ग्रहस्थिती : मंगळ मेष राशीत, गुरु-शुक्र मिथुन राशीमध्ये, प्लूटो मकर राशीत, राहू कुंभ राशीत, शनि-नेपच्युन मीन राशीत, रवि-बुध-हर्षल वृषभेत, केतू सिंह राशीमध्ये. दिनविशेष :२३ मे दुर्गाष्टमी, २७ मे कमला एकादशी, बकरी ईद, २८ मे प्रदोष.

मेष : नवीन ओळखींमधून फायदे होतील. घर घ्याल. सरकारी कामे झटपट पूर्ण होतील. मुलांशी वाद टाळा. नोकरीनिमित्त प्रवास कराल. तरुणांनी वेंधळेपणा टाळावा. घरात आनंद वाढेल. नव्या व्यवसायाच्या कल्पना सुचतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अति विश्वास दाखवू करू नका. शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. लहान चुका डोकेदुखी वाढवतील. व्यवसायात व क्रीडाक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अधिकचे प्रयत्न करावे लागतील. मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या. मित्रांशी अति करू नका. उधार उसनवारी टाळा. महिलांना यश देणारा काळ. ब्रोकरना चांगले यश मिळेल.

वृषभ : तरुणांना कामानिमित्ताने विदेशात जाण्याची संधी मिळेल. व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना कराल. वेळ आणि कामाचे गणित सांभाळा. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. पत्रकार, लेखक, संपादकांच्या कामाचा गौरव होईल. बोलताना काळजी घ्या. सामाजिक क्षेत्रात गौरव होईल. आर्थिक बाजू भक्कम ठेवा. मौजमजेवर खर्च टाळा. येणे वसूल होईल. घरातील अडकलेले प्रश्न मार्गी लागतील. नवीन गुंतवणूक जपून करा. प्राध्यापकांना यशदायी काळ. आई-वडिलांची प्रकृती सांभाळा.

मिथुन : कामे वेगाने पूर्ण होतील. व्यवसायात महत्वाचे करार होतील. मुलांकडून आनंद वाढवणारी बातमी समजेल. कुटुंबासोबत पर्यटनाला जाल. तरुणांना शिक्षणात अपेक्षित यश मिळेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. जागरणातून आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. घरातील ज्येष्ठांच्या मताचा आदर करा. महिलांनी आरोग्य सांभाळावे. शिक्षण क्षेत्रात उत्तम काळ. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या.नातेवाईकांशी वाद टाळा. प्रवासात काळजी घ्या. वाणीवर नियंत्रण ठेवा.

कर्क : आर्थिक बाजू सांभाळा. मोठे निर्णय टाळा. नोकरीत वाद होतील. कलाकारांचा उत्कर्ष होईल. विवाह जमवण्यासाठी चांगला काळ. सामाजिक कामाचा गौरव होईल. तरुणांना नोकरी मिळेल. काहींना अचानक धनलाभ होतील. खेळाडूंना यश मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. छोटा समारंभ होईल. व्यवसायात, गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ होतील. जुने आजार डोके वर काढतील. ध्यान-धारणेमधून सकारात्मकता वाढेल. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाऊ शकाल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या.

सिंह : मनासारख्या घटना घडतील. तरुणांना यश मिळेल. मुले आनंद वाढवतील. लग्न जमेल. नोकरदारांना दूरचे प्रवास करावे लागतील. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. वेळेचे गणित जुळवा. व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. तरुणांचा मौज-मजेकडे कल राहील. मित्रांना मनातल्या गोष्टी सांगू नका. शेअर, लॉटरीपासून दोन हात दूर राहा. संततीच्या वागण्याकडे लक्ष द्या. अचानक धनलाभ होईल. व्यवसायाच्या नव्या कल्पनांना आकार मिळेल. नोकरीचा शोध संपेल. तब्येत सांभाळा.

कन्या : जवळच्या व्यक्तींबाबत सुवार्ता कानावर पडेल. नोकरीत पगारवाढ, प्रमोशनचे योग जुळून येतील. वरिष्ठ खूष होतील. मित्रांचा सल्ला कामी येईल. भावंडांची मदत होईल. मनातल्या सगळ्या गोष्टी ओठावर आणू नका. यशामुळे हुरळून जाऊ नका. संयम कामी येईल. घरकामात खूप वेळ खर्च होईल. व्यवसायवृद्धीसाठी नव्या योजना आखाल. भागीदारीत तसेच नवीन ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नोकरी-व्यवसायातील फायद्याच्या गोष्टी जगजाहीर करू नका.

तूळ : अपेक्षित यश मिळेल. सरकारी कामे पुढे सरकतील. शेअर, सट्टा, लॉटरीपासून दोन हात दूर राहा. नोकरीच्या संधी चालून येतील. शिक्षणाचे प्रश्न पुढे सरकतील. व्यवसायात यश मिळेल. नव्या ऑर्डर येतील. आमदनी आणि खर्चाचा मेळ घाला. प्रवासाचे अचूक नियोजन करा. मालत्तेचे व्यवहार करताना काळजी घ्या. बँकेची कामे पुढे सरकतील. उधार-उसनवारी टाळा. नवीन गुंतवणूक करण्याकडे कल राहील. मित्रांना आर्थिक मदत करताना विचार करा. थकीत येणे वसूल होईल. खिशात पैसे राहतील. आरोग्याची काळजी घ्या. भागीदारीत ताणतणाव वाढणारे प्रसंग घडतील.

वृश्चिक : भावना व्यक्त करणे टाळा. महिलांचा आदर करा. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. प्रवासात वाद टाळा. गुरुबळामुळे कामात यश मिळेल. आर्थिक नियोजन करा. वाहन चालवताना काळजी घ्या. कोणावर टीकाटिप्पणी करू नका. नोकरीत आत्मविश्वास वाढेल. नवीन घराचा प्रश्न मार्गी लागेल. घरात आपलेच म्हणणे रेटू नका. ज्येष्ठांचा सल्ला ऐका. गायक, कलाकारांना यश मिळेल. नव्या कामाच्या संधी चालून येतील. मनस्वास्थ्य सांभाळा. सामाजिक कार्यात मान वाढेल.

धनु : तरुणांच्या योजना सफल होतील. नोकरीत उत्तम स्थिती राहील. आरोग्याच्या समस्या त्रास वाढवतील. प्रवासात चोरीपासून सांभाळा. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. व्यवसायात नियोजन कामी येईल. पत्नीची साथ मिळेल. नव्या कल्पना व्यावसायिक यश मिळवून देतील. मित्रांशी वाद टाळा. व्यवहार करण्याआधी कागदपत्रांची तपासणी करा. नातेवाईकांना सल्ला देऊ नका. सामाजिक कार्यात वेळ खर्च होईल. जनसंपर्क क्षेत्रात चांगला काळ, नव्या ओळखी होतील, त्यामधून कामाच्या संधी मिळतील.

मकर : मित्रांकडून त्रास होतील. वाहनावर खर्च होईल. व्यवसायात यश मिळेल. तरुणांना विदेशात कामाची संधी मिळेल. घरात आनंद वाढेल. मुलांकडे लक्ष ठेवा. रागाला आवर घाला. तरुणांच्या मनावरील दडपण कमी होईल. स्पर्धेत यश मिळेल. व्यवसायात कष्ट पडतील. नोकरीत कामाचे कौतुक होईल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. बँकेत कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन संधी चालून येईल. कलाकार, अभियंत्यांना चांगले अनुभव येतील. कोर्ट-कचेरीची कामे लांबतील.

कुंभ : कामात शॉर्टकट अवलंबू नका. व्यवसायात बुद्धीच्या जोरावर यश मिळवाल. स्पर्धेचा सामना करावा लागेल. व्यवसायात नव्या कल्पना आकाराला येतील. आर्थिक नियोजनाचे गणित बिघडू शकते, काळजी घ्या. कलाकारांचा गौरव होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. नव्या नोकरीची संधी मिळेल. सामाजिक कार्यातून प्रतिष्ठा वाढेल. पत्नीकडून मदत मिळेल. सुगंधी द्रव्य, अत्तरे तयार करणार्यांना चांगला लाभ मिळेल. नोकरीच्या निमित्ताने दूरचे प्रवास कराल. भागीदारीत सबुरीने घ्या.

मीन : तरुणांना मोठे यश देणारा काळ. ब्रोकरचे काम वाढेल. शेअर, लॉटरीमधून लाभ होतील. घरात भरपूर वेळ खर्च होईल. मोठा निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मुलांना शिक्षणक्षेत्रात यश मिळेल. शिक्षक, प्राध्यापकांसाठीr उत्तम काळ. नवीन गुंतवणूक काळजीपूर्वक करा. नोकरीत प्रमोशन, पगारवाढ होईल. नोकरदारांच्या कामावर वरिष्ठ खूष राहतील. घरात छोटेखानी कार्यक्रमात नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. कुणाला सल्ले देऊ नका. व्यवसायात अडचणी येतील.
