुटुंबाशी जुळवून घ्या. निर्णय घेताना भावनेत गुंतू नका. आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करा.

मकर : आत्मविश्वास वाढेल. नोकरीत काळजी घ्या. मुलांना शिक्षणात यश मिळेल. घरातील ज्येष्ठांचा आदर ठेवा. नवीन वास्तू घेण्याचा विचार पुढे सरकेल. व्यवसायात संयम ठेवा. तरुणांना, महिलांना मोठे यश मिळवून देणारा काळ. अडकलेली कामे पुढे सरकतील. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कलाकारांचा गौरव होईल. नोकरीत आतातायीपणा महागात पडेल. मनाविरुद्ध घटना घडतील. व्यवसायात नव्या संधी चालून येतील. शेअर, लॉटरीमधून काहीजणांना लाभ मिळेल. रियल इस्टेटमध्ये लाभ देणारा काळ. कलाकार, संगीतकार, खेळाडूंसाठी चांगला काळ. उधार देण्याचे टाळा.

कुंभ : घरात किरकोळ वाद वाढू देऊ नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. महिलांना आरोग्याचे प्रश्न त्रास देतील. पत्नीशी जमवून घ्या. नोकरीत कामाचा ताण वाढेल. व्यवसायात निर्णय चुकतील. मनातल्या गोष्टी सांगू नका. ब्रोकर, मार्वेâटिंग क्षेत्रात यश मिळेल. तरुण बुद्धीच्या जोरावर यश मिळवतील. ज्येष्ठांशी बोलताना जपून. समाजसेवेत चांगला अनुभव आल्याने कामाचा हुरूप वाढेल. मित्रमंडळी मदतीला धावून येतील. खेळाडूंना यश देणारा काळ. तरुणांचे विदेशात शिक्षण घेण्याचे प्रयत्न सफल होतील.

मीन : व्यवसायात यश मिळेल. कुटुंबाला सहलीला घेऊन जाल. नोकरीत वरिष्ठांशी जमवून घ्या. जुने मित्र भेटतील. मित्रांच्या बाबतीत संशयाचे वातावरण निर्माण होईल. घरातील वाद सामोपचारने मिटवा. बँकेची कामे करताना खबरदारी घ्या. कुठेही सही करताना काळजी घ्या. नवीन वाहन घेण्याच्या विचाराला गती मिळेल. प्रेमप्रकरणात जरा जपून. व्यावसायिकांना कल्पनाशक्ती आणि कौशल्याचा वापर करावा लागेल. तरुणांची कामे मार्गी लागतील. संसर्गजन्य आजारामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

Previous Post

…म्हणून मीच हवा, मीच हवा, मीच हवा!

Next Post

गंध वेलदोड्याचा, कणाने स्वाद वाढविण्याचा…

Next Post
गंध वेलदोड्याचा, कणाने स्वाद वाढविण्याचा…

गंध वेलदोड्याचा, कणाने स्वाद वाढविण्याचा...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.